Skip to main content

परब्रह्म

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 02/06/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
परब्रह्म विटेवरी | दोन्ही कर कटेवरी वाट भक्ताची पाहतो | देव पुंडलिकादारी संत जनाईच्या घरी | दळण कांडण करी ओव्या गातो भक्तासंगे | भावाचा भुकेला हरी देव एकनाथाघरी | कावडीने पाणी भरी सांभाळितो चोखोबाची | गुरे सावळा मुरारी तुक्याचे अभंग तारी | कान्होपात्रेला उद्धारी निवृत्ति, सोपान, मुक्ता| ज्ञानियाचा हात धरी दुमदुमली पंढरी | रिंगणात वारकरी नित्यनेमाने चालते | आषाढी कार्तिकी वारी संत मी ना वारकरी | आळविते तुला तरी आस मुक्तीची घेऊन | आले देवा तुझ्या दारी
लेखनविषय:

वाचने 3847
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

काय सुंदर छंद रचलाय तुम्ही... संत मी ना वारकरी | आळवितो तुला तरी आस मुक्तीची घेऊन | आलो देवा तुझ्या दारी असेच म्हणावेसे वाटते. -अनामिक

तुमी आमाला पंढरीला नेऊन आणलंत. छान. अभंगच जणू.

भक्तिरसाने ओथंबलेले गीत !

सुंदर भक्तीमय कविता.. चालीत अगदी नीट म्हणता येतेय.. ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

वा. प्रसन्न वाटल.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

सुंदर रचना. चाल लावलीत का? :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सुंदर! छान रचना आहे. --शाल्मली.

अतिशय सुंदर रचना! हा अभंगच आहे.. खूप प्रसन्न वाटले वाचून. असेच लिहीत रहा. संत मी ना वारकरी | आळवितो तुला तरी आस मुक्तीची घेऊन | आलो देवा तुझ्या दारी... क्या बात है! राघव

अतिशय प्रासादिक रचना... (फ्यॅन) तात्या.