वाटंला डोळे जीव थकला
धनी कधी हो येता घरला
साजण माझ्या स्वप्नीच आला
मला दिलाचा दिलवर भेटला
तगमग जिवाची होतेया भारी
रात सरली कधी येतेया स्वारी
वृंदगान : मर्दानी तोरा हसतोय छान
हिच्चा नवरा शारूख खान
माझा डोळाच पटकन लागला
मला दिलाचा दिलवर भेटला
नणदेचा दादला डोळा मारी
इष्टेटीवरती नज्जर सारी
वृंदगान : बटाटे डोळे टमाटे कान
नण्देचा नवरा इर्फ़ान खान
हा ठेवा मी जपून ठेवला
मला दिलाचा दिलवर भेटला
राती अचानक खोलीत आला
मला पाहुनी दिवा मालवला..
वृंदगान : अगं अगं येडे लवकर जाण
शारूख हाये की इर्फ़ान खान
कसा एकदम अंधार झाला
मला दिलाचा दिलवर भेटला
अंधाराची मजला वाटतेया भीती
चोराचिलटाची चिंता गं किती
वृंदगान : दादल्यानं हिकडं प्येटवलं रान
नक्कीच हाये ह्यो शारूख खान
किती नवसानं तीर माझा बसला
मला दिलाचा दिलवर भेटला
३० मे २००९, पुणे
____________________________________________________________
वाचने
7360
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
अग्गा अग्गा !
बटाटे डोळे
जोरदार!
भारी!!!
अवांतर:
In reply to भारी!!! by बिपिन कार्यकर्ते
मजा आली
वा! मस्त
बाप रे......
वृंदगानाला दंडवत ....
विषयांतराबद्दल क्षमस्व !
In reply to वृंदगानाला दंडवत .... by भडकमकर मास्तर
अरे काय
In reply to वृंदगानाला दंडवत .... by भडकमकर मास्तर
वा!
भारी
एकदम झक्कास............
आणि या
अब सुनिये
In reply to आणि या by अनंता
भारीच की...
(येथे एक
सुंदर
मस्त..
लय भारी
बटाटे डोळे
लावणी
In reply to बटाटे डोळे by मनिष
सहमत - इरफान खानच्या आवडीबद्दल
In reply to लावणी by मेघना भुस्कुटे
रंगा सेठ,
In reply to सहमत - इरफान खानच्या आवडीबद्दल by चतुरंग
हा हा
जबरा! येऊ
दे धमाल
लावण्य 'खानी ' लावणी . सगळे खानच कां ?
शरदिनी
"दिलाचा