Skip to main content

(आय विश)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 09/06/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा सुवर्णमयीताईंची 'आय विश' ही कविता! ;) मराठी जालावर मोजक्या वर्षांचे नवकाव्य मागे मी वाचत वाचत. पद्यविभागात दिसणार्‍या नवकविता पाहून 'कर्म, कर्म' म्हणत होतो मी. वाचकांना वाचवण्याकरता दिल्या ढुशा मी त्या नवकवितांना ..कित्येकदा त्याने उंचावर दिसणार्‍या गोमट्या कविता बघितल्या..चढला वरती एक कल्पना घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश मर्ढेकर, आरती प्रभू , ग्रेस, धामणस्कर' डोक्यात आणखी एक कल्पना घेऊन गुळगुळीत कागदावर सुसाट पुढे लिहीत गेला.. मी वाचेस्तोवर एका वाचकावर नवकविता ठेवून ..गेला पुढे . मी धास्तावलो.. विचारले त्याला.. तो मागे फिरला, वाटेत अनेक अर्धमेले वाचक होते.. कधीचेच.. प्रत्येक वाचकाजवळ जात आय विश आय विश असे फुटफुटला मला म्हणाला, 'आता सगळे वाचक उठून वाचू लागतील, रिडल पझल सुटलं म्हणतील' 'आय विश' चतुरंग

वाचने 2850
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

काय पण नवकविता आहे. झिट यायचीच बाकी राहीली आहे. प्र. के. अत्रे आठवले. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

In reply to by मुक्तसुनीत

हुच्च!!

In reply to by सहज

+३

वाचकांना वाचवण्याकरता दिल्या ढुशा मी त्या नवकवितांना ..कित्येकदा =)) =)) =)) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

आय विश, आय विश मर्ढेकर, आरती प्रभू , ग्रेस, धामणस्कर':) वा॓! चालू द्या.

हा हा हा !!! रंगाशेट आय विश :) (तुम्हाला कळले असेलच मला काय म्हणायचे ते ;) ) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by संदीप चित्रे

>>>अपेक्षाभंग झाला नाही खरे आहे! ;)

त्याने उंचावर दिसणार्‍या गोमट्या कविता बघितल्या..चढला वरती एक कल्पना घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश मर्ढेकर, आरती प्रभू , ग्रेस, धामणस्कर' .. हे फार आवडलं, आणि आय विश आय विश असे फुटफुटला - हि ओळ तशीच ठेवली हे ही फार आवडलं.

लैच भारी विडंबन... आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!