Skip to main content

जास्तीत जास्त उत्क्रुष्ट मराठी चि़ञपट निर्माण होण्यसाठी कशाची गरज आहे?

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 26/02/2009 21:48 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1921
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

उत्कृष्ठ चित्रपट निर्माण होण्यासाठी १ व ४ या गोष्टी आवश्यक असल्या तरी या असल्या म्हणजे चांगला चित्रपट बनत नाही. त्यासाठी
  1. चांगली कथा असली पाहिजे.
  2. दिग्दर्शकाचे चित्रपट माध्यमावर प्रभुत्व असले पाहिजे. नाटक आणि सिनेमा ही वेगळी माध्यमे आहेत (दूरदर्शन हे अजूनच वेगळे माध्यम आहे) हे लक्षात घेतले पाहिजे. दृश्य पडद्यावर कसे दिसेल याचा अंदाज पटकथा लिहितानाच असला पाहिजे.
  3. चित्रपटाचे वाचाळपण कमी करायला पाहिजे.
  4. चित्रपट विनोदीच (पक्षी: आचरट) असला पाहिजे हा हट्ट सोडायला हवा.
  5. सध्या चित्रपट विनोदी तरी असतो किंवा मग एकदम सामाजिक जाणीववाला तरी असतो.
  6. मराठीच्या प्रेमासाठी प्रेक्षकांनी काहीही चालवून घ्यावे अशी अपेक्षा करता कामा नये.
अवांतरः सचिन व महेश कोठारे (आणि स्मिता तळवलकर) यांनी चित्रपट बनवणे बंद केले पाहिजे. (तिघांची क्षमा मागून. ही नावे घेतली म्हणजे इतर चांगले आहेत असे नाही) खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

In reply to by नितिन थत्ते

सुंदर प्रतिसाद, आवडला ...
अवांतरः सचिन व महेश कोठारे (आणि स्मिता तळवलकर) यांनी चित्रपट बनवणे बंद केले पाहिजे. (तिघांची क्षमा मागून. ही नावे घेतली म्हणजे इतर चांगले आहेत असे नाही)
+१, असेच म्हणतो. याशिवाय भरत जाधव, पॅडी कांबळे, सिद्धार्थ जाधव ह्यांनी सुद्धा लवकरात लवकर गाशा गुंडाळुन आपापल्या गावी प्रयाण केल्यास उत्तम ... मराठी चित्रपटांचे १ अख्खे तपच्या तप अलका कुबल नावाच्या रडुबाईच्या आश्रुमध्ये वाहुन गेले ... आता भरत जाधव त्याच्या टाकाऊ व पाचकळपणा असलेल्या अभिनयातुन तेच करतो आहे ... बाकी "गजेंद्र अहिरे" हा माणुस उत्तम चित्रपट बनवतो ह्याच्याशी सहमत. सरकारनामानंतर अजय झणकरही खास म्हणावे असे झळकले नाहीत. :( ------ छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

मकरंद अनासपुरेदे़खील. सुरवातीला चित्रपटात प्रचलीत भाषांपेक्षा वेगळी बोली प्रचारात आणल्यामुळे बरं वाटल. पण आता वीट आणतो, नवीन काही करतच नाही.

In reply to by नितिन थत्ते

मुळात कथाविषय सशक्त हवा. कथा पटकथा इ. ची बांधणी चांगली हवी. बाकी तंत्रज्ञान वगैरे गोष्टी दुय्यमच मानल्या पाहिजेत. अगदी तू तिथं मी, चौकट राजा आदि चित्रपट केवळ कन्टेण्ट वरच चाललेत. विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)

अतिशय सुंदर विश्लेषण...

खरोखर चांगला चित्रपट बनवण्याची इच्छा आणि जिद्द हवी .. पु. ल. देशपांडेंचा 'सबकुछ पु. ल.' असलेला "गुळाचा गणपती" याचं उत्कृष्ठ उदाहरण आहे .. त्यांच्या कडे ना मोठे भांडवल होते ना अधुनिक तंत्रज्ञान .... आणि प्रेक्षक कसा असेल हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेल ना ... चित्रपटांकडे केवळ व्यवसाय म्हणून बघणार्‍यांनी प्रेक्षकांना काय हवे काय नको हे स्वतःच ठरवले ... आणि स्वतःच्या कमी दर्जाच्या कलाकृती .. (त्यांना कलाकृती तरी का म्हणायचं हा प्रश्नच आहे) लोकांच्या माथी मारल्या आणि त्याचं समर्थन करण्याकरता ... हल्ली असेच चित्रपट लोकांना हवे असतात --- ही मखलाशी . खरोखरच लोकांची आवड अशी असती तर "श्वास", "नॉट ओन्ली मिसेस राउत" इ. सारखे चित्रपट त्यांनी पाहिलेच नसते . गजेंद्र अहिरेंचे चित्रपट खरोखरच बघण्यासारखे असतात ... त्यांनी 'मैत्र जिवांचे' मधील 'नाव आहे चाललेली -- काल ही अन् आज ही' या गाण्याचे चित्रीकरण केले आहे तेकेवळ अप्रतीम आहे

मराठी लोकंनी मराठी चित्रपटाला लोकाश्रय दीला पाहीजे. मराठी चित्रपट पहाणे म्हणजे कमीपणा हा विचार सोडुन दीला पाहीजे. काही मराठी लोक , भंगार हीन्दी चित्रपट पहातात पण मराठी बघत नाहीत.

मूळ कथा उत्तम हवी. सामना, सिंहासनसारखी! मध्यंतरीच्या काळात आलेल्या सचिन, कोठारे वगैरे मंडळींच्या सिनेमांनी मराठी सिनेमाची पार वाट लावली.. त्यात अशोक सराफ, लक्षा बेर्डे वगैरे मंडळींचा यथेच्छ फालतूपणाच होता. उत्तम मराठी चित्रपट हवा असेल तर राजाभाऊ परांजप्यांसारखी मंडळी हवीत..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आता राजाभाऊ, शांतारामबापू आणि तेंडुलकर राहिले नाहीत. जब्बार पटेल चित्रपट बनवीत नाहीत. मराठीच्या साठी काय वाटेल ते चालवून घ्यायचे का? मराठी चित्रपटात सोनाली बेन्द्रे असून काय उपयोग? तिच्यावर हिंदीच गाणे चित्रित होणार असेल तर? खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

आजकाल रंगभूमीवरचे अनेक ताकदीचे कलाकार चित्रपट सृष्टीत आहेत. ह्याच बरोबर, दिगदर्शक मंडळींना कोकण "पुन्हा" सापडलं आहे ('बापू', श्वास, देवराई इ.) एखादा बुद्धीवान बिपीन नाडकर्णी "मराठी मुंबई" सुद्धा ताकदीने दाखवतो. एव्ह्ढच नव्हे तर ताकदीचे गायक्/गायिका आणि संगीतकार आहेत. त्यामुळे, आपल्याकडे उत्तम सिनेमा बनविण्याचे सर्व साहित्य आहेच! पण एखाद्या मंद महेश कोठारे ने फद्या करायचा म्ह्टला तर त्याला कोण काय करणार.

काही मंडळींनी लक्ष्या, अशोक सराफ, सचिन इ. बाबत काही अंशी निगेटीव्ह सूर लावला आहे. यांचे सर्वच चित्रपट अत्यंत फालतू आहेत असं नाही. निव्वळ मनोरंजनात्मक दृष्टीकोण ठेवून जरी या मंडळींनी चित्रपट केले असतील, तरीही गंमत्-जंमत, बनवाबनवी, झपाटलेला इ. अनेक चित्रपट (माझ्या मते तरी) मस्तंच आहेत. सचिन आणि लक्ष्या यांच्या भूमिकांमध्ये तोच तोच पणा जाणवतो पण अशोक सराफ चा विविधांगी अभिनय वाखाणन्याजोगा आहे. मला तरी या मंडळींच्या प्रयत्नांचं कौतुक वाटतं. जशी चित्रपट ही कला आहे तसाच किंबहुना त्याहूनही जास्त तो एक व्यवसाय आहे. अवांतरः आजकाल नट-नट्यांकडून चित्रपट चालावा म्हणून जो विविधांगी अभिनय करवून घेतला जातो त्याबद्दल आपले काय म्हणने आहे? -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

In reply to by झेल्या

सहमत. एखाद्या गोष्टीविषयी आपले मत नोंदवताना कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर टिक ही केलीच पाहिजे का ? सचीन, लक्षा, अशोक सराफ, महेश कोठारे ह्यांचे कितीतरी चित्रपट हे खरच अप्रतीम होते. अलका कुबल ह्या 'प्रलयात' हि लोक आपापल्या 'होड्या' घेउन होती म्हणुन आपण आणी हि मराठी चित्रपट सृष्टी तरली म्हणायची. अशी ही बनवा बनवी, सवत माझी लाडकी, कळत नकळत, नवरी मिळे नवर्‍याला, झपाटलेला, गंमत जंमत ह्या सारख्या चित्रपटांनी काय बहार उडवली होती आठवा. एक उनाड दिवस मधला अशोक सराफ आठवा आणी हमाल दे धमाल, एक होता विदुषक मधला लक्षा आठवा. शेवटी हे लोक सुद्धा पोट भरण्यासाठी ह्या व्यवसायात आले आहेत. सगळ्याच माणसांना एका वेळी खुष करणे अवघड असते हेच खरे. ह्या लोकांच्यात सुद्धा काही कमतरता असतील, पण मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांचे योगदान उल्लेखनीयच आहे. लक्षानी 'बायको चुकली स्टँडवर' वगैरे सारखे टुकार चित्रपट केले या बद्दल शंकाच नाही पण जेंव्हा 'एक होता विदुषक' सारख्या चित्रपटातुन हा माणुस स्वतःतील सशक्त अभिनयाचे वारु उधळीत होता तेंव्हा किती लोकांनी तो चित्रपट बघितला ? तरुणाई तरुणाई म्हणुन आजकाल जी हाकाटी सुरु आहे ती खरे तर, लक्षा, सचीन, महेश कोठारे ह्या सारख्या लोकांनी आणली. मराठीतील पहिला सिनेमास्कोप चित्रपट असो वा बोलक्या बहुल्यांचा करुन घेतलेला वापर असो महेश कोठारे यांनी कायमच नवनवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. जॉनी लिव्हर सारख्या माणसाला मुख्य भुमीकेत घेउन 'खतरनाक' सारखा चित्रपट काढला तर कधी तुषार दळवी, रेशम टिपणीस सारखे नवोदीत घेउन 'जिवलगा.' सहकुटुंब बघण्यासारखे चित्रपट ही व्याख्याच लोक विसरले होते, अशा काळात संपुर्णपणे कौटुंबीक, कुठलेही कमरेखालचे विनोद नसलेले नितांत सुंदर चित्रपट बनवुन सचीन ह्यांनी मराठी माणुस पुन्हा एकदा सहकुटुंब थेटर मध्ये ओढुन आणला. एका मागोमाग एक यशस्वी चित्रपट बनवत त्यांनी स्वतःला सिद्ध करुन दाखवले. यशाचे आणी चोखंदळपणाचे यशस्वी गणीत त्यांना जमले. अशोक सराफ ह्या व्यक्तीविषयी तर लिहायची सुध्दा आपली लायकी आहे का नाही असे क्षणभर वाटुन जाते. 'पांडु हवालदार' असो नाहीतर 'भस्म्या', 'आपली माणसे ' असोत वा 'एक उनाड दिवस' हा माणुस खरच अशक्य आहे. चालते बोलते अभिनयाचे महाविद्यालय आहे हो हे. साला अजुनही जाता येता टिव्हीवर कधीतरी ती खर्जातली 'मास्तुरे भ्रुर्र्र' अशी हाक कानावर येते आणी आम्ही हातातले काम सोडुन टिव्ही पुढे जाउन बसतो. 'ऑफिसमध्ये झुरळे जरा कमीच आहेत नाही?' विचारणारा अशोक सराफ 'स्स्साल्ला' अशी मनमोकळी दाद फटकनी घेउन जातो. काय लिहु आणी किती लिहु... ह्या 'तरुणाईला' आमचे तर लाखो सलाम. अवांतर :- विषयाला सोडुनच जवळ जवळ सर्व लिखाण केले आहे. पण एकुणच टिकेचा सुर बघुन स्वतःला थांबवु शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

=D> सुंदर! Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D

In reply to by दशानन

झकास प्रतिसाद. थोडक्यात काय. एक दोन चित्रपट चांगले चालले. लोकांना आवडले की अखंड तेच करत राहिलं की वीट येतो. शांतेचं कार्टं, टुरटुर मधला लक्षा आजही आठवतो ना? बनवा बनवी, धुमधडाका असे काही आजही कधीही मस्त वाटतात. वेताळराव त्या खंड्याच्या आठवणीने तर बहार आणलीत... लिंबाचं मटण आणि ती अश्विनी... म्हणजे मूळात जर पटकथा चांगली असली तर नक्कीच चित्रपट चालतील आणि नवीन चांगले येत राहील. महेश कोठारेचा इंस्पेक्टर महेश आणि ते डॅम इट नंतर बोअर व्हायला लागले पण सुरुवातीचे काही विशेषतः झपाटलेला चांगला होता. स्मिता तळवलकर ने - अस्मिता चित्र ने असे कुठले चित्रपट केले ज्यामुळे त्यांनी बंद करावंसं वाटावं ? कळत नकळत, चौकट राजा, सवत माझी लाडकी, तू तिथं मी ... सई परांजपेंनी खूप वर्षांनी एक चित्रपट आणला आणि झकासच होता - पक पक पकाक. तोच तो पणा कंटाळवाणा होतो जसा लक्ष्या, महेश कोठारे, भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांचा झाला आहे. सध्या तरी परिस्थिती फार वाइट आहे असं नाही पण भरत जाधव, मकरंद अनासपुरे, पॅडी कांबळे, सिद्धार्थ जाधव हे बरंच पकवू लागले आहेत. मराठी लोक भंगार हिंदी चित्रपट पाहतात पण मराठी पाहत नाहीत हा गैरसमज आहे. पुण्यात सिटी प्राईड मध्ये मराठी चित्रपट हाऊस फुल चालतात. जेव्हा अनेक चांगले चित्रपट एकदम आले तेव्हा सहा ते आठ चित्रपट एका वेळी मल्टिप्लेक्स मध्ये लागले होते. गेल्या पाच वर्षातली नावं पाहिली तर अगदी काही वाईट परिस्थिती आली नाही जशी त्या आधी झाली होती. http://en.wikipedia.org/wiki/Marathi_cinema

In reply to by मैत्र

झेल्या आणी परा !! अत्युत्तम प्रतीसाद !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

झेल्या आणी परा !!अत्युत्तम प्रतीसाद !! सहमत. अशोक सराफ ह्या व्यक्तीविषयी तर लिहायची सुध्दा आपली लायकी आहे का नाही असे क्षणभर वाटुन जाते ++++++++१ त्याच्यासारखा अभिनेता झाला नाही आणि होणारही नाही. तो काही करु शकतो. कुठेही टाका का झाला त्यातला. अशोक सराफचा कुठलाही चित्रपट मी कितीवेळाही पाहु शकतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

एक नंबर! ~(झपाटलेला) शक्तिमान

In reply to by परिकथेतील राजकुमार

१०१% सहमत! लक्ष्या, महेश, अशोक सराफ सचिन यांनी आणी इतर कलाकारांनीच मराठी चित्रपटसॄष्ट्रीला नवसंजिवनी दिली हे मान्य करायलाच हवे. मराठी चित्रपटाच्या इतिहासातून यांचे चित्रपट वजा करून पहा किती काय उरतं ते. आणी यांचे चित्रपट येतात कारण ते चालतात. लक्षींकांत बेर्डेंच्या भाषेत सांगायचं तर मराठी सिनेमा मराठी मातीतलाच असायला पाहिजे. हिंदी स्टाईल मराठी सिनेमा चालणार नाही हे यापुर्वी अनेक सिनेमांनी सिद्ध केलेलं आहे. आम्ही येथे पडीक असतो!

In reply to by रम्या

अरेरेरेरे.. पब्लिक आमच्या दादाना विसरले वाटते.. दादानी धमाल आणि बेबंद विनोदी चित्रपट काढले. मराठी सिनेमे चालत नाहीत अशी बोंब असताना किंवा लक्ष्या आदिंच्या विनोदाला कंटाळलेले प्रेक्षक मात्र दादांचे पाचकळ विनोद असलेले सिनेमे बघायला आवर्जून जात असत. दादानी चित्रपटसृष्टीला काही दिले का नाही माहीत नाही पण ज्याना केवळ मनोरंजन म्हणून सिनेमे बघायचे होते त्याना २ घटका हमखास मनोरंजनाची सोय नक्की करून दिली. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

पंढरीची वारी , बिनकामाचा नवरा , वजीर मधल्या अशोक सराफला तर तोड्च नाय .. मराठी मधे अनिमेशन किंवा नविन तंत्रज्ञान आणायचा प्रयत्न महेश कोठारेनीच केला..

अशोक सराफ व लक्षा बेस्टच आहेत. वेताळ

मी तर आधुनिक तंत्रज्ञान मत दिले आहे... खरे पहता चित्रपट हे त्या त्या वेळची परिस्थीती, काळ, समाज याचे चित्रण करत असतात्...लक्शा, अशोक सराफ, सचिन यानी एक काळ गाजवला. दादा कोंडके नी एक काळ गाजवला...पण त्यावेळी जी परिस्थिती त्यात दाखवली ते त्या काळाला साजेसे होते.. पण परवाच मी 'मुखवटे' नावाचा एकदम टुकार मराठी सिनेमा पाहिला...त्यात एका द्रुश्या मधे तमाशा दाखवला आहे..आणी तो माणुस किन्व गुन्ड लोक मुम्बैत रहात असतात्...वास्तविक प्रत्येक मराठी सिनेमात तमाशा दाखवायलाच हवा का??..कारण आता खेडो-पाडी पण लोक तमाशा बघत नाहीत्..तर ह्या अश्या मुळे सिनेमा त्याचे वास्तव हर्वुन बसतो... त्याच बरोबर आत हेही नमुद करवेसे वाटते की, श्वास, सात च्या आत घरात, पैलतीर, चेकमेट, वळु, सनै-चौघडे आणी असे अनेल चांगले सिनेमे येत आहेत्...त्यामुळे खूप अपेक्षा वाढ्ल्या आहेत्...पण अनासपूरे, भरत जाधव सारखी लोक त्याच्-त्याच पद्दतिची कामे करुन्...त्यन्च्या तल्या कलाकारा ला मारत आहेत असे खेदाने नमूद करावेसे वाटते.. आणी त्याच बरोबर, आधुनिक तंत्रज्ञान हे सुद्धा वापरले पाहिजे...आज-काल साऊथ चे मूव्ही हिन्दी पेक्षा ही तांत्रिक बाबतित चांगले आहे.. -------------- केदार जोशी

भरत जाधव, पॅडी कांबळे, सिद्धार्थ जाधव ह्यांनी सुद्धा लवकरात लवकर गाशा गुंडाळुन आपापल्या गावी प्रयाण केल्यास उत्तम ... छोटा डॉन च्या या विधानाशी असहमत डान राव अहो जिथे शहरी आणी ग्रामिण असा भेद होतो ना तिथे हि अशी चलणी नाणी चालतात आज ही महाराष्ट्रात मराठी सिनेमात शहरी आणी ग्रामीन असा भेद होतो मला सांगा तुम्ही म्हणता अलका कुबल रडुबाई आहे कबुल पण आज हि तिचे चित्रपट महाराष्ट्रातील स्त्री वर्ग ( ग्रामीण ) तिचा चाहता आहे मला सांगा अहो जशी मागणी असेल तसा पुरवठा होतो कारण आता हि फक्त कला नाहि आहे तर हा व्यवसाय झाला आहे पण यात जर तोच तो पणा असेल तर कंटाळवाणा होतो हे पण कबुल जेंव्हा 'एक होता विदुषक' सारख्या चित्रपटातुन हा माणुस स्वतःतील सशक्त अभिनयाचे वारु उधळीत होता तेंव्हा किती लोकांनी तो चित्रपट बघितला ? हे बाकि पटल मला परिकथेतील राजकुमार चे कारण जेव्हा विनोदी अभिनेता हा शिक्का बसतो ना तेव्हा 'एक होता विदुषक' सारख्या चांगल्या चित्रपटाला लोक नाकारतात आज मराठी सिनेमाला चांगले दिवस आले आहेत आज मराठी सिनेमा कोटी कोटी ची उड्डाणे करु लागला आहे ( बनवायला आणी कमवायला ) तर आपण वाद घालु नका अहो सिनेमा थेटरात बघा डीव्हीडी किवा व्हीसीडी वर नको ............ ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

जिथे शहरी आणी ग्रामिण असा भेद होतो ना तिथे हि अशी चलणी नाणी चालतात महाराष्ट्रात मराठी सिनेमात शहरी आणी ग्रामीन असा भेद होतो जशी मागणी असेल तसा पुरवठा होतो कारण आता हि फक्त कला नाहि आहे तर हा व्यवसाय झाला आहे
असेलही, आम्ही केव्हा नाकारले ... मुळात चर्चा प्रस्ताव हा "उत्कॄष्ट मराठी चित्रपट" कसा बनवता येईल ह्याविषयी होता, त्यानुसारच आमचे मत होते. चांगला आणि उत्कॄष्ट चित्रपट हा "लोकप्रिय" होईलच असे नाही पण त्याचे नाव इतिहासात वारंवार घेतले जाईल. बाकी गल्लाभरु व सो कॉल्ड लोकप्रिय चित्रपटांचा किती चाहतावर्ग आहे ह्याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही ... आमच्या मते तुम्ही १० गल्लाभरु व लोकप्रिय चित्रपट बनवा पण त्याबरोबर कमीत कमी १ तरी "उत्कॄष्ट आणि वैचारीक,उच्च तंत्रज्ञानयुक्त" असा मराठी चित्रपट बनवा. कारण कसे आहे की "चाहते" फक्त गल्लाभरु चित्रपटांना मिळतात ही सध्याची एक प्रचलीत समस्या आहे. उदा : आजसुद्धा दादाचे धोतर, ताईच्या बांगड्या, कुंकवचा करंडा असे चित्रपट अक्षरशः धो-धो चालतात पण "सातच्या आत घरात" आपल्यापैकी किती जणांनी व एकंदर महाराष्ट्रात किती जणांनी थेटरमध्ये जाऊन पाहिला ? देवराई, सैल, चकवा, ध्यासपर्व असे अनेक चित्रपट किती यशस्वी झाले ? हे चित्रपट ग्रामीण भागात चालणार नाहीत हे जरी सत्य असले तरी मग आपण असे चित्रपट बनवायचेच नाहीत असे आहे का ? सामना, सिंहासन अश चित्रपटांना आजही मागणी आहे कारण "क्वालिटी" , ती अशी चाहते आणि गल्ला अशी काळजी घेऊन चित्रपट बनवला तर येत नसते, तिथे मुळापासुन तशी इच्छा लागते. बाकी असे किती आले आणि किती गेले ह्याला मोजमाप नाही ... महाराष्ट्र शासनाचे २५ ( की ३५ ?) लाखाचे अनुदान लाटण्यासाठी काहितरी बनवायचे म्हणुन बनवले गेलेले किती चित्रपट तुम्हाला दाखवु ? अत्यंत भिकार व टाकावु चित्रपट आहेत हे ... माझा विरोध मुळी चाहतेवर्गाला अनुसरुन बनवल्या जाणार्‍या चित्रपटांना नाहीच . पाचकळपणा व हिडीस व अत्यंत टकावु विनोद पाहुन ज्याचे मनोरंजन होत असेल त्याने जरुर असे चित्रपट बनवावेत , त्यात काम करावे व ते आवडीने पहावेत. पण ह्यासाठी तुम्ही चलती नाही म्हणुन "उत्कृष्ट" चित्रपटांना टांग मारणार आहात ? १० फालतु बनवता ना मग थोडे डोके लाऊन १ चांगला बनवायला काय हरकत आहे ? अवांतर : " तुम्ही दोघे सारखेच ड्यांबिस. तुमच्यात डावं-उजवं करणे अवघड आहे. ड्यांबिस म्हणालो मी ड्यांबिस " : इति डिसुझा (सिंहासन ) " मारुती कांबळेचे काय झाले " : इति मास्तर ( सामना ) "काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर ( सामना ) असे आम्ही जन्मायच्या आधी तयार झालेल्या चित्रपटांचे अजरामर डायलॉक आम्ही आजही तंतोतंत लक्षात ठेवतो कारण ते चित्रपट "उत्कृष्ट" होते म्हणुन, त्यांनी गल्ला किती भरला अगर किती चाहते आहेत ह्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. ------ ( सुस्पष्ट आणि सविस्तर ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

चांगला आणि उत्कॄष्ट चित्रपट हा "लोकप्रिय" होईलच असे नाही पण त्याचे नाव इतिहासात वारंवार घेतले जाईल. सहमत सहमत सहमत ! पण आज गंमत अशी झाली आहे की फायदा कमावणे ह्या एकाच उद्देशाने चित्रपट निर्माण करणार्‍यांची संख्या वाढते आहे आणी त्यांनी आणलेल्या लाटेत मग 'देवराई' 'अबोली' सारखे सुंदर आणी दर्जेदार चित्रपट काहिवेळा दुर्लक्षीले जातात. काहितरी संदेश देण्यासाठी, एक अभिजात कलाकृती बनवायचा प्रयत्न म्हणुन निघणारे 'नॉट ओन्ली मिसेस राउत' 'डोंबीवली फास्ट' 'शेवरी' 'उत्तरायण' सारख्या कलाकृती बनवणारे मोजकेच. डान राव अहो जिथे शहरी आणी ग्रामिण असा भेद होतो ना तिथे हि अशी चलणी नाणी चालतात आज ही महाराष्ट्रात मराठी सिनेमात शहरी आणी ग्रामीन असा भेद होतो मला सांगा तुम्ही म्हणता अलका कुबल रडुबाई आहे कबुल पण आज हि तिचे चित्रपट महाराष्ट्रातील स्त्री वर्ग ( ग्रामीण ) तिचा चाहता आहे मला सांगा अहो जशी मागणी असेल तसा पुरवठा होतो कारण आता हि फक्त कला नाहि आहे तर हा व्यवसाय झाला आहे आजवर मला शहरी आणी ग्रामीण हा भेद खरच कळाला नाहिये. आमच्या दृष्टिनी चित्रपट एकतर 'ग्रामीण' पार्श्वभुमी लाभलेला अथवा 'शहरी'.... मधल्या काळात गुजराथी आणी मारवाडी लोकांनी मोठ्या प्रमाणावर मराठी चित्रपट निर्मीती मध्ये पैसा गुंतवला होता, त्यांचा एकमेव उद्देश नफा कमावणे हा असल्याने एकाच कथेत जास्तीत जास्त जेव्हडा माल मसाला घुसवता येईल तेव्हडा घुसवुन सर्व थरातील रसिक प्रेक्षकांना खेचुन घेण्याची अहमीका लागली. मग एकाच कथेत दरोडेखोर, गावचा पाटिल, तमाशा, शहरात नायकानी केलेला कॅब्रे, नायिकेचा झालेला छळ, बैलगाडिच्या शर्यती आणी कारचा पाठलाग हे सगळे माल मसाले एकत्र दिसायला लागले. हळुहळु कॉलेज मध्ये जाणार्‍या, फाड फाड इंग्रजी बोलणार्‍या, परपुरुषाशी अगदी टेचात बोलणार्‍या नायिकांचे युग अवतरले पण तरीही चित्रपट सृष्टी पुर्ण कात टाकायला तयार न्हवती. कॉलेजात जाणारी, कॅब्रे करणारी एक नायिका शहरात आणी लगेच तिची जुळी बहिण गावातल्या तमाशा थेटरात, असले पण काय काय प्रयोग करुन झाले. पण खरा मुद्दा हा राहतो की किती लोकांच्या अपेक्षा हे चित्रपट पुर्ण करु शकत होते ? प्रेक्षकांना आवडतो तेच आम्ही देतो म्हणुन सांगणारे, प्रेक्षकांना खरच हवे ते देण्यात किती यशस्वी झाले ? पॅडी कांबळे, मकरंद अनासपुरे, भरत जाधव ही चलनी नाणी आहे हे कोण आणी कसे ठरवते ? एकट्याच्या जिवावर ह्या माणसांनी अशे किती चित्रपट तारुन नेले ? एका पक्षाचे सरकार येणे आजकाल जेव्हडे अशक्य आहे तेव्हडेच अशक्य आजकाल एकच हिरो असलेले चित्रपट चालणे आहे. सुनिल बर्वे, प्रसाद ओक सारखी मंडळी भारंभार चित्रपट नसतील करत पण म्हणुन ती चलनी नाणी नाहित असे म्हणुन आपण त्यांना दुर्लक्षीत तर करु शकत नाहि ना ? मध्ये कोणीतरी गमतीने सांगत होते, "लक्षानी मराठी चित्रपट सृष्टी जेव्हडी वर आणली, शेवटी शेवटी त्याच्या दुप्पट रसातळाला नेली." वाक्य खरच विचार करण्यासारखे आहे. 'लोकांना हेच हवे आहे' ह्या छापिल उत्तराखाली तुम्ही लोकांच्या गळ्यात काय काय मारणार आहात ? आम्हाला हे खरच हवे आहे का नाही ह्याचा विचार कधी होणार ? 'श्वास' , 'डोंबीवली फास्ट' सारख्या चित्रपटात कुठे कोण 'चलनी नाणी' होती हो ? भरभरुन प्रेम आणी पैसा दिलाच की आम्ही रसिकांनी त्यांना. अलका कुबल विषयी मी जास्ती काहि बोलु इच्छीत नाही. हे म्हणजे अनिल कुंबळेनी प्रथम दर्जाच्या सामन्यात शतक मारल्यामुळे त्याची आणी डॉन ब्रॅडमनची तुलना चालु केल्या सारखे वाटायला लागते. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

आत्ता खरे मुद्देसुद चर्चा चालु झाली ... बहुसंख्य मुद्दे व विधाने मला पटली आहेत व तुझ्या मतांविषयी तुझे कौतुक वाटले ... मी अजुन ह्यात भर घालेनच पण आत्ता लगेच शक्य नाही. मात्र तु संतुलीत विचार करुन लिहु शकतोस हे सिद्ध झाले, चालु देत ... चर्चा ऑन ट्रॅक आहे हे उत्तम ..!!! ------ (पिटातला प्रेक्षक )छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

In reply to by छोटा डॉन

आमच्या मते तुम्ही १० गल्लाभरु व लोकप्रिय चित्रपट बनवा पण त्याबरोबर कमीत कमी १ तरी "उत्कॄष्ट आणि वैचारीक,उच्च तंत्रज्ञानयुक्त" असा मराठी चित्रपट बनवा. कारण कसे आहे की "चाहते" फक्त गल्लाभरु चित्रपटांना मिळतात ही सध्याची एक प्रचलीत समस्या आहे. आता जर प्रेक्षक येणार नसतिल तर कोण निर्माता कशाला मरायला धाडस करेल मी आधीच म्हटले आहे कि चित्रपट निर्मीती हि आता फक्त कला राहिलि नसुन तो आता व्यवसाय झाला आहे आणी जर व्यवसायात सारखा सारखा नुकसान होणार असेल तर कोन माईचालाल धाडस करेल आणी धंद्याला लागेल "सातच्या आत घरात" आपल्यापैकी किती जणांनी व एकंदर महाराष्ट्रात किती जणांनी थेटरमध्ये जाऊन पाहिला ? सात च्या आत घरात मी स्वत: चार वेळा थेटरात जाउन पाहिला आहे आणी आज ही मी मराठी चित्रपट पाहण्यासाठी भारतमाता मधे जातो कारण फक्त तेथेच मराठी चित्रपट लावले जातात पण आता ते सुधा जाईल आपल्या वस्त्रोद्योग मंत्र्याच्या क्रुपेने महाराष्ट्र शासनाचे २५ ( की ३५ ?) लाखाचे अनुदान लाटण्यासाठी काहितरी बनवायचे म्हणुन बनवले गेलेले किती चित्रपट तुम्हाला दाखवु ? अत्यंत भिकार व टाकावु चित्रपट आहेत हे ... बनतात ना बनतात मुळात शासन सरसकट जे अनुदान देत होती त्याचे हे फळ पण आता शासन पण शहाणे झाले ते सुद्धा चित्रपटाचा दर्जा बघुनच अनुदान देणार आहे १० फालतु बनवता ना मग थोडे डोके लाऊन १ चांगला बनवायला काय हरकत आहे ? कोण बनवणार कोण अहो ते गजेंद्र अहिरे एक वर्षाला चार चार आणी चांगले चित्रपट बनवायचे ते बिचारे आता प्रेक्षक येत नाहि म्हनुन चित्रपट बनवत नाहित हे एक कटु सत्य आहे .......................................... ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

आता जर प्रेक्षक येणार नसतिल तर कोण निर्माता कशाला मरायला धाडस करेल मी आधीच म्हटले आहे कि चित्रपट निर्मीती हि आता फक्त कला राहिलि नसुन तो आता व्यवसाय झाला आहे आणी जर व्यवसायात सारखा सारखा नुकसान होणार असेल तर कोन माईचालाल धाडस करेल आणी धंद्याला लागेल चित्रपटनिर्मिती ही आताच नव्हे तर पूर्वीही व्यवसायच होती. जेवढा पैसा गुंतवला जातो तो बघता ही कला व्यवसाय असण्यात काही चुकीचे नाही. नफा आणि नुकसानाची गणिते पूर्वीसारखी हिंदीमधेही राह्यली नाहीत मराठीत ती तेवढी कधी नव्हतीच. नवीन काही करायचे कष्ट नकोत म्हणून फॉर्म्युलावर वेळ घालवतात लोक. चांगली फिल्म केली तर लोक बघायलाही येतात हे तितकेच खरे आहे. तसेच एका मॉडरेट बजेट मधे केलेल्या फिल्मला रिकव्हरीच काय प्रॉफिट मिळणंही अवघड राह्यलेलं नाही जर मार्केटचा योग्य अभ्यास केला तर. चांगल्या फिल्ममेकींगबरोबर मार्केटचा अभ्यास आणि मार्केटींगचे नवीन तंत्र यावरही दिग्दर्शकाची पकड असायला हवी. कोण बनवणार कोण अहो ते गजेंद्र अहिरे एक वर्षाला चार चार आणी चांगले चित्रपट बनवायचे ते बिचारे आता प्रेक्षक येत नाहि म्हनुन चित्रपट बनवत नाहित हे एक कटु सत्य आहे .............. काहीही फेकता काय? गजाची नवीन फिल्म रिलीज होतेय आज गुलमोहर नावाची. मधे त्याने एकदोन हिंदी फिल्म्स केल्या. अजून एक मराठी फिल्मही केली. ह्या सगळ्या आत्ता पोस्ट प्रॉडक्शन मधे आहेत. अजून एका मराठी फिल्मचे शूटींग झाले नुकतेच ज्याची गाणी तर अफलातून आहेत. खरी माहीती घेऊन तरी बोला ना. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

अरे वा! आमच्या मराठी चित्रपटात इतकी सगळी गुणी मंडळी आहेत तर मग, जास्तीत जास्त उत्क्रुष्ट मराठी चि़ञपट निर्माण होण्यसाठी कशाची गरज आहे? ह्या प्रश्नाची काही आवश्यकताच उरत नाही! किंवा, लोकं मराठी सिनेमे पाहात नाहीत, मराठी सिनेमे पाहायला हवेत वगैरे गळे काढायची तरीही काय गरज आहे कुणास ठाऊक! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आमच्या मराठी चित्रपटात इतकी सगळी गुणी मंडळी आहेत तर मग, जास्तीत जास्त उत्क्रुष्ट मराठी चि़ञपट निर्माण होण्यसाठी कशाची गरज आहे? तात्या आता गंमत अशी आहे की 'उत्कृष्ट' ह्या शब्दाची प्रत्येकाची व्याख्या ही वेगवेगळी असते. तुम्हाला 'अभिजात' म्हणायचे आहे का ? कारण दादा कोंडकेंचे सीनेमे मला 'उत्कृष्ट' वाटतात तर तेच माझ्या मावसबहिणीला द्विअर्थी आणी कंबरेखालच्या विनोदाने बरबटलेले वाटतात. लक्षाचे 'ऑ' वगैरे करणे , अशोक सराफ चे हिंदी बोलणे अशा प्रसंगानी भरलेले काहि चित्रपत मला बर्‍याचदा आवडले आहेत आणी 'उत्कृष्ट' वाटले आहेत , तर तेच चित्रपट आमच्या घरच्यांना तद्दन भिकार आणी आचरट वाटतात. समाजातील सर्वच थरांना आवडुन जाणारा, सर्व थरातुन भरभरुन प्रतिसाद मिळवणारा चित्रपट अशी आपल्याला 'उत्कृष्ट' चित्रपटाची व्याख्याच करता येणार नाहि असे मला वाटते. माहेरची साडी ह्या चित्रपटाने उत्पन्नाचे विक्रम साजरे केले, पण त्याला खरच 'उत्कृष्ट' चित्रपट म्हणता येईल का ? लोकं मराठी सिनेमे पाहात नाहीत, मराठी सिनेमे पाहायला हवेत वगैरे गळे काढायची तरीही काय गरज आहे कुणास ठाऊक! हे मात्र खरे आहे. आज बरिचशी माणसे चित्रपटगृहात जाउन चित्रपट बघायला नाखुश असतात. पण ह्याला थोड्या फार प्रमाणात हि कलाकार मंडळी सुद्धा कारणीभुत आहेत. रोज जाता येता जे छोट्या पडद्यावर २४ तास बागडताना आणी कधी कधी तर उच्च अभिनय क्षमता असतानाही काहि काहि भिकार कार्यक्रमातुन आपले दर्शन घडवताना हि मंडळी दिसत असतील तर पुन्हा पैसा खर्च करुन दोन अडिच तास ह्यांना पाहायला कोण जाणार हो ? माझे खरे मत तर असे आहे की हे अशी रडणारी मंडळी आजकाल खुप कमी झाली आहेत. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

दादा कोंडकेंचे सीनेमे मला 'उत्कृष्ट' वाटतात तर तेच माझ्या मावसबहिणीला द्विअर्थी आणी कंबरेखालच्या विनोदाने बरबटलेले दादा कोंडके यांचा मी पण फ्यान आहे. त्यांचे सोंगाड्या, पांडू हवालदार, ह्योच नवरा पाहिजे, राम राम गंगाराम हे चित्रपट फारच सुंदर होते. या सार्‍या चित्रपटांची कथा उत्तम होती. नंतर जेव्हा विनोद आधी ठरवून त्यासाठी प्रसंग निर्माण करू लागल्यावर चित्रपटांची वाट लागली. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया पाहुन आनंद झाला. मराठी चित्रपटा बद्द्ल सर्वांचे ज्ञान पाहुन थक्क झालो... अर्थात आपल्या सर्वाना जी आपुलकी , आदर व आवड आहे मराठी बद्द्ल हे सिद्ध झाले.. आपल्या प्रतिक्रिया मी माझ्या चित्रपटाशी निगडित असलेल्या मित्रांपर्यंत नक्कि पोहचवेन... आभार...........

In reply to by नीधप

फक्त मी आणी माझे मित्रच चित्रपटसृष्टीत आहेत...बाकी सगळे फुशारक्या मारणारे...

चेकमेट व वळु सारखे चित्रपट असेल तर बघन्यात मजा आहे.

सगळ्यात महत्वाची आहे पटकथा आणि त्याचबरोबर दिग्दर्शक आणि त्याची/तिची दृष्टी. चांगला दिग्दर्शक फारसे नावाजलेले कलाकार/अभिनेते नसतांनाही चागले चित्रपट बनवू शकतो (उदा. सचिन कुंडलकर - रेस्टॉरंट, समीर धर्माधिकारी.), सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर ह्यांचे कित्येक चित्रपट. बाजाराचे आणि उत्कृष्ट्तेचे गणित जमतेच असे नाही, कित्येक वेळा नाहीच जमत. तरीही मराठीत गेल्या काही वर्षात बरेच चांगले चित्रपट येऊन गेले. माझ्या मते , डोंबिवली फास्ट, श्वास, रेस्टॉरंट, देवराई, दहावी फ, नितळ, उत्तरायण, वळू, टिंग्या हे खरेच उल्लेखनीय होते - इतरही आहेत. हे कुठल्या लटेतले चित्रपट नव्हते - आणि ह्यातले कित्येक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वीही झाले. गरज आहे ती सशक्त कथानकांची आणि ती प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर सादर करणार्‍या दिग्दर्शकांची! मला स्वतःला सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर ह्यांचे बहुतांश चित्रपट आवडतात. त्यांच्या काही चित्रपटात मात्र कधी-कधी शेवट खूपच भाबडा, सरळ-सोपा केल्याचे वाटते. उदा. वास्तुपुरुष. पण तरीही व्यक्तिरेखांचा उत्कृष्ट आलेख आणि सशक्त कथानक ही त्यांची महत्वाची बलस्थाने आहेत. त्यांच्या बहुतेक व्यक्तिरेखा विश्वासार्ह आणि खर्‍याखुर्‍या वाटतात. त्याउलट गजेंद्र आहिरेचे सिनेमे मला तरी लाऊड आणि बतबटीत, मेलोड्रामॅटीक वाटतात, मी त्यचे नवीन चित्रपट पाहिले नाहीत -- पण पांढर (ह्यात त्यांच्याशी चर्चा करायची संधी मिळाली), नॉट ओन्ली मिसेस राऊत (ह्यात रेप मधे मेडीकल होत नाही इतकं सगळं भंपक दाखवले आहे, अदिती देशपांडेशी बोललो तर त्यांना म्हणे हे महितच नव्हते. हे फार पोरकट वाटले) असे काही सुरुवातीचे चित्रपट पाहिले, आणि ते क्रेडीबल नाही वाटले. सचिन कुंडलकर आणि त्याच्या फक्त व्यक्तिरेखेंवर आधारलेले चित्रपट आश्वासक वाटतात पण रेस्टॉरंट च्या तुलनेत दुसरा, समीर धर्माधिकारी आणि रेणूका दफ्तरदारचा (नाव विसरलो) चित्रपट फार आवडला नाही. निशिकांत कामथ फारच अफलातून आहे (डोंबिवली फास्ट आणि मुंबई मेरी जान) पण तो मराठीत किती काम करेल काय माहीत? बिपीन नाडकर्णीचा उत्तरायण शिवय दुसरा चित्रपट महित नही, पण त्याची समज आणि हाताळणी प्रगल्भ आहे. मला कलाकारांपेक्षा जास्त अपेक्षा आहेत त्या ह्या आणि नवीन दिग्दर्शकांकडून. कलाकारांमधे अतुल कुलकर्णी किंवा सोनाली कुलकर्णी हे विशेषतः जास्त अर्थपुर्ण चित्रपटांशी निगडीत असतात असे वाटते -- त्यांचे चित्रपट पाहण्याची खरच उत्सुकता असते. बाकी - भरत जाधव, मकरंद अनासपुरे इ. माझ्यापुरते तरी 'स्ट्रीक्टली ऍव्हाइडेबल'! त्यांना काय करायचे ते करू देत...'सातच्या आत घरात' ला जर उत्कृष्ट चित्रपट म्हणायचे असेल तर बोलणेच खुंटल. तसेच अशोक सराफ विषयी - प्रसादचे प्रतिसाद एरवी आवडतात, पण अशोक सराफ म्हणजे 'अभिनयाचे विद्यापीठ'? हे काही मला पचत नाही -- कदाचित मी त्याचे चांगले चित्रपट पाहिले नसतील (एक उनाड दिवस राहून गेला असाच! :(), पन जे काही ३०-४० पाहिलेत त्यात त्याचा चेहरा दिसला तरी चीड/किळस येते...आणि त्याचा तो चिरका आवज, सुटलेल्या पोटावर घातलेला चीप, टाईट टी-शर्ट् - यक्क!!! असो! त्या मनाने (मला) तेंव्हा फारसे माहित नसलेल्या अरुण नलावडेंचा श्वास मधला अभिनय हेलावणारा होता! मला अपेक्षा आहेत त्या नवीन आणि वेगळी वाट चोखाळणार्‍या दिग्दर्शक आणी कलाकारांकडून -- हिंदीतही फरहान अख्तर, निशिकांत कामथ अशा नवीन दिग्दर्शकांनीच वेगळे विषय आणी चित्रपट दिलेत. ह्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांच्या कथेचे वेगळेपण आणि त्यांचे त्या कथेविषयीचे conviction!!

In reply to by मनिष

गजेंद्र आहिरेचे सिनेमे मला तरी लाऊड आणि बतबटीत, मेलोड्रामॅटीक वाटतात, सहमत... ... सरीवर सरी की काय तो अगदी त्रास सिनेमा होता... मिलिंद गुणाजीचे कॅरॅक्टर गोंधळलेले. ... आणि शेवरी बराच काळ आवडला पण शेवट पुलावर अवघडून उभे राहिलेले अभिनेते पाहून अंमळ विनोदी प्रसंगासारखे हसू आले होते... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मनिष

पण अशोक सराफ म्हणजे 'अभिनयाचे विद्यापीठ'? हे काही मला पचत नाही>>>> पचणार कसे...या सध्याच्या पुळचट विनोदी अभिनीते आणी चित्रपट पाहीले की होत अस.एक सीन पा॑डु हवालदार मधला बघा...जेव्हा अशोक सराफला सिगरेट प्यायची असते तो...अभिनय तर सोडाच पण पडद्यावर विनोद करायची पण एक क्वालीटी असते ती अजुन त्यानी सोडली नाही...त्यामुळे तो कधीच बोर वाटत नाही.. -- कदाचित मी त्याचे चांगले चित्रपट पाहिले नसतील (एक उनाड दिवस राहून गेला असाच! )>>>>, असु द्या ,पुण्यात असलात तर सा॑गा सी.डी गिफ्ट करतो..अरे हो ..एक चित्रपट कदाचित आपण एकलाही नसेल्.त्यात अशोक सराफने नऊ रोल केलेत्...केलेत नव्हे पेललेत... पन जे काही ३०-४० पाहिलेत त्यात त्याचा चेहरा दिसला तरी चीड/किळस येते...आणि त्याचा तो चिरका आवज, सुटलेल्या पोटावर घातलेला चीप, टाईट टी-शर्ट् - यक्क!!!>>>> का रे बाबा....म्हणजे साऊथचे चित्रपट तर आपण अजिबात बघत नसाल..अहो शेट अभिनय बघावा त्याचा... सूहास

In reply to by मनिष

पण अशोक सराफ म्हणजे 'अभिनयाचे विद्यापीठ'? हे काही मला पचत नाही>>>> पचणार कसे...या सध्याच्या पुळचट विनोदी अभिनीते आणी चित्रपट पाहीले की होत अस.एक सीन पा॑डु हवालदार मधला बघा...जेव्हा अशोक सराफला सिगरेट प्यायची असते तो...अभिनय तर सोडाच पण पडद्यावर विनोद करायची पण एक क्वालीटी असते ती अजुन त्यानी सोडली नाही...त्यामुळे तो कधीच बोर वाटत नाही.. -- कदाचित मी त्याचे चांगले चित्रपट पाहिले नसतील (एक उनाड दिवस राहून गेला असाच! )>>>>, असु द्या ,पुण्यात असलात तर सा॑गा सी.डी गिफ्ट करतो..अरे हो ..एक चित्रपट कदाचित आपण एकलाही नसेल्.त्यात अशोक सराफने नऊ रोल केलेत्...केलेत नव्हे पेललेत... पन जे काही ३०-४० पाहिलेत त्यात त्याचा चेहरा दिसला तरी चीड/किळस येते...आणि त्याचा तो चिरका आवज, सुटलेल्या पोटावर घातलेला चीप, टाईट टी-शर्ट् - यक्क!!!>>>> का रे बाबा....म्हणजे साऊथचे चित्रपट तर आपण अजिबात बघत नसाल..अहो शेट अभिनय बघावा त्याचा... सूहास

सगळ्यात महत्वाची आहे पटकथा आणि त्याचबरोबर दिग्दर्शक आणि त्याची/तिची दृष्टी. याचा अर्थ काय? आपल्याकडे चांगल्या पटकथा नाहीत कि दिग्दर्शक लोकांची द्रुष्टी चांगली नाही??? माझ्या मते आपल्याकडे सर्व काही आहे तरी हे कळत नही कि घोडं अडतं कुठे???

पण अशोक सराफ म्हणजे 'अभिनयाचे विद्यापीठ'? हे काही मला पचत नाही चालते हो, आमची काय बळजबरी नाही ;) गंमतीचा भाग सोडा पण ते मी माझे स्वतःचे मत नोंदवले होते. जसे मी वरती म्हणालो होतो की मला उत्कृष्ट वगैरे वाटणारे चित्रपट माझ्या घरच्यांना तद्दन आचरट आणी बंडल वाटतात. प्रत्येकाची आवड निवड हि वेगळीच असते, आणी असावी ;) रेणुका दफ्तरदारचा तुम्ही उल्लेख करत असलेला चित्रपट भवतेक 'माझी आई' असावा, खात्री नाही. तुमचा प्रतीसाद आवडला, अदिती देशपांडेंचा तुम्ही लिहिलेला किस्सा वाचुन अंमळ आश्चर्य वाटले. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

जास्तीत जास्त उत्क्रुष्ट मराठी चि़ञपट निर्माण होण्यसाठी कशाची गरज आहे? हे टाळणं- १. प्रसंगामधे हिरो मारुती ८०० म्धुन येतो आहे आणि पार्श्वसंगीत जीपचा आवाज काढतंय २. कानडी हेल मधे बोलणारे पात्र घेउन टुकार विनोद निर्मिती करणे ३. एखाद्या पात्राचे आडनाव चुकिचे उच्चारुन भंकस विनोद करणे ४. डोळे बंद करुन चित्रपट "ऐका" सगळी पात्रे जोरर्जोरात बोलतात असे आढळेल. नाटक आणि चित्रपटाच्या साऊंड रेकॉर्डींचा मुलभूत अभ्यास पात्रांनी करणे.

वरच्या ऑप्शन्स मध्ये 'चित्रपटाची कथा' हा पर्याय नाहीच आहे. मग काय कथा चांगली असणे हे महत्वाचे नाही धरले काय? का ते गृहीत आहे म्हणून ऑप्शन मध्ये टाकले नाही? माझ्या मते, १.उत्कृष्ट कथा, २.उत्कृष्ट कलावंत आणि ३.दिग्दर्शक. बाकीचे मुद्दे(भांडवल वगैरे) वरच्या मुद्द्यापुंढे गौण आहेत जरी ते पुर्णपणे दुर्लक्षीत करण्यासारखे नसले तरी. प्रेक्षकवर्ग हा आपोआप तयार होतो जर चांगले मूवीस निर्मीत होत असतील तर. कारण चांगला पिक्चर कोणाला नाही आवडणार बघायला? बाकी तंत्रज्ञान कितीही चांगले असो, बाजारत नवीन पिक्चराचे तुणतुणे का वाजवा भरपूर्(मार्केटींग) पण बेकार कथा ,बेकार दिग्दर्शन आणि बेकार अभिनय करणारे नट असलेले पिक्चर आपटताच बहुधा.(उदा: द्रोणा सारखे(माहीतीय हा हिंदी आहे ते पण हे उदा. आहे).

In reply to by चित्रादेव

दिग्दर्शक तिसर्‍या क्रमांकावर? नाही हो. दिग्दर्शक ज्याला फिल्ममेकर असं म्हणतात... खरोखर तोच कर्ता धर्ता असतो चित्रपटाचा. (असायला हवा! स्टारशरण चित्रपटात बहुतांशी ठिकाणी स्टार म्हणेल ते दिग्दर्शकाला करावे लागते हे आपल्या चित्रपटसृष्टीचे दुर्दैव!) चित्रपट म्हणजे दिग्दर्शकाचे 'व्हिजन' असते. तेव्हा दिग्दर्शक हा सगळ्यात महत्वाचा घटक. उत्तम कथा हवी बरोबरे पण उत्तम कथेचं पटकथा तयार होताना वांगं होऊ शकतं. किंवा प्रत्येक उत्तम कथा चित्रपट म्हणून येऊ शकत नाही हे विसरता कामा नये ना. कलावंत (दुर्दैवाने केवळ अभिनेत्यांनाच कलावंत म्हणलं जातं बाकीचे हमाल की काय?) - अभिनेते चांगले असावेत हे खरं पण चांगला अभिनेता आणि प्रसिद्ध/ सेलेबल अभिनेता यात फरक आहे. मराठी सिनेमात अजूनतरी सेलेबल अभिनेत्याशिवाय चित्रपट होणार नाही अशी समीकरणे रूढ झाली नाहीयेत सुदैवाने. बरा अभिनेता असेल तरी त्याच्याकडून उत्तम अभिनय काढून घ्यायची जबाबदारी दिग्दर्शकाचीच. तांत्रिक बाजू - हे का विसरतात लोक? आपल्याला तांत्रिक बाजू दुर्लक्षलेल्या चित्रपटांची सवय झालीये बहुतेक. त्यात अनेक तंत्राकडे दुर्लक्ष करणारे लोक 'गोष्ट महत्वाची, बाकी सगळे नसले तरी चालेल!' असं म्हणत फिरतात आणि आपण टाळ्या वाजवतो. गोष्टीच्या पुढे तंत्राने जाऊ नये हे बरोबरच पण गोष्टीच्या पुढे कुणीच जाऊ नये. अभिनेत्याने सुद्धा हे कैक वेळेला विसरलेले असते. तसेच गोष्टीच्या पुढे जाऊ नये पण गोष्टीच्या गरजेइतके तरी असावेच हे का विसरले जाते? तर दुसरीकडे अद्ययावत व महाग तंत्रज्ञान वापरणे म्हणजे तांत्रिक बाजू भक्कम असणे असा विचार ठसवला जातो. ज्या तांत्रिक लखलखाटाची गरजच नाही कथेला त्यात कशाला वापरायचा? जिथे जे जरूरीचं आहे तेवढंच आणि ते ते असलं पाहीजे. तेवढं तर असलंच पाहीजे. हे तारतम्य आणि निर्णयन करणारा परत दिग्दर्शकच आणि मग दिग्दर्शकाबरोबरची तंत्रकलाकारांची टीम. सुजाण प्रेक्षक - मूर्खपणा, चुकीच्या गोष्टी, चुकीचे पायंडे आणि अश्या अनेक गोष्टी नाकारणारा प्रेक्षक ही असायला हवा. प्रेक्षकाची चित्रपट बघण्याची समज वाढायला हवी. ( हे माझेच मत नाही. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे ही हेच म्हणतात. मला ते पटलंय इतकंच!) आणि हो चित्रपटाचं मार्केटींग, व्यवसाय इत्यादी गोष्टींचा निर्मात्यांनी पूर्ण अभ्यास करायला हवा. सध्या जो उठतो तो काहीही न करता निर्माता होतोय. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

सुजाण प्रेक्षक - मूर्खपणा, चुकीच्या गोष्टी, चुकीचे पायंडे आणि अश्या अनेक गोष्टी नाकारणारा प्रेक्षक ही असायला हवा. प्रेक्षकाची चित्रपट बघण्याची समज वाढायला हवी. ( हे माझेच मत नाही. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे ही हेच म्हणतात. मला ते पटलंय इतकंच!) आपण चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहात हे आम्हास ज्ञात असलेने हा प्रतिसाद. आपण असे कसे म्हणु शकता ?? मला कुणी असे म्हटले तर मी विचारीन "माझी समज ठरवणारा/री तू (तू म्हणजे तुम्ही नव्हे) कोण ?". मला एखादा चित्रपट पहावासा वाटला तर मी काळ्या बाजारातुनही तिकीट घेईन, टाळ्या वाजवत, शिट्ट्या मारत चित्रपट बघीन, मध्यंतरात आईस्क्रिम खाईन आणि आनंदाने घरी परतीन...भले तो चित्रपट कितीही "रद्दन" का असेना. जे विकले जाते तेच पिकवावे याबद्दल दुमत नाहीच..पण तरीही प्रेक्षकाच्या समजेमुळे "चांगल्या" चित्रपटांचा अभाव आहे हे मी (आणि माझ्यासारखे हजारो सामान्य प्रेक्षक) तरी समजुन घेणार नाही...जर येवढेच असेल तर चित्रपटांनी आमची समज वाढवावी. * चांगला आणि रद्दन हे शब्द माझ्यालेखी व्यक्तिसापेक्ष असल्याने दुहेरी अवतरण चिन्हात आहेत एक शंका- कथेची पटकथा होऊ शकते की नाही हे ठरवण्याचे काही निकष असतात का ? - बॉलिवुड सम्राट शाहरुख

In reply to by शाहरुख

>>आपण असे कसे म्हणु शकता ?? मला कुणी असे म्हटले तर मी विचारीन "माझी समज ठरवणारा/री तू (तू म्हणजे तुम्ही नव्हे) कोण ?". मला एखादा चित्रपट पहावासा वाटला तर मी काळ्या बाजारातुनही तिकीट घेईन, टाळ्या वाजवत, शिट्ट्या मारत चित्रपट बघीन, मध्यंतरात आईस्क्रिम खाईन आणि आनंदाने घरी परतीन...भले तो चित्रपट कितीही "रद्दन" का असेना. तुम्हाला कशात आनंद मिळतो हा तुमचा प्रश्न आहे तिथे समज हा मुद्दा येत नाही. एखादा सिनेमा तद्दन टुकार माहीत असूनही डोक्याला ताप नाही म्हणून कोणी बघत असेल तर तिथे कुणाला आक्षेप असण्याचा संबंध नाही. पण केवळ तेच चांगलं बाकी बकवास असं जर तो माणूस म्हणू लागेल तर 'समज' हा मुद्दा येतोच. समज कमी असल्याची उदाहरणे बघायची झाली तर... १. जिथे केवळ महागडं तंत्रज्ञान आणि चकचकीत दृश्ये असतात, त्यांचा कथेशी काहीही संबंध नसतो अश्या चित्रपटांना तांत्रिकदृष्ट्या उत्तम चित्रपट म्हणणे. २. एकुणातच सगळ्या चकचकाटावर चित्रपटाचे महत्व अवलंबून असणे. ३. कायमच कमी दर्जाच्या (हे कितीही सापेक्ष म्हणलं तरी जागतिक पातळीवरच्या जाणकारांच्या मतांना दुर्लक्षिता येत नाही ) वस्तू समोर आल्याने तेच चांगलं असं वाटणे. ४. आपल्या आवडीच्या/ सवयीच्या पलिकडेही चांगल्या कलाकृती असतील याला नकार. ५. चित्रपट हा अभिनेत्यांच्याच मुळे बनतो असे समजून अभिनेत्याला ऑलमॉस्ट देव समजणे. गाजलेल्या चित्रपटासाठी केवळ अभिनेत्यालाच श्रेय देणे. असे अनेक.. >>जे विकले जाते तेच पिकवावे याबद्दल दुमत नाहीच.. हे मत संपूर्णतया मान्य नाहीचे मला. विकले जाण्याची समीकरणंच पाळायची असती तर वरती उल्लेख झालेल्या अनेक कलाकृती जन्माला आल्याच नसत्या. त्या आल्या आणि अनेकांना जाणवलं की अरे कदाचित असाही सिनेमा असू शकेल. आणि तोही आपल्याला आवडतोय की. प्रेक्षकांची 'समज' किंचित का होईना वाढलीच ना इथे? >>पण तरीही प्रेक्षकाच्या समजेमुळे "चांगल्या" चित्रपटांचा अभाव आहे हे मी (आणि माझ्यासारखे हजारो सामान्य प्रेक्षक) तरी समजुन घेणार नाही...जर येवढेच असेल तर चित्रपटांनी आमची समज वाढवावी. चित्रपटांनी वाढवावी ह्यात वादच नाहीये. आणि चांगल्या चित्रपटांचा अभाव केवळ प्रेक्षकांच्या समजेमुळे आहे असं मी म्हणालेही नाहीये. माझ्या मुद्द्यांमधे तो शेवटचा मुद्दा होता हे बघितलं नाहीत का? पण शेवटचा असला तरी महत्वाचा आहेच. तुम्ही समजून नका घेऊ. मी काही सक्ती करू शकत नाही तुमच्यावर. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

आपले इतर मुद्दे पुर्णपणे पटले होतेचं...उगाच +१ चे नाटक केले नव्हते. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही (म्हणजे चित्रपट निर्माते,दिग्दर्शक वगॅरे..) प्रेक्षकांना असे म्हणणार आहात का "बाबा रे, तुझी जरा समज वाढव की चित्रपटांची..मग बघ आम्ही कसे छान छान चित्रपट काढतो" ?? चांगला चित्रपट काढायची (आणि त्याच बरोबर तो विकायची) जबाबदारी ही सर्वस्वी तो तयार करणार्‍यांची आहे असे मला वाटते....कमी चकचकाट असलेला एखादा चित्रपट चांगला असेल असे जर वाटले एखाद्या कमी समज असलेल्या प्रेक्षकाला तर तो नक्कीच बघेल.वर उल्लेखलेल्या कलाकृतींनी ते सिध्द केले आहेच.. बाकी, जर आपण माझा आधीचा प्रतिसाद व्ययक्तिक (कि वय्यक्तिक ?) घेतला असल्यास (भाषेवरुन वाटले तसे) तो घेऊ नये ही विनंती.

In reply to by शाहरुख

>>उगाच +१ चे नाटक केले नव्हते. मी असं म्हणलं का? >>माझा मुद्दा असा आहे की तुम्ही (म्हणजे चित्रपट निर्माते,दिग्दर्शक वगॅरे..) प्रेक्षकांना असे म्हणणार आहात का "बाबा रे, तुझी जरा समज वाढव की चित्रपटांची..मग बघ आम्ही कसे छान छान चित्रपट काढतो" ?? म्हणणार आहोत नाही म्हणतो आहोत. :) ही simulteneous प्रक्रिया आहे. >>चांगला चित्रपट काढायची (आणि त्याच बरोबर तो विकायची) जबाबदारी ही सर्वस्वी तो तयार करणार्‍यांची आहे असे मला वाटते.. नाही कोण म्हणतंय? पण त्याही पलिकडे जाऊन बरंच काही देण्यासारखं असतं. ते कदाचित एवढ्यात स्वीकारले जाणार नाही अजून काही वर्षं लागतील असाही विचार आम्ही करतो. >> कमी चकचकाट असलेला एखादा चित्रपट चांगला असेल असे जर वाटले एखाद्या कमी समज असलेल्या प्रेक्षकाला तर तो नक्कीच बघेल.वर उल्लेखलेल्या कलाकृतींनी ते सिध्द केले आहेच.. त्यातून प्रेक्षकाची समज वाढली नाही? >>बाकी, जर आपण माझा आधीचा प्रतिसाद व्ययक्तिक (कि वय्यक्तिक ?) घेतला असल्यास (भाषेवरुन वाटले तसे) मला नाही वाटत माझ्या प्रतिसादात वैयक्तिक घेतलाय असं वाटावं असं काही होतं. पण ठीके तुमचा दृष्टीकोन तो. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by नीधप

>>म्हणणार आहोत नाही म्हणतो आहोत. :-) ही simulteneous प्रक्रिया आहे. ठीक आहे तर मग..लागतो आम्ही समज वाढवायच्या मागे :-) होप वुई वील कॅच अप !!

चित्रपट व्यवसाय हा नशिबाचा खेळ आहे....चित्रपट यशस्वि होण्यासाठी कुठलच नियम नाहि.......अनेक चित्रपट का सिल्वर जुबिलि झाले..व काहि बोलपट का आपटले याचे रहस्य कोणालाच कळले नाहि...त्या मुळे ५ वा पर्याय नशिब असा द्यावा असे मि आपनास सुचवु ईच्चितो..

In reply to by अविनाशकुलकर्णी

अगदीच असहमत... नशीबाचा खेळ केवळ १०% असतो असं म्हणायला हरकत नाही. मार्केट, प्रेक्षकांची मानसिकता, तत्कालीन घटना इत्यादींचा नीट अभ्यास केला निर्माता आणि दिग्दर्शकाने तर कुठल्या फिल्मला का यश मिळाले किंवा नाही मिळाले याचे गणित सुटू शकते. अभ्यास करण्याची, स्वतःच्याच चुका शोधण्याची/ मानण्याची इच्छा हवी. नशीबाचे दैववादी दाखले इत्यादी ही पळवाट आहे केवळ. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

>>नशीबाचा खेळ केवळ १०% असतो असं म्हणायला हरकत नाही. सहमत आहे. आणी हे १०% सुद्धा म्हणजे चित्रपट प्रदर्शित होताना त्याचवेळी एखादा तोडीचा चित्रपट प्रदर्शित होणे, निवडणुका होणे, किंवा दुसरी एखादी मोठी घटना घडणे यामुळे चित्रपटाच्या यशस्वी होण्यावर थोडाफार फरक पडु शकतो. लोकांना काय दाखवायचे यापेक्षा लोकांना काय हवे आहे याचा विचार केला तर नक्कीच चांगला चित्रपट तयार होऊ शकतो, लोकांच्या डोळ्यात पाणी कसे आणायचे किंवा खळखळुन कसे हसवायचे हे तंत्र दिग्दर्शकाला ज्ञात हवे. अर्थात त्यात कलावंतांचा (पडद्यामागचे सुद्धा) सहभाग हवाच. श्वास हा चित्रपट जीवंत उदाहरण आहेच. यात मला "अमृता सुभाष" अभिनय फारच आवडला होता, अर्थात "अरुण नलावडेंचा" सुद्धा. हरीशचंद्राची फॅक्टरी चित्रपट कुणी पाहिला आहे काय? त्याबद्दल थोडी माहिती मिळाली तर आनंद होईल. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by मराठमोळा

>>आणी हे १०% सुद्धा म्हणजे चित्रपट प्रदर्शित होताना त्याचवेळी एखादा तोडीचा चित्रपट प्रदर्शित होणे, निवडणुका होणे, किंवा दुसरी एखादी मोठी घटना घडणे यामुळे चित्रपटाच्या यशस्वी होण्यावर थोडाफार फरक पडु शकतो. अगदी बरोबर! >>लोकांना काय दाखवायचे यापेक्षा लोकांना काय हवे आहे याचा विचार केला तर नक्कीच चांगला चित्रपट तयार होऊ शकतो, लोकांच्या डोळ्यात पाणी कसे आणायचे किंवा खळखळुन कसे हसवायचे हे तंत्र दिग्दर्शकाला ज्ञात हवे. लोकांना काय हवे आहे याचाच केवळ विचार करणे अयोग्य. अतिशय प्रामाणिकपणे बनवलेली कुठलीही कलाकृती लोक स्वीकारतातच. पण ती तयार होण्याआधी लोकांना माहीत नसते की आपल्याला असेही हवे आहे. (हे अनुभवातून!) डोळ्यात पाणी आणणं काही अवघड नाही. सौभाग्य वस्तू भांडार वाले सिनेमे ते करतच आलेले आहेत. असो... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home