मिसळपावच्या जुन्या सदस्यांना ‘दास्तान-ए-आवारगी’ आठवत असेलच.
तर तीच केळकरची गोष्ट आता एकसंध वाचायला किंडलवर उपलब्ध झाली आहे !
साधारण दशकभरापूर्वी गगन विहारी (गवि) यांनी मिसळपाववर टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केलेली ही गोष्ट. ‘और गिटार’, ‘ब्राऊ’ हे या कथेचे त्यानंतरचे भाग. त्यावेळी या लेखनाला मिपाकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. प्रत्येक भागावर भरभरून प्रतिक्रिया आल्या होत्या. इतक्या वर्षांनंतरही अनेक जुन्या मिपाकरांच्या स्मरणात केळकर आणि त्याची दुनिया ताजी आहे.
आता ही संपूर्ण गोष्ट "केळकर" या नावाने एक लहानशी कादंबरी बनून ॲमेझॉन किंडलवर एकसंध वाचायला उपलब्ध झाली आहे.
लेखकाच्या शब्दांत सांगायचं तर...
---
...आयुष्यात नेमकं कोण कुणाच्या नादी लागलं होतं, याचा हिशेब कधीकधी शेवटपर्यंत लागत नाही.
एका विशिष्ट वयात आपल्याला सगळं जग कळलेलं असतं. हो. असतंच. असा माझा प्रामाणिक समज होता.
आम्हा पोरांचा तर पोरींबाबतचा अभ्यासही दांडगा होता. अर्थात, तसा आमचा समज होता. हाही एक प्रामाणिक समज.
त्यात मित्रही असे लाभलेले, की आपण खड्ड्यात पडणार असलो तर आपल्याला सावध करण्याऐवजी ते आधीच खड्ड्यात उतरून आपली वाट पाहत बसलेले असायचे.
पण त्या वयात सहज, आपोआप सुरू झालेल्या प्रत्येक गोष्टीचा शेवटही सहजच होतो असं नाही.
आणि कधीकधी स्वतःच्याच मनात असं काही सापडतं, की च्यायला, ते सापडलं नसतं तर बरं झालं असतं असं वाटत राहतं.
तर अशाच एका वयातली ही गोष्ट. जुनी पण नवी. विना मोबाईल, विना इंटरनेट असा काळ. पण त्याने काय फरक पडतो?
गोष्ट. केळकरची.
---
मिसळपाववर जन्माला आलेल्या आणि इथल्या वाचकांनी आपुलकीने उचलून धरलेल्या एका साहित्यकृतीचा हा पुढचा टप्पा, ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे.
जुन्या मिपाकरांसाठी केळकरशी पुन्हा एकदा भेट घेण्याची संधी आणि नव्या मिपाकरांसाठी त्याच्याशी नव्याने ओळख करून घेण्याची.
गवि यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
"केळकर"
लेखक : गगन विहारी (गवि)
किंडल अनलिमिटेड वर मोफत वाचायला उपलब्ध.
उपलब्ध : ॲमेझॉन किंडल
लिंक : https://amzn.in/d/07zPMoiJ
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनन्दन् !!
गवी,
अभिनन्दन् !!
कादंबरी वाचेनच, पण ओरिजिनल लेखही आठ्वतोय..
व्वा...! अभिनंदन गविशेठ…
व्वा...!
अभिनंदन गविशेठ.
आजही मिपाच्या सर्वोत्तम लेखनात 'केळकर' आहे.
आता लगे हातो 'वाड्यात' पण पूर्ण करा ही आग्रहाची विनंती.
अभिनंदन
अरे वा. अभिनंदन
अभिनंदन गवि!
और आंदो
गवि मित्रा अभिन्ंदन! किंडल…
गवि मित्रा अभिन्ंदन!
किंडल अनलिमिटेड वर 'गगन विहारी' सर्च करून सगळी eBooks डाउनलोड करून ठेवली आहेत.
- (गविपंखा) सोकाजी
अभिनंदन गवि! 🌹🎉🎊💐
अभिनंदन गवि!
🌹🎉🎊💐
अभिनन्दन
सुन्दर उपक्रम