Skip to main content
लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 28/09/2026 19:03 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मिपाकर...

एक ऑक्टोबरला अजून एक-दोन दिवस बाकी आहेत. पण, लिहित्या हातांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, हे आपलं पहिल्यापासूनच धोरण आहे. पाहा संदर्भ जुने धागे. तर, काही मित्रांचं सुरू झालं, सर, चालू घडामोडीचा धागा काढा. तर, आपल्याला मिपाकर मित्रांचे आग्रह मोडता येत नाहीत.

तर मित्रांनो, यावेळी पाऊस कमीच झाला. दुष्काळी तालुक्यांची नावे जाहीर झाली. आपला तालुका राहिला, आपल्यावर अन्याय होतोय म्हणून कार्यकर्ते नेत्यांच्या मागे लागलेत. शेतीसाठी पाण्याची गरज, पिण्याचे पाणी, शेतीचे कर्ज, कर्जमाफी हे नियमितच विषय झाले आहेत. त्यावरही बोलू काही.

श्रीगणेशोत्सव शांतपणे, कमी आवाजात साजरा झालाय. गणपती बाप्पाची आठवण अजून आहेच. आता दुर्गोत्सव पण दिसायला लागला आहे. आमच्याकडे गल्लीत श्रीगणेशाचं स्टेज देवीसाठी तसंच ठेवलं आहे. आता वर्गणीवाले सुरू होतील, दांडिया रंगेल, काही अशा-काही तशा बातम्या येतील. उत्साह महत्त्वाचा. परंपरा, श्रद्धा वगैरे आणि देवीच्या कथा-आख्यायिका, त्यावरही काही बोलूया.

दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या कारभारावर चर्चा सुरू आहे. मतदार वगळणे, अन्याय आणि निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय, तसेच पक्षीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. निवडणूक आयोगाची स्वायत्तता, प्रत्यक्ष अंमलबजावणी, निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता, पक्षीय भूमिका आणि शेवटी असलेला मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे, यावरही चर्चा करू.

कॉकरोच जनता पार्टीचं निवडणूक आयोगाच्या धोरणाविरुद्ध आंदोलन सुरू होणार आहे, अशा बातम्या येत आहेत; पण त्यापूर्वीच आंदोलन पोकळ व्हावे, पूर्वीसारखं काही होऊ नये म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या सुरू झालेल्या आहेत. दोन ऑक्टोबरला मुंबैतील दादरच्या शिवाजी पार्क येथे निवडणूक आयोगाच्या कारभाराविरुद्ध आंदोलन करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने पोलिसांकडे परवानगी मागितल्याची बातमी होती आणि आंदोलन कायदा-संविधानाला अनुसरून शांततापूर्वक राहील, असे कॉकरोच जनता पार्टीने म्हटले आहे. सीजेपीचं प्रेशर ग्रुप म्हणून काम करणे पुढे कसे सुरू राहील, ते भविष्यात कुठे जाईल, त्यावरही बोलू...

तर, काथ्याकूट शांततेच्या मार्गाने, मिपाच्या धोरणानुसार, एकमेकांच्या मतांचा आदर करत सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

स्वागत आहे. शुभेच्छा.


वाचने 7218
प्रतिक्रिया 268

प्रतिक्रिया

In reply to by स्वधर्म

राहुल गांधी यांनी दोन वेळेस ( एकदा सर्वोच्च न्यायालयात आणि आताच एकदा मध्य प्रदेश उच्च न्यायालयात खोटे बोलल्याबद्दल सपशेल माफी मागितली आहे  आणि आपली सुटका करून घेतली आहे.).

Arvind Kejriwal has tendered formal apologies or expressed regret in at least 5 major defamation cases to resolve court proceedings.

 

यांच्या नैतिकतेबद्दल काही बोलायचं नाही. नाही तर व्हॉट अबाऊटरी चे आरोप करणार   

आणि हे आंदोलनात पुरावे ना देता नवे नवे आरोप करायला मोकळे

 

याना काय म्हणायचं कोडगे? का सालस?  

 

त्यापेक्षा ज्ञानेश कुमार बरे.   


मी अगोदर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे का कुणाकडे?

ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच नाही तर झुरळं काय करणार आहेत?

आणि ती सरकारची जबाबदारी कशी?

उत्तर नाही म्हणून ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा कसा द्यायचा ही प्रक्रिया कशाला सांगताय?
रस्त्यावर उतरून अनागोंदी माजवणे किंवा लोकनियुक्त सरकारला आणि जनतेला वेठीस धरणे हे मान्य आहे का?
लोकशाही मध्ये तुमच्यावर अन्याय झाला तर सरकार कडे आणि तेथे न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाणे हे घटनात्मक अधिकार आपल्याला आहेत यातील एकही न वापरता रस्त्यावर उतरून जनजीवन विस्कळीत करणे हा केवळ गुन्हा नसून घटनेची पायमल्ली आहे याविषयी काय मत आहे?


In reply to by सुबोध खरे

>> ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच नाही तर झुरळं काय करणार आहेत?

- राजीनामा नाही दिला तर घटनात्मक मार्गाने हटवले जाईल अशी आशा आहे.

- तुंम्हाला जवळपास खात्रीच आहे की काय की ते राजीनामा देणार नाहीत याची? प्रधान यांच्या बाबतीत झुरळांमुळे राजीनामा झाला होता. यांचा नाही झाला तर झुरळे आणखी जोरात आंदोलन करू शकतील. शिवाय विरोधी पक्ष राष्ट्रपतींना भेटले आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन. कोणी दादच घेईना तर सर्व जनता शेवटी रस्त्यावर उतरेल.

>> आणि ती सरकारची जबाबदारी कशी?

- देशातील लोकांच्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे जे आयुक्त खोटे बोलले आहेत (फॉर्म ६ च्या दुरूस्तीला मान्यता दिली होती याचा सर्वोच्च न्यायालयाने इन्कार केला आहे), ज्यांच्यामुळे लाखो मतदारांचा हक्क डावलला गेला, अशा आयुक्तांना घटनासंमत प्रक्रियेचा अवलंब करून हटवणे व जनतेच्या मतदानाच्या हक्कांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.


In reply to by स्वधर्म

त्यामुळे जे आयुक्त खोटे बोलले आहेत (फॉर्म ६ च्या दुरूस्तीला मान्यता दिली होती याचा सर्वोच्च न्यायालयाने इन्कार केला आहे),

याचा कृपया पुरावा देता येईल का?

निवडणूक आयोगाने शपथपत्र दाखल केले आहे कि फॉर्म ६ मध्ये फेरफार नाही तर एक पुरवणी जोडली आहे.   


In reply to by सुबोध खरे

The Chief Election Commissioner (CEC) and the Election Commission of India (ECI) claim that they did not change Form 6 itself, but rather attached a special declaration for the Special Intensive Revision (SIR), maintaining in a September 26 press note that this declaration had been upheld by the Supreme Court

. Conversely, India's Supreme Court explicitly stated on 5 October 2026 that it has not approved any modifications to Form 6, distancing itself from the alterations and demanding official records to investigate who authorized them. [1, 2, 3, 4, 5]

प्रक्रीया बदलली ना? शिवाय त्याला सुप्रीम कोर्टाची संमती आहे अशी दिशाभूलही केली. अजून काय पुरावा हवा आयोगाच्या बेकायदा कृती आणि दिशाभूल करण्याचा?


In reply to by स्वधर्म

फॉर्म 6 मध्ये कोणताही फेरफार केलेला नाही हे शपथपत्र निवडणूक आयोगाने दाखल केलेले आहे ते दाखवण्याऐवजी अगोदरची बातमी देऊन दिशाभूल करण्याचा आपला प्रयत्न केविलवाणा आहे एवढे लिहून मी थांबतो. पुढच्या सुनावणीच्या वेळेस गोष्टी स्पष्ट होतीलच.


In reply to by सुबोध खरे

पुरवणी का जोडली? त्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी होती का? बाकी एकच वाक्य उचलून आपण किती पळणार? निवडणूक आयोगाने जे काही केले (पुरवणी, प्रक्रीया बदल, एस आय आर अंतर्गत) त्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी नव्हती हे आपल्याला कोणत्याही शब्दात मांडले तर कळणार नाही, कारण तुंम्ही फटी बघून सतत पळत राहणार. चालू द्या. 


In reply to by स्वधर्म

अगदी एवढं बेकायदेशीर होतं तर सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्टे का दिलेला नाही.

 

मुळात कोणताही फॉर्म किंवा त्याला पुरवणी जोडणे हे सर्वोच्च न्यायालयाचे कामच नाही.

ते निवडणूक आयोगाचेच काम आहे. पण हे तुम्ही ध्यानातच न घेता एकाच मुद्द्यावर वितंडवाद घालता आहात.

उद्या सर्वोच्च न्यायालयाने पुरवणी लावणे बेकायदेशीर आहे असे म्हटले तर निवडणूक आयोग चूक आहे असे म्हणता येईल.  

तुम्ही अगोदरच निवाडा करून मोकळे होताय.

अर्थात आकाशातल्या ग्रहांची शांती करता येते    
दुराग्रहाची नाही   


जेंव्हा मतचोरीबाबत विरोधी पक्ष व्हिडिओ चित्रीकरण मागत होते, तेंव्हा हेच आयुक्त म्हणाले होते:
हमारे बहुबेटिंयोंकी इज्जत के कारण हम व्हिडिओ नही दे सकते. पण आता जंतर मंतर वर जवळजवळ प्रत्येक खांबावर सीसी टीव्ही, पोलिसांच्या गाड्यांवर, पोलिसांच्या छातीवर नांवाची पट्टी नाही पण बॉडी कॅमेरे लावले आहेत.  आता मुली बाळींचे चित्रिकरण केले जात आहे. आता नाही का इज्जतीचा सवाल?


In reply to by स्वधर्म

+१ 

अगदी कुठे, कुठे वेगवेगळ्या ठिकाणी cctv लावलेत याचा नक्की दुरुपयोग होणार नाही ही काय खात्री?


In reply to by स्वधर्म

केवळ मतदान केंद्रातील सी सी टी व्ही ही   निवडणुक आयुक्तांची जबाब दारी आहे

जंतर मंतर वरच्या सी सी टी व्ही ची नाही.

उगाच वडाची साल पिंपळाला लावू नका.

असंबद्ध लिहून काय निष्पन्न होणार आहे?        


व्होट चोरी, EVM मध्ये फेरफार, मतदार यादींतून बाहेर, मतदारांना धाक दाखवणे, ई डी, सी बी आय अशीच रडारडच चालणार असेल तर चर्चा होणारच नाही.

कारण याच निवडणूक आयोगाने घेतलेल्या त्याच EVM मुले केरळ तामिळनाडू कर्नाटक पंजाब येथे इंडी आघाडीची सरकारे आलेली आहेत. असं कसं झाला याचा कुठलाही पुरावा येथे कोणीही देणार नाही त्यामुळे त्यावर वितंडवाद घालणे हा केवळ कालापव्यय आहे.

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर कितीही आंदोलने करा त्यांना महाभियोग चालवल्याशिवाय बडतर्फ करता येणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे.

दिपके आणि कंपनी ने त्याबद्दल एक तरी पुरावा दिला आहे का ? SIR मुले बाहेर पडलेले मतदार हे केवळ इंडी आघाडीचेच होते असे कसे सिद्ध करणार?

जे मृत्यू पावलेले आहेत किंवा स्थलांतरित आहेत त्यांना मतदार यादीतून बाहेर काढणे हि प्रक्रिया गेली कित्येक वर्षे चालू आहे हे वक्तव्य श्री कपील सिब्बल यांनी संसदेत केले होते याचा थेट व्हिडीओ श्री किरण रिजिजू यांनी दाखवला आहे.

शिवाय काँग्रेस चा या आंदोलनाला पाठिंबा नाही.

बाकी इंडी आघाडीचे घटक आंदोलनाला तात्पुरता पाठिंबा देतील. ज्या तरुणावर खटले भरले जातील त्यांना नंतर कोणीही विचारणार नाही. जर आंदोलन हिंसक झाले तर दोन्ही बाजूना दुखापती होतील आणि नेते मात्र नामानिराळे राहतील.

मुळात CJP चे बोलविते धनी कोण आहेत ते उघड आहे.

मतपेटीतून आपल्याला सरकार बनवता येणार नाही हे त्यांना समजून चुकले आहे म्हणून असे घटना बाह्य आणि अराजकता वादी उपाय जर इंडी आघाडीचे लोक CJP मार्फत करणार असतील जनता त्यांना पाठिंबा देणार नाही हे स्पष्ट झालेले आहे.

यामुळेच हे लोक परत वैफल्यग्रस्त झाले आहेत. हीच स्थिती मिपावरील काही लोकांची आहे.

चालायचंच 


In reply to by सुबोध खरे

व्होट चोरी, EVM मध्ये फेरफार, मतदार यादींतून बाहेर, मतदारांना धाक दाखवणे, ई डी, सी बी आय अशीच रडारडच चालणार असेल तर चर्चा होणारच नाही.

हीच तर मुख्य गोम आहे. आता ती गोष्ट फॉलोअर्सला देश ज्यांना अंधभक्त म्हणतो, त्यांना  मान्य नाही त्यामुळे त्यावर चर्चा होऊ शकत नाही. सरकारला आपले काळे कारनामे करण्यासाठी सर्व संस्था वापरायला मिळाल्या त्यावर हे मित्रो म्हणून गावभर दळण टाकून येतात. 

 

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर कितीही आंदोलने करा त्यांना महाभियोग चालवल्याशिवाय बडतर्फ करता येणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे.

सरकार चालवणार का महाभियोग ? की विरोधी पक्ष ? एकतर लोकसभेच्या किमान १०० किंवा राज्यसभेच्या किमान ५० खासदारांच्या स्वाक्षरीने प्रस्ताव अध्यक्षांकडे आला तरी, तीन सदस्यांची समिती, नंतर, २/३ बहुमताने प्रस्ताव पास करावा लागतो, तेव्हा ते बडतर्फ होतील.  आणि आता जेव्हा, ''ज्ञानेश कुमार कहाँ मिलेंगे? मोदी जी की गोदी में'' अशा घोषणा देशभर महिला देताना पाहिले तेव्हा हे शक्य आहे का ? तर त्याचे उत्तर नाही. स्वतःच जर, काही सुबुद्धी सुचली आणि सरकार जेव्हा सांगतील तेव्हाच ते राजीनामा देतील आणि ते शक्य नाही. 

 

 

असं कसं झाला याचा कुठलाही पुरावा येथे कोणीही देणार नाही त्यामुळे त्यावर वितंडवाद घालणे हा केवळ कालापव्यय आहे.

खरं आहे,  सरकारला कितीही पुरावे दिले तरी, त्यांना  काहीच मान्य नसतं त्यामुळे आता काही पटवून देण्यात काही अर्थ नाही, हे विरोधी पक्षासह देशाला कळले आहे, त्यामुळे कालापव्यय आहे, हे मान्य. 

 

शिवाय काँग्रेस चा या आंदोलनाला पाठिंबा नाही.

लो कल्लो बात. चलो दिल्ली. जंतर मंतर १२ ऑक्टोबर २०२६

 

मुळात CJP चे बोलविते धनी कोण आहेत ते उघड आहे.

विद्यार्थ्यांना इडी, सीबीआय, नेते, कोणाचीच भिती उरलेली नाही. आपलं होऊन होऊन काय होणार याची कल्पना आहे, त्यामुळे ते सरकारला बिंधास्त नागडं करतात, त्यांच्या कोणीही नादी लागत नाही.

 

-दिलीप बिरुटे


दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाबाहेर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या वकिलांना ताब्यात घेतले होते, मात्र सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या आदेशानंतर त्या सर्व वकिलांची सुटका करण्यात आली आहे. 


https://www.lokmat.com/national/supreme-court-lawyers-detained-delhi-cj…


मतदार यादी मधून नाव वगळण्याची प्रक्रिया नक्की काय आहे ?

इथे कुणाचे मतदार यादी मधून नाव वगळले गेले आहे काय ?

एस आर ए च्या प्रक्रियेमधून कोण कोण गेले आहे आतापर्यंत ?

 


मतदार यादी मधून नाव वगळण्याची प्रक्रिया नक्की काय आहे ?

इथे कुणाचे मतदार यादी मधून नाव वगळले गेले आहे काय ?

एस आर ए च्या प्रक्रियेमधून कोण कोण गेले आहे आतापर्यंत ?

 


In reply to by धर्मराजमुटके

एस आर ए ऐवजी एस आय आर असे वाचावे.


In reply to by धर्मराजमुटके

SIR मध्ये माझे आणि कुटुंबाचे (बायको आणि मुलगी) नाव वगळले होते.

आमच्या शाळा सोडल्याचा दाखला जोडून फॉर्म भरल्यावर काम झाले. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात अडीच तास गेले.

पण आपले कर्तव्य म्हणून आपण आपले मतदार म्हणून नोंदणी अद्ययावत करणे आवश्यक आहे.


In reply to by धर्मराजमुटके

>>मतदार यादी मधून नाव वगळण्याची प्रक्रिया नक्की काय आहे ?

 

भाजपाला मत न देणारे काढले जातात असे मिपावरील विचारवंत म्हणत असतात.

 

>>इथे कुणाचे मतदार यादी मधून नाव वगळले गेले आहे काय ?

माझे तरी नाही

 

>>>एस आर ए च्या प्रक्रियेमधून कोण कोण गेले आहे आतापर्यंत ?

नाव प्रारुप यादीत आल्याने बाकी वेळ आली नाही.


In reply to by राज जोशी

तीस टक्के स्थानीक. 

सत्तर टक्के स्थलांतरीत. 

पन्नास  टक्के मालक आणी पन्नास टक्के भाडे तत्त्वावर  रहाणारे.

आमच्या सोसायटी व्यवस्थापनाने एस आय आर कर्मचाऱ्यांना सोसायटीतील क्लब हाऊस  मधे जागा दिली आणी प्रक्रिया राबवण्यात मदत केली. 

 

स्थानीक मतदारांची नावांचे पुष्टीकरण झाले.

मृत मतदार आणी स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यासाठी हवी असलेली कागदपत्रे पुरवली.

 

स्थलांतरीत  रहिवाशांनी ज्यांना स्थानीक  मतदार यादीत नाव हवे होते त्यांनी पूर्वीच्या यादी चे संदर्भ देवून वगळण्यात यावे या साठी नवीन जागीचे रहिवासी प्रमाणपत्र दिले.

 

प्रक्रिया अतिशय  सोपी होती. बी एल ओ ने ड्राफ्ट यादीतील नाव शोधण्यात  मदत केली. 

 

स्थानीक पातळीवर  काही नावे गळाली तर काही नवीन नावे सामील झाली.


In reply to by कर्नलतपस्वी

तेच मला जाणून घ्यायचे आहे.

एस आय आर च्या प्रक्रियेमधे जाणीवपुर्वक नावे वगळली गेल्याचा आरोप होतो आहे तर मिपावरील एखादा तरी सैंपल सेट म्हणून एखादी तरी केस मिळते काय ते बघायचे होते.

मी आणि माझी पत्नी दर निवडणूकीत मतदान करते (नगरभक्षक निवडणूक सोडून) तरी पण आमची नावे २०२४ च्या मतदारयादीत दिसत नव्हती. मी दोनदा मागीतलेली कागदपत्रे दिली आणि आता सर्व काहि सुरळीत आहे.

कोणत्यातरी एका वर्षानंतर कागदपत्रांची संख्या बदलते . बहुतेक २००० नंतर जन्मलेल्या मुलांच्या आईवडीलांचे देखील पुरावे मागत आहे तर त्याअगोदर जन्मलेल्यांचे जन्माचा पुरावा असलेले कागद हवे आहेत. 

दहावी चे मार्कशीट, जन्मतारखेचा लोकल म्युनिसिपालीटीचा दाखला हे वैध पुरावा म्हणून स्वीकारले जात आहेत.

मग नक्की नावे कशी वगळली जातात, काय चलाखी केली जाते हेच समजून घ्यायचे आहे.

नावे वगळल्यामुळे  विरोध करणारे आणि एस आय आर चे समर्थन करणारे वेगवेगळ्या मुद्यांवर मोठमोठे लेख पाडत आहेत पण प्रक्रियेत नक्की कुठे घोळ आहे ते कोणीच सांगत नाहित. 


In reply to by धर्मराजमुटके

"अजाण बालका हे गुप्त ज्ञान कोणीच सांगणार नाही"

हलकेच घ्या.

एस आय आर ही प्रक्रिया पिरियाडिकली राबवली जाते. यासाठी योग्य  तो कायदा आणी संवैधानिक प्रोसिजर आहे.

स्वातंत्र्यानंतर ही प्रक्रिया आठ वेळा राबवली गेली. प्रत्येक वेळेस मागील प्रक्रियेच्या वर्षाला कट ऑफ इयर मानले जाते. ते साधारण  चोवीस ते पंचवीस  वर्ष  असते. याचे मुख्य कारण होते ते,मतदान करण्याचा अधिकार  एकवीस वर्षानंतर मिळायचा.

रिव्हिजन प्रक्रियेत नवीन मतदार नोंदणी व मृत मतदारांची नावे वगळणे व स्थलांतरीत मतदाराची इच्छुक मतदार संघात पुनर्नोंदणी करणे व मतदार यादीची शुद्धीकरण करणे. यात सहाजिकच काही नावे वगळली जात होती, तेव्हांही आणी आताही. 

१९८८ मधे मतदान करण्याचे वय आठरा वर्ष करण्यात आले. १९८९ मधे अंमलात  आणले गेले.

तेंव्हा एस आय आर ही प्रक्रिया नवी नाही. आरडाओरड करणाऱ्यां राजकिय पक्षाचे सरकार स्वातंत्र्यानंतर बराच काळ होते. आतापर्यंत च्या बहुतेक प्रक्रिया, किंबहुना सर्व, यांच्याच काळात राबवल्या गेल्या होत्या. 

आता चालू असलेली प्रक्रिया बी जे पी सरकार च्या कार्यकाळातली पहिलीच वेळ आहे.

शेवटची,२००२ च्या प्रक्रिये नंतर झालेल्या संगणक क्रांतीमुळे प्रक्रिया राबवणे आणी करेक्ट  इन्फॉर्मेशन मिळणे बरेच सोपे झाले आहे. त्यामुळेच मतदान यादीत लाक्षणीय  बदल घडत असावा हे सामान्य  मतदारांनाही कळत आहे.

ज्यांनी जास्त वेळा ही प्रक्रिया राबवली त्यांनी पुरावे द्यावेत.

इतके दिवस  इ व्ही एम च्या नावाने खडे फोडत होते आता मत चोरीच्या नावाने. 

सुज्ञास जास्त सांगण्याची गरज नाही.


'एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी देशाचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य पणाला लावता कामा नये. आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. तो हिरावून घेणारे तुम्ही कोण?' असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे

अगदी खरं आहे, सरकारच्या नेतृत्वात्  त्यांच्या कवटीत केवळ मेंदूच नाही, शेणाचे पो असल्यावर ज्याला हिंदीत गोबर म्हणतात ते असल्यामुळे त्यांना काहीच संवेदना पोहोचत नाहीत, असे वाटते.

काल जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयोगाचे प्रमुख असलेले ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आलेल्या आणि येत राहिलेल्या हजारो युवक-युवतींना ताब्यात घेऊन सरकार नेमके काय सिद्ध करू पाहत आहे? सुमारे ६,००० युवक-युवतींना ताब्यात घेणे, ४० हजार पोलिसांच्या तैनातीत आंदोलन हानुन पाडण्याचा प्रयत्न केला दिवसभर आंदोलक येत राहिले, आंदोलन होत राहिले, पोलिस  पोलिसबळाच्या जोरावर आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न, करीत होते. 

हे सगळे पाहता लोकशाहीत नागरिकांच्या आवाजाला नेमके स्थान तरी किती उरले आहे, असा प्रश्न पडतो. युवकांनी प्रश्न विचारले की त्यांना उत्तरे देण्याऐवजी त्यांच्यासमोर पोलिसांची फौज उभी करायची, दहशत निर्माण करायची, मारहाण करायची, भिती उभी करायची,  अन्यायाविरुद्ध आवाज उठवला की त्यांना ताब्यात घ्यायचे आणि आपल्या हक्कांची मागणी केली की त्यांना गप्प बसवायचे, हाच जर सत्तेचा मार्ग असेल, तर ही लोकशाहीची कोणती व्याख्या आहे ?

 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १९ ने नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि शांततेने एकत्र येण्याचा अधिकार दिला आहे. हे अधिकार सरकारने दिलेली भीक नाहीत, तर संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आहेत. त्यांच्यावर कायद्यानुसार वाजवी निर्बंध असू शकतात; पण त्या नावाखाली नागरिकांचा आवाज अनावश्यकपणे दडपला जात असेल, तर सरकारला जाब विचारणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे. हजारो तरुणांना ताब्यात घेण्याची वेळ का आली ? एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिसबळ तैनात करण्याची गरज का भासली? आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना सामोरे जाण्याऐवजी बळाचा वापर का करावा लागला? या प्रश्नांची उत्तरे देशाला मिळालीच पाहिजेत.

अभिजीत दीपके यांना विमानातच ताब्यात घेण्यात आल्याच्या घटनेनेही अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. महिलांना पुढे करून एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेण्याची कारवाई झाली असेल, तर त्यामागची नेमकी परिस्थिती आणि कायदेशीर आधार जनतेसमोर आला पाहिजे. 

महाभारतातील शिखंडीचे उदाहरण येथे आठवते. भीष्मांविरुद्धच्या युद्धात शिखंडीची भूमिका निर्णायक ठरली होती. आजच्या राजकारणातही महिला पोलिसांना   पुढे करून स्वतःचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न होत आहे का, हा प्रश्न विचारला गेलाच पाहिजे ? महिला पोलिसांना छळले, मारहाण झाली अशा नाटकासाठी असे कृत्य करावे लागते ?

प. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हे विसरू नये की देश म्हणजे केवळ सत्ता, खुर्ची, पोलिसबळ आणि प्रशासन नव्हे; देश म्हणजे त्यातील नागरिक, त्यांची स्वप्ने, त्यांचे अधिकार आणि त्यांच्या भविष्याची आशा! तरुणाईच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तर असंतोष कमी होण्याऐवजी अधिक तीव्र होऊ शकतो. 

पोलिसांच्या बळावर आंदोलनस्थळ रिकामे करता येईल, पण लोकांच्या मनातील प्रश्न रिकामे करता येणार नाहीत. काही हजार लोकांना ताब्यात घेता येईल, पण संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव असलेल्या कोट्यवधी नागरिकांना कायमचे गप्प बसवता येणार नाही. सत्ता कितीही ताकदवान असली, तरी ती संविधानापेक्षा मोठी नाही; सरकार कितीही प्रबळ असले, तरी ते जनतेपेक्षा मोठे नसते.

सत्ता ही कायमस्वरूपी मालमत्ता नसते; ती जनतेने दिलेली जबाबदारी असते. जनतेचा विश्वास गमावणे ही कोणत्याही सरकारसाठी गंभीर बाब असते. आजचा संघर्ष हा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध द्वेषाचा नसून अन्यायाच्या आरोपांविरुद्ध न्यायाचा, दडपशाहीच्या आरोपांविरुद्ध स्वातंत्र्याचा आणि सत्तेच्या अहंकाराविरुद्ध संविधानिक मूल्यांचा आहे. हा लढा शांततेने, निर्भयपणे आणि लोकशाहीच्या मार्गाने पुढे गेला पाहिजे. 

इतिहास साक्षीदार आहे सत्ता बदलतात, सत्ताधारी बदलतात, पण जनतेच्या न्याय्य प्रश्नांना कायमचे दफन करता येत नाही. आता लढा सुरू झाला आहे, हा लढा संविधान वाचवण्याचा, अधिकार जपण्याचा आणि लोकशाहीला अधिक मजबूत करण्याचा आहे. आवाज दाबू नका,  युवकांना गुन्हेगार समजू नका, त्यांच्या भविष्याचा विचार करा! कारण लोकशाहीत जनता ही प्रजा नसते, जनता हीच सत्तेची मालक असते, अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा....!

जय हिंद जय भारत.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे मास्तर 

 

ठळक केलेल्या शब्दांचा अर्थ समजत असेल तर अशी भंपक वक्तव्ये येथे कॉपी पेस्ट करणार नाही.

Article 19 of the Indian Constitution guarantees six fundamental freedoms to all citizens of India, subject to reasonable restrictions imposed by the State


In reply to by सुबोध खरे

संसदेवर चालून येणाऱ्या मोर्चाची काय आरती ओवळायची का पार्श्वभूमीवर फटके द्यायचे?


In reply to by सुबोध खरे

डाक़्टर साहेब, संसदेवर मोर्चा होता की जंतरमंतरवर आंदोलन करणार होते याची आपल्याला काही माहिती नाही असे दिसते. 

संपादित 

-मिपा व्यवस्थापन

दिल्लीतील जंतर-मंतर हे पारंपरिक आंदोलन स्थळ आहे, त्यामुळे तिथे येण्यापासून रोखणे नियम बाह्यच होते असे वाटते. 

आता समजा, सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा जीवित आणि मालमत्तेस धोक्याचे कलम १६३ टाकलेच होते, त्या नुसार त्यांनी आंदोलनकर्त्याची धरपकड केली आणि जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी कायदेशीर प्रक्रिया करुन सीजेपी नेते आणि विद्यार्थ्यी यांना  जामीन देऊन अटी शर्तीवर त्यांना सोडून दिले. आता प्रश्न असा पडतो की संपूर्ण दिल्लीला पोलिसांनी वेठीस धरले ते नियम बाह्य होते का नव्हते ? तर नियम बाह्य होते. 

जिथे, सार्वज़निक शांतता आणि तत्सम गोष्टीचं कलमच नव्हतं तिथे पोलिसांनी उगाच शहाणपणा केला आहे, हिरोगीरी केली आहे, पोलिस आणि सीआरपीएफ यांना आपल्यामागे थेट ग्रुहमंत्रालय आहे, कशाला कोणाला घाबरायचं ? असे समजून नियमबाह्य कार्यवाही केली.  मेट्रो, रेल्वे बंद केल्या. रेल्वे, मेट्रो यांनी येणा-यांवर कार्यवाही केली. सामान्य लोकांवर कार्यवाही केली. इंटरनेट बंद केले. पण आज सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांची पद्धतशीरपणे ठासली. तसंही, एवढ्यात सरकार  शहाणे होणार नाहीत.  सद्य भाजप सरकार, देशाचे प. मोदी आणि ग़्रुहमंत्री सत्तेवरुन पायउतार झाल्याशिवाय ही स्थिती सुधारणार नाही, असे व्यक्तीगत मत आहे. 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी मागच्या वेळेस काय झाले त्याबद्दल लिहिले  होते. तेंव्हा मोर्चा संसद भवनावर चालून जाणार होता

यावेळेस  सर्वोच्च न्यायालयावर जाणार होता.

मागच्या वेळेस झाला तसा हिंसाचार होऊ नये म्हणून सरकारने या वेळेस  जास्त खबरदारी घेतली होती.

इंडी आघाडीच्या हुशार लोकांनी ही सरन्यायाधीशांची भेट मागितली जी प्रक्रियेच्या बाहेर आहे.

त्यामुळे सरन्यायाधीशांनि हि भेट नाकारली आणि जे काही आहे ते रीतसर अर्ज करून पुरावे जोडून न्यायालयीन प्रक्रिया करून या सांगितले त्याप्रमाणे आता  त्यांनी अर्ज दाखल केले आहेत.

विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयावर किंवा संसदेवर मोर्चा घेऊन जाणे हे प्रक्रियेतहि बसत नाही आणि घटनेतील कलम १९ मध्ये म्हटलेल्या वाजवी निर्बंध ( reasonable restriction) या खाली येते त्यामुळे अशा मोर्चाला परवानगी देता येत नाही.          

झुरळं कुणालाही घाबरत नाहीत. म्हणून मग वाटेल ते करायला गेले आणि सरकारने कारवाई सुरु केली कि पळता भुई थोडी होईल

जशी परवा  एका "गांधी"ला ( गांधीजींचे सोंग घेतलेल्या तरुणाला) पार्श्वभागाला पाय लावून पळतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.        

   


समजा, एक प्रयोग म्हणून रस्त्यावरील पोलिस, सरकारी यंत्रणा संपुर्णपणे काढून घ्यायची. आंदोलन करणारे गांधीवादी आणि संविधान वादी आहेत त्यामुळे ते चुकीचे काही करणार नाहित असे समजायचे. आंदोलनकर्त्यांना त्यांची मर्जी असेल तितके दिवस त्यांच्या मर्जीप्रमाणे आंदोलन करुन द्यायचे. पोलिस अशीही बघ्याची भुमिका घेणार असतील तर त्यांना रस्त्यावर उन्हातान्हात उभे करण्यात काही अर्थ नाही.

 

मला वाटते सरकारने असा प्रयोग करुन पहावा. त्यामुळे (आंदोलकांच्या ) मते लोकशाहीची चाड राखली जाईल.

 


In reply to by धर्मराजमुटके

त्यासाठी आंदोलनाला सरकारने अधिकृत परवानगी द्यायला हवी. परंतू सरकारला हिंसेपेक्षा अभिव्यक्ती  स्वातंत्र्याची भीती वाटते. 

  


In reply to by आग्या१९९०

मला वाटते वेगळ्या परवानगीची गरज पडू नये.  परवानगी नसताना कालचे आंदोलन केलेच ना ?

मुळात कोणतेही आंदोलन हे त्या त्या वेळी पदावर असलेल्या सरकारविरोधातच असते त्यामुळे कोणतेही सरकार त्याला आनंदाने परवानगी देईल असे वाटत नाही.

 

 


In reply to by धर्मराजमुटके

मला वाटते वेगळ्या परवानगीची गरज पडू नये.  परवानगी नसताना कालचे आंदोलन केलेच ना

म्हणून तर सरकारने सुरक्षा बंदोबस्त तैनात केला होता. 

सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही आंदोलनासाठी परवानगी घ्यावी लागते हा नियम आहे


In reply to by धर्मराजमुटके

15 मिनिटे पोलीस काढून घ्या मग आम्ही दाखवतो काय करू शकतो ते

हे बोलणाऱ्या एम आय एम च्या असदुद्दीन ओवैसी ची हिम्मत पहा.

त्यांच्या तुमानीवरचा ढेकूण मारण्याची हिम्मत हे फुरोगामी दाखवतील का?


In reply to by सुबोध खरे

हे मुद्दे आता चालत नाहीत, काहीतरी नवीन टूलकीट आणा! रेशिम्बागेतून काही मिळते का पहा.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

आता ते राहुल गांधी यांनी  वंदेमातरम यांनी दोनच ओळी गायल्या. 
किंवा पटेलांना डावलून प.नेहरुंना पंतप्रधान केले ते चालवले पाहिजे.  =)) 

 

-दिलीप बिरुटे
 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता ते राहुल गांधी यांनी  वंदेमातरम यांनी दोनच ओळी गायल्या. 

 

राहुल गांधींनी वंदे मातरम ऐवजी गॉड सेव्ह द किंग  गायले तरी  चालेल आम्ही समजून घेऊ. 


आता कालच्या आंदोलनातील छायाचित्रे व्हिडिओ माध्यमावर येत आहेत. जंतर मंतर दिल्ली येथील आंदोलक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यावर पोलिसांच्या कार्यवाही धरपकड अनेकांनी पाहिली. कोणत्याही आंदोलनात कमी जास्त प्रमाणात पोलिस कमी जास्त जबरदस्ती करत असतात. काल अतिरेक होता.

पण पोलिसांच्या आडून गळ्यात भगवी उपरणे घालून पोलिसिंग करणा-या पुरस्कृत मवाली गुंडांनी युवती महिला यांची जी फरफड़ केली त्यांच्याशी जे गैरवर्तन  केले त्यांच्यावर पोलिसांनी कार्यवाही करायला  पाहिजे.  हिंदू भगिनी हिंदूकडून खतरेमें आल्या आहेत...?

 

-दिलीप बिरुटे


जंतर मंतरवर आजही आंदोलन सुरु धरपकड़ सुरु. लोकशाही वाचवण्यासाठीचा संघर्ष एवड्यात थोड़ी संपणार आहे हे सगळं. =))

 

मला नोबेल दिलं नाही पाहुन घेतो- ट्रम्प =))

 

-दिलीप बिरुटे

 

 

 

 


आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुट्टीच्या दिवशी आंदोलनावर सुनावणी होती आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आणि त्याचा खुलासा ही मागवला आहे, अवमान याचिकेचा खटला का चालवू नये असेही विचारले आहे

 शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना रोखता येणार नाही त्याचबरोबर रेल्वे मेट्रो याही सुरू कराव्यात असं सांगितलं इंटरनेट सुरु करावेत असे आदेश दिले आता ऑर्डर आल्यानंतर बघूया त्यात काय लिहिलेले आहे सध्या मात्र आता सीजेपी ने बाजी मारली असं त्याचा अर्थ होत आहे आणि उद्यापासून हे आंदोलन आता अधिक तीव्र होईल असे वाटत आहे. 

 

जिंदाबाद जिंदाबाद

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल्ली पोलिस आता पत्रकारांनाही ताब्यात घेत आहे. पत्रकारांचे प्रश्न हिंसक झाले वाटतं. ह्याला आणीबाणी म्हणू नये बरंका.


In reply to by आग्या१९९०

प्रेस फ्रिडम रैंकिंग मधे २०२६ साली भारत १८० देशांपैकी १५७ व्या स्थानावर आहे.


राहुल गांधीसह विरोधक खासदारांचे  सुप्रीम कोर्टाकडे मार्च.  प्रचंड गर्दी झालेली दिसत आहे. ग्यानेशकुमाराच्या कथित घोटाळ्याच्या विरोधात सध्या देशभर आंदोलन सुरु आहे, जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच आहे, तर दुसरीकडे कॉंग्रेसने सरन्यायाधिश यांची वेळ मागितली होती. परंतु, त्यांनी आपलं जे काय म्हणने असेल तर त्याबाबत दावा दाखल करा असे सरन्यायाधिश म्हणाले होते. मात्र अचानक जंतर मंतरवरुन हे विरोधकांचे मार्च आता सर्वोच्च न्यायालयाकडे चालले आहे. पोलिसांचा बंदोबस्त आहे, आता हे थोड्या वेळात सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रवेश द्वारापर्यंत पोहचतील. 

-दिलीप बिरुटे
 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आजही दिल्लीतील सहा मेट्रो स्टेशन्स बंद ठेवण्यात आले होते.  जंतरमंतरला आंदोलन स्थळ म्हणून रद्द करण्यात आले आहे. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

काल दिल्ली पोलीस कमीशनर यांचे  आंदोलन स्थळासाठी तीन नवे पर्याय दिले आहेत, त्याबाबतचे पत्र माध्यमांवर आहे, आता भविष्यात सातत्याने सद्य सरकारविरोधात लोक आंदोलन करत राहतील तेव्हा नवा पर्याय आवश्यकच होता असे वाटते. 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बहुतेक करून देशातील कुठल्याही भागातील आंदोलनासाठी फक्त अंदमान बेटावरच परवानगी दिली जाईल. ना मेट्रो, ना रेल्वे , ना बस वाहतूक बंद करावी लागणार आणि हवशे गवशेही दूर राहतील. परतीची विमाने आणि जलवाहतूक बंद केली की झाले. बसा काळ्या पाण्याची शिक्षा भोगत.  


In reply to by आग्या१९९०

त्यांना लेह ला करू द्या आंदोलन. मस्त थंड हवेत. आणि सोनम वांगचुक पण येतील त्यांना पाठिंबा द्यायला.


आजच्या राहुल गांधींच्या मोर्चाला प्रचंड गर्दी होती, नेहा बोरा, अखिलेश यादवही सहभागी होते! 


जंतर-मंतरवर महिला युवतींशी  गैरवर्तनाचे आरोप असणाऱ्यांना अभय कोणाचे ? भगवे रुमाल घालून आलेले ते लोक नेमके कोण होते ? तथाकथित हिंदू रक्षक म्हणवून घेणारे लोक कोण आहेत ?  आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, महिलांशी गैरवर्तन करण्याचा अधिकार त्यांना दिला तरी कोणी ? प्रश्न विचारले पाहिजेत. 

नवरात्रीत देवीची पूजा करायची, स्त्रीशक्तीचा जयजयकार करायचा आणि प्रत्यक्षात महिलांच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित झाला की मौन बाळगायचे, हा दुटप्पीपणा नाही का ? मंदिरात स्त्रीला देवी मानायचे आणि सार्वजनिक जीवनात न्याय मागणाऱ्या स्त्रीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा, ही कोणती संस्कृती ? देवीच्या चरणी नतमस्तक होणाऱ्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलांचाही सन्मान राखला पाहिजे होता.  सध्या नवरात्र उत्सव सुरु आहे,  स्त्री शक्तीचा गौरव केल्या जात आहे. ज्या संस्कृतीत स्त्रीला देवी मानले जाते, ज्या परंपरेत स्त्रीशक्तीचा जयघोष केला जातो, त्याच देशात न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिला- युवतींना  अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याचे आरोप समोर येत असतील, तर हा केवळ राजकीय प्रश्न राहत नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा, संविधानाचा आणि मानवी मूल्यांचा प्रश्न बनतो. माणसाच्या आत असलेल्या विकृत प्रवृत्तीचाही प्रश्न बनतो. 

दिल्लीतील जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी आणि निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या नागरिकांसोबत घडलेल्या घटनांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.  महिला आंदोलकांना धक्काबुक्की करणे, अश्लील हावभाव, करणे, स्त्री म्हणून त्यांच्या शरीराशी जे घाणेरडेपणाने छेडछाड केली ते निषेधार्ह आहे.   मुलींच्या कपड्यांना ओढून त्यांना मारहाण करणा-या प्रवृत्तीत विकृत मानसिकता दिसत आहे, त्यांना अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागत असेल, तर लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण नेमके कोण करणार, हा प्रश्न विचारणे आवश्यक आहे. सरंरक्षण करणारे पोलिस गुंडाना आवरण्या ऐवजी बघ्याची भूमिका घेत होते असे दिसते, याचा अर्थ काय ?

भगवा रंग हा श्रद्धेचा, त्यागाचा आणि अध्यात्माचं प्रतीक आहे; तो कोणाच्याही दादागिरीचा परवाना नाही. भगवा रुमाल घातला म्हणजे कोणी कायद्यापेक्षा मोठे होत नाही. एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी संबंध असल्याचा दावा केला म्हणजे सामान्य नागरिकांना धमकावण्याचा अधिकार मिळत नाही.  धर्म आणि संस्कृतीच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी सर्वप्रथम त्या संस्कृतीतील स्त्रीसन्मानाच्या मूल्यांचे पालन करायला नको का ? अगोदर ते शिका. 

भाजप असो  किंवा अन्य कोणतीही राजकीय संघटना असो, कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. भगवे रुमाल घातलेल्या व्यक्तींची ओळख, त्यांची भूमिका आणि त्यांच्यावरील आरोपांची सत्यता निष्पक्ष चौकशीतून स्पष्ट झाली पाहिजे. त्यांचा कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास, त्या संबंधांचा विचार न करता कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे, पोलिसांच्या कारवाईत नियमांचे उल्लंघन झाले असेल किंवा महिला आंदोलकांशी गैरवर्तन झाले असेल, तर संबंधितांचीही जबाबदारी निश्चित केली पाहिजे. कारण कायदा सर्वांसाठी समान आहे आणि कोणतीही व्यक्ती, संघटना किंवा राजकीय पक्ष कायद्यापेक्षा मोठा असू शकत नाही.

महिलांचा सन्मान हा राजकारणापेक्षा मोठा आहे आणि महिलांची सुरक्षितता ही कोणत्याही पक्षाच्या प्रतिष्ठेपेक्षा महत्त्वाची आहे.  महिला कोणत्याही पक्षाची असो, कोणत्याही विचारसरणीची असो किंवा कोणत्याही आंदोलनात सहभागी असो, तिच्या सन्मानाशी तडजोड होता कामा नये. एखाद्या महिलेने सरकारला प्रश्न विचारले, व्यवस्थेविरोधात आवाज उठवला किंवा आपल्या घटनात्मक अधिकारांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, म्हणून तिच्याशी गैरवर्तन करण्याची मुभा कोणालाही मिळत नाही.  देश संविधानाने चालतो, कोणत्याही पक्षाच्या दादागिरीने नाही.  जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायी आहेत. नागरिकांनी प्रश्न विचारले म्हणून त्यांना शत्रू समजणे, महिलांनी न्याय मागितला म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे किंवा राजकीय संबंधांच्या आधारावर कोणालाही अभय मिळणे, या गोष्टी लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांशी विसंगत आहेत.

भगवा असो, हिरवा असो, निळा असो कोणताही रंग महिलांच्या अपमानाचे समर्थन करू शकत नाही. धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी धर्मातील मूल्यांचाही आदर करावा. संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्यांनी महिलांच्या सन्मानाचे रक्षण करावे आणि संविधानाची शपथ घेणाऱ्या प्रत्येकाने नागरिकांच्या अधिकारांचा आदर करावा.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवताः! हे वचन केवळ भिंतीवर लिहिण्यासाठी, भाषणात सांगण्यासाठी किंवा राजकीय फायद्यासाठी वापरण्यासाठी नाही. ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणण्यासाठी आहे. स्त्रीचा सन्मान हा घोषणांचा विषय नाही, तर प्रत्येकाच्या वर्तनातून दिसणारे मूल्य आहे. आज प्रश्न केवळ जंतर-मंतरवरील घटनेचा नाही; प्रश्न आहे महिलांच्या सन्मानाचा, नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचा आणि लोकशाहीतील उत्तरदायित्वाचा आहे,  त्यामुळे संबंधित व्यक्तींची ओळख स्पष्ट झाली पाहिजे, आरोपांची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे.

देवीची पूजा करणाऱ्या देशात महिलांना न्यायासाठी संघर्ष का करावा लागावा ? स्त्रीशक्तीचा जयघोष करणाऱ्यांनी महिलांच्या सन्मानासाठी प्रत्यक्ष उभे राहायचे की केवळ घोषणा देत राहायचे ? याचा विचार केला पाहिजे. नवरात्र उत्सवाच्या दुर्गाशक्तीच्या उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा.  हे जगदंबेमाता सरकारला सुबुद्धी दे.....!

-दिलीप बिरुटे
 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महिलांशी गैरवर्तन करणारे फक्त भगवे गुंडच नव्हते, तर काही वेळा पोलीसही विचित्र प्रकारे महिला व मुलींना उचलून बसेसमधे कोंबत होते. ५-७००० आंदोलकांना रोखण्यासाठी ३०-४० हजार पोलीस लावणारे सत्ताधारी... या सगळ्या प्रकाराचा निषेध करावा तेवढा थोडा.


In reply to by स्वधर्म

दिल्ली पोलीस  सरसकट नव्हे पण काही  फार नालायकपणाने वागलेत. पोलीसांनाही लेकीबाळी असतीलच. 
ज्या पद्धतीने ते वागले ते निषेधार्ह आहेच. तो मोठा आणि महत्त्वाच मुद्दा आहे. दिल्ली पोलिसांचा निषेध आहेच. 

-दिलीप बिरुटै

 


दिल्लीतील रामलीला मैदानाला दिवसाला १.२१ लाख रुपे भाडे, फक्त ३ तारखा उपलब्ध २०२६ साठी. 

https://www.instagram.com/p/DebMsmvDcTS/?psln=MWoyY3ZnYXJycTQzYQ==


In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>> दिल्लीतील रामलीला मैदानाला दिवसाला १.२१ लाख रुपे भाडे, फक्त ३ तारखा उपलब्ध २०२६ साठी. 

सारांश, कोणत्याही संघटनेस आता आंदोलन लांबवणे शक्य नाही. परवडणारे नाही. आंदोलन रोखण्याचा नवा पर्याय... डर अच्छा होता है. 

 

आता घर घर कोबी नव्हे, तर घर घर जंतर मंतर...! 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाडे किती व परवडणारे आहे की नाही हा मुद्दा दुय्यम असावा. जर आंदोलनाला काही लाख लोक येणार असतील तर वर्गणी काढुन हा प्रश्न सोडवता येईल. राहीला भाग जंतर मंतर चा. ह्या ठिकाणा विषयी काय ऑबसेशन आहे माहीत नाही. कदाचीत जंतर मंतर वरच्या आंदोलनाची नुसन्स वॅल्यु जास्त असते. पण तो मुद्दा गौण असायला हवा. रास्त मागण्या असतील तर आंदोलन कुठेही केले तर जनतेचा पाठींबा मिळतोच.

नाहीतर धुडगुसच घालायचा असेल तर दिल्ली च्या सिमेवरुनही ते करता येते हे शेतकरी आंदोलच्या वेळी पाहिलेच आहे.


In reply to by चबुगबाळे

नाहीतर धुडगुसच घालायचा असेल तर दिल्ली च्या सिमेवरुनही ते करता येते हे शेतकरी आंदोलच्या वेळी पाहिलेच आहे.

धुडगूस?


सर प्रक्रिया अत्यंत पारदर्शी पार पडली आहे. पंजाब कोंग्रेस https://www.facebook.com/share/r/14yoaFQxoYw/

पंजाब मध्ये 50 वार्ड मध्ये पुन्हा निवडणूक. यावर  पुरोगामींची टिप्पणी 

भाडोत्री कोक्रोचकांना हे ही माहीत नाही ते कश्यासाठी आले आहे. यू ट्यूबेरचे विडियो पहा. त्यांची उत्तरे ऐकून हसू येईल.  

एका तरुण नेत्याने महिला पत्रकारला धक्का दिला ती खाली पडली. ही बातमी  नाही. 

आंदोलन पूर्णपणे पडले आहे. जेन जी समर्थन नाही. उलट याचा परिणाम समाजवादी पक्ष ज्याला या वेळी निवडणूक जिंकण्याची आशा आहे, विपरीत होणार. कालच एक समर्थक मला म्हणाला असेच सुरू राहिले तर मजबूरी मध्ये योगीला मत द्यावे लागेल. राहुल उत्तर परदेशात समाजवादी पक्षाला नुकसान पोहचविणार. बहुतेक अखिलेश 50 जागा ही देणार नाही. स्वबळावर लढण्याची तैयारी करण्यात राहुलला रुचि ही नाही. 

बुराडी मैदान एवढे मोठे आहे तिथे 4 ते 5 लक्ष लोक समावू शकतात.   अधिकान्श सत्संग इत्यादि याच मैदानात होतात. 



राष्ट्रपतींना जाऊन श्री ज्ञानेश कुमार यांची तक्रार दिली. त्यांनी त्यांना पुरावे देण्यास सांगितले. राष्ट्रपती ज्ञानेश कुमार याना  महाभियोगाची प्रक्रिया पूर्ण करून संसदेने शिफारस केली तर आणि तरच बडतर्फ करून शकतात हे काँग्रेस मध्ये असलेल्या दिग्गज वकिलांना माहिती नाही असे नाही.      

 

पण घटनात्मक मार्गाने निवडणूक जिंकता येत नाहीत हे कळून चुकल्यामुळे असे घटनाबाह्य मार्ग चोखाळले जात आहेत.

हे सामान्य जनतेला समजत नाही असे नाही. ते गप्प आहेत आणि मतपेट्यातून  आपले मत व्यक्त करतात.

 

असेच चालू राहिले तर २०२९ ला जिंकणे अशक्य आहे हे इंडी आघाडीच्या लोकांना समजले आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त आहेत.
आणि त्यांचे समर्थक, सहानुभूतीदार, चमचे, गुलाम, मंदभक्त इ  जास्त वैफल्यग्रस्त होताना दिसतात.

 

संसदेवर चालून जाणे, सर्वोच्च न्यायालयावर चालून जाणे अशा घटना बाह्य गोष्टी कोणत्याही लोकशाही राष्ट्रात मान्य होत नाहीत आणि असे मोर्चे हाताबाहेर जाण्याअगोदरच नियंत्रणात आणले जातात.        


मला अजूनही कळाले नाही की इलेक्षन कमीशन ने वोटचोरी कशी केली ? किंबहुना एस.आय. आर. मधे नावे कशी वगळली जातात. ज्यांना वोटचोरी झाले असे वाटते ते याबाबत काही माहिती देऊ शकतात काय ?

बिरुटे सर शिक्षक आहेत त्यामुळे त्यांचा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा एस. आय. आर.  राबविण्याचा प्रक्रियेत सहभाग असू शकतो. मला काही केसेस ची माहिती मिळू शकते काय ? की ज्यांचे मतदानाचे अधिकार वैध कागदपत्रे असतानाही डावलले गेले ?

दोन्ही धाग्यांवर आणि एकंदरीत जालावर नुसताच दंगा चालू आहे पण मतचोरीचे पुरावे किंवा निदान ती प्रक्रिया कशी पार पाडली जाते त्यावर कुठेच काही माहिती हाती लागली नाही.

कोणी मदत करेल काय ?


In reply to by धर्मराजमुटके

भरपूर पुरावे आहेत, निवांत पहा ३ फाइल्स कोपऱ्यात वोट चोरी वर क्लिक केल्यास येतात. डाउनलोड होतात.

Vote Chori — Exposing Electoral Irregularities | Rahul Gandhi https://rahulgandhi.in/awaazbharatki/votechori


In reply to by धर्मराजमुटके

>>... इलेक्षन कमीशन ने वोटचोरी कशी केली ? किंबहुना एस.आय. आर. मधे नावे कशी वगळली जातात. ज्यांना वोटचोरी झाले असे वाटते ते याबाबत काही माहिती देऊ शकतात काय ?

मागच्या निवडणुकीनंतर एस आय आर च्याही आधी राहूल गांधी यांनी जिवंत मतदार ज्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला होता ते आणून उभे केले होते. त्यावेळी आयोगाने प्रतिज्ञापत्र फाईल करा तरच दखल घेऊ असे म्हटले होते. त्याच वेळी आयोगाने घातलेले इतरही घोळ उजेडात आणले होते उदा. महाराष्ट्रात अचानक ४ महिन्यात वाढवले गेलेले मतदार. त्यांनी ० घर नंबर वाले मतदार कसे आले विचारले तेंव्हा आयोग (ज्ञा,कु) म्हणाला होता की पूलाखाली झोपणाऱ्यांचा पण अधिकार आहे पण आता मात्र घर बदलले तरी लोक एस आय आर मधून काढले जात आहेत.

माझ्या चिंचवडमधील मित्राने त्याचे नांव काढले गेले असे सांगितले आहे.

हा नुसता डेटा चा विषय नसून गेल्या काही वर्षातील आयोगाच्या इंटेन्शन किती पक्षपाती व सतत बदलणाऱ्या आहेत याचा प्रश्न आहे.


पादऱ्याला पावट्याचे निमित्त अशी म्हण  आहे.

बहुतांशी इंडी आघाडीचे नेते हे आता निवडणूक जिंकणे अशक्य दिसत आहे हे पाहून वैफल्यग्रस्त झाले आहेत.

यामुळे सुरुवातीला मोदींवर गुजरात दंगे, मुस्लिम विरोध असे आरोप करत होते. तीन तलाक बंद झाल्याचा कायदा आल्यामुळे मुस्लिम महिलानीं छुप्या तर्हेने का होईना मोदींना मते द्यायला सुरुवात केल्यामुळे ती व्होट बँक मोडीत निघाली.

 मग चौकीदार चोर आहे, राफेल राफेल चा खेळ खेळून झाला त्यात राहुल गांधी याना बिनशर्त माफी मागावी लागली.

मग इ डी, सी बी आय आयकर खाते यांच्या धमकीचे तुणतुणे वाजवून झाले ते फुसके निघाले.

इ व्ही एम हॅकिंग ची रडारड करून झाली.  

मग नोटबंदी पुलवामा बद्दल रडारड करून झाली त्यातून काहीच निघालं नाही.

मग सर्वोच्च न्यायालयावर शंका काढून झाल्या. 

मध्येच नीट परीक्षेत झुरळांचं आंदोलन झालं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन "जितं मया" म्हणून थोडं नाचून झालं.    

पण झुरळं हि आपची पिल्लं निघाली त्यामुळे इतरांचा पापड मोडलाय.  

आणि आता निवडणूक आयोगावर व्होट चोरी चं तुणतुणं वाजवणं चालू आहे.

सामान्य जनतेला हे माहिती आहे कि एस आय आर मध्ये ज्यांचं नाव कटलं तरी ते सगळे काही भाजप विरोधी नव्हते तर भाजप समर्थकांची नावे पण बाद  झालेली आहेत. त्यामुळे हा सरकारी भोंगळपणा किंवा प्रक्रियेतील त्रुटी आहेत.

आणि यामुळे सामान्य माणसाला शष्प फरक पडत नाही. कारण मतदारयादीतून नाव बाहेर गेले तरी सरकारी योजनांतून जोवर तो जात नाही तोवर त्याला फारसे घेणे देणे नसते. कोणत्या पक्षाचे सरकार आले तरी स्थानिक नेते पैसे खाणे कमी करणार नाहीतच हे लोकांना माहिती आहे.

आणि लोकांच्या दृष्टीने देशपातळीवर मोदींच्या उंचीचा एकही नेता नाही.

राहुल गांधी अजून परिपक्व होण्याच्या ऐवजी पंचविशीच्या तरुणासारखे बॅरीकेड वर चढून आपलला बालिशपणा  जगजाहीर करत आहेत.          

केजरीवाल यांनी रंग बदलण्यात सरड्यालाही लाजवले. बाकी एकही नेता असा नाही ज्याला पन्नास खासदार पाठिंबा देतील.  

गंमत म्हणजे  मागची एस आय आर २००२ ते २००४ या कालावधीत झाली आणि त्यानंतर २००४ मध्ये काँग्रेस चे सरकार आले होते. तेंव्हा भाजपने आमचे मतदार  यादीतून बाहेर काढले अशी रडारड केली नव्हती.

पण "पब्लिक मेमरी इज शॉर्ट" यावर विश्वास ठेवून त्यांनी रडारड सुरु केली आहे.                          

निष्पन्न काहीच होणार नाही. 
 


In reply to by सुबोध खरे

बहुतांशी इंडी आघाडीचे नेते हे आता निवडणूक जिंकणे अशक्य दिसत आहे हे पाहून वैफल्यग्रस्त झाले आहेत.>>>
 हा कॉन्फिडन्स येतो कुठून? निवडणुका जिंकणे अशक्य का? 

बाकी, निवडणूक आयोग आयुक्त निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीश काढून कॅबेनेट मंत्री टाकण्यात आले अशी व्यवस्था का बदलण्यात आली?


सुप्रीम कोर्टातला आजचा संवाद -

विषय-जंतरमंतर आंदोलनस्थळ डीनोटिफाय करण्याबाबत.

न्या. बागची- "याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की आंदोलनस्थळ जवळ असलं पाहिजे सरकारच्या कानावर आवाज पडायला त्यामुळे सोपं होतं. पण आजच्या तांत्रिक युगात असं काही उरलेलं नाही."

सिनियर अँडव्होकेट हरिहरन- "मग या लॉजिकने आम्ही तर केरळात बसूनच युक्तीवाद केला पाहिजे. आम्हाला कशाला इथे यावं लागतं...?"

=))

 

संदर्भ : Law Chakra ने आपल्या १५ ऑक्टोबर २०२६ च्या वृत्तात केली आहे.

 

-दिलीप बिरुटे

 

 


सगळ्या झुरळांना सर्व  नेत्यांना सुद्धा सर्वोच्च न्यायालयात संसदेत जाऊ द्या त्या शिवाय त्यांचा आवाज कसा ऐकला  जाईल.

याच न्यायाने शाळेत विद्यार्थ्यांना काही हवं असेल तर विद्यार्थ्यांनी थेट मुख्याध्यापकांच्या खोलीतच मोर्चा न्यायला पाहिजे.

आणि  आपलं मांजर हरवलं कि आपण पण थेट पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर धडकायला हवं.  

सर्वाना आपला म्हणणं ऐकवायची मूलभूत अधिकार आहे ना? घटनेतील कलम १९ काय सांगतं?  

हा का ना का.

  


दुष्यंत कुमार गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ इंडिया गेटजवळ आंदोलन करणाऱ्या अंकिता भंडारीच्या आई-वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांची सुटका करण्यात आली. उत्तराखंडमध्ये २०२२मध्ये हत्या झालेल्या १९ वर्षीय अंकिताला न्याय मिळावा, या मागणीसाठी तिचे

 

अंकिताच्या मृत्यूप्रकरणात दुष्यंत कुमार गौतम यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. गौतम यांची राज्यपालपदी नियुक्ती २४ तासांत रद्द करावी, अशी मागणी अंकिताचे वडील वीरेंद्रसिंह भंडारी यांनी केली होती.

 

-दिलीप बिरुटे

 

 


दिल्लीच्या मध्यवर्ती कॅनॉट प्लेसमधील सेंट्रल पार्कमधे कॉक्रोच जनता पार्टीने लहेरा दो तिरंगा आंदोलनास निघालेल्या सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके आणि ऑल इंडिया स्टूडंट असोशियशनच्या अध्यक्ष नेहा बोरा यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले तरी हजारोच्या संखेने सरकार विरोधातील धोरणाच्या विरोधात  लहेरा दो तिरंगा हे आंदोलन यशस्वी झालेले दिसले.  दिल्ली पोलिसांनी नेहमीप्रमाणे कलम १६३ लावून अनेक कार्यकर्ते सामान्य नागरिक यांची धरपकड केली दीडशे जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त होते. अनेक कार्यकर्त्यांना नोटीसा देणे,  दमबाजी यात सरकारच्या पोलिसांनी आघाडी घेतल्याचे दिसते. 

अर्थात, आता सरकारच्या विरोधात  हे सातत्याने जनतेचे आंदोलन  देशभर सुरु राहणार असेच दिसते. नागरिकांच्या शोषणाची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा संपली की लोक सरकारविरुद्ध पेटून उठतात हेच लहेरा दो तिरंगा आंदोलनाने सिद्ध केले असे वाटते. 

-दिलीप बिरुटे


 अर्थात, आता सरकारच्या विरोधात  हे सातत्याने जनतेचे आंदोलन  देशभर सुरु राहणार.

 

आझाद मैदानात परवानगी दिल्यावर एकंदर १५० झुरळं आली होती.

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/cjps-mumbai-protest-flops-draws-barely-150/articleshow/135005825.cms

हायला 

बिरुटे मास्तर

१५० लोक तर एखाद्याच्या  लग्नाला "फुकट जेवायला" सुद्धा असतात.  

 

 दिल्लीत तमाशा पाहायला आलेले आणि पत्रकारच जास्त होते.   

एकंदर झुरळांनि चुकीच्या घोड्यावर पैज लावली आहे असं दिसतंय आणि मंदभक्तांनि चुकीच्या पक्षावर.

चालायचंच     


In reply to by सुबोध खरे

>>> आझाद मैदानात परवानगी दिल्यावर एकंदर १५० झुरळं आली होती.

अरे वाह ! डाक्टर. मुंबईचं आंदोलन माहिती नव्हतं, फॉलोअप घेत आहात हे पाहुन बरं वाटलं. 'देशप्रेमी' नागरिकांची देशातील घड़ामोडीकड़े लक्ष असणे गरजेचं आहे. Thanks  

 

बाकी दिल्लीतलं आंदोलन भारी झालं. पोलिस आली की पोरं राष्ट्रगीत म्हणायचे.  मुख्य नेतृत्त्वास अटक केली तरी हजारोंनी तिरंगा फड़कवला. देशात तिरंगा फड़कवतांना यापूर्वी भारतीयांवर इंग्रजानी लाठीमार केला होता आणि आज स्वातंत्र्य नंतर काल तिरंगा फड़कावला म्हणून भाजप मोदी सरकार यांनी आन्दोलकावर लाठीमार केला अटक केली. बोलू दिलं नाही.  इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. भारतीय जनता या जुलमामातून लवकरच मुक्त होईल अशी अपेक्षा करुया.

 

-दिलीप बिरुटे


मास्तर

टाइम्स ऑफ इंडिया सारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या वृत्तपत्रात आलेली मोठ्या मथळयाची बातमी आहे.

तुमच्या  नजरेतून सुटली कशी?

कि आता वृत्तपत्रे वाचनच सोडले आहे?    

 

 


https://www.facebook.com/share/v/1CRjmPGbE9/

ध्रुव राठी यांनी पोलीस आणि लष्कराला सरकारच्या विरुद्ध उभे राहण्याची मागणी केली आहे! 

याच्यावर आता खटला झाला पाहिजे!


In reply to by सुबोध खरे

>>>>याच्यावर आता खटला झाला पाहिजे!

खरं आहे,  लंडनमधे टीका करीत फिरत आहे,  कार्यवाही व्हायला पाहिजे.  ( दुवा )
तथाकथित रक्षक दलांनी किमान धक्काबुक्की तरी केली पाहिजे. 

लंडनमधील भक्तांनी पुढाकार घेतला पाहिजे,  असं हळु आवाजात
सकाळी बागेत फिरायला आलेल्या शाखेतल्या काकांचे मत होते. =))

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर

राठी चा पासपोर्ट रद्द केला तर हे जे शहाण पण आहे ते सर्व चुलीत जाईल आणि त्याला झक मारत भारतात यावे लागेल.

 असे झाले तर पुढची काही वर्षे त्याला तुरुंगात आत बाहेर करावे लागेल. कारण लष्कराला आणि पोलिसांना बंड  करण्याचे आव्हान देणे हा "देशद्रोह" आहे आणि त्यासाठी UAPA ची कलमे सहज लावता येतील.  

 

 त्याने जे बोलून दाखवले आहे त्यामुळे हे सहज सिद्ध करता येईल.    

हा स्वतःला "लोकनायक जयप्रकाश नारायण" समजतोय का?  श्रीमती इंदिरा गांधी यांनी न्यायालयाचा निर्णय मानण्यास नकार दिला होता त्यामुळे "लोकनायक जयप्रकाश नारायण" यांनी असे आवाहन केले होते. 

इथे हा केवळ अराजक निर्माण करण्यासाठी असली विधाने करतो आहे. त्याला कोण साथ देणार आहे?  

किंवा

जर भारतात यायचेच नसेल तर दुसऱ्या देशात शरणार्थी म्हणून आश्रय मागायला लागेल. ज्यासाठी बरेच देश त्याला फारशी साथ देतील असे वाटत नाही . तो काही शेख हसीना नाही. 

श्री मोदींना तुम्ही काहीही म्हणा पण सध्या तात्याने पण शेपूट घातली आहे आणि भारतावरील १०० % टेरिफ रद्द केला आहे.   
 
पण अगदी आश्रय मिळाला तर  भारतात येऊन आगाऊ पणा करणे वगैरे विसरायला लागेल.

मोदी शाह याना हुकूमशाह म्हणताय पण यदाकदाचित त्यांनी अशी कार्यवाही केली तर हा "जर्मन शेफर्ड" भुंकणे विसरून जाईल.    

आणि मला विचारलं तर अशी सज्जड कार्यवाही त्यांनी करावीच. म्हणजे हे असे देशाबाहेर जाऊन देशाविरुद्ध भुंकणाऱ्यांची तोंडे तरी बंद होतील.   
 


काही माणसं फार पालथ्या पायाची असतात, कपाळ करंटीच म्हणा. ज्याला हात लावतील त्याची माती होते. जिथे यांचे पाऊल पडले की तिथे त्याची माती शंभर टक्के होणार,  असे समजल्या जाते. असा एक पारंपरिक समज आहे. 

इटलीच्या पंतप्रधान यांना कोणीतरी मेलोडी चॉकलेट दिली होती, कोणी दिलं ते नाव नेमकं  आत्ता चहा पिताना आठवत नाही. पण त्या माणसाचं वैशिष्ट्येच असं आहे म्हणे की जिथे जातील तिथे  माती करतील. यांचं पाऊल त्या इटलीत पडलं आणि योगायोगाने  तिथे   महागाई  भडकली,  राहणीमानाचा  खर्च वाढला, आणि त्या  वाढत्या इंधन दरांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याच्या बातम्या येत आहेत.  कोणाला तो माणूस आपला माणूस वाटला असेल तर तो निव्वळ योगायोग समजावा. 

हे दुर्गेमाते, जगात शांतता नांदू दे....जगातली बला जाऊ दे, तुझ्याकडे काही फार मागणं नाही. 

-दिलीप बिरुटे


In reply to by आग्या१९९०

निर्मला सीतारामन यांनी भारत आणि चीन मधील वाढत्या 'व्यापार असमतोलाबाबत' (Trade Imbalance) बोलताना सांगितले की, दोन्ही देशांमधील व्यापारी दरी अत्यंत वेगाने म्हणजेच घातांक पद्धतीने वाढत आहे. बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीदरम्यान 'अटलांटिक कौन्सिल'शी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. 

बाईंचं सर्वप्रथम अभिनंदन. कधीतरी काहीतरी निरीक्षणं नोंदवावी वाटली. घराघरात चीनच्या वस्तू पडलेल्या असतात. आत्मर्निर्भर भारत ही एक अशीच नशेची गोळी होती. भारत चीनकडून वस्तू आयात करत आहे आणि चीनलाही निर्यात करत आहे. परंतु, आपण चीनकडून जेवढा माल मागवतोय, त्या तुलनेत आपली विक्री नगण्य आहे. या दोन्हीमधील फरक (व्यापार तूट) दरवर्षी प्रचंड वेगाने वाढून फुगत चालला आहे. हा फरक आता संथ राहिलेला नसून त्याने घातांक वेग घेतला आहे, ज्यामुळे भारताचे अब्जावधी डॉलर्स चीनमध्ये जात आहेत. 

भारताची बाजारपेठ चिनी इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री आणि कच्च्या मालासाठी खुली आहे. त्यामुळे चीनची भारतातील निर्यात सातत्याने उसळी मारत आहे. आपली काय स्थिती तिकडे ?

 

 -दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सगळं काही अंबानी अदाणी बनवू शकत नाही, त्यामुळे चिन कडून काही गोष्टी मागवावया लागतात.😝


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाईंचं सर्वप्रथम अभिनंदन. कधीतरी काहीतरी निरीक्षणं नोंदवावी वाटली. घराघरात चीनच्या वस्तू पडलेल्या असतात. आत्मर्निर्भर भारत ही एक अशीच नशेची गोळी होती.

आत्मनिर्भर फक्त लावायला , प्रत्यक्षात टिकाव पावडे ( बोगदे खणायचे अजस्त्र यंत्र )   पण चीन मधून आयात करावे लागते. पक्षनिधीसाठी ठराविक ठेकेरारांनाच  कंत्राट देण्यात आले. संशोधन शुन्य , त्यामुळे रस्ते , पूल आणि बोगदे असलीच दिखावू  कामे करताना नालायक  ठेकेदारांमुळे निकृष्ट  दर्जाचे काम झाले. ह्यात नुकसान करदात्यांचे झाले. बँकांचा पैसा ह्याच नालायक ठेकेदारांना द्यायला लावला. बँका पैसे देऊन पस्तावले , वरतून दबाव आल्याने वसूलूी  थांबली. परदेशी चलनाचा साठा आटायला लागला होता तो खड्डा बुजवण्यासाठी NRI साठी अधिक व्याजाचे बाँड योजना आणली. तीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. एक महिना अगोदरच ती योजना थांबवली गेली. आता  भविष्यात बाँडधारकांना व्याज द्यावे लागेल , रुपया घसरतोय , तो सावरायचे नाव घेत नाही . विकासाच्या नावाने आपण महाराक्षस जन्माला घातला हे उशीरा लक्षात आले. वेळेत लक्षात येण्याची ह्या सरकारमध्ये एकाचीही  क्षमता नाही.  त्यात पारदर्शकेचा अभाव. आता जेन झी , जेन अल्फा प्रश्न विचारू लागल्याने घाम फुटू  लागला . हि पीढी 1-2 वर्षात अनेक अडचणी निर्माण करू शकतात ह्याची जाणीव झाल्याने ताईंना  कबूली द्यावी लागली. चीनमधील दिपमाळा , पणत्या ह्यावर बहिष्कार घालून हि तूट भरून येणार नाही हे अंधभक्तांशिवाय कोणालाच ते पटवून देऊ शकले नाहीत.  २०२९ ह्यांचेच सरकार स्थापन व्हावे हि खूप ईच्छा आहे.  खूप मजा येईल त्यांचे फेफरे बघताना. हि सुरुवात आहे .


In reply to by आग्या१९९०

>>>>चीनमधील दिपमाळा , पणत्या ह्यावर बहिष्कार घालून हि तूट भरून येणार नाही हे अंधभक्तांशिवाय कोणालाच ते पटवून देऊ शकले नाहीत.

 

हे मात्र खरं आहे...!

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by आग्या१९९०

अंधभक्त फक्त पाकिस्तानवरच भूभुत्कार करतात, नी चिन आला की शेपट्या घालतात, सांगा की म्हणा आकाला चीनी मालावर बंदी घालायला.


In reply to by आग्या१९९०

चीनने  टनेल बोरिंग मशीनसह प्रमुख यंत्रसामग्रीवर नवीन निर्यात नियंत्रणे जाहीर केली असून, या निर्णयामुळे भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

उगाच का ताईंची चुरुचूरू चालणारी चीभ  ठिकाणावर आली?

 

https://www.moneycontrol.com/world/china-tightens-exports-of-tunnel-bor…

 


एवढ्यातच एक मास्टरस्ट्रोक खेळला आहे. आपल्या जनतेची अर्थ साक्षरता अत्यंत कमी असल्याने ते सध्या नवरात्रोत्सव व गरबा खेळण्यात दंग आहेत. आय डी बी आय बॅंक कॅनडाच्या फेअरफॅक्सला विकली आहे. म्हणजे यातील सरकार व एल आय सी यांचे मिळून ६०% समभाग त्यांना विकले आहेत. परिणामी या बॅंकेची धोरणे आता परदेशस्थ खाजगी वित्त कंपनी ठरवणार आहे. यात बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत:

- सतत गेले ३-४ वर्षे नफा कमवत असलेली बॅंक विकण्याचे मुळी कारणच काय?

- किंमत आधी जास्त होती, तेंव्हा घेणारे कोणी आले नाहीत म्हणून किंमत कमी करून विकावी लागली

- जेंव्हा बॅंक तोट्यात होती, तेंव्हा एल आय सी ला यात पैसे गुंतवायला भाग पाडले गेले. नंतर फायद्यात आल्यावर एल आय सीला त्यांचे समभाग विकायला भाग पाडण्यात आले. ज्यांचा विमा आहे, त्यांच्यासाठी एल आय सीची ही अवस्था चिंताजनक आहे.

- एकाच परदेशस्थ खाजगी संस्थेला भारतात दोन बॅंकात गुंतवणूक करता येत नाही. तो नियम बाजूला सरकवून तशी परवानगी इथे देण्यात आली.

- राष्ट्रीयकृत बॅंकेत अपंग, महिला, भटके विमुक्त, आदिवासी, अ.जा. अ. ज, ओबीसी यांचे नोकरीतले आरक्षण संपुष्टात आले.

खालील व्हिडिओ एक नमुना विदा म्हणून देत आहे. ज्यात बॅंकिंग तज्ञ देवीदास तुळजापूरकर यांनी वरील माहिती दिली आहे. असेच अनेक व्हिडिओ आहेत. उदा. अजित अभ्यंकर यांचा.

एकूण विद्यमान सरकार देशाची पूर्ण वाताहात केल्याशिवाय रहाणार नाही, आणि बहुसंख्य समर्थक सुशिक्षित नमो जप करत राहणार.

https://youtu.be/wIgZxn6SGGQ?si=eZTxwp6GheTPAXRH

 


  • ज्यांचा विमा आहे, त्यांच्यासाठी एल आय सीची ही अवस्था चिंताजनक आहे.
  • एकांगी मुद्दा मांडण्यात आपला हात कोणी धरणार नाही.  
  • LIC’s Monetization: LIC will divest a 30.24% stake as part of this transaction, which brings in approximately ₹26,337 crore in proceeds. This allows LIC to recover its core capital investment (which was roughly ₹21,624 crore when it initially acquired its controlling stake around 2019). [1, 2]
  • Remaining Stake: Following the transaction, LIC will continue to hold a 19% stake in IDBI Bank (roughly 204.3 crore shares), valued at approximately ₹18,566 crore at the deal price.
  • एल आय सीने  किती हजार कोटी  नफा कमावला आहे याचा हिशेब आपणच करून पहा.  

In reply to by सुबोध खरे

हे आकडे बरोबर असतील (मी चेक केलेले नाहीत पण तुम्ही लिहिलेले बरोबरच असेल) तर CAGR तीन टक्क्यांपेक्षा कमी येईल. LIC ची ही investment मग घाटाचा सौदा झाला न?


In reply to by सुबोध खरे

बाकीचे तुम्हाला गैरसोयीचे मुद्दे संपूर्णपणे दुर्लक्षित करून एकच फट शोधून दुसरी व्यक्ती एकांगी आहे असे सांगणे, हे काय दर्शवते? अहो, जरा तरी विचार कराल? 

पण कितीही विपर्यास केला तरी उपयोग होत नाही, कारण लगेच वर तिता यांनी तुंम्हाला एल आय सीच्या गुंतवणुकीवर जो सी ए जी आर मिळाला, तो घाट्याचा आहे का, असे विचारले आहे! तुमचाच युक्तीवाद तुमच्यावर उलटला!

अजून...

बरं तुंम्ही कसेही करून हे सिध्द केले की होय, एल आय सीच्या दृष्टीने ही गुंतवणूक फायद्याचीच ठरली, तर मग अशी चांगली गुंतवणूक एल आय सीने का विकून टाकावी, याचेही उत्तर तुंम्हाला द्यावे लागेल. आता तुंम्ही दुसरेच भलते काही न काढता किंवा कोलांटउडी न मारता, फक्त वरील प्रश्नांची व दुर्लक्ष केलेल्या बाकीच्या मुद्द्यांबद्दल उत्तरे द्या.

माझे अजूनही मत आहे की एल आय सी वर दबाव आणून आयडीबीआय मध्ये पैसे गुंतवायला लावणे व पुन्हा दबाव आणून हिस्सा विकायला लावणे हे सरकारच्या अधिकारांचा दुरूपयोग आहे. 

 


In reply to by स्वधर्म

जाणकार नाही. मी आगोदरच सांगतो की आपले प्रतिसाद वाचून  उत्सुकते पोटी माझे जवळचे नातेवाईक  गेली चाळीस वर्ष  या क्षेत्रात कार्यरत आहेत व ख्यातनाम तज्ज्ञ ,प्रशिक्षक, सल्लागार म्हणून आता या क्षेत्रात प्रसिद्ध आहे   ..डाॅक्टरेट सह अनेक पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधर आहेत. ..म्हणून त्यांना विचारले. त्यांचे मत खाली देत आहे. 

जाणकार नसल्याने यावर युक्तिवाद  करता येणार नाही.

 

"थोड्या इतिहासात जावे लागेल. सहा वर्षांपूर्वी आयडीबीआय बँकेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. तिला झालेला तोटा, रिझर्व बँकेने तिच्यावर घातलेली व्यावसायिक बंधने, याचा विचार करून सरकारने एलआयसी ला आयडीबीआय बँकेमध्ये भांडवल घालण्यासाठी भाग पाडले. हे झाल्यामुळे सरकारी मालकीची बँक  खाजगी बँक झाली. रिझर्व बॅंकेच्या आणि अर्थ खात्याच्या प्रेशर मुळे बँकेला आपली परिस्थिती सुधारणे भाग पडले. सुदैवाने  वसुली आणि व्यवसाय   दोन्ही आघाड्यांवर यश आल्यामुळे पाच वर्षात खाजगी क्षेत्रात चांगला नफा कमवणारी बँक असा या बँकेचा आता लौकिक झाला आहे. मागील तीन वर्षापासून सरकार आणि एलआयसी आपण घातलेले भांडवल काढून घेण्यासाठी उत्सुक होते आणि बँकेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्राहक शोधण्याचे काम सुरू होते. सरकारला अपेक्षित असलेली किंमत फेरफॅक्स ने देऊ केल्यामुळे या सौद्याला अंतिम स्वरूप आले आहे. एलआयसी ला त्यांनी घातलेल्या भांडवलाच्या काहीपट परतावा मिळणार आहे. सरकार आपले भांडवल काढून घेणार आहे. त्यामुळे आता ही बँक खाजगी, परदेशी मालकीची अशी होईल.
सरकारने आपले भांडवल काढून घेणे याला अर्थशास्त्रीय परिभाषेत निर्गुंतवणूक असे म्हटले जाते. यासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. त्याच्यामार्फतच हा सर्व कारभार झाला. फेरफॅक्स ने यापूर्वी कॅथोलिक सिरियन बँक ताब्यात घेतली आहे. पुढील दोन वर्षात दोन्ही बँकांचे विलीनीकरण किंवा एका बँकेची विक्री करणे खरेदीदारांवर बंधनकारक आहे.

झालेली सर्व प्रक्रिया कायद्याच्या पूर्णपणे चौकटीत आहे. अस्तित्वातील एकोणीस हजार कर्मचारी, आणि निवृत्त कर्मचारी यांच्या वेतन पेन्शन किंवा अन्य आर्थिक सोयी सवलती यात बदल होणार नाही असे आता तरी आश्वासन देण्यात आले आहे. नफा वाढवण्यासाठी कर्मचारी कपात हा आंतरराष्ट्रीय फॉर्मुला पुढील दोन वर्षात नक्की वापरला जाईल. पेन्शन हा कायदेशीर हक्क असल्यामुळे पेन्शन धारकांवर फारसा परिणाम होणार नाही.
या व्यवहारातील आकड्याचा विचार करता अर्थव्यवस्थेवर याचा फारसा परिणाम होणार नाही. सरकार आणि एलआयसी ला त्यांनी गुंतवलेले पैशाचा परतावा मिळेल."

 

बाकी,चालू द्यात. 


In reply to by कर्नलतपस्वी

तुमचे नातेवाईक अनुभवी व तज्ञ असतीलही पण वस्तुनिष्ठपणे, निष्पक्ष दृष्टीकोनातून विचार करू शकतात का, हा मुद्दा आहे. तुंम्ही मी दिलेला व्हिडीओ पाहिलात का? तुमचे नातेवाईक त्यात काही खोटे किंवा दिशाभूल करणारे आहे असे म्हणतात का? नसेल तर तुंम्ही किंवा तुमच्या नातेवाईक आधीच सत्ताधाऱ्यांच्या बाजूने पक्षपाती आहात असे म्हणावे लागेल. 

शिवाय जे घडले आहे, ते समजायला तज्ञ असण्याची काहीच गरज नाही. आयडीबीआय च्या देशात २९ ठिकाणी मोठ्या स्थावर मालमत्ता आहेत. त्यातील केवळ एक हैदराबाद येथे असलेले कर्मचारी प्रशिक्षण केंद्र शहरात ५० एकर जागेवर आहे. त्या एकट्या मालमत्तेचे मूल्यांकन १३००० कोटी पेक्षा जास्त आहे. शिवाय कमी व्याजदरावर बॅंकेत असलेली ठेव रक्कम (उदा. सेव्हिंग, करंट खाती) हजारो कोटीत आहेत. बॅंकेचा गेल्या वर्षीचा ऑपरेटिंग प्रॉफीट २०६५५ कोटी रु. आहे. (संदर्भ: https://economictimes.indiatimes.com/idbi-bank-ltd/yearly/companyid-11689.cms) 

 

अशा बॅंकेचा ६०% मालकी हिस्सा कॅनडाच्या बॅंकेला फक्त  ५२८०० कोटी रुपयात मिळालेला आहे. हे सगळे कुणासाठी कोण करत आहे याचा आपल्याला काही अंदाज? आपली सरकार करते ते चांगलेच असणार अशी श्रध्दा असेल, तर लवकरच हे सत्ताधारी अर्धा विकलेला देश पूर्ण विकतील यात कसलीही शंका नाही. तुमच्यासारख्या लोकांनी हे सत्ताधारी किती हीन पातळीला जाऊन देशाचे शोषण करत आहेत हे कधी तरी डोळे उघडून पहायला पाहिजे नाहीतर खरंच पुढच्या पिढीचं अवघड आहे.

बाकी खरे यांचा प्रतिसाद नव्हे प्रतिवाद अजून आला नाही...


In reply to by स्वधर्म

LIC will continue to hold a 19% stake in IDBI Bank (roughly 204.3 crore shares), valued at approximately ₹18,566 crore at the deal price.

हे वाचलेलं दिसत नाही!

 

असू द्या!


In reply to by सुबोध खरे

सीएजीआर ४ ते ४.५% येतो. कोणत्याही ए आय ला विचारा, एक सेकंदात आकडेमोड मिळेल.


In reply to by स्वधर्म

साधे cagr कॅलक्यूलेटर  वर टाकून पहा हो.

उगाच शब्दांची उलथापालथ लागणार नाही  


In reply to by स्वधर्म

सीएजीआर ४ ते ४.५% येतो. कोणत्याही ए आय ला विचारा, एक सेकंदात आकडेमोड मिळेल.

 

प्रत्यक्ष वार्षिक परतावा मोजणे थोडे गुंतागुतीचे आहे पण तितकेच महत्त्वाचे आहे . हा नफा मोजताना LIC ने 2019 पासून आतापर्यंत केलेली  एकुण  गुंतवणूक आणि प्रत्यक्षात विकलेला हिस्सा , उर्वरीत हिश्श्यावरील नफा/ तोटा हा नोशनल असल्याने तो हिशोबात न धरता आकडेमोड केल्यास LIC ला सरासरी वार्षिक परतावा 7. 4 % मिळाला. हा प्रत्यक्षात नफा  नाही. प्रत्यक्ष नफा , डिव्हीडंड ,कर  ई . खर्च वजा केल्यास हा परतावा 7.4 % पेक्षा कमी होऊू शकतो.

एकंदरीत नफ्यातील बँक विकून LIC ला फार फायदा झाला नाही . सरकारचा विचार केल्यास फायद्यापेक्षा बँक का विकली हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कळेल थोड्याच दिवसात . 

 

 


In reply to by आग्या१९९०

कशाला शब्दांची लटपटपंची करताय?

 

मूळ विधान  काय होते?

ज्यांचा विमा आहे, त्यांच्यासाठी एल आय सीची ही अवस्था चिंताजनक आहे

सरासरी वार्षिक परतावा 7. 4 % मिळाला हे चिंताजनक कसं काय?  

 

गेल्या दोन वर्षातील बाजाराची स्थिती पाहिली तर हा परतावा अधिकच ठळकपणे उठून दिसेल 


In reply to by स्वधर्म

एल आय सी वर दबाव आणून आयडीबीआय मध्ये पैसे गुंतवायला लावणे व पुन्हा दबाव आणून हिस्सा विकायला लावणे हे सरकारच्या अधिकारांचा दुरूपयोग आहे. 

The Government of India holds a 90.0% stake in the Life Insurance Corporation of India (LIC).

 

९० % भाग भांडवल असणाऱ्या मालकाने कंपनीचे काय करावे हा अधिकारांचा दुरुपयोग?

त्यातून ७.४ % CAGR गेल्या सात वर्षात मिळाले.

आय डी बी आय सारख्य बँकेला बुडण्यापासून वाचवले.  

त्याच्या कर्मचाऱ्यांची नोकरी संतोष फंड निवृत्तीवेतन याना बुडीत खात्यात जाण्यापासून वाचवले. 

एवढं सगळं केलं तरी तुमचं तोंड वाकडं च.


 


झुरळांना माझे अजिबात समर्थन नसले तरी झुरळे तिथेच उपस्थित होतात जिथे घाण आणि कचरा आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी षड़यंत्रे शोधण्यापेक्षा साफसफाईवर लक्ष केंद्रीत करणे गोबी-गुंडशा आणि अनैच्छिक ब्रह्मचारी संघाच्या व्यवस्थेला जास्त फायद्याचे ठरेल. झुरळांच्या मागे उंदीर, बुरशी, माश्या, त्यांच्या मागे साप वगैरे सर्व काही येतील. जे फाटलेले आहे त्याला काही रिल्स आणि बूमर whatsapp प्रोपागंडा वापरून रफ़ू करणे शक्य नाही ! 


जाणकार नाही पण इतर जाणकारांचे मला पटेल असे मत मांडले आहे म्हणुन त्यावर युक्तिवाद करता येणार नाही ..... मी नाही त्यातली कडी लावा आतली ह्या म्हणीची आठवण झाली. 

 

आणि मग शेवटाला 'बाकी,चालू द्यात.' आहेच. 


In reply to by तिता

आगोदरच मी स्पष्टीकरण दिले आहे. मला विषयात गती नसल्याने युक्तिवाद करूच शकत नाही. 

 

तज्ज्ञांचे मत त्यांच्याच भाषेत  फक्त  माहिती साठी मांडले आहे. पटलं तर मान डोलवा नाहितर सोडून द्या. 

 

उगाचच मराठी म्हण टाकून मशाल पाळायची गरज नव्हती. 

एक मराठी म्हण अशीही आहे,"जित्याची खोड मेल्याशिवाय  जात नाही". 

 

विजयादशमीच्या हार्दिक  शुभेच्छा.


In reply to by कर्नलतपस्वी

आपल्याला पटले असेल तर लिहावे. लिहले तर जबाबदारी दुसर्‍यावर टाकू नये.  जित्याची खोड.... ही म्हण कुणाला लागु होते हे दिसते आहेच. 


युसूफ पठाणने आपल्या घराशेजारील 978 चौरस मीटर सरकारी जमिनीचा तुकडा साधारण 2012 पासून बळकावल्याचा आरोप होता. भाजपने सुरुवातीपासून याला विरोध केला, तो योग्यच होता.

पण आता गंमत बघा! तृणमूल काँग्रेसकडून निवडून आलेला पठाण वेगळी चूल मांडतो काय आणि गुजरात सरकार त्याच जमिनीच्या वाटपाला मंजुरी देतं काय! आता हा निव्वळ योगायोग वाटत नाही. "तू फक्त बाहेर पड, तुला पाहिजे ते देतो," अशीच काही डील झाली असावी. बरं, यात एकटा पठाणच नाही, तर एकूण असे 19 खासदार आहेत. त्यात पठाण सेलिब्रिटी असल्यामुळे बातमी तरी झाली; बाकीच्यांची प्रकरणं कदाचित चर्चेतही येणार नाहीत. उगाच एखादा पत्रकार अडचणीत यायचा!

भाजपची राजकीय वॉशिंग मशीन तर आता जगजाहीर झाली आहे. ED-CBI च्या कारवायांनंतर विरोधक भाजपमध्ये येतात आणि त्यांच्या प्रकरणांचं पुढे काहीच हो नाही.  महाराष्ट्रात राणे, भुजबळ आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या नेते उगाच बाहेर नाहीत.

विरोधक फोडायचे, सत्ता मिळवायची आणि श्रेय घ्यायची वेळ आली की RSSची रणनीती, अमित शहांची चाणक्यनीती आणि मोदींच्या सभेची जादू! मग ED-CBI च्या भूमिकेचं श्रेय कुणाला द्यायचं? खरं तर मोदी-शहा-फडणवीस यांच्या राजकारणाला ED-CBI च्या दबावाचं समर्थन मिळालं नसतं, तर त्यांना इतकं राजकीय यश मिळालचं नसतं.

राहुल गांधी यांनी एक टक्का जरी मूर्खपणा कमी केला आणि थोडीफार संघटना मजबूत केली, तर काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात. सध्या त्यांना मिळत असलेलं समर्थनही दुर्लक्षित करता येणार नाही.

भाजपची खरी ताकद चाणक्यनीतीत नसून  यंत्रणांच्या धाकातचं आहे.


सध्या मिडियावर ज्या निवडणुकीचा गाजावाजा होतोय त्या कोल्हापुर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून, यात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला आहे.

सत्तेची अफाट ताकद, साम-दाम-दंड-भेदाचे राजकारण, वचनांची खैरात आणि देवदेवतांच्या शपथांचे मोहजाळ या महायुतीच्या अस्त्रांना धुडकावून लावत ठरावधारकांनी आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीच्या पाठीशी भक्कम वज्रमूठ उभी केली. परिणामी, विरोधकांचा अहंकार धुळीस मिळवत गोकुळच्या पटलावर समविचारी आघाडीची 'शिट्टी' गर्जना करत घुमली 

सहकारातील सहा दशकांची वैभवशाली परंपरा जपणाऱ्या गोकुळच्या या निवडणुकीत महायुतीने महाकाय तटबंदी उभारली होती. तीन मंत्री, दोन खासदार, दहा आमदार, पाच माजी आमदार आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सजलेले तगडे सैन्य एका बाजूला, तर दुसरीकडे एकाकी झुंज देणारे निष्ठावंत नेतृत्व अशी ही थरारक लढाई रंगली होती. परंतु, कोल्हापूरच्या स्वाभिमानी मतदारांनी भंडारा, शपथांच्या राजकारणाला अजिबात भीक घातली नाही.

बाकी गोकुळचा निर्णय फिरवण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून काय काय काय प्रयत्न केले गेले त्याच्या सुरस चमत्कारिक कथा बाहेर येत आहेत.

-दिलीप बिरुटे


अखिल भारतीय चिंचणीपाडा सहकारी पतसंस्थेच्या ( ५५ लाख वार्षिक उलाढाल)  महानिवडणुकांत काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मविआ ने महाप्रचंड विजय मिळवला असून हा सत्याचा विजय आहे आणि मोदी पुतीन आणि ट्रम्प यांच्या कटकारस्थानाचा सपशेल पराभव आहे असे निवडून आलेल्या श्री रुपेशरावजी साहेब  भोईर यांनी तेथे झालेल्या विजय मिरवणुकीत घणाघात करताना सांगितले.

या पतसंस्थेत ई व्ही एम वर नव्हे तर मतपत्रिका वापरून निवडणूक झाल्या त्यामुळे मोदीशाह यांचे षडयंत्र पराभूत झालेले आहे त्यामुळे श्री मोदी यांनी आपला नैतिक पराभव मान्य  करून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी श्री रुपेशरावजी साहेब  भोईर यांनी केली आहे.          


अक्षय कुमार त्याच्या घराला बुलेट प्रूफ काच लावून घेतो आहे.
https://www.ndtv.com/video/akshay-kumar-s-home-gets-bulletproof-glass-amid-tiger-shroff-firing-probe-1177934

देश सुरक्षित हातात असताना बुलेट प्रूफ काच लावून घ्यायची काय गरज? आता बुलेटप्रूफ काचे पलीकडे हा आंबे चोखून खाणार की कापून? 


केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि अमेरिकेतील लैंगिक गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेला जेफ्री एपस्टीन यांचा एकत्रित फोटो अमेरिकेच्या न्याय विभागाशी संबंधित कागदपत्रांमधून समोर आला आहे.

 फोटोमध्ये दोघे एकत्र दिसतात, परंतु केवळ फोटोवरून त्या भेटीचा नेमका उद्देश, संभाषणाचा विषय किंवा त्या वेळी खोलीत इतर कोणी उपस्थित होते का, भविष्यात तपशील येतील..?

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वरील विषय संदर्भ दुवा...

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अमेरिका एपस्टीन फाईलची धुरी देऊन भारताला  व्यापारी करारात कितपत नमवते आणि आपले गुळाचे गणपती कितपत पाघळते हे लवकरच कळेल. 

अमेरीका भारतीय मालावर 4 %  पेक्षा अधिक ड्यूटी लावणार असेल तर आपण गप्प  बसून  राहिलो हा मास्टर स्ट्रोक म्हणून मिरवता येणार नाही.


In reply to by आग्या१९९०

अमेरिकेकडे एपस्टिन फाईल असल्याने अमेरिकेपुढे लोटांगण घालण्याशिवाय आशियातील अनेक देशांच्या नेत्यांना पर्याय नाही!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

चीनला  काहीही फरक पडणार नाही. त्यांच्याकडे दुर्मिळ खनिजे आहे. आपल्याकडे मेंदू दुर्मिळ आहे  आणि Testosterone मुबलक आहे सत्ताधारी पक्षात आणि  हीच मोठी अडचण आहे आपल्या सरकारची .


In reply to by आग्या१९९०

सहमत, नी चीनला अमेरिका दुखावणार नाही कारण चीनची निर्यातक्षमता प्रचंड आहे, जग चीनवर अवलंबून आहे त्यातून अमेरिकाही सुटलेली नाही, भारतात गोबरयुग असल्याने बजबजपुरी माजली आहे! अमेरिकेची एक धमकी नी आपली बोबडी वळू शकते.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटर खात्यावरुन द फ्रेंड्शीप फाइल्स नावाचा  डॉक्युमेंटरी  व्हीडीयो शेयर केला आहे. ''सरकारला ही डॉक्युमेंट्री समाजमाध्यमांवरून गायब करायची आहे. याचं कारण काय असेल ते तुम्हाला ही डॉक्युमेंट्री बघितल्यावर कळेलच. त्यामुळे सरकारने ही डॉक्युमेंट्री गायब करायच्या आधी बघून घ्या !'' असे लिहून व्हीडीयो शेयर केला आहे. 


ट्वीटर खाते आणि व्हीडीयो दुवा. 

-दिलीप बिरुटे