आंब्याचे दिवस सरत आलेत. उसगावात मुष्कीलीने मिळणारे हापूस अगदी जपून खाताना चारच उरले होते. म्हटले कायतरी झकास बनवूयाच. त्यात संकष्टी चतुर्थीचे निमित्त होतच्(म्हणजे निमित्त केले हो..) म्हटले का नाही एखादा फक्कड बेत बनवूया. नमनालाच घडीभर तेल ओतून तुमची जिज्ञासा ताणून झाली आहेच तर हे घ्या खास मिपांकरांसाठी केसरी बेत.
केसरी मोदक, गवसणी आणि आमरस
आता गवसणी हा प्रकार खूपच कमी लोकांना माहीती आहे हे आलेय लक्षात इथे ह्या ओळीपर्यन्त आल्यावर.
गवसणीची गोष्टः गवसणी हा उकड कणकेत घालून बनवायचा प्रकार. कोकणात खूप आवडीने आमरसा बरोबर खल्ला जातो.
सामानः
गवसणी करता सामानः
१ वाटी सुवासीक तांदूळाची पिठी(ही मोदकासाठी लागते तीच घ्या),केसर, चिमूटभर भाजलेली बडीशेपची पूड आणि काळमीरीची पूड्,वेलची पूड, १ चमचा तूप आणि जराशी चिमटीभर साखर.
२ वाटी कणीक,तेल्,मिठ्,पाणी.
पांरपारीक गवसणीची उकड अशी करत नाहीत पण मी चवीसाठी केलेला फेरफार खूप वेगळी चव देवून गेला.(पारंपारीक उकड मध्ये बडीशेप अथवा काळमीरी घालत नाहीत).
आमरस सामानः
१ चमचा शुद्ध तूप्,चार पिकलेले हापूस आंबे(हापूस खेरीज दुसर्या आंब्याकडे ढूंकून पहात नाही आम्ही) :),केसर काड्या,वेलची पूड, किसलेले आले पाव चमचा.
ऊकडीचे मोदक सामानः
२ वाट्या सुवासीक तांदूळ पिठी, १/२ वाटी हापूस रस्,केसर काड्या, १ चमचा शुद्ध तूप,१/२ वाटी दूध, १ वाटी पाणी, चिमटीभर साखर अन मिठ जरासेच.
खोबर्याच गूळ टाकून चव्(ह्याची कृती माहीती आहेच सर्वांना)
कृती:
गवसणीची तयारी:
रोजच्यासारखी कणीक चपातीला मळतो तशीच मळावी पण जरा हलकी,मऊ मळावी व झाकून ठेवावी.
आता तांदूळाची उकडः
१ वाटी पाणी खदखदा उकळले की १ चमचा तूप्,केसर काड्या, वेलची पूड्,मिठ्,साखर्,बडीशेप पूड्,काळमीरी पूड टाकावी. मग तांदूळ पिठ टाकून त्यात चार खड्डे चमच्याने पाडून गॅस बंद करून झाकून ठेवावी. मग बेताची गरम असताना मस्त शुद्ध तूपाचा हात लावून मळून झाकून ठेवावी १५-२० मिनीटे.
कणीकेचा उंडा घ्यावा आता एक वरील उकडीचा मावेल इतपत गोळा घेवून पूरणपोळीसारखे नाजूक हाताने लाटत जावे. हात अलगद ठेवावा. मस्त पातळ लाटली इतकी आतली उकड बर्यापैकी दिसेल पण फाटून बाहेर नाही येइल अशी लाटली की गरम तव्यावर पूपो सारखी भाजावी. आतील उकडीच्या केसराचा घमघमाट सुटतो. खाली काढून घडी करून हातानेच दाबून ठेवून मग तूपाची धार सोडावी. अतीशय मऊ, पापूद्रे सुटलेली अशी गवसणी तयार.
उकडीचे मोदक उकडः
१/२ वाटी हापूस रस घेवून त्यात १/२ वाटी दूध मिक्स करून १ वाटी पाणी मिक्स करायचे. गॅस वर खदाखदा उकळवून मग त्यात चिमटीभर साखर, १ चमचा शुद्ध तूप, मिठ व केसर टाकून मगच सुवासीक तांदूळ पिठी घालावी. चार खड्डे पाडून झाकण मारून गॅस बंद करावा. बेताचे गरम असताना मस्त मळून घ्यावी ताटात. मऊ मुलायम केसरी रंगाची अशी उकड झाली मोदकाला तयार. केसरी रंग खूप खूलून दिसतो.
रोजच्या सारखा नारळाच चव करा मग मोदक बनवून उकडा १० मिनीटे मोदक पात्रात.
आमरसाची तयारी:
हा एक खास रीतीने केला जातो. आमरस काढला की त्यात १ चमचा शुद्ध तूप्(चांगले असते तूप टाकणे उष्ण आंबा बाधत नाही). वरून वेलची पूड्,जायफळ पूड,केसर टाकून ढवळून थंड करून घ्यावा.
असा तिहेरी बेत गावची आठवण काढत खावा. :)
फोटो येत आहे................ जरा सबूरी ठेवा. :)
वाचने
8669
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय मस्त दिसतंय
सगळाच बेत
केशर
काय राव?
In reply to केशर by कोलंबस
झकास
आता मिपावर येण बंद कराव लागणार बा!
असा फक्कड
असेच म्हणतो
In reply to असा फक्कड by रेवती
छान
फतकल
In reply to छान by चकली
भारी
नको 'देव' राया अंत असा पाहु...
आई ग्ग्ग्गं!!!!
नि:शब्द
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
केसरी
वाह ! तेरा
वाह! वा!
In reply to वाह ! तेरा by परिकथेतील राजकुमार
गवसणी
धन्यवाद
डोळे
डोळे दिपले..
हारलो..! माझ
पुन्हा
पाकृ मस्तच !!
वा..
....
अश्वीनी३३
चित्राताई,
मस्त
मस्त