घारे साहेब,
हरीने कोणत्या प्रसंगात गाढवाचे पाय धरले असतील, त्याची कथा पुराणकार सांगतील. पण या म्हणीचा उपयोग जगण्याच्या रहाटगाड्यात करावा लागतोच , हे मात्र खरं आहे ! :)
-दिलीप बिरुटे
(लौकिक जीवनातला हरी)
फिरकी आवडली!
पुराण ग्रंथातील अगम्य भाषेतुन हवे तसे अर्थ काढुन संभ्रम करणे माहीत होते, पण अश्या इतक्या सरळ म्हणींचे ही लोक "काय" अर्थ काढतील हे त्या 'हरी' लाच माहीत! :)
एका साध्या म्हणीचा इतका कीस? मजा वाटली.
>>अडला माणूस लबाड कोल्ह्याचे पाय धरी
हे थोडे दृष्टीकोनावर अवलंबून आहे. त्या कोल्ह्याला तो लबाडी करतोय असे खरोखरच वाटत नसू शकेल.
(ब्राह्मण श्रेष्ठ असे ब्राह्मणाने अब्राह्मणाला 'सांगणे' आणि ब्राह्मण श्रेष्ठ असे ब्राह्मणाला 'खरोखरच वाटणे' यातला जो फरक आहे तो)
खराटा
(रंग माझा वेगळा)
एकादा कोल्हा प्रामाणिक असू शकेल, पण कोल्ह्याला लबाडपणाचा गुण चिकटवून ठेवलेला असल्यामुळे ते दोन्ही शब्द बरेच वेळा एकसाथ येतात.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
हरी किंवा नारायण हे देव नसून माणसेच आहेत, असे गृहीत धरल्यास अडलेल्या हरीने गाढवाचेच काय पण डुकराचेही पाय धरल्यास नवल वाटू नये.
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
प्रतिक्रिया
अडला नारायण...
गमतीदार चर्चा
फिरकी
एका साध्या
शक्य आहे
घारे काका,
हेच
मुद्दे पटले.
आनंदराव, मज
हरी किंवा नारायण