Skip to main content

खानदेशी शेव भाजी

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 02/06/2009 04:10 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः १ वाटी कांदा - उभा चिरून १/२ वाटी सुके खोबरे १ टेस्पु. पोहे २-३ लसुण पाकळ्या (सोलून) १ १/२ इंच आले १ १/२ टि स्पु गरम मसाला तिखट चवीनुसार मिठ चवीनुसार १/२ वाटी तेल ३-४ वाट्या गरम पाणी - मी अंदाजाने च टाकते. १ वाटि तिखट शेव कृति: १) कांदा, १ टे स्पु. तेल घालुन भाजुन घ्यावा. कांदा चांगला तपकिरी रंगा चा भाजला गेला पाहिजे. २) खोबरे सोनेरि रंगा वर भाजुन घ्या. तसेच पोहे पण थोड्या तेलात भाजुन घ्या. ३) कांदा + खोबरे + पोहे +आले + लसुण + गरम मसाला , पाणी घालून नीट बारिक वाटुन घ्या. ४) बाकिचे तेल पातेल्या त किंवा कढई त गरम करुन घ्या. ५) तेलात वरिल बारिक केलेले वाटण + तिखट टाका. ६) आता तेल सुटे पर्यंत मध्यम आचे वर परतवत रहा. ७) छान तेल सुट्ले पाहिजे नहितर चोथा पाणी होतो मसाला. ८) आता गरम पाणी , मिठ टाकुन मध्यम आचे वर उकळी यायला ठेवा. ९) जेवायच्या १० मिनिटे आधी तिखट शेव टाकुन वाढा. टिपः शेव खुप आधी टाकुन ठेवु नये नाहितर लगदा बनतो. मस्त कांदा लिंबू घेउन खावे.

वाचने 26281
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

In reply to by मितालि

आयच्यान ... खरं सांगतो .. बणेल ओला झाला लाळ गळून ... आमची आई .. असली झण्झणीत शेवची भाजी करते .. त्याची आठवण झाली .. बेष्ट .. - टारझन (मु.पो. सावदा)

फारच झकास दिसते आहे भाजी! मसाल्यात पोहेसुद्धा घालायचे म्हणजे अगदी वेगळाच प्रकार! मी विचारच करत होते या अठवड्यात ही भाजी करायचा......बरी सापडली कृती! ;) केल्यावर कळविनच! एक शंका, भाजीबरोबर पोळी खायची की भात? रेवती

In reply to by रेवती

रेवती, आम्ही आधी पोळी सोबत खातो आणि नंतर भातासोबत... :) मसाल्यात पोहे घातल्याने भाजी मिळून येते पण जास्त पोहे घालू नयेत, एखाद चमचा पुरे होतात. दिपाली :)

In reply to by दिपाली पाटिल

आम्ही आधी पोळी सोबत खातो आणि नंतर भातासोबत... हा हा हा. रेवती

In reply to by दिपाली पाटिल

मस्त गावरणी ज्वारी चि भाकरी आणि शेवभाजी....आहा हा हा...... कांदा....लिंबाची फोड...... नाकातोंडातून पाणी आले.....नुसत्या आठवणीने.....

झकास... बर्याच दिवसा॑न॑तर सय आली शेव भाजीची....

आईऽऽऽ शपथ्थ!! जबरी!!!!!!!!!! या भाजीत पोहे असतात हे माहीतीच नव्हतं.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अरे भाई , आ शाक तो आपडा सेव टमाटानाच शाक होय... सुरतमा बहु सरस मळसे.. खानदेसमा क्यांथी आवी गयु? विंजिनेर पटेल

In reply to by विंजिनेर

या शाक मध्ये टोमॅटो नाहिये.. खानदेसमा क्यांथी आवी गयु? :/ दिपाली :)

आहाहा.... सुट्टीत खूप खेळून दमून आल्यावर 'आजीऽऽ भूऽऽक' अशी मारलेली आरोळी आणि मग आजीने पानात वाढलेली अस्सल खानदेशी पद्धतीची गरम गरम शेव भाजी आणि पोळी आठवली. जीव कासावीस की हो झाला.

झ क्का स !! बास ! दुसरा शब्दच नाही :) --अवलिया

खुसखुशीत भाजी मस्त! करून पहायला हवी! :) क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

वा! शेव भाजी! झख्खास!

अतिसुंदर... :) ही गरम मसाल्याची शेव भाजी आहे...अस्सल काळ्या मसाल्याची शेव भाजी फार सुंदर लागते... नाशिकमधे तर जवळपास सर्व ठिकाणी मिळते. काही लोकं भावनगरी शेव वापरतात.. ती सुद्धा छान लागते पण त्यात सोडा जास्त असल्याने पोटासाठी तेवढी चांगली नाही. ;) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

पाकृ जबर्‍याच! दिपाली, जियो..! :) तात्या.

उच्च ! ह्या रविवारी हा बेत नक्की ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

करुनच बघते ,,,,,, आता ,,,,, नेहा

आज सकाळीच मला शेवभाजीची आठवण झाली आणि मिपा उघडल्यावर तीच दिसली.. पोह्यांचे मलाही माहित नव्हते. पण इथे फ्राफुत शेव अगदी बंडल मिळते, :( तरीही करीनच एकदा लवकरच.. स्वाती

भाजी झकासच आहे ग !!!!! पण याच्या ग्रेव्हीत टोमॅटो का वापरत नाहीस?

जबरी. मिसळपाववर अगदी सुयोग्य पाककृती. खराटा (रंग माझा वेगळा)

मस्त दिसत्ये शेव भाजी. सध्या फक्त फोटोवरच समाधान मानावं लागणार भारतात जाईपर्यंत .. इथे तशी शेव मिळत नाही. :( --शाल्मली.

माधुरि दिक्षीत - अस्सल खानदेशी ग्रेव्यां मध्ये टोमॅटो नसते . :) स्वाती ताई, चकली - तुमचे प्रतिसाद आले म्हणजे परिक्षे त पास झाल्यासारखं वाटतं. :D बाकि तात्या, परा,प्राजु, रेवती, मिताली,अनिता, क्रांती, खराटा, अवलिया,शाल्मली, सँडी, आणि ज्यांची नावं विसरली असेल त्यांनासुध्दा मनापासून धन्यवाद. बागडू -- खानदेशा त सगळ्या आमट्यां ना भाजी च म्हणतात. मराठमोळा - काळ्या मसाल्याची कशी असते शेवे ची भाजी ? पाकृ दिलीत तर ....:) सगळे करून बघा आणि फोटो टाका... दिपाली :)

खुपच छान दिसतीय ही भाजी ,खुप दिवसात केली नाही आता करुन बघेन समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

लै भारी आहे ही पाकक्रिया. काही वर्षापूर्वी भुसावळ ला एका भावाच्या लग्नाला गेलो होतो त्यावेळी आदल्या दिवशी त्या कार्यालयात ही शेवभाजी प्रथम खाल्ली होती. अजूनही जिभेवर ती चव रेंगाळते आहे. ( दुसर्‍या दिवशीचं जेवण मात्र अगदीच बावळट होतं ) ही पाकृ दिल्याबद्दल आभार. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

टोटल आडवा झालो. आता करायलाच पाहिजे. जातो कुठे. दिपाली.. ब्रेड बरोबर खायला सुद्धा चांगली लागते ना ? ....बबलु

एकदम झकास दिसतीये भाजी.... जेवण झाल्यावरही लिंबु पिळुन अशी आंबट-तिखट भाजी ओरपण्यात काय मज्जा येते....

शेवभाजीची पाककृती आणि छायाचित्र जबरी आहे. सोबत जोंधळ्याची भाकरी आणि जमल्यास खानदेशी भरीत (वांग्याचे) हवे बुवा! लवकरच करून पाहतो म्हणणार होतो पण भाजीवरील तेलाचा तवंग पाहिल्याबरोबर आमच्या फॅमिली डॉक्टरांची कृद्ध नजर आठवली. (ते कोकणांत त्यांच्या गावी गेले की करू.) मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

In reply to by प्रभाकर पेठकर

सोबत जोंधळ्याची भाकरी आणि जमल्यास खानदेशी भरीत (वांग्याचे) हवे बुवा! प्रभाकर , या भाजी सोबत जोंधळ्याची भाकरी आणि खानदेशी भरीत नाही खात, या सोबत पोळी , भात खातात. आणि सोबत लिंबु पिळुन, कांदा, टोमॅटो, मुळा खातात. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने दोघांची ही चव नीट लागणार नाही. :) दिपाली :)

In reply to by प्रभाकर पेठकर

सोबत जोंधळ्याची भाकरी आणि जमल्यास खानदेशी भरीत (वांग्याचे) हवे बुवा! प्रभाकर , या भाजी सोबत जोंधळ्याची भाकरी आणि खानदेशी भरीत नाही खात, या सोबत पोळी , भात खातात. आणि सोबत लिंबु पिळुन, कांदा, टोमॅटो, मुळा खातात. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने दोघांची ही चव नीट लागणार नाही. :) दिपाली :)

खानदेशी भरीत (वांग्याचे) ? अरे वा... रेसिपी डकवा.. ../मुक्ता

हा एक प्रकार आत्तापर्यंत कधी खाल्ला नाहीये :( बघू लवकरच जमवावं लागेल.

In reply to by संदीप चित्रे

खानदेशी भरित पाकृ द्यायची होती मला पण फोटो नाहिये. ते थोड्या वेगळ्या पद्धती ने करतात.. दिपाली :)

पार्सेल मिलेल का........... राकेश मु पो अमळनेर.....

सकाळ की कुठल्याश्या अंकात हीच पाकृ आली आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ही पाकृ मला झोपेतुन उठवुन विचारली तरी येईल. :) ... माझी च नाही घेतली ??? /:) /:) /:)

In reply to by दिपाली पाटिल

माझी च नाही घेतली ??? येस! तुझीच ढापली आहे कुणीतरी! सर्वसाक्षी का कुणीसं मला म्हणत होतं! आता वयानुसार नक्की आठवत नाही.. असो तात्या.

एकदम मस्त... माझी काकी मस्त करते ही भाजी... आता मी पण करुन बघेन... पण दिपालीताई, पोहे कुठले वापरु सान्गाल का? म्हणजे जाड, बारिक?? की कुठलेही वापरले तरी चालतील? कारण आमच्या इकडे जाड पोहे म्हणजे बर्‍यापैकी कडक मिळतात...

आजच 'हिला " भाजी करायला सांगतो. अगदी वघळ येइस्तो हाणायचा बेत ठरवलाय, दिपालिताइ बाकी प्रतिक्रिया उद्या.......