Skip to main content

केसरी महोत्सव

लेखक चित्रादेव यांनी गुरुवार, 11/06/2009 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
आंब्याचे दिवस सरत आलेत. उसगावात मुष्कीलीने मिळणारे हापूस अगदी जपून खाताना चारच उरले होते. म्हटले कायतरी झकास बनवूयाच. त्यात संकष्टी चतुर्थीचे निमित्त होतच्(म्हणजे निमित्त केले हो..) म्हटले का नाही एखादा फक्कड बेत बनवूया. नमनालाच घडीभर तेल ओतून तुमची जिज्ञासा ताणून झाली आहेच तर हे घ्या खास मिपांकरांसाठी केसरी बेत. केसरी मोदक, गवसणी आणि आमरस आता गवसणी हा प्रकार खूपच कमी लोकांना माहीती आहे हे आलेय लक्षात इथे ह्या ओळीपर्यन्त आल्यावर. गवसणीची गोष्टः गवसणी हा उकड कणकेत घालून बनवायचा प्रकार. कोकणात खूप आवडीने आमरसा बरोबर खल्ला जातो. सामानः गवसणी करता सामानः १ वाटी सुवासीक तांदूळाची पिठी(ही मोदकासाठी लागते तीच घ्या),केसर, चिमूटभर भाजलेली बडीशेपची पूड आणि काळमीरीची पूड्,वेलची पूड, १ चमचा तूप आणि जराशी चिमटीभर साखर. २ वाटी कणीक,तेल्,मिठ्,पाणी. पांरपारीक गवसणीची उकड अशी करत नाहीत पण मी चवीसाठी केलेला फेरफार खूप वेगळी चव देवून गेला.(पारंपारीक उकड मध्ये बडीशेप अथवा काळमीरी घालत नाहीत). आमरस सामानः १ चमचा शुद्ध तूप्,चार पिकलेले हापूस आंबे(हापूस खेरीज दुसर्‍या आंब्याकडे ढूंकून पहात नाही आम्ही) :),केसर काड्या,वेलची पूड, किसलेले आले पाव चमचा. ऊकडीचे मोदक सामानः २ वाट्या सुवासीक तांदूळ पिठी, १/२ वाटी हापूस रस्,केसर काड्या, १ चमचा शुद्ध तूप,१/२ वाटी दूध, १ वाटी पाणी, चिमटीभर साखर अन मिठ जरासेच. खोबर्‍याच गूळ टाकून चव्(ह्याची कृती माहीती आहेच सर्वांना) कृती: गवसणीची तयारी: रोजच्यासारखी कणीक चपातीला मळतो तशीच मळावी पण जरा हलकी,मऊ मळावी व झाकून ठेवावी. आता तांदूळाची उकडः १ वाटी पाणी खदखदा उकळले की १ चमचा तूप्,केसर काड्या, वेलची पूड्,मिठ्,साखर्,बडीशेप पूड्,काळमीरी पूड टाकावी. मग तांदूळ पिठ टाकून त्यात चार खड्डे चमच्याने पाडून गॅस बंद करून झाकून ठेवावी. मग बेताची गरम असताना मस्त शुद्ध तूपाचा हात लावून मळून झाकून ठेवावी १५-२० मिनीटे. कणीकेचा उंडा घ्यावा आता एक वरील उकडीचा मावेल इतपत गोळा घेवून पूरणपोळीसारखे नाजूक हाताने लाटत जावे. हात अलगद ठेवावा. मस्त पातळ लाटली इतकी आतली उकड बर्‍यापैकी दिसेल पण फाटून बाहेर नाही येइल अशी लाटली की गरम तव्यावर पूपो सारखी भाजावी. आतील उकडीच्या केसराचा घमघमाट सुटतो. खाली काढून घडी करून हातानेच दाबून ठेवून मग तूपाची धार सोडावी. अतीशय मऊ, पापूद्रे सुटलेली अशी गवसणी तयार. उकडीचे मोदक उकडः १/२ वाटी हापूस रस घेवून त्यात १/२ वाटी दूध मिक्स करून १ वाटी पाणी मिक्स करायचे. गॅस वर खदाखदा उकळवून मग त्यात चिमटीभर साखर, १ चमचा शुद्ध तूप, मिठ व केसर टाकून मगच सुवासीक तांदूळ पिठी घालावी. चार खड्डे पाडून झाकण मारून गॅस बंद करावा. बेताचे गरम असताना मस्त मळून घ्यावी ताटात. मऊ मुलायम केसरी रंगाची अशी उकड झाली मोदकाला तयार. केसरी रंग खूप खूलून दिसतो. रोजच्या सारखा नारळाच चव करा मग मोदक बनवून उकडा १० मिनीटे मोदक पात्रात. आमरसाची तयारी: हा एक खास रीतीने केला जातो. आमरस काढला की त्यात १ चमचा शुद्ध तूप्(चांगले असते तूप टाकणे उष्ण आंबा बाधत नाही). वरून वेलची पूड्,जायफळ पूड,केसर टाकून ढवळून थंड करून घ्यावा. असा तिहेरी बेत गावची आठवण काढत खावा. :) फोटो येत आहे................ जरा सबूरी ठेवा. :)

वाचने 8669
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

उसगावात चांगलं केशर कुठुन आणावं ते सांगाल का?

In reply to by कोलंबस

काय राव? उसगाव शोधणारे तुम्ही अन केशर कुठुन आणायचं विचारताय? ;)

एकदम मस्त आहे फोटो..:) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

असा फक्कड बेत व त्याचे फोटू देताना चित्रा देव यांना आमची दया कशी आली नाही? आता शिक्षा म्हणून त्यांनी सगळ्या मिपागावाला मेजवानीस बोलवावे. रेवती

In reply to by रेवती

आधी एकेका पदार्थाची रेसिपी यायची आता तर तिहेरी ... अरे जरा दया माया दाखवा रे :)

बेत फारच मस्त. आणि गवसणी ची माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद. बडीशेप चे इम्प्रो आवडले. चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

मारून खायला बसावेसे वाटते. :) विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

बेत भारी आहे. धन्यु.

केसरी महोत्सव छान आहे दिसायला. (मला मात्र आमचे गावराणी आंबेच जास्तं प्रिय! काय एकेकाची चव ती!! उगाच ते महाग किंवा कमी आहे म्हणून जपून खाणे नको... ) -अनामिक

वाह ! तेरा और तेरी पाकृ का क्या केहना ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाह ! तेरा और तेरी पाकृ का क्या केहना

आमरस आणि गवसणी छान दिसते आहे.

धन्यवाद सर्वांना!

दिपले, पुन्हा भूक लागली! काय एकेक सुगरण ताईंची कारागिरी! [आमची आयती खाबूगिरी!] क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

डोळे दिपले हे खरेच.. पण पोट हा छान छान खाऊ मागतेय त्याचं काय? 8> मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

हारलो..! माझ्याकडे तरी शब्द नाहीत! :) चित्रादेवांचा विजय असो..! :) त्यांनी यापुढेही मिपावर अश्याच उत्तमोत्तम व देखण्या पाकृ टाकाव्यात अशी त्यांना कळकळीची विनंती! तात्या.

पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना. तात्या, अहो, नुसते चित्रा म्हटले तरी चालेल. देव माझे लास्ट नेम म्हणजेच आडनाव आहे. :)

आत्ताचं जेऊन आले तरी परत तोंडाला पाणी सुट्लं गवसणी बरोबर आमरसच हवा का?? अश्विनि ....

फारच छान दिसत आहेत फोटो, झकास बेत झालेला दिसतो आहे. स्वाती

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

अश्वीनी३३७९, तुम्ही कोकणात घावन घाटले खाल्ले आहेत का? त्यांची जशी जोडी असते तसेच गवसणी अन आमरस ही जोडी आहे. आता कोणाला गवसणी आणि मटण रस्सा खायचा असेल तर खावू शकतो ना... बंदी नाही आहे. :) पण गवसणी आमरसाबरबरोच छान लागते. दुसरे ऑप्शन आहे मटण किंवा कोंबडी रस्सा जर हवेच असेल तर.... आधी आमरसाबरोबर खावून तर बघा. :)

आमरसाला घातलेली गवसणी आवडली! :) (चतुरंग)

आमरसाला घातलेली गवसणी आवडली +१ हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

आमरसाला घातलेली गवसणी आवडली +१ हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.