मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंजीर मोदक (पेढा)

दिपाली पाटिल · · पाककृती
पेढा साहित्यः १ कप दुध पावडर २ टे. स्पु . तुप वेलची पावडर १/२ कप अंजीर पेस्ट (५ अंजीर १/२ कप दुधात भिजवुन बारिक करावेत) १/२ डबा कंडेन्स्ड दुध (याच्या गोडपणा मुळे साखर लागत नाही सहसा..) कृती: वरिल सगळं साहित्य (वेलची पावडर सोडुन) एका पॅन मध्ये एकत्र करुन घ्या. कमी उष्ण्ते वर घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. वेलची पुड टाकुन हलवा आणि हव्या त्या आकारात पेढे बनवा. वरुन बदाम काप टाकुन सजवू शकता... टीपः अंजीर न टाकता पेढ्या चा बेस तयार होईल, त्यात दुसरा फ्लेवर टाकुन ही पेढे बनवता येतील. जसं केशर पेढा...

वाचने 12069 वाचनखूण प्रतिक्रिया 36

शार्दुल Tue, 06/09/2009 - 12:39
पाकक्रुती एकदम सोपी आणि साधी आहे,,, अगदी जमेल अशी,,, अग पण दुध पावडर पाण्यात मिक्स नाही ना करायची? कोरडीच वापरायची? नेहा

विसोबा खेचर Tue, 06/09/2009 - 12:46
शब्दच संपले..! दिपाली, तुझं कौतुक तरी किती करू?! :) मोदक ही आमची अत्यंत मनभावन पाकृ! जियो...! तात्या. अवांतर - अगं पण शीर्षक तर 'पेढा' असं दिलं आहेस. पान उघडून पाहतो तर बाप्पाच्या कृपेने त्याचे मोदक तयार झालेले! :) असो, लालबागच्या राजाचा विजय असो.. आपला, (कट्टर गणेशभक्त) तात्या.

हे हे हे २ पेढे ताबडतोब इमेल करा ;) काय जबर्‍या दिसत आहेत, पटकन उचलुन एक खावा असे वाटत आहे. परा हलवाई ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by दिपाली पाटिल

अवलिया Tue, 06/09/2009 - 14:57
मला पण इमेल करा ...... :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

दिपाली पाटिल Tue, 06/09/2009 - 12:50
धन्यवाद तात्या, मी याला मोदक च शिर्षक देते. चुचुताई यांना अंजीर मोदक पण म्हणता येईल. शार्दुल , दुधाची पावडर पाण्यात नाही टाकायची, गरम झाल्यावर कंडेन्स्ड मिल्क आणि अंजीर पेस्ट , तुप विरघळायला लागेल. दिपाली :)

स्वाती दिनेश Tue, 06/09/2009 - 12:56
अंजीर मोदक फारच सुरेख दिसताहेत ग दिपाली, अंजिर न घातल्यास नुसते थोडे केशराच्या काड्या घालून केशरी पेढाही करता येईल ना? वरुन पिस्त्याचे काप लावायचे..:) स्वाती

सहज Tue, 06/09/2009 - 13:07
दिपालीताई जय हो!! पाकृ मस्त व फोटो तर काही बोलायलाच नको!!! अप्रतिम!

यशोधरा Tue, 06/09/2009 - 13:31
दिपाली, एकदम मस्त गं! :) त्या पर्‍याला २ पेढे दे आणि उरलेलं पेढ्यांच आणि मोदकांच ताट पेढ्यां मोदकासकट मला पाठव पाहू :)

फार झकास दिसताहेत हे अंजीर मोदक आणि पाकृ सुद्धा किती सोपी. धन्यवाद दिपाली. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

मराठमोळा Tue, 06/09/2009 - 15:02
फोटो एकदम जबरदस्त.. पाकृ आवडली.. पुढच्या चतुर्थीला नक्कीच होणार घरी अंजीर मोदक.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

रेवती Tue, 06/09/2009 - 18:40
काय भारी दिसतायत सगळे फोटू! दिपाली तू म्हणजे एकदम बाजी मारलीस की! स्वातीताईच्या सुचवण्यावरून तू पेढ्यांचा जे फोटू चढवलायस ना.... तो तर ग्रेटच आहे. तू भेट मला एकदा! :) ह्या पाकृबद्दल तुला बक्षीस द्यावसं वाटतयं. रेवती

मदनबाण Tue, 06/09/2009 - 19:19
मोदक आणि तोही अंजिरवाला....अहाहाहाअ... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor

संदीप चित्रे Tue, 06/09/2009 - 19:28
दीपाली, आधीच मोदक आवडता प्रकार आहे. त्यात खव्याचे मोदक / पेढे म्हणजे तर एकदम आवडते. फोटो पाहूनच खलासलो... लवकर पाठव हे अंजीर मोदक :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com

शाल्मली Tue, 06/09/2009 - 21:26
काय मस्त दिसताहेत मोदक आणि पेढे! खव्याशिवायही पेढे होतात हे वाटलंच नव्हतं! ह्या उत्तम पाकृसाठी धन्यवाद. --शाल्मली.

In reply to by शाल्मली

समिधा Tue, 06/09/2009 - 23:03
मलाही खव्याशिवायही पेढे होतात हे वाटलंच नव्हतं! खुपच सुंदर दिसतायत.. धन्यवाद.....:) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

चतुरंग Tue, 06/09/2009 - 21:31
पण कसलं काय! एकदा नव्हे सकाळपासून चारदा चक्कर झाली इथे! दीपालीताई, कसला अल्टी फोटू आलाय!! शिस्तीत ताटली घेऊन बसावे आणि मांडा ठोकून एकेक करुन सगळे मोदक अन पेढे फस्त करावेत असं वाटतंय! =P~ (गोडघाशा)चतुरंग

प्राजु Wed, 06/10/2009 - 00:42
मस्त केले आहेस गं! मस्तच फोटो. एकदम खास. मीही पेढे करून बघेन. आवांतर : तुझ्याकडे तो मोदकाचा साचा आहे का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रान्ति Wed, 06/10/2009 - 08:36
उद्या गणपतीला नैवेद्य! मस्तच फोटो आणि पाकृ. :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

मुक्ता गुरुवार, 06/11/2009 - 05:47
रिकोटा चीज आणि कंडेंस मिल्क सारख्या प्रमाणात घेतल्यास अगदी खव्याचा मोदकासारखे मोदक होतात. त्यात बदाम, पिस्ते, काजु, इ.(पेस्ट) घालून आपल्या आवडी/स्वादा प्रमाणे करता येतात. बाकी तुझी रेसीपी आवडली, नक्की करुन पाहीन. ../मुक्ता