तळलेले (कुरकुरीत) सुके बोंबील.
साहीत्य :
७-८ सुके बोंबील (तुकडे करुन)
दोन चिमुट मिठ (कमीच घालावे कारण आधीच हे खारट असतात)
थोडी हळद, हिंग, मसाला, पाव चमचा लिंबाचा रस, तळण्यापुरते तेल.
बोंबील धुवून घ्यावेत. त्याला हिंग, हळद, मिठ, मसाला, लिंबाचा रस चोळावा
तवा गरम करून त्यात २ चमचे तेल टाकुन बोंबील टाकावे. गॅस मंद ठेवावा.
मधून मधून हलवावेत. साधारण ५ मिनीटांत हे तळून होतात मग गॅस बंद करावा.
हे थंड झाले की कडक होऊन कुरकुरीत लागतात.
वाचने
8144
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
एक छोटीशी चुक
धन्यवाद.
होत असं कधी कधी
वाव
मुलांना
आम्ही
एवढा तरी
कुरकुरीत