सुख माझे कसे, मलाच महाग झाले
सोसवेना विरह , मन पिसे झाले
जपले आजवरी मी, गे कसे हरवले
अश्रु आज माझे, शुष्क कसे झाले
वेदना मनीची नच, जाणिली कुणी
भावनांचे आज, माझ्या हंसे झाले
डोळ्यात साठलेले, प्रेम लुप्त झाले
तुझे टाळणे मला, नित्य असे झाले
आता आठवांचेही, वार दुधारी झाले
शब्दांवर वेदनांचे, विकल ठसे झाले
विशाल
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1393
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त....
सोसवेना विरह , मन पिसे झाले
सुंदर.......
वेदना
वेदना मनीची नच, जाणिली कुणी
भावनांचे आज, माझ्या हंसे झाले
सुंदरच...
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
धन्यवाद. सस
धन्यवाद.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : https://www.misalpav.com/node/8120
आवडली.
शब्दांवर वेदनांचे, विकल ठसे झाले
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
आता
आता आठवांचेही, वार दुधारी झाले
शब्दांवर वेदनांचे, विकल ठसे झाले
व्वा! सुरेखच!
- (सर्वव्यापी)प्राजु
https://praaju.blogspot.com/