Skip to main content

जगायचे स्वतःलाच शोधत!!!

लेखक निशिगंध यांनी रविवार, 31/05/2009 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुला शोधता शोधता..... मी हरवून बसलो होतो स्वतःलाच.. आता तुझे विचारही नाहीत मनात मी शोधत आहे माझे मलाच... माझे मलाच... असे काही तरी लिहायचे आणी समजुत घालायची आपल्या मनाची.. पण प्रयत्न केले नाहीत असे नाही.. खुप प्रयत्न केले तीला सांगण्याचे.. पण हरलोच ना शेवटी, कधी आजुबाजुच्यांचा विचार, तर कधी तिचाच. तिला काय वाटेल. मित्र म्हणायचे अरे सांग तीला मग तिलाच ठरवू दे ना.. त्यांना काय जाते सांगायला. मी जाईन इथुन २ महिन्यानी पण तीला अजुन २ वर्ष काढायची आहेत हया महाविद्यालयात.. आणि आईचे निराळेच.. फोटो पाहुन म्हणते छान आहे रे!! पण आपल्यातलीच आहे ना रे!! आता आपल्यातलीच पाहुन थोडे प्रेम होते.. शेवटी ठरवलेय तीला काहीच सांगायचे नाही.. आणी आपण नुसतेच जगायचे... आता पर्यंत नाही का जगलो आताही पुढे तसेच जगायचे स्वतःलाच शोधत...........
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1433
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

एक तर प्रेमाच्या भानगडीत पडायचं नाही. आणि पडल्यावर बोलायचं काही बाकी ठेवायचं नाही. नाही तर , उरल्या आयुष्यात कविता करत बसावे लागते ! ( ह. घ्या ) जे होईल ते होईल, मनातलं सांगून टाक ! -दिलीप बिरुटे (निशिगंधचा मित्र )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा! त्याला मारे उपदेश करता ..... स्वतःचे काय? चालु द्या ;) --अवलिया

शहाणी सुरती माणसं मुळी प्रेमच कां करतांत? मेलो मेलो म्हणत, मग कुंथत कां बसतात?