Skip to main content

अमृत धारा

लेखक जागु यांनी सोमवार, 15/06/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिक्षेत जीव हा दाहला विसंबली तुजवर जीवनमाला तुजविन हर जीव अधुरा आकाशी फाकल्या निल धमन्या डोंगरी आगी वाचुन वणवा सिंधू, तलावाची महानता पणाला घाल धाव बरसत जीवन धारा अधिर धरती तुज स्पर्शाला तुज संगच्या ओलपणाला गुदमरे अंकुर बी प्रसुतीला पशू पक्षी घालती कोरड ताना वृक्षे आतूर गार पल्लवीला ये रे बरसत अमृत धारा.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2221
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मस्त कवीता.. ये रे बरसत अमृत धारा. अगदी मला पण असेच वाटत आहे.. ____ नि शि गं ध ____

जागु मस्त्च !!! चुचु

आम्हीदेखील पावसाची वाट पाहतो आहोत... जागू, सुंदर कविता केली आहेस रे! तात्या.

पावसाला साद घालणारी कविता आवडली . क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

निशिगंध, मराठे, तात्या,क्रांती, प्राजू धन्यवाद.