काव्यात हरवलेला मी ..
शब्दांना नाही गणती
एक सोडावा, दुसर्या जोडावे
ओळ, शब्द मर्यादेसाठी
मनामध्ये उजवे, डावे
कुणी म्हणतात . .
काव्य असावे छांदस,
शब्दांच्या मर्यादेत.
मर्यादा सोड्ली तर गैर,
नी छंदमुक्त अन स्वैर..
मला नाही वाटंत तसं, कि ..
हव्यात मर्यादा काव्यासाठी
अथांग सागर, सुसाट वारे
खुला निसर्ग सर्वांसाठी
एक विचारू तुम्हाला मी. .?
जंगलामध्ये आडवाटेवर
फुलांची असतेच् ना वस्ती ?
रसिक पाखरे येतातच् ना
रसभरल्या फळांवरती ?
म्हणून कधी वाटते मला. .
छंदोपजीवी काव्य नको ..
मर्यादेचे नांव नको ..
अर्थभारल्या भावनांना
संख्याबाधीत ठाव नको
असेही असते बरं कां ..
काव्य कुणाला, कधी स्फुरावे
ह्याचेही बंधन नस्ते खास
वर्हांड्यातल्या डबड्यामधून
तुळससुध्दा घेते श्वास....
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2766
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सही!
केवळ क्लास ओळी!
In reply to सही! by क्रान्ति
सहमत
करेक्ट!
व्वा ! छान काव्य
मस्त आहे.
छंदमुक्त काव्य आवडते, पण तुमचे कारण नाही
वर्हांड्
अप्रतीम