राजकारणात सद्हेतूने येणारांची संख्या आता घटलीये. किंबहुना या लोकांना आता राजकारणात स्थानच राहिलेले नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा राजकारणाचा नियम झालाय. एक विचार घेऊन आम्ही राजकारणात येतो, जनतेच्या उद्धार हेच आमचे कर्तव्य आहे, असे आश्वासक शब्द वापरून राजकारणात स्थिर स्थावर व्हायचे आणि नंतर वाट्टेल तशी भूमिका बदलून लोकांनी टाकलेल्या विश्वासाला हरताळ फासायचा. हे थोड्या बहुत फरकाने प्रत्येक राजकीय पक्षालाच लागू आहे. त्यात कॉंग्रेस हा तर व्यवहारवादीच पक्ष आहे. तरीही सामान्य जनांमध्ये हाच पक्ष लोकप्रिय आहे. त्याची कारणे आर्थिक व्यवहारांशीच निगडीत आहे. परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे पक्ष काही वेगळ्या विचारांचे प्रतिनिधित्व करीत आहेत, असे वाटत होते. परंतु हे पक्षही संधीसाधू झाले आहे. शिवसेना हा तर मराठी माणसाच्या एकजुटीवर उभा राहिलेला पक्ष आहे. या पक्षाच्या प्रमुखांनी मात्र या शक्तीचा गैरवापर केला. सत्तेच्या राजकारणासाठी अनेक तडजोडी केल्या. सत्ता मिळविली; पण मराठी माणसाचे काय झाले, असा प्रश्न विचारल्यास किंवा सद्य स्थितीचे अवलोकन केल्यास "मराठी' उपऱ्याचेच जिणे जगतो आहे. आता तर खरा कोण? मी का तू? यावरच भांडणे सुरू आहेत.
या भांडणावरही वर्तमानपत्रातून चर्चा होते आहे. त्यातून काय निष्पन्न होणार देव जाणे... वाचा
http://beta.esakal.com/2009/05/27103828/features-current-affairs-about…
http://beta.esakal.com/2009/05/29100539/features-current-affairs-about…
वाचने
1766
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
वैध बुवा
मराठी
मराठी मान्साच
मराठी माणूस
असली वाक्य
In reply to मराठी माणूस by चिरोटा
स्वतः मराठी माणूसच....