Skip to main content

तळलेले (कुरकुरीत) सुके बोंबील.

लेखक जागु यांनी शुक्रवार, 29/05/2009 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य : ७-८ सुके बोंबील (तुकडे करुन) दोन चिमुट मिठ (कमीच घालावे कारण आधीच हे खारट असतात) थोडी हळद, हिंग, मसाला, पाव चमचा लिंबाचा रस, तळण्यापुरते तेल. बोंबील धुवून घ्यावेत. त्याला हिंग, हळद, मिठ, मसाला, लिंबाचा रस चोळावा तवा गरम करून त्यात २ चमचे तेल टाकुन बोंबील टाकावे. गॅस मंद ठेवावा. मधून मधून हलवावेत. साधारण ५ मिनीटांत हे तळून होतात मग गॅस बंद करावा. हे थंड झाले की कडक होऊन कुरकुरीत लागतात.

वाचने 8154
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

लेखात एक छोटीशी चुक झाली आहे. तुम्ही बोंबील न लिहिता लिंबु लिहिल आहे. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

=)) =)) सुर धन्यवाद हो. मी बघितलच नव्हत.

जागु अगं किती धन्यवाद देऊ तुला..... घरी मुलांना खुप आवडतात सुके बोंबिल... आणि मलाही.. साधना

मुलांना करुन दे आणि तु पण खा म्हणजे मिळाले मला धन्यवाद.

आम्ही विनाफोटूच्या पाकृंना बरा-वाईट, कोणताच प्रतिसाद देत नाही.. क्षमस्व.. तात्या.

एवढा तरी प्रतिसाद दिलात त्या बद्दल धन्यवाद.

कुरकुरीत पा.क्रु. :) करुन बघावीच लागेल !!!!