Skip to main content
लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 28/09/2026 19:03 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मिपाकर...

एक ऑक्टोबरला अजून एक-दोन दिवस बाकी आहेत. पण, लिहित्या हातांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, हे आपलं पहिल्यापासूनच धोरण आहे. पाहा संदर्भ जुने धागे. तर, काही मित्रांचं सुरू झालं, सर, चालू घडामोडीचा धागा काढा. तर, आपल्याला मिपाकर मित्रांचे आग्रह मोडता येत नाहीत.

तर मित्रांनो, यावेळी पाऊस कमीच झाला. दुष्काळी तालुक्यांची नावे जाहीर झाली. आपला तालुका राहिला, आपल्यावर अन्याय होतोय म्हणून कार्यकर्ते नेत्यांच्या मागे लागलेत. शेतीसाठी पाण्याची गरज, पिण्याचे पाणी, शेतीचे कर्ज, कर्जमाफी हे नियमितच विषय झाले आहेत. त्यावरही बोलू काही.

श्रीगणेशोत्सव शांतपणे, कमी आवाजात साजरा झालाय. गणपती बाप्पाची आठवण अजून आहेच. आता दुर्गोत्सव पण दिसायला लागला आहे. आमच्याकडे गल्लीत श्रीगणेशाचं स्टेज देवीसाठी तसंच ठेवलं आहे. आता वर्गणीवाले सुरू होतील, दांडिया रंगेल, काही अशा-काही तशा बातम्या येतील. उत्साह महत्त्वाचा. परंपरा, श्रद्धा वगैरे आणि देवीच्या कथा-आख्यायिका, त्यावरही काही बोलूया.

दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या कारभारावर चर्चा सुरू आहे. मतदार वगळणे, अन्याय आणि निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय, तसेच पक्षीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. निवडणूक आयोगाची स्वायत्तता, प्रत्यक्ष अंमलबजावणी, निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता, पक्षीय भूमिका आणि शेवटी असलेला मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे, यावरही चर्चा करू.

कॉकरोच जनता पार्टीचं निवडणूक आयोगाच्या धोरणाविरुद्ध आंदोलन सुरू होणार आहे, अशा बातम्या येत आहेत; पण त्यापूर्वीच आंदोलन पोकळ व्हावे, पूर्वीसारखं काही होऊ नये म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या सुरू झालेल्या आहेत. दोन ऑक्टोबरला मुंबैतील दादरच्या शिवाजी पार्क येथे निवडणूक आयोगाच्या कारभाराविरुद्ध आंदोलन करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने पोलिसांकडे परवानगी मागितल्याची बातमी होती आणि आंदोलन कायदा-संविधानाला अनुसरून शांततापूर्वक राहील, असे कॉकरोच जनता पार्टीने म्हटले आहे. सीजेपीचं प्रेशर ग्रुप म्हणून काम करणे पुढे कसे सुरू राहील, ते भविष्यात कुठे जाईल, त्यावरही बोलू...

तर, काथ्याकूट शांततेच्या मार्गाने, मिपाच्या धोरणानुसार, एकमेकांच्या मतांचा आदर करत सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

स्वागत आहे. शुभेच्छा.


वाचने 7214
प्रतिक्रिया 268

प्रतिक्रिया

धन्यवाद बिरुटे सर, गेले महिनाभर उपवास घडला, लिहू लिहू म्हणत होतो पण लिहायचे कुठे हा प्रश्न पडला होता, तो तुम्ही ह्या धाग्याच्या रूपाने सोडवलात धन्यवाद.

तर पाऊस कमी असल्याने व विरोध पक्ष जोरात मागणी करू लागल्यामुळे सरकारला शेवटी दुष्काळ जाहीर करावा लागला, पण फक्त कागदोपत्री दुष्काळ नको मदत जाहीर करा असे शेतकरी tv चॅनल्सच्या माईकवर येऊन बोलू लागलेत.

दुसऱ्या बाजूला झुरळ जनता पक्षाने ज्ञानेशकुमार ह्या भारतीय निवडणूक आयोग प्रमुखाच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे, ह्यावर सरकार त्यांना काढू शकत नाही असे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे पण आम्ही सरकारला त्याना हटवा असे सांगितलेले नाही तर ज्ञानेशकुमार ह्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे असे झुरळ पक्ष म्हणतोय.

दुसऱ्या बाजूने ज्ञानेशकुमार ह्यांच्या बाजूने काही भाजपचे नेते वक्तव्य करत आहेत. काँग्रेस, नेहा बोरा, अभिजीत दिपके व झुरळे, ठाकरे बंधू हे ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसताहेत, काँग्रेसचे आंदोलन सुरू झाले आहे तर नेहा बोरा नी इतर विद्यार्थी संघटनांनी जंतर मंतरवर आंदोलन घोषित केले आहे, अभिजीत दिपके आणी झुरळे ह्यांनी मुंबईत २ ऑक्टोबरला आंदोलनाची हाक दिली आहे.

तर दुसरीकडे निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारांच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या काही वरिष्ठ वकिलांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे. वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन निवडणूक आयुक्त (डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी) यांच्या सहमतीशिवाय एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. हे निर्णय घटनाबाह्य आणि अवैध घोषित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

विचारवंत श्री. विश्वंभर चौधरी ह्यांनी त्यांच्या चेपू पानावर पुढील पोस्ट केली आहे.

ग्यानेसचे कारनामे

ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात 52,000 मतं कापून टाकली.

ममता 15,000 मतांनी हरल्या.
https://www.facebook.com/share/18PsAu4C5o/

एकंदरीत हा महिना आंदोलनात जाणार असे दिसतेय.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

पाऊस कमी असल्याने व विरोध पक्ष जोरात मागणी करू लागल्यामुळे सरकारला शेवटी दुष्काळ जाहीर करावा लागला, पण फक्त कागदोपत्री दुष्काळ नको मदत जाहीर करा असे शेतकरी tv चॅनल्सच्या माईकवर येऊन बोलू लागलेत.

 

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्ध्या, माढा तालुक्यातील तुळशी गाव मिडियावर गाजते आहे.  गावातल्या लोकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे त्या गावातील नागरिकांनी  गाव विकणे आहेचा ठराव घेतला आहे. कोणी  तरी अडाणी ;) आपलं गाव विकत घेईल आणि आपल्या गावाची दुर्दशा थांबेल असे गावक-यांना वाटत असावे.  

दुष्काळात कर्जमाफी आणि अतिवृष्टीत नुकसानभरपाई ही तात्पुरती मदत यापुढे या देशातील शेतकरी जाणार की नाही ? कायमस्वरुपी यावर काही तोडगा निघणार नाही, यात काही शंका नाही. कारण राजकारण कसे करता येईल त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना असा दुष्काळ आणि अतिवृष्टीत नुकसानभरपाई हा मतांचाच विषय वाटत असल्यामुळे त्यावर कायम स्वरुपी उपायांपेक्षा तात्पूरती मदत देऊन आपली वोट बॅंक जपणे यावरच ते काम सुरु असते.

 ''कोणतीही आपत्ती आली की कर्जमाफी” यापेक्षा शेतीचा धोका कायमचा कमी कसा करता येईल त्यावर उपाययोजना प्रत्येकवर्षी  आखल्या पाहिजेत असे वाटते.
 

गेले महिनाभर उपवास घडला, लिहू लिहू म्हणत होतो

खरंय,  काय ते दररोजच्या बातम्यांचा त्रास करुन घ्यायचा. सरकारच्या धोरणाचा ताण घ्यायचा, आपल्या लिहिण्या बोलण्याने काही बदल होतील का ? सार्वजनिक प्रश्नांच्या बाबतीत आपण भावनिक गुंतवणूक करुन त्रास करुन घ्यायचा कशाला ?  असे वाटतेच.  पण, आपण सगळंच बदलू शकत नाही; पण काहीच बदलू शकत नाही, असंही नाही. आपलं लिहिणं, बोलणं, प्रश्न विचारणं यांची किंमत कदाचित लगेच दिसत नाही. पण लोकशाहीत सार्वजनिक मत तयार होण्याची प्रक्रिया अशाच अनेक छोट्या आवाजातून घडते, हे आपण  सीजेपी आंदोलनात पाहिलं आहे, तेव्हा थांबायचं नाही. लिहायचं आणि जमेल तसं बोलायचं. 


-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणी  तरी अडाणी ;) आपलं गाव विकत घेईल>>>
एका बाजूला सुभाष चंद्राचे २२ हजार करोडचे कर्ज माफ होते नी दुसऱ्या बाजूला बळीराजाला मदत करायला जमत नाही, काय करतील गाववाले तरी? अर्थात गोबरयुग म्हटले की ह्या गोष्टी ओघाने आल्याच!

लिहायचं आणि जमेल तसं बोलायचं. >>
+१


सर्वोच्च न्यायालयाचे वकील बृजेश सिंह यांनी अटर्नी जनरल यांच्याकडे ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना कारवाई सुरू करण्यासाठी अधिकृत परवानगी मागितली आहे. बहु-सदस्यीय निवडणूक आयोग केवळ एका व्यक्तीच्या मनमानी कारभाराने चालवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

https://www.thehindu.com/news/national/advocate-seeks-to-file-contempt-…

प्रशांत भूषण, महमूद प्राचा आणि बलराज मलिक यांसारख्या सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांनी जाहीरपणे वक्तव्ये करत ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची हकालपट्टी करण्याची आणि त्यांना तुरुंगात पाठवण्याची (Behind the bars) मागणी केली आहे.
https://www.instagram.com/reel/Ddol0KcBzZm/?stkn=MXZ4ajgxMGdsMHE0Yw==


राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या आरोपांना चोख उत्तर देण्यासाठी भाजपने एकाच वेळी पक्षाच्या १२ हून अधिक मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या राज्यांच्या राजधान्यांमध्ये पत्रकार परिषदा घेण्यासाठी मैदानात उतरवले.

या सर्व मुख्यमंत्र्यांनी एकमुखाने सांगितले की, निवडणूक आयोगाने घेतलेले सर्व निर्णय (ज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीचा म्हणजेच SIR चा समावेश आहे) हे पूर्णपणे एकसमान आणि सर्व सदस्यांच्या संमतीने (Unanimous Decisions) घेण्यात आले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/bjp-deploys-a-dozen-chief-ministers-vs-rahul-gandhi-on-gyanesh-kumar-row-lies-exposed-12105917

 


केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने या मुद्द्यावर सोमवारी देशभर निदर्शने केली तर, कॉक्रोच जनता पार्टीने दिल्ली आणि मुंबईत शुक्रवारी 'जंतर-मंतर २.०' करत 'जेलभरो'चा इशारा दिला आहे.

इंडिया आघाडीची बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली असून उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू मंगळवारी आपल्या पक्षांची आंदोलन दिशा जाहीर करणार आहेत. एकूणच काय तर, आता शेठ आणि कंपनीकड़े गमावण्यासारखे काहीही राहिले नाही. 

 

बड़े बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले. 

बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले.

 

 -दिलीप बिरुटे


कोकरोच पार्टीला हेच माहीत नाही ज्ञानेश कुमारांची नियुक्ती केंव्हा झाली. जनता आम्हाला मत देत नाही. मग बिना निवडणूक लढवता आम्हाला सत्ता पाहिजे.  कोकरोच पार्टी (काही आप काही लाल  झेंडा यांची भेळ). जंतर मंतर परिणाम डीयूएसयू निवडणूकीत पहिल्यांदा एनएसयूआय एक ही जागा जिंकू शकली नाही. अधिकान्श कॉलेजात ही एबीव्हीपी स्वीप केले. बहुतेक सर्वात जास्त जागा यावेळी जिंकल्या असतील.  

 


In reply to by पाषाणभेद

तीन महीने सद्य गोबरयुगात सामजिक, राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीने सामान्य माणसाच्या  महत्वाचे आहेत, त्या चालु  घडामोडी आणि त्याचं विश्लेषण ( वादविवाद नको ) अपेक्षित आहे. 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by पाषाणभेद

ऑक्टोबर ते डिसेंबर-२०२६   ???
इतक्या तीन महिन्यांच्या घाडामोडी?

तेच लिहालया आले होते😆What a masterstroke सरजी😅🤣


लोक आपले वैफल्य आणि नैराश्य येथे व्यक्त करत आहेत. त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही

त्यांच्या मनातील घाणीचा थोडाफार निचरा होऊन त्यांचा रक्तदाब कमी व्हावा हीच परमेश्वर चरणी इच्छा.

अन्यथा

बुडणारा काडीचा आधार शोधात असतो तसे अंध द्वेष्टे दिपके सारख्या उपटसुम्भाचा आधार घेण्याचा प्रयत्न करत आहेत.  

चालू द्या 
 


In reply to by सुबोध खरे

दिपके उपटसुंभ? का तर नालायक लोकांचा राजीनामा मागतो म्हणून?


In reply to by सुबोध खरे

गटार घाण आहे म्हणून त्याकडे पाठ फिरवून पळता येत नाही. उलट, त्याच घाणीच्या प्रवाहातून एखादा बापट स्वच्छ, निर्मळ नदीसारखा जाणवतो; सीजेपीचा दीपक वेगळा भासतो; तुकाराम मुंढे यांच्यासारखी माणसं त्या गढूळ वातावरणातही आपल्या प्रामाणिकपणामुळे उठून दिसतात; आणि सोनम वांगचुकसारख्या व्यक्ती तर त्या सगळ्या प्रवाहात स्वच्छ, निर्मळ नदीसारख्या वाटतात.

घाण आहे म्हणून तिच्यापासून दूर जाणे हा उपाय नाही. त्याच घाणीच्या प्रवाहात जे निर्मळ, प्रामाणिक आणि विधायक आहे ते ओळखणे, जपणे आणि त्याला बळ देणे अधिक महत्त्वाचे आहे, आणि ते बळ आपण दिले पाहिजे.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जौद्या, लढा यशस्वी करून दाखवला दिपके ह्यांनी ह्याचे त्यांना वाईट वाटतेय.😌


In reply to by अमरेंद्र बाहुबली

दीपके यांच्यासारख्या व्हिसल ब्लोअर्सची भारतीय समाजाला आजच्या घडीला सक्त आवश्यकता आहे. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व कोकरोच दीपिके पासून आप वालेच आहे. त्याने ही आपचा प्रचार केला होता फेब्रुवरी  2025 निवडणूकीत.  बाकी निवडणूक आयोगाचे कार्य पारदर्शी आहे. बहुमताने निर्णय होतात हे इंडियन एक्सप्रेस ने दोन लेखांत हे स्पष्ट केले आहे. बाकी एका ही मतदारचे नाव बंगाल निवडणूकीत वळगले गेले नाही आहे.  खरी समस्या  मृत आणि डुप्लीकेट मतदारांची आहे. त्यात अल्पसंख्यक जास्त आहे. त्यांचे नाव कापल्यागेल्याचे नुकसान गैर भाजप पक्षांना होणार कारण अल्पसंख्यक कधीच भाजपला मत देत नाही. त्याममुळे विपक्षला मतदार यादीची सुधारणा नको आहे. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्याच घाणीच्या प्रवाहातून एखादा बापट स्वच्छ, निर्मळ नदीसारखा जाणवतो; सीजेपीचा दीपक वेगळा भासतो; तुकाराम मुंढे यांच्यासारखी माणसं त्या गढूळ वातावरणातही आपल्या प्रामाणिकपणामुळे उठून दिसतात;

 

हायला

बिरुटे मास्तर

कुठे तुकाराम मुंढे  आणि बापट

आणि

कुठे तो दिपके

तिळाचं तेल किंवा बदामाच्या तेलाबरोबर एरंडेलची कुठे तुलना करताय? 


In reply to by सुबोध खरे

तुकाराम मुंढे आणी बापट हे सध्या फक्त राज्यपातळीवर प्रसिद्ध आहेत तर दिपके हे देशभरातील तरुणांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. पण देशपातळीवर इतर दोन्ही प्रसिद्ध नसले तरीही त्यांचे कार्य कमी नाही! 


आंदोलन कायदा-संविधानाला अनुसरून शांततापूर्वक राहील, असे कॉकरोच जनता पार्टीने म्हटले आहे.

 

ते जंतर मंतर वर झालेले आंदोलन ही असेच शांतीपुर्ण होते. विश्वास ठेवाल ह्या वाक्यावर??


In reply to by अमरेंद्र बाहुबली

वय बघु नका हो !!  प्रश्ना चे उत्तर आहे? की नेहेमी प्रमाणे कलटी मारणार ?


राहुल गांधीचा देहरादून येथे छात्र की गूंज  कार्यक्रम झाला होता. हजारो विद्यार्थी तिथे आले होते. सर्वांना वाटत होते या वेळी एनएसयू बाजी मारणार. पण राजकुमारांचे  अगाथ ज्ञान ऐकलेल्या विद्यार्थांना एबीवीपील मत देणे जास्त योग्य वाटले. 


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना निलंबित करण्याची मागणी करणाऱ्या आणि निवडणूक आयोगाने दोन निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीशिवाय कथितरीत्या निर्णय घेण्याच्या पद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सहमती दर्शवली.

सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची व व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा मांडण्यात आला. 'बहुसदस्यीय निवडणूक आयोगाचे निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेणे आवश्यक आहे. मात्र, आयोगाच्या कार्यपद्धतीवरून निर्णय एकमताने घेतले जातात की नाही, याबद्दल शंका येते, असे म्हणणे हे प्रकरण मांडणारे वकील विकास सिंह यांनी सांगितले.

 

मा. सर्वोच्च न्यायालय अशा वेळी काय निर्णय घेणार ? त्यांनी घेतलेले निर्णय योग्य होते असेच म्हणनार, कार्यपद्धतीवर चर्चा करता येईल असे म्हणून निकाल लागेल दुसरं काय ?

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

निवडणूक आयोगात निर्णय बहुमताने स्वतः कोणीही एक निर्णय घेऊ शकत नाही. कारण तिघांचे स्वाक्षरी लागते. बाकी मतदाराला मत देता आले नाही असा आरोप कोणत्याही पक्षांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लावलेला नाही किंवा ज्यांना मत देता आले नाही असे लोक दाखवता आलेले नाही. देशात अर्पाजकता पसरून प्रजातंत्राच्या विरुद्ध लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हे सर्व सुरू आहे. विना निवडणूक सत्तेवर बसण्याचे दिवास्वप्न आहे.  सर्वसामान्य माणसाला हे सर्व कळत आहे त्यामुळे यांच्या नाटकांचा फायदा फक्त भाजपला होणार आहे त्यापेक्षा उत्तर प्रदेशच्या ठाण मांडून तिथल्या निवडणुकीची तयारी करणे जास्त गरजेचे आहे. 


In reply to by विवेकपटाईत

निवडणूक आयोगाने सपशेल माघार घेतली तरी त्यांची पाठराखण करत बसण्याची मानसिकता कशी निर्माण होते, हे अनाकलनीय आहे. उद्या खुद्द महामानव जरी माझे चुकले म्हणाले तरी समर्थक त्यांचीच पाठराखण करतील यात शंका नाही. निवडणूक आयोगाने अर्ज ६ च्या जातक तरतूदी पूर्णपणे मागे घेतल्या आहेत. प. बंगालमध्ये म्हणे १३ लाख प्रकरणे आहेत ज्यात निवडणूक आयोगाने मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला आहे. त्यांचे काम हे आधिकाधिक लोकांना मतदान करण्यासाठी मदत करण्याचे आहे पण कृती मात्र आधिकाधिक लोकांना मतदान करण्यापासून वंचित ठेवण्याची दिसून येते आहे.


च्यायला, २०१४ पासून  असं काय झालं  या व्यवस्थेला काही कळत नाही. मेंदूचा अजिबातच वापर न करणा-यांचा प्रश्न नाही,  पण, या गोबरयुगात भला असलेला मेंदुही हॅंग होऊन रिस्टार्ट व्हायला लागतो. तर, सांगायचा मुद्दा असा होता की- 


कथा अशी आहे. प्रकरण आहे दिवाळीच्या काळातील फटाके वाजविणे बाबत तर, फटाक्यावर संपूर्ण बंदी घातल्यास भावना दुखावतील ( अरे पण कोणाच्या ) असे निरीक्ष्जण सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले. त्याचबरोबर फटाक्यांवर संपूर्ण बंदीही लादणार नाही. किंवा चोवीस तास ( असं कोण करीत असतं ) अतिषबाजीलाही परवानगी देणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. 

फटाके कोणत्या वेळेत वाजवावे त्यावर एक मार्ग शोधला पाहिजे असे न्यायमूर्ती म्हणाले. फटाक्यांना दिवसभर परवानगी दिल्यास ( नै नै द्यायची होती, लोकभावना ) वृद्ध आजारी आणि लहान मुलांसह प्रत्येक सजीवांवर मोठा परिणाम होईल आपण निश्चित वेळ देऊ शकू असा काही उपाय शोधण्याची गरज आहे  ( असे तोंडी म्हणाले )  

विशिष्ट हरित फटाके, आवाज उत्सर्जन, राष्ट्रीय पर्यावरण संस्था यांनी विकसित केलेले फटाके वगैरे आणि तत्सम गोष्टी पाहून अशा फटाक्यांना परवानगी द्यायला हरकत नाही, वगैरे इत्यादि ( संदर्भ मटा ) 


फटाक्यावर बंदी घातलीच असती तर असं काय घडले असते ? लोकभावना कोणाच्या दुखावणार होत्या ? फटाक्याच्या आर्थिक उलाढाली करणा-यांच्या ? फटाके विकत घेणा-यांच्या, की लक्ष्मीपुजनाच्या दिवशी फटाक्यांची लड न वाजवल्यामुळे विष्णूपत्नी लक्ष्मीच्या भावना दुखावल्या असत्या ? मला वाटतं, फटाक्यांवर बंदी घातली असती तर,  सामान्य माणसाच्या जीवनाला शांतता लाभली असती असेच वाटते. 

-दिलीप बिरुटे

(शांतता हवी असलेला ) 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लहानपणी आम्ही लक्ष्मी छाप फटाके फोडायचो तेव्हा फटाक्यावरील चित्राच्या चिंधड्या उडायच्या , तेव्हा आमच्या भावना दुखावत नसत. आता सांगता येणार नाही. कचाचित दुखावतीलही , पण सर्वोच्च न्यायालय दखल घेणार नाही. 


In reply to by आग्या१९९०

लहानपणी आम्ही लक्ष्मी छाप फटाके फोडायचो तेव्हा फटाक्यावरील चित्राच्या चिंधड्या उडायच्या , तेव्हा आमच्या भावना दुखावत नसत.

खरंय लहानपण निरागस होतं. फटाक्यांवरील देवदेवतामधे भावनेपेक्षा कडक आवाज महत्त्वाचा आवाज होता, सकाळी ती कागदं अंगणभर पसरलेली दिसली की मित्रांमधे खूप फटाके वाजवले हा संदेश जाणे महत्त्वाचे असायचे. फटाक्यातील दारु हाताने पिळून भपका होण्यातली मजा भारी होती.

आपण वयाने आणि बुद्धीने वाढत गेलो, बदलत गेलो. ( काही अजून तिथेच राहिले आहेत ते सोडून देऊ ;) ) तर,   हवेची गुणवत्ता, ध्वनीप्रदूषण, आरोग्यावर होणारे परिणाम, आणि इतर नागरिकांच्या आरोग्याचा अधिकार हे वस्तूनिष्ठ आणि कायदेशीर गोष्टी आपल्याला  महत्त्वाच्या वाटायला लागल्या, महत्त्वाच्या आहेत. झ

सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टीकोन 'लोकभवना विरुद्ध वास्तवता' यात संतूलन राखण्याचा प्रयत्न वाटला.  ( उद्धव ठाकरे यांचं सगळं बरोबर आहे,  पण आता मागे जाऊन न्याय देऊ शकत नाही ) निर्णय न करणे हा काही न्याय वाटत नाही, असे म्हणत होतो. 

-दिलीप बिरुटे 


In reply to by आग्या१९९०

>>लहानपणी आम्ही लक्ष्मी छाप फटाके फोडायचो तेव्हा फटाक्यावरील चित्राच्या चिंधड्या उडायच..

येस्स. लक्ष्मी छाप फटाके फार जोरात आवाज करायचे. एक टायगर छाप पण असायचे.

भावना दुखावण्यावरुन आठवले. राम राम गंगाराम ह्या चित्रपटात अशोक सराफ ने म्हमद्या नावाचे मुस्लीम पात्र साकारले होते. त्यात एका प्रसंगात तो चक्क भिंतीवर टांगलेल्या महादेवाच्या फोटोला धूप वगैरे दाखवत असतो व दादा कोंडकेला सुनावतो कि अरे तुमच्याकडे ३३ कोटी आहेत त्यातील एक आम्ही घेतला तर तुमचे काय जाते.. त्यावरुन तेव्हा काही गदारोळ झाल्याचे ऐकले नाही( वडिलधार्या मंडळींकडुन ऐकले नाही.). दुसरे म्हणजे दूरदर्शनवर उषा चव्हाणचा एक चित्रपट दाखवला होता. त्यात गावात काही विचित्र प्रकार होतात त्यात पारावरच्या मारुतीचा एक हात त्याच्या तोंडावर काय आक्रित पाहतोय अश्या पोझिशन मध्ये होता. ती तशी मूर्ती पाहुनच फिस्सकन हसु आले होते. हा चित्रपट दूरदर्शनवर चक्क दाखवला गेला होता. असे प्रसंग सध्याच्या चित्रपटात दाखवण्याचा कुणीही विचार करु शकणार नाही.तेव्हाच्या भावना आडदांड असाव्यात.सध्या भावना फार नाजुक झाली आहे. कशानेही दुखावते.


तामिळनाडू मधेय ६९ टक्के आरक्षण आहे. त्याविरुद्धचा खटला अजूनही प्रलंबित आहे.  

महाराष्ट्रात ६२ टक्के आरक्षण आहे. As things stand, reservation in the state is 52%. The break down: 13% for Scheduled Castes, 7% for Scheduled Tribes, 19% for OBCs, 2% for Special Backward Classes, 3% for Vimukta Jati, 2.5% for Nomadic Tribe (B), 3.5% for Nomadic Tribe (C) Dhangar, and 2% for Nomadic Tribe (D) Vanjari. Additionally, there is a separate 10% EWS (economically weaker section) quota applicable to the non-reserved section of the population, regardless of caste and religion, with an annual income limit of ₹8 lakh.

इंद्र साहनी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने  १९९२ मध्ये नि:संदिग्ध पणे असे लिहिलेले आहे कि ५० टक्क्याच्या वर आरक्षण हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे.

मग अजून ३४ वर्षांनी हा खटला का प्रलंबित आहे.

न्यायालयात निकाल / निवाडा मिळेल. न्याय मिळेलच असे नाही    

किंवा 

न्यायालयात जे मिळते त्याला  न्याय म्हणायचे असते 


In reply to by सुबोध खरे

आंतरजालावर, माणूस म्हटलं की गुण-दोष असायचेच आणि ते मान्य करून पुढे गेले, तर आपला आनंद आणि उत्साह टिकवता येतो. तसंच, आपल्यातील गुणांचेही कौतुक कायम आहेच. मात्र, आपला एक मुद्दा अगदी बिंदुगामी आहे."न्यायालयात निकाल किंवा निवाडा मिळेल; न्याय मिळेलच असे नाही." हे अगदी शंभर टक्के खरं आहे.

खरं म्हणजे, आपण ३४ वर्षांपासून खटला का प्रलंबित आहे, हा जो आपला मुद्दा आहे, त्यामध्ये असे म्हणायला पाहिजे होते की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाल्यापासून न्यायालयात अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. मग, जे सत्तर वर्षांत झाले नाही, ते बारा-पंधरा वर्षांत कसे होईल? आणि तशी अपेक्षा कशी करता येईल, असे म्हणता येते.

लोकसंख्या वाढली. भांडणे वाढली. हक्कांविषयीची जाणीव वाढली. हक्कांसाठी लोक सहजपणे, "चला, पोलिसात केस करू; नाही तर भेटू कोर्टात," अशी धमकी देतात. त्यामुळे न्यायालयातील गर्दी वाढली आणि प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाणही वाढले, असे म्हणता येईल.  प्रकरणे प्रलंबित राहण्यासाठी कोणतेही एक व्यक्ती किंवा घटक जबाबदार नाही, सद्य सरकार तर अजिबातच जवाबदार नाही, हे पहिल्यांदाच स्पष्ट सांगतो. कोणाला तसा अंगुलीनिर्देश वाटत असेल, तर तो केवळ योगायोग समजावा. जलद न्यायाची अपेक्षा अपेक्षा कृपया कोणीही करू नये. जिंदाबाद, जिंदाबाद, कमल बाबू जिंदाबाद. अरे, येऊन येऊन येणार कोण? आमच्याशिवाय दुसरं कोण?"

तर, इंद्रा साहनी प्रकरणाबाबत आंतरजालावर उपलब्ध माहितीनुसार, त्या निकालामध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा सांगितली गेली; परंतु ती कोणत्याही परिस्थितीत कधीही ओलांडता येणार नाही, अशी घटनात्मक बंदी म्हणून मांडलेली नाही. अपवादात्मक परिस्थितीत ही मर्यादा ओलांडण्याची शक्यता निकालात मान्य केली गेली होती. त्यानंतर झालेल्या घटनात्मक दुरुस्त्या, नवीन कायद्यांची निर्मिती आणि त्यावरील न्यायालयीन आव्हाने यामुळे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. त्यामुळे हा गुंता अद्याप तसाच प्रलंबित आहे, असे वाटते.

-दिलीप बिरुटे


निवडणूक प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड ही पारदर्शक पद्धतीने व्हायला हवी, अशी मागणी करीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी दिला. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलन करण्यात येणार आहे, तरीही ते पायउतार झाले नाहीत, तर राजधानी दिल्लीत जंतर मंतरवर पुन्हा आंदोलनास बसू, असे दीपके यांनी सांगितले.

 

छत्रपती शिवाजी महाराज पार्कात शुक्रवारी गांधी जयंतीला आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे. भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकाने यामध्ये सहभागी व्हावे. हातामध्ये तिरंगा आणि शक्यतो महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेले कपडे परिधान करावेत, असे दीपके यांनी सांगितले.

 'आमच्या प्रमुख तीन मागण्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, एसआयआर प्रक्रिया त्वरित गोठवावी, २०२५च्या मतदारयादीप्रमाणेच पुढील निवडणुका घ्याव्यात, या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईनंतर गोवा, बंगळुरू, कोलकाता, पाटणा, रांची तसेच उत्तर प्रदेशात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतरही त्यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतर येथे आंदोलनास बसु' असे दीपके यांनी सांगितले.

 

आता सरकार आंदोलन कसे हाताळते ते पाहणे रोचक ठरणार आहे, सीजेपीच्या मागण्या मान्य हितील की आंदोलन मोडून काढ़ल्या जाईल ? या आंदोलनाला विद्यार्थी आणि जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो हे येणारा काळ निश्चित करेल. सरकारची जी दिवसेंदिवस बे आबरू होणे सुरु आहे, त्याबाबत सरकार काळजी घेईल असे वाटते.

 

-दिलीप बिरुटे

 


मला वाटत होते संपादक दुबई फ्लाईट बाबत काहीतरी लिहितील पण बहुतेक तिथे लोकांना मारण्याचा प्रयत्न करणारा जिहादी होता. राहुल गांधी पासून एकाही पुरोगाम्याने जहरी विरुद्ध एकही शब्द उच्चारला नाही किंवा पायलट ची प्रश्ंसा केली नाही. बहुतेक बी बी सी सी एन एन इत्यादींच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे पुरुगामीत्व.


In reply to by विवेकपटाईत

बऱ्याच लोकांनी विमानात असं होणं शक्यच नाही म्हणून लिहायला सुरवातपण केली आहे.


दुबईकडून तेल अविकडे जाणारे फ्लायदुबई चे विमान पाडण्याचा प्रयत्न हाणून पाडणा-या गंभीर जखमी असलेल्या भारतीय वंशाचे वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ट्रम्प तात्या, नेत्यानाहू,  आप्ल्या राष्ट्रपती मुर्मू आणि  देशाचे थोर, अभ्यासू , संशोधक, जगाचे मार्गदर्शक आदरणीय   पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी, विरोधी पक्ष नेते खर्गे, राज्याचे मुख्यमंत्री या सर्वांनी स्मित यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या 'फ्लाईदुबई' या प्रवासी विमानात आकाशात घडलेल्या थरारक घटना अनेकजण सारखे माध्यमांवर शोधत आहेत.  एक वैमानिक  दुसऱ्या मुख्य वैमानिकावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला काय करतो,  विमान जमिनीच्या दिशेने वेगाने खाली यायला लागते.  कॉकपीटचं दार वैमानिक उघडतो, प्रवासी आत घुसतात हल्लेखोराला आवळतात बांधून ठेवतात.  प्रवासी असलेले सह  कोणी सह वैमानिक  विमानाचे नियंत्रण मिळवून १५० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवतात आणि विमान सौदीच्या विमानतळावर सुखरुप उतरते. सर्व प्रवासी सुखरुप उतरले त्यांच्यावर काय बीतली असेल याची कल्पनाच करवत नाही. 

आता या घटनेत दोन वैमानिकांचे अंतर्गत भांडण, अपहरणाचा प्रयत्न, इस्त्रायल विरुद्ध इतर देश,  मुस्लीम अतिरेकी, हिंदू-मुस्लीम, सर्व अंगाने ष्टोरी थरार आख्यायिका समोर येतील.    सखोल तपास होईल आणि तपासातून सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा करुया.  सर्व घटनेत एका थरारक सिनेमाचे मटेरियल यात आहे. 

वृत्तपत्रीय बातम्यानुसार कॉकपीटमधे पहिला पोहचणारा माणूस यानीव हायून होता.   कॉकपीटमधे सहवैमानिक ज्याने हल्ला केला तो विमान हाताळत असल्याचे दिसताच त्यास याने दूर केले.  इतरही प्रवासी आले आणि हल्लेखोरास आवरले.  यानीव हायून याने विमान खाली जाणारी दिशा थांबवण्यासाठी त्यांनी नियंत्रणे खेचली  विमान हाताळण्याचा त्याला अनुभव त्याला  नव्हता मात्र एअर क्रॅश इन्व्हेश्टीगेशन हा कार्यक्रम पाहात असल्यामुळे काही कल्पना त्याला होती असे तो म्हणाला ( हे राम ) नंतर सहप्रवासी म्हणून विमानात असलेल्या दोन वैमानिकांनी नियंत्रणाची जवाबदारी स्विकारली. आणि विमान नियंत्रणात आणले. 

 

आज म.गांधी यांची जयंती. ज्यांच्या हातात शस्त्र नव्हते, पण ज्यांच्या विचारांमध्ये जग बदलण्याची ताकद होती... ज्यांनी सत्याला आपली ताकद आणि अहिंसेला आपले अस्त्र बनवून स्वातंत्र्याची चळवळ जनमानसात रुजवली, अशा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 

 

-दिलीप  बिरुटे




 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

 

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.  भारताला जग गांधींचा देश म्हणून ओळखतो. म्हणून गांधींद्वेष्ट्यांनाही विदेशात जाऊन गांधींच्या समाधीवर फुले वहावी लागतात!

कॅप्टन स्मित मच्छार ह्यांचे अभिनंदन! 💐त्यांच्यामुळे गांधींच्या देशाची मान अभिमानाने उंचावली गेली जगात! आज लालबहादूर शास्त्री ह्यांची जयंती त्यांच्याही स्मृतीस अभिवादन!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

महामानव होते गांधीजी पण मी त्यांना "राष्ट्रपिता" मानत नाही राष्ट्र खूप मोठे आहे पिता नाही राष्ट्राचा कोणी, राष्ट्रपुरुष स्वतःच सर्वतोपरी आहे. काल कोणी उठला गांधीना राष्ट्रपिता बनवून टाकले, आज कोणी उठला मोदींना राष्ट्रपिता बनवून टाकेल, जमणार नाही. अर्थात इथे त्यांचे मोठेपण नाकारण्याचा भाग नाही पण त्यांची प्रतिमा अवास्तव फुगवणे सुद्धा नामंजूर कारण सत्यात जगणे हाच गांधीजींचा मुळस्वभाव होता. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


यावरून एक घटना आठवली.

 १९७१ मध्ये कराचीहून उड्डाण करणाऱ्या एक पाकिस्तानी लढाऊ विमानात दोन पाकिस्तानी हवाईदल वैमानिकांची विमानाचे नियंत्रण ताब्यात घेण्यावरून जोरदार धुमश्चक्री होऊन अखेर ते विमान भारतीय हद्दीपासून चाळीस किलोमीटर आत पाकिस्तानी हद्दीतच पडले. ते भारतीय हद्दीत नेण्याचा प्रयत्न करणारा मूळचा बंगाली आणि त्याला विरोध करणारा पश्चिम पाकिस्तानी असे दोघेही वैमानिक त्या अपघातात मृत्युमुखी पडले. दोघांनाही पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांचे आपापल्या बाजूसाठीचे हवाई दलाचे सर्वोच्च पुरस्कार मिळाले. 

 


In reply to by रामचंद्र

मूळचे गुजरातचे असलेले कॅप्टन स्मित यांनी देशाचे आणि गुजरात राज्याचे नाव जगात उज्ज्वल केले आहे, गुजरात सरकारने 'गुजरात गरिमा' पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

आता या गौरवाचा मार्केट ट्रेडिंग चालवता येतील त्याचे प्रयत्न सुरु होतील, असे वाटते.

 

दुसरं असं की, दोन ऑक्टोबर पासून शिवाजी पार्क मुंबईतून जेलभरो आंदोलनास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे, आता जंतर मंतर 2.0 हाच पर्याय दिसतो आहे.

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

याचे श्रेय ही गुजरातकडे कसे काय जाते? मिंध्यांचा यात काहीतरी डाव आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा हा डाव हाणून पाडा.

सच्चे सैनीक ,गद्दाराना त्यांची जागा दाखवून देतील. : आदु चे बाबा-दादूस. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अक्षय कुमार ला पुढच्या चित्रपटाचा विषय मिळाला ! 


In reply to by साहना

कॅनडा कुमार! तुम्ही आंबा चिरून खाता की पिळून? असा प्रश्न महामहीम, विश्वगुरू, नॉन बायोलिजिकल, गंगापुत्र ह्यांना विचारणारा.🤣


CJP चे मुख्य 'जेलभरो आंदोलन' मुंबईतील शिवाजी पार्क (गेट क्रमांक ६) येथे पार पडले. मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता, तरीही CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक तिरंगा आणि विविध फलक हाती घेऊन शिवाजी पार्कवर जमा झाले होते.

 

'गद्दार ग्यानु मष्ट गो'  असे काही तरी मोठे बॅनर शिवाजी पार्कवर दिसत होते बातम्यांमधे, आजकालच्या जेन झीची भाषा आणि त्यांच्या मागण्या हा नवा विषय आहे, त्यावर स्वतंत्र धागा काढावा लागेल. 

 

दिल्लीमध्ये जंतर मंतर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात CJP ला पाठिंबा देणाऱ्या विविध विद्यार्थी संघटना (AISA, SFI, NSUI) आणि विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. आंदोलकांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी कडक नाकेबंदी केली होती आणि शेकडो आंदोलकांना ताब्यात घेतले, असे वृत्त येत आहेत.

 

आता यापुढे हे आंदोलन देशातील सहा मुख्य शहरांमधे होणार आहे, दिल्लीतील मागील आंदोलनात दिल्ली पोलिसांची देशभर नाचक्की झाली होती त्या नंतर आज संयमाने परिस्थिती हाताळली असे दिसते.

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'गद्दार ग्यानु मष्ट गो' 

त्याला गद्दार कसं आणि कुणी ठरवलं? काही आगापिछा नाही. कोण तरी उपटसुंभ उठतो आणि काही तरी म्हणतो कि झालं?     

 

झुरळांनी गाढवावर बोली लावली आहे. गाढव कधी रेस मध्ये जिंकलंय का कि त्याच्यावर लावलेले पैसे दाम दुप्पट झाले आहेत? 

 

एवढी मरमर करून चुकून ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच तरी त्याचा सरकार वर शष्प फरक पडणार नाही.

जसा धर्मेंद्र कुमार यांचा राजीनामा मिळवून झुरळांनी काय मिळवले. तात्विक विजय? त्याला कुत्रं सुद्धा हुंगायला येत नाही.    

आणि

ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर झुरळं मोकाट फिरत राहतील पण त्यांना आपल्या जागेवरून बडतर्फ करणे सरकारला सुद्धा अशक्य आहे.

ज्यांच्या घरात जळक्या नोटा मिळाल्या अशा उच्च न्यायालया च्या न्यायाधीशाला काढणे सरकारला अशक्य झाले होते. त्यांनीच राजीनामा दिला म्हणून  बरं झालं.

मला समजत नाही  शिकले सवरलेले लोक सुद्धा असल्या टिनपाट लोकांच्यावर कसे काय खूष होतात?  

ठाकरे बंधूंची गोष्ट वेगळी आहे ते राजकारणात आहेत काहीतरी करून प्रकाश झोतात राहण्यासाठी ते असल्या फडतूस आंदोलनाला पाठिंबा देत राहतील.

दीपके या पात्राची एकंदर लायकी काय आहे? ते पण जरांगे पाटील सारखे उभे केलेले बुजगावणे आहे. त्याला दोन तास उपास करता येत नाही. गेली इतकी वर्षे तो काय करत होता याचा हिशेब नाही. पुढे काय करेल हे त्यालाही ठाऊक नाही.

आणि स्वतः ला उच्च शिक्षित म्हणवणारे लोक  मुरलीवाल्याने भुलवलेले उंदीर त्याच्या मागे  फिरतात तसे फिरत आहेत.

अर्थात भारतात यात काही नवीन नाही. असेच उच्च शिक्षित लोक बाबा, महाराज, आणि बुवांच्या मागे गोंडा घोळतात त्याचीच हि सुधारित आवृत्ती.

चालायचंच           
  
 
  


In reply to by सुबोध खरे

फारच चिडचिड होते आहे डॉक्टर साहेब दिपकेंच्या नावाने! असो.

त्याला गद्दार कसं आणि कुणी ठरवलं? >> जो देश, पद ह्यांच्याशी गद्दारी करतो तो गद्दारच धरला जातो.

 

एवढी मरमर करून चुकून ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच तरी त्याचा सरकार वर शष्प फरक पडणार नाही. >>>
मग तरीही सरकारकडून पाठराखण का केली जाते आहे ज्ञानेशची? काहीतरी फरक पडणारच असेल ना?

 

जसा धर्मेंद्र कुमार यांचा राजीनामा मिळवून झुरळांनी काय मिळवले. तात्विक विजय? त्याला कुत्रं सुद्धा हुंगायला येत नाही.    >>>>
झुरलाना काही मिळणारच नव्हते तर २६ दिवस का लावले राजीनामा द्यायला?

 

ज्यांच्या घरात जळक्या नोटा मिळाल्या अशा उच्च न्यायालया च्या न्यायाधीशाला काढणे सरकारला अशक्य झाले होते. त्यांनीच राजीनामा दिला म्हणून  बरं झालं. >>>
पण त्या नोटा कुठून आल्या कोणी दिल्या? ह्याची सरकारने चौकशी केली नाही, आणी कॅलिनसेल तरी अजून काही बातमी बाहेर नाही! राजीनामा झाला म्हणजे मिटले सगळे नाही?

 

मला समजत नाही  शिकले सवरलेले लोक सुद्धा असल्या टिनपाट लोकांच्यावर कसे काय खूष होतात? >>>>
टिनपाट कोण हे कसे ठरवणार? सत्तेत बसलेल्यांनाही टिनपाट म्हणतात लोक आणी शिकले सवरलेले लोकही सत्तेतल्यांवर खुश होतात.

 

ठाकरे बंधूंची गोष्ट वेगळी आहे ते राजकारणात आहेत काहीतरी करून प्रकाश झोतात राहण्यासाठी ते असल्या फडतूस आंदोलनाला पाठिंबा देत राहतील.>>>>
आंदोलन फडतूस हे कसे ठरवलेत? आणी ठाकरे बंधूना प्रकाशझोतात राहायची काय गरज? त्यांचे एक वाक्य सगळ्या मीडियात झळकते! तेही सत्तेत नसताना, त्याना कधी गोदी मीडिया पाळायची गरज पडलेली दिसली नाही.

 

दीपके या पात्राची एकंदर लायकी काय आहे? ते पण जरांगे पाटील सारखे उभे केलेले बुजगावणे आहे. त्याला दोन तास उपास करता येत नाही. गेली इतकी वर्षे तो काय करत होता याचा हिशेब नाही. पुढे काय करेल हे त्यालाही ठाऊक नाही. >>>
लायकी कशी ठरवणार? मला वाटते ह्या देशाचा नागरिक असणे पुरेसे नाही का? बाकी जरागे पाटील नी दीपके हे कोणाचाही पाठिंबा न घेता स्वतच्या जीवावर उभे राहिलेले लोक आहेत. जरांगेनी मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षे काम केले तसेच उपोषण वगैरे स्वतच्या जीवावर करतात, दिपकेनी स्वतः स्थापन केली झुरळ जनता पक्षाची! 

 

आणि स्वतः ला उच्च शिक्षित म्हणवणारे लोक  मुरलीवाल्याने भुलवलेले उंदीर त्याच्या मागे  फिरतात तसे फिरत आहेत. >>>
 फिरायलाच हवे! जेव्हा जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा तेव्हा प्रत्येकाने उच्च शिक्षित असो नसो आंदोलनामागे उभे राहिले पाहिजे.

 

अर्थात भारतात यात काही नवीन नाही. असेच उच्च शिक्षित लोक बाबा, महाराज, आणि बुवांच्या मागे गोंडा घोळतात त्याचीच हि सुधारित आवृत्ती. >>>>
असच एक गांधी बाबा होता त्याच्या मागे उभे राहून देशाने स्वातंत्र्य मिळवले.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

असच एक गांधी बाबा होता त्याच्या मागे उभे राहून देशाने स्वातंत्र्य मिळवले.

 

भुजबळ बुवा

भारत सोडला तर श्रीलंका, म्यानमार,लिबिया सुदान घाना मलेशिया सायप्रस नायजेरिया याही देशां ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं तेसुद्धा चरखा चालवणारा गांधी बाबा नसताना.

त्याच काळात लाओस कंबोडिया व्हिएतनाम मोरक्को कॅमेरून टोगो नायगर छाड, काँगो , सेनेगल, बेनिन या राष्ट्रांना फ्रांस पासून स्वातंत्र्य मिळाले.

कोरिया इंडोनेशिया सुरीनाम  याही देशांना त्याच काळात जपान आणि नेदरलँड पासून स्वातंत्र्य मिळाले.  

आपल्याला कित्येक वर्षे " चरखा चला चला के स्वतंत्रता मिली " चे भंपक बाळकडू पाजून बुणगे बनवले गेलेले आहे. 

 

गांधी बाबाच्या नादाला लागुन लष्कर बरखास्त केले असते तर संपूर्ण काश्मीरचा नव्हे तर पंजाब हरियाणा नि राजस्थान सुद्धा आज पाकिस्तानचा भाग झाले असते. 

भोंगळ आणि भंपक अहिंसावादाच्या मागे लागलो असतो तर भारताचे किती तुकडे झाले असते.   

Mahatma Gandhi envisioned an ideal society based on absolute non-violence (ahimsa) where a free India would not need a standing military, viewing non-violent defense (Shanti Sena) as the ultimate goal.

He stated that a state fully committed to ahimsa would replace traditional military and police forces with non-violent volunteer corps.

Independent India's political leaders, including Prime Minister Jawaharlal Nehru and Sardar Vallabhbhai Patel, respected Gandhi's ideals but recognized that maintaining a standing army was necessary for national defense and territorial integrity.

Nehru noted that while he admired Gandhian principles, he could not disband the armed forces because the nation and the world were not yet ready for pure non-violent defense.

एकदा नीट वाचून पहा इतिहासात सत्य काय होते ते.  

राष्टच्या सीमा या चरख्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात  हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.

बाकी एकंदर तुमच्या टंकलेखनाबद्दल बऱ्याच वेळेस लिहिलेले आहे.        

त्याबद्दल द्विरुक्ती नको    


In reply to by सुबोध खरे

भोंगळ आणि भंपक अहिंसावादाच्या मागे लागलो असतो तर भारताचे किती तुकडे झाले असते. Screenshot 20261007 123801 Screenshot 20261007 123734 Screenshot 20261007 123701 आता तुमचे वरील वाक्य बघा अन् ही तीन ट्विट बघा, भारत सरकारला तुमचे अहिंसावाद विषयी असणारे मत मंजूर नाही असे दिसते. बाकी सोयीस्कर मांडणी फारच हास्यास्पद आहे Gandhi envisioned an ideal society म्हणले आहे तुम्हीच Envisioned - Envisioned is the past tense, past participle, or adjective form of the verb envision, which means to picture something clearly in your mind or imagine a future possibility. (संदर्भ - मेरियम वेब्स्टर डिक्शनरी) Envision केले होते म्हणजे गांधींनी शक्यता वर्तवली होती किंवा असे भविष्य असावे असे "इमॅजिन" केले होते. कुठेही ही व्यवस्था "Enforce" करायचा संदर्भ असला तर पुढे बोलता येईल.


In reply to by वृषभ खोंडे

उगाच शब्दांचा घोळ घालण्यापेक्षा गांधीजी लष्कर बरखास्त करण्याबद्दल काय म्हणाले होते आणि त्या अर्थाचे पत्र तेंव्हाचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी पंडित नेहरूंना लिहिलेले होते ते पण वाचून घ्या. 


उगाच मी शब्दप्रभू खोंडे म्हणून आपलीच टिमकी वाजवू नका .

 

The Gandhian Ideal in Government: After India gained independence, Gandhi's philosophical stance on complete disarmament continued to influence discussions among some prominent followers and leaders who weighed the moral contradiction of professing a foreign policy of peace while maintaining armed forces. For instance, historical correspondence from figures like President Rajendra Prasad reflected on Gandhi's ideal of disarmament when discussing the future role of military establishments in a newly independent nation.

 

https://www.facebook.com/anujdhar/posts/declassified-top-secret-letter-shows-that-president-rajendra-prasad-supreme-comm/10160758895871557/

  

गांधीजींच्या नावाने इतकी वर्षे काँग्रेसने मते मिळवली. ती मते आपल्याकडे वळवण्यासाठी मोदी त्यांच्या नावाचा वापर करतात  एवढं साधं आपल्याला कळू नये? याचा आश्चर्य वाटतं. 

 

शरद पवारांना आपले गुरु म्हणतात ते उगाच का?

त्याच वेळेस त्यांच्याच पुतण्या कडून त्यांचा पक्ष फोडून त्यांची वाताहत सुद्धा करतात. हे सर्व राजकारण आहे. हेही आपल्याला कळू नये?

चालू द्या!         

 

 


In reply to by सुबोध खरे

>>>गांधीजींच्या नावाने इतकी वर्षे काँग्रेसने मते मिळवली. ती मते आपल्याकडे वळवण्यासाठी मोदी त्यांच्या नावाचा वापर करतात  एवढं साधं आपल्याला कळू नये? याचा आश्चर्य वाटतं. 

 

गिरीजापतीसेवकाला हे आकलन नसावे असे आपणांस का वाटले?


In reply to by राज जोशी

तू जे नाव ठेवलेस ते ठेवण्यामागे तुझा बुड/ नॉन बुड बुडीत धसका आहे हे मजला कळते. 😂😂 पण झकास आहे. 

 

उरता उरला प्रश्न सरांना असे का वाटले ?

न वाटता मज पामरास मूर्ख समजून माझी कीव करण्याचा छद्मी आनंद सर कैसा घेते ? सांग गारू तुवाच आता कवणे अधिक काय बोलणे ?'


In reply to by सुबोध खरे

शब्दांचा घोळ आम्ही नाही तुम्ही घातलात खरे साहेब. परप्रकाशित असण्यात असे होते, इंटरनेट वरील रँडम आयडी कसा चूक आहे हे दाखवण्याची घाई अन् धडपड घात करते बघा. 

उरता उरला टिमकी वाजवण्याचा प्रश्न, जग मार्केटिंगचे आहे महाराज. माझी टिमकी मीच वाजवणार नाहीतर काय तुम्ही वाजवणार ? ती पण फुकटात ? का बघा बुवा खोंडे कसा शब्दप्रभू आहे असे ? काय पण बोलता राव. 

गांधीजींच्या नावाने इतकी वर्षे काँग्रेसने मते मिळवली. ती मते आपल्याकडे वळवण्यासाठी मोदी त्यांच्या नावाचा वापर करतात एवढं साधं आपल्याला कळू नये? 

सर, सांभाळून एक कर्कश्य का होईना तर्क म्हणून मला चालेल विचारांना खाद्य म्हणून पण मोदींना असे संधीसाधू म्हणणे कदाचित त्यांच्या भक्त मंडळीला आवडणार नाही हं बघा बुवा तुम्ही मेरे शब्द मेरी जिम्मेदारी मला मिसळपाव डॉट कॉम ने शिकवले आहे, मला वाटले तुम्ही पण शिकले असाल ! 

त्याच वेळेस त्यांच्याच पुतण्या कडून त्यांचा पक्ष फोडून त्यांची वाताहत सुद्धा करतात. हे सर्व राजकारण आहे. हेही आपल्याला कळू नये?

 पार्टी विथ अ डिफरन्स हे हे हे हे. असो तुमचे पण चालू दे हं.


In reply to by वृषभ खोंडे

पार्टी विथ अ डिफरन्स

हे श्री वाजपेयी यांच्या काळातच गंगार्पण केले गेले आहे.

तत्वासाठी एक मताने सरकार पडले त्यानंतर   


In reply to by वृषभ खोंडे

मोदींना असे संधीसाधू म्हणणे

संधीसाधू हे विशेषण चूक आहे.

संधीसाधू हे संधी अचानक आली तर त्याचा उपयोग करणे याला म्हणतात.

श्री मोदी हे संधी निर्माण करतात, दुसर्याने केलेल्या संधीवर आयते बसत नाहीत ( अर्थात असे करणे युद्धात आणि राजकारणात क्षम्यच असते).        


In reply to by सुबोध खरे

अर्थात असे करणे युद्धात आणि राजकारणात क्षम्यच असते

हे वाक्य आपण रिट्रॅक्ट करणार नाही अशी अपेक्षा. बाकी बुंद से गई वगैरे वगैरे सगळ्यांनाच लागू असते बरंका सर.  

😂😂


In reply to by सुबोध खरे

संधीसाधू हे विशेषण चूक आहे.

गांधीसाधू हे विशेषण कसे वाटते. 😁


In reply to by कानडाऊ योगेशु

सत्तेसाठी ते कृपाशंकर ला शरण गेले! गांधीतर त्या ममानाने महानच म्हणायचे. शब्द आवडला! गांधीसाधू!😀


In reply to by सुबोध खरे

गांधीजींच्या नावाने इतकी वर्षे काँग्रेसने मते मिळवली. ती मते आपल्याकडे वळवण्यासाठी मोदी त्यांच्या नावाचा वापर करतात  एवढं साधं आपल्याला कळू नये? याचा आश्चर्य वाटतं. 

 

काँग्रेसने केले तर ढोंग आणि प्रातःस्मरणीय परमआदरणीय HPMSNMJ ह्यांनी केले तर मते मिळवण्याचा राजकीय चाणाक्षपणा ?

HPMSNMJ ह्यांचे गांधी प्रेम हे खरे प्रेम नसून मते मिळविण्यासाठी केलेले ढोंग आहे हे मान्य केले तर मग त्यांच्या इतर सर्व हालचाली सुद्धा मते मिळविण्यासाठी केलेली ढोंग असू शकतात अशी दाट शक्यता निर्माण होते. राम मंदिर असो वा आपल्या वयोवृद्ध मातेला ATM च्या रांगेत उभे करणे असो वा ब्लॅक मनी आणण्याची भाषा असो किंवा भ्रष्टाचार निर्मूलनाची दर्पोक्ती ?

अर्थात सोपा आणि सत्यास धरून असा निष्कर्ष निघतो तो म्हणजे HPMSNMJ असो काँग्रेस सर्वच एकाच थाळीची मांजरे आहेत. 


In reply to by सुबोध खरे

भारत सोडला तर श्रीलंका, म्यानमार,लिबिया सुदान घाना मलेशिया सायप्रस नायजेरिया याही देशां ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं तेसुद्धा चरखा चालवणारा गांधी बाबा नसताना. >>>
प्रत्येक देशाचे मार्ग वेगळे! मी म्हटले नाही की इतर देशही गांधींमुळेच स्वतंत्र झाले पण भारत हा देश गांधीबाबाच्या नादाला लागूनच स्वतंत्र झाला, म्हणून नाही का विश्वगुरू विदेशात जाऊनही गांधींच्याच पुतळयाला फुले वाहतात? नोटेवर गांधींचाच फोटो का? सांगा सांगा!

 

आपल्याला कित्येक वर्षे " चरखा चला चला के स्वतंत्रता मिली " चे भंपक बाळकडू पाजून बुणगे बनवले गेलेले आहे.  >>>>
चरखा चालवूनच शांतीपूर्ण मार्गाने शेवटपर्यंत लढून गांधीनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले! 

 

संपादित

- मिपा प्रशासन 

 

भोंगळ आणि भंपक अहिंसावादाच्या मागे लागलो असतो तर भारताचे किती तुकडे झाले असते.   >>>
 त्या भोंगळ नी भंपक अहिंसावादामुळेच आज भारत अखंड नी एकजूट आहे! गांधीबाबाने ह्याच मार्गानी भारताची अखंडता राखली, नाहीतर हिंदू महासभेचा सत्तेतील पार्टनर हिंसावादी जिन्नाचा देश पहा, दोन तुकडे झाले! काय उदाहरण देता राव?

 

राष्टच्या सीमा या चरख्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात  हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.>>>
असे म्हणणाऱ्यान साधा भरत रत्नही देत नाहीत हो मोदी! पण गांधीना राष्ट्रपिता मानतात! आता मोदी खरे की तुम्ही खरे सानग पाहू!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीलंकेला तर त्यानी मागितलेले नसतानाही स्वातंत्र्य मिळाले.

त्यामुळे एका उदाहरणावरून  स्वातंत्र्य मिळण्यासाठी  ते मागितले तरच मिळते  हा चुकीचा समज पसरवलेला आहे. हे दिसून येते.


२८ दिवसांच्या मासिक धर्म चक्र आधारीत मोबाईल रिचार्ज बंद होऊन आता बहुतेक ३० दिवसांचा रिचार्ज करता येईल. स्त्रियांच्या सन्मानाखातर २८ दिवसांच्या मोबाईल रिचार्जची सुरुवात करणाऱ्या मोबाईल कंपन्या केवळ द्र्ष्ट्या होत्या. हा कालावधी बदलून तो ३० दिवसांचा करणाऱ्या स्त्रिद्वेष्ट्या ट्राय चा निषेध :)


काल निवडणूक आयोगाच्या ग्यानेशकुमार यांच्या विरोधातील मोर्चाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. मुंबई असो की जंतर मंतर, दोन्ही ठिकाणी प्रचंड गर्दी झाली. काल व्हीडीयो, छायाचित्रे भरगच्च दिसत होती. काही व्हीडीयोंमधे पोलिसांची दादागिरी आंदोलन हाताळताना दिसली.  आता आंदोलनकर्त्यांना त्याची सवय होत चालली असावी. दिल्लीत सातशे पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. कालही भारी बॅनर होते. बाकी, सरकार त्या घडामोडींपासून कोसो दूर राहिले, हे भारी होतं. 

उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुंबैत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराविरोधात गर्जना मोर्चा निघणार आहे, एकूनच जनता आता स्वत:हून व्यवस्थेच्या अनागोंदीविरुद्ध रस्त्यावर उतरत आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत ही चांगली गोष्ट होत आहे, आमचं कोणी काहीच करु शकत नाही, या भोंगळ समजाला लोकांनी वाटाण्याच्या अक्षता  लावल्या आहेत. 

आपलं काही पारंपरिक कर्मफळाच्या तत्त्वावर विश्वास नाही पण आपल्याला काही लोक इच्छा नसताना सहन करावे लागतात,  आपल्या वाटेला येतात. बरं, त्यांचं कर्तुत्त्व असं असतं की ज्याला हात लावतील त्याची माती शंभर टक्के होणार. च्यायला, कशाचाही इव्हेंट करायची मतलबी आणि घाणेरडी वृत्ती पाहिली की शिसारी येते. दुबै घटनेत ज्या काही अकल्पीत गोष्टी घडल्या तो केवळ चमत्कारच. पण, आता वैमानिकास फोनवर व्हीडीयो कॉल करुन आपलं छायाचित्र प्रसिद्ध करणा-या फोटोजीवीची दया आली.  अरे आता तरी सुधरा रे..... 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता वैमानिकास फोनवर व्हीडीयो कॉल करुन आपलं छायाचित्र प्रसिद्ध करणा-या फोटोजीवीची दया आली.  अरे आता तरी सुधरा रे.....  >>>
हे देखील करून झाले का? आता पुढची पायरी असेल श्री. मच्छार भेटल्यानंतर त्याना बळजबरी जवळ ओढून छातीला कवटाळले जाईल. 


In the recent Global Hunger Index (GHI) report, India ranks 102nd out of 123 countries

, scoring 25.8. This score places the country firmly in the "Serious" hunger category.
ग्लोबल हंगर इंडेक्स मधे भारत १०२ वा १२३ देशांच्या यादीत! वा मोदीजी वा!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

हा इन्डेक्स हा बहुधा चुकून अन्नाऐवजी पैसे खाण्याबद्द्ल तर नाही ना ?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

खिक्क !! 

आले का परत ते रद्दी मटेरियल !! मजा आहे बुआ. एस्वातीनी , ईथीयोपिया , चिली , लिबिया , नेपाळ , नामीबिया , युगांडा , रवांडा भारताच्या पुढे आहेत. 

लई भारी.    भारताला १२४ वा नंबर दिला तरी आपली काही हरकत नाही. 

 


In reply to by चबुगबाळे

ह्या सर्वे मध्ये अनेक दोष आहेत. पण ढोबळ मानाने तो बरोबर आहे. आणि ह्याचा जो मूळ डेटा आहे त्याचे अनेक स्रोत असले तरी एक महत्वाचा स्रोत हा भारत सरकारचा स्वतःचा रिपोर्ट आहे आणि त्यातील आकडे आणि रिपोर्ट मध्ये जे आकडे आहेत ते मेळ खातात.

> NFHS-5 found that 35.5% of Indian children under 5 are stunted and 19.3% are wasted (one of the highest child wasting rates globally). Even if genetic or sanitation factors are at play, child anthropometric deficits in India remain high by any global standard.

> The GHI is technically flawed as a measure of macro-level "food shortage" or acute starvation, but it is a credible warning signal for chronic undernutrition and public health sanitation deficits.

 


In reply to by साहना

साहना जी

ते व्हू च्या नियमाप्रमाणे बघितले तर stunted व wasted चे मानकच चुकीचे आहे. नियमाप्रमाणे वयाच्या ५व्या वर्षा पर्यंत मुलाची उंची १२० ते १२५ सेंमी असायला हवी वजन २४ ते २८ किलो असायला हवे. यात कमी आली तर ते लगेच मुल कुपोशीत आहे हा निष्कर्ष काढला जातो. कुपोशीत मुलांची समस्या भारतात आहे त्यावर दुमत नाही. परंतु सरसकट हा नियम लाउन आक्खा ईंडेक्स खाली ओढण्यात काय हशील? 

तसे बघितले तर आता शहरी / निमशहरी भागात मुलांच्या लठठपणाची समस्या भेडसावत आहे.  

माझा दुसरा आक्षेप असा की ईतर देशात जसे की लीबीया / घाना जिथे खायची मारामार असते तिथे मुले कसे काय stunted व wasted  नसतात? 

घाना जो आता ६५ व्या क्रमांकावर आहे तिथे २०२४ मधे १५% stunted व ५% wasted बालके होती मात्र भारतात त्याच वर्षी  ३३% stunted व १८% wasted? आणी लीबीया मधे ३% आणी ९%??

दया कुच तो गड्बड है!! 


In reply to by चबुगबाळे

घाना आणि लिबिया हे बिहार पेक्षा खूपच चांगले देश आहेत. बिहार आणि इतर देहाती प्रदेशांच्या तुलनेने ते अत्यंत चांगले आहेत त्यामुले सरासरी आकडेवारीत ते भारतापॆक्षा वर येतील ह्यांत आश्चर्य नाही. भारतांत मुलांची संख्या देहात प्रदेशांत जास्त आहे.

Bihar's nominal per capita income of roughly $1,100
Libya's nominal GDP per capita at approximately $6,449 घाना कदाचित $४००० च्या आस पास आहे.

विश्वगुरूचे चूर्ण खाता खाता आम्हाला भारत किती गरीब देश आहे ह्याचा विसर पडतो. भारत म्हणजे पुणे मुंबई बंगलोर नाही. 


In reply to by साहना

मुंबई पुण्याच्या आलिशान फ्लॅट मध्ये हाफचड्डीत बसून समोरच्या ५६ इंची टीव्हीवर गोदी मीडिया द्वारे चाललेली विश्वगुरू आरती पाहिली की सगळे कसे आलबेल आहे असे अनेकांना वाटते!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

तेच तर म्हणतोय, ह्यांना लोकांची मत पाहिजे ती पण आयती. मुंबईच्या बाहेर पडतच नाहीत हे भाऊ भाऊ.


In reply to by रात्रीचे चांदणे

मराठी माणूस मुंबई बाहेर निघावा हा तुमचा प्रयत्न गेली ७० वर्षे फेल गेला पुढे ७०० वर्षेही फेलच जाणार! 😌


In reply to by अमरेंद्र बाहुबली

मराठी माणसाची चिंता राहू देत.

उबाठा नी  वांद्रे कलानगर सोडून इतरत्र महाराष्ट्र आहे  हे माहीत आहे का असा प्रश्न पडतो.

 


In reply to by विजुभाऊ

मराठी माणसाची चिंता राहू देत. >>>
नाही आम्ही करूच! कशाला राहूदेत? मुंबई परप्रांतीयांच्या घशात घालायचा डाव यशस्वी होऊ द्यायला? खो खो.

उबाठा नी  वांद्रे कलानगर सोडून इतरत्र महाराष्ट्र आहे  हे माहीत आहे का असा प्रश्न पडतो.

>>> 

मातोश्री समोर जा, सातारा जी अंथरुण चार आय

दिवस चार रात्री जेवण न करता बसून रहा, ठाकरेना जर तुमचे तोंड पाहून दया आलीच तर ते तुम्हाला आत बोलवतील नी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतील. 😌


In reply to by अमरेंद्र बाहुबली

 प्रतिसाद संपूर्णपणे निग्लेक्टणीय आहे.

 


मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी मुंबईत 'गर्जना मोर्चा'ला सुरुवात झालेली सध्या तुडुंब गर्दी झालेली आहे. लोकांनी तिरंगा ध्वज मोर्चात आणावा. ही भूमिका चांगली आहे.  जनतेचा लढा आहे, हा संदेश चांगला आहे. 

 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेहा बोरा ह्यांच्या दिल्लीतील, दिपके नी ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चाला प्रचंड जनसागर उसळलेला दिसतो आहे. एकंदरीत ज्ञानेशकुमार ह्यांच्या राजीनाम्याच्या मागणील जनतेतून चांगला पाठिंबा असल्याचे दिसत आहे!


ठाकरे बंधूनी खरेतर जरांगेंच्या मोर्च्याला पाठिंबा जाहीर करायला हवा होता. 

दिपके च्या कुबड्या वापरून स्वत:ची प्रतिमा उजळावयाचा प्रयत्न छान आहे.

कशी का होईना प्रतिमा उजळू दे असेच म्हणावेसे वाटते 


In reply to by विजुभाऊ

सध्या मोदीना प्रतिमा उजळवून घेन्याची गरज आहे!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

त्याहीपेक्षा ठाकरे बंधुना प्रतिमा उजळवून घ्यायची गरज आहे.

अर्थात त्यांची प्रतिमा काही उरली असेल असे त्यानाही वाटत नसावे.

असो.


In reply to by विजुभाऊ

सहमत, पण मोर्चा झाला की दोन्ही ठाकरे बंधू परत घरात जाऊन बसतील. ह्या वर्षी तर दुष्काळ आहे राज ठाकरे तरी काय बाहेर पडणार नाहीत.

एवढं ऊन असतानाही दोघांनी मोर्चा केला हेच लै झालं.

 


In reply to by रात्रीचे चांदणे

कमीट कमी संसदेच्या मागच्या दारुण पळून जाणारी तर नाहीत. खो खो.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

ह्या दोन्ही भावांच्या मोर्चाचा मार्ग गुगलून बघितलं तर समजलं की हा मोर्चा एक किलोमीटर पेक्षाही कमी आंतरचा आहे. वाटलंच होत ह्यांना काही उन्हात चालता येणार नाहीच.


In reply to by विजुभाऊ

ज्यांची प्रतिमा खराब असते त्याना उजळावी लागते, नी करोडो खर्च करावा लागतो. इंस्टा रिल्स बनवाव्या लागतात. सार्वजनिक संडास ते पेट्रोल पंप सगळीकडे आपले फोटू लावावे लागतात.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

शेवटी नर्मदेतला गोटाच, त्याचे खरे रूप कितीही प्रयत्न केला तरी बदलणार नाही .


एक कथा

एक वेश्या असते तिच्या घरासमोर एक मंदीर असते. त्या मंदिराच्या बाजुला घरात पुजारी आणि त्याची बायको राहत असे.

पुजार्याची बायको रोज वेश्येच्या घराकडे पाहून मनातल्या मनात शिव्या घालत असे. वेश्या कशी नालायक आहे, कसा तिच्या वागण्याला धरबंद नाही आणि काय आणि काय !

इकडे वेश्या मंदिराकडे पाहत असे आणि पुजाऱ्याच्या बायकोकडे पाहत असे आणि मनातल्या मनात म्हणत असे की ही स्त्री किती पतिव्रता आहे, पतीची एकनिष्ठ पणे सेवा करते, देवाची सेवा करते आणि मनातल्या मनात तिला रोज वंदन करत असे.

 

मेल्यानंतर वेश्या स्वर्गात गेली आणि पुजाऱ्याची पत्नी नरकात !

 

तळटीप : याचा अंधभक्त, मंदभक्त आणि रोजच्या चर्चेशी काही काही संबंध नाही.

 


दिल्ली पुरुष पोलिस पत्रकार महिला , आंदोलनातील तरुण मुलींना किळसवाण्या पद्धतीने स्पर्श करतानाचे विडीओ वायरल होत आहेत आणि महिला पोलिस जाऊदे  असे त्या मुलींना निर्लज्जपणे सांगत आहेत. FIR नोंदवून घेण्यास केली जाते. एकीकडे परदेशात भारतीय पायलटचे कौतूकहोत आहे आणि इकडे भारतात वर्दीतले सांड ..... विश्वघाबरू काय करतो आहे? 


शिक्षण क्षेत्रातील अपुऱ्या मनुष्यबळासह मोठ्या वर्गखोल्या, शिक्षकांची कमतरता, शाळांमधील पायाभूत सुविधांची समस्या आणि सरकारच्या काटकसरीच्या धोरणांविरोधात सध्या फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. हायस्कूल आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा विस्तार अनेक शहरांमध्ये झाला आहे. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शने आणि शाळा-ब्लॉकेड केले आहेत. काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये संघर्षही झाला असून अटक करण्यात आल्याच्या घटना वृत्तपत्र माध्यमांमधे दिसत आहेत. 

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या सरकारचे 2027 च्या अर्थसंकल्पातील काटकसरीच्या प्रस्तावांवरही तीव्र नाराजी आहे. शिक्षणाचे बजेट नाममात्र वाढवण्याचा प्रस्ताव असला, तरी तो महागाईच्या तुलनेत कमी असल्याने प्रत्यक्षात शिक्षणासाठी उपलब्ध संसाधनांवर दबाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिक्षकांची कमतरता आणि शाळांमधील वाढता विद्यार्थीसंख्या यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
 

याच काळात सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, त्यात शिक्षक, अग्निशामक, आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचारी, यांचे वेतन, आणि  सरकारी काटकसरीच्या धोरणांविरोधात स्वतंत्रपणे संप आणि निदर्शनांमध्ये आंदोलक सहभागी झाले आहेत. या आंदोलनात सुमारे तीन लाख लोक सहभागी झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे.  फ्रान्समधील सध्याची परिस्थिती केवळ ‘विद्यार्थ्यांचे आंदोलन’ एवढ्यापुरती मर्यादित नाही. शिक्षणातील समस्या, सार्वजनिक सेवांवरील खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधातील व्यापक असंतोष या सर्वांचा त्यात समावेश आहे.

भारत आणि फ्रान्समधील परिस्थिती सामाजिक व संस्थात्मकदृष्ट्या वेगळी असली, तरी दोन्ही देशांमध्ये शिक्षणाच्या दर्जाबाबत, सार्वजनिक शिक्षणासाठी पुरेसा निधी, शिक्षकांची उपलब्धता आणि शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण, खासगीकरण  याबाबत गंभीर प्रश्न सारखेच आहेत असे वाटायला लागले आहेत. व्यवस्थेबद्दलचं कोणतेही आंदोलन, विरोध  हे शांततेत असायला पाहिजेत असे आपले मत आहे.  जाणकार तुलनात्मक अभ्यास करुन लिहितील अशी अपेक्षा...

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे बापरे ! शिक्षणाचा सावळा गोंधळ पुढारीत देशांतही आहे म्हणायचा.

तिथल्या विद्यार्थ्यांनी तिथल्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागायला पाहिजे होता पण अजून तरी ते व्यवस्थेतील बदलच सुचवित आहेत. त्यांना कदाचित इथल्या विद्यार्थी नेत्यांची शिकवणी लावली पाहिजे. शक्य झाले तर तेथील गृहमंत्री आणि पंतप्रधानांचाही राजीनामा मागायला पाहिजे. 

शिवाय डफलीवाले, सुवाच्य भाषेतील आंदोलनकारी यांची कमतरता यामुळे तिकडे काही क्रांती होणे अशक्यच आहे. तिथले विरोधी पक्ष देखील बुळेच दिसतात.

इथून आमचे विद्यार्थी नेते न्या म्हणावे, बघा कशी व्यवस्था सुधरत नाही ते :) 


In reply to by धर्मराजमुटके

पण तिथल्या शिक्षण व्यवस्थेची वाट लागायला तिथे मेकॉले नव्हता की मनुस्मृती नव्हती, तरी असे कसे झाले?


In reply to by राज जोशी

झाले असेल कसेही आपल्याला काय करायचे? सध्या आपल्या ithe mpsc च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे त्यावर लक्ष द्या, अहो साधी परीक्षा घेतल्या जात नाही पेपरफुटिविना नी चालले विश्वगुरू बनायला! खो खो.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

खरे आहे तुमचे... 

 

जंतर मंतर आंदोलन परिक्षा  ऑनलाईन घ्या म्हणून

पुण्यात आंदोलन परीक्षा ऑफलाईन घ्या म्हणून... 

 

चालू द्या... 


In reply to by वृषभ खोंडे

नाही ना भाउ... एमपीएसी ऑफलाईन घ्या म्हणतायत पुण्यात... 

आणि नीट ऑनलाईन घ्या म्हणत होते जंतरमंतरला... 

आमचा तर डोकाच गरगरला...


आयएएस/आयपीएस इत्यादी चोचले बंद करून टाकायला हवेत. दुसरे म्हणजे सरकारी नोकऱ्यांचे रिव्हॅम्प प्रचंड जास्त गरजेचे झाले आहे. आणि पुनरुत्थान म्हणजे लॅटरल एन्ट्री स्कीम आणून व्यवस्था बदलण्याच्या फुशारक्या मारणे नव्हे.


जंतर-मंतरवरील आंदोलन २ ऑक्टोबरपासून सुरू झाले होते; ६ ऑक्टोबरला राहुल गांधी आणि INDIA आघाडीच्या नेत्यांनी संसद परिसरातून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर आकाशवाणी भवनाजवळ धरणे झाले आणि राहुल गांधींसह काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. 

 कालच्या आंदोलनाच्या निमित्ताने लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष आवश्यक आहे. लोक कायम बोलताना पाहिलं आहे, लोकशाहीत विरोधी पक्ष कमकुवत आहे, विरोधी पक्ष काहीच करीत नाही. विरोधी पक्ष देशात राहिलाच नाही. विरोधी पक्ष देशातून मिटला आहे, आता कोणत्या राज्यात शिल्लक आहे, असे एक ना शंभर गोष्टी गोबरभक्त घेऊन येत असतात. 
कालच्या सहा  ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि INDIA आघाडीतील अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे मोर्चा काढला. या आंदोलनाचा केंद्रबिंदू होता मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेबाबतचे आक्षेप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी. 

विरोधकांनी मतदार यादीतील कथित अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत; दुसरीकडे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षांनी हे आरोप फेटाळले आहेत. मोर्चा पुढे जाण्यापासून पोलिसांनी रोखल्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर नेते आकाशवाणी भवन परिसरात ठिय्या देऊन बसले, कालचे फोटो व्हीडीयो पाहण्यासारखे आहेत. 
काही वेळाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले; नंतर त्यांची सुटका करण्यात आली. 

या संपूर्ण घटनेकडे केवळ एका पक्षाच्या आंदोलनाच्या नजरेतून न पाहता, भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया, मतदाराचा अधिकार आणि संस्थांची पारदर्शकता या व्यापक प्रश्नांच्या संदर्भात पाहणे गरजेचे आहे. मतदार यादीमध्ये चुकीची नावे असतील तर ती दुरुस्त झाली पाहिजेत. पात्र मतदाराचे नाव वगळले जात असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत असतील, तर त्या प्रश्नांना तथ्य, आकडेवारी आणि पारदर्शक प्रक्रियेच्या माध्यमातून उत्तरे मिळाली पाहिजेत.  विरोधी पक्षाने सरकारला प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. त्याच वेळी आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांनीही आपले आरोप पुराव्यांसह मांडणे आणि घटनात्मक मार्गांचा सन्मान करणे तितकेच आवश्यक आहे. सत्ता कोणाचीही असो, मतदाराचा अधिकार सर्वांत मोठा असला पाहिजे.  निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे ही प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे. लोकशाही केवळ निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्याचे नाव नाही; लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचा अधिकार, उत्तर मागण्याचा अधिकार आणि आपल्या मताची किंमत सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था. मतदाराचा आवाज मजबूत असेल, तरच लोकशाही मजबूत राहील.

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर हा फोटो खरा आहे की AI ?👍️

मला फक्त हा मागच्या वेळेचा फोटो आठवतोय😀

 सध्या फक्त गाणीच पाहत असल्यामुळे आजुबाजुला काय चालु आहे सिरियसली हे माहितीच नाही😅

 


In reply to by Bhakti

छायाचित्र खरेच असावे काल पोलिस ज्या पद्धतीने रेटारेटी करत होते त्यावरुन शंका वाटत नाही. सध्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची हेळसांड, नेहा बोराची काल केलेली फरफट. एमपीएससी विरोधातील आमदार आणि रोहीत पवार यांचे चालले आंदोलन, याकडे सरकार जितके आंदोलन दाबता येईल तितके दाबण्याचाच प्रयत्न करीत आहेत असे वाटते.  कठीण आहे, सर्व. 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विरोधी पक्षाने सरकारला प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. त्याच वेळी आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षांनीही आपले आरोप पुराव्यांसह मांडणे आणि घटनात्मक मार्गांचा सन्मान करणे तितकेच आवश्यक आहे.

 

बिरुटे मास्तर

हे सर्व कुठे करायला हवे? संसदेत.

रस्त्यावर नव्हे.

"संसदेत कायम गदारोळ करून संसदेचे कामकाज थांबवण्यामुळे काहीही होत नाही.

सरकारकडे व्यवस्थित बहुमत आहे आवाजी मतदानाने ते हवी ती विधेयके दहा मिनिटात पास करवून घेऊ शकतात.      

रस्त्यावर आंदोलने केल्याने काहीही होत नाही.

संसदेचे कामकाज थांबवण्यापेक्षा आपले मुद्दे सरकारला पटवून दिल्यास त्याचा जास्त चांगला उपयोग होऊ शकेल

किंवा

ते मुद्दे संसदेच्या कामकाजात रेकॉर्डवर आल्यास उद्या न्यायालयात जाण्यापूर्वी आम्ही संसदेत हे विधेयक थांबवण्याचे प्रयत्न केले होते हे न्यायाधीशांना पटवून देणे सोपे होते.  " 

हा पोच राहुल गांधी याना नाही.

हे वर लिहिलेले खुद्द शशी थरुर यांनीच म्हटलेले आहे.       

 

 


In reply to by सुबोध खरे

हे सर्व कुठे करायला हवे? संसदेत.

रस्त्यावर नव्हे.

डाक्टर काका, कॉंग्रेस आणि आघाडीची सरकारं होती तेव्हा  खाजप ( खाऊ दे जनता पार्टी )  सॉरी भाजपचे सदस्य  संसदेतच आपले प्रश्न अभ्यास करुनच बोलायचे असे वाटते का ? रस्त्यावर कधीच उतरले नाहीत असे म्हणायचे का ?  

 

सुषमा स्वराज, आवडत्या  नेत्या होत्या.  संसदेतील भाषण नंबर एक असायचं. वाढती महागाई, सिलेंडरचे वाढते दर त्यावेळी त्याही  रस्त्यावर उतरायच्या  बरं का ?

लालकृष्ण अडवाणी यांनी तेव्हाच्या सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात 'जन चेतना यात्रा' काढली होती. रथ यात्रा तर प्रसिद्धच आहे, तेही, संसदेच्या बाहेर मानवी साखळी करुन आंदोलन करायचे बरं का डाक्टर काका.   नितीन गडकरी यांनी रस्त्यावर केलेले भाजीपाल्याचं आंदोलन,  अनुराग ठाकुरांनी बेरोजगार, महागाई विरोधात काढलेले रस्त्यावरील  मोर्चे,  मुरली मनोहर जोशी, प्रकाश जावडेकर, यांनी रस्त्यावर उतरुन केलेली आंदोलन बरीच आहेत.  गाडीबैलाचं आंदोलन रस्तयवरचंच. 

च्यायला, आपले  हे  आदरणीय, जगाचे मार्गदर्शक, गुरुवर्य,  नॉनबायलॉजीकल जीव नेमकं तेव्हा कुठे आंदोलन करीत होते   माहिती नाही. पण आमदार आणि लोकसभा सदस्यांना  देशातील रस्त्यावरची आंदोलने नवीन नाहीत, नवीन नव्हती. एवढंच सांगून आपली रजा घेतो. 

-दिलीप बिरुटे


 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल प्रणित इंडिया अगेन्स्ट करप्शन (आय ए सी) आंदोलनात आपल्या बेधडक शैलीत आंदोलनाच्या समर्थनार्थ फेर धरून नवक्रांतीचे बिगुल वाजत असताना समर्थन देणाऱ्या स्वर्गीय सुषमा स्वराज. सुषमा स्वराज ह्यांनी ज्या धडाडीने स्वतःला सार्वजनिक राजकीय आयुष्याला वाहून घेतलं होतं त्याचं आजही निव्वळ अन् निव्वळ कौतुकच वाटते.


In reply to by वृषभ खोंडे

स्वातंत्र्याचं आंदोलन आपण काही थेट पाहिलं नव्हतं पण जनलोकपाल विधेयक जे भ्रष्टाचाराविरोधातलं होतं ते आंदोलन आवडलं होतं, पण त्यामुळे आपण गोबरयुगाकडे ढकलले जाऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते.  सुषमा स्वराज, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांची भाषणे आवडीने पाहिली. वेळोवेळी घेतलेल्या भूमिका आंदोलनेही आवडली. स्वयंपाकाचे   सिलेंडर दर  महाग झाले तेव्हा घराघरात लोकप्रिय असलेल्या मालिकेतील त्या  नटीचं आंदोलनही आवडले होते. सारांश व्यवस्थेच्या विरोधात भूमिका घेऊन व्यवस्था सरळ करणा-यांच्या सोबत आपण कायम राहिलो आहोत.  

पण, आत्ता सध्या भाजपकडे एखाद्या नेत्याचं भाषण ऐकत राहावे  असा नेता राहिला नाही. सत्ताधारी खासदार उभे राहतात ते रुल अमुक धमुक असे बोलता येत नाही. रुल अमुक धमुक हे शब्द आक्षेपार्ह आहेत. इतकंच ऐकायला येतं. बाकी,  'सुनने की क्षमता रखीये वाला' लडाखचा खासदार त्याचं भाषण आवडलं होतं. आता नुसतं ख्या ख्या ख्या, आणि बळजबरी गळेपडू धोरण. 
 

बाकी लावलेल्या वीटेबद्दल आभार. :)

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे मास्तर


हे सर्व लोक रस्त्यावर आंदोलने करत असत ते संसदेच्या आतील कामकाज करून  (अधिक/ व्यतिरिक्त) त्याऐवजी नव्हे.

संसदेत गदारोळ करून कोणतेही कामकाज करू न देता असे करत नसत हा एक मूलभूत फरक लक्षात घेतलात तर बरे होईल.

बाकी श्री राहुल गांधी यांची एकंदर बुद्धिमत्ता पाहिली तर सुषमा स्वराज अरुण जेटली मनोहर पर्रीकर यांच्यासारखे अभ्यासपूर्ण भाषण हे त्यांना झेपणारे नाहीच. 

 

भा ज प चे दुर्दैव म्हन्जे हे सर्व उत्तम नेते काळाने हरण करून नेले. (त्यांना पक्षाने अडगळीत टाकले नाही).   

वाईट म्हणजे काँग्रेस मध्ये असणारे शशी थरूर यांच्या सारखे चांगले वक्ते  याना अडगळीत टाकल्यामुळे काँग्रेसची अशी स्थिती झाली आहे.

असो चालायचंच         


In reply to by सुबोध खरे

हे सर्व लोक रस्त्यावर आंदोलने करत असत ते संसदेच्या आतील कामकाज करून 

किती जड जातं  ना असं गावगप्पा करणे,  म्हणजे आतील कामकाज करुन बाहेर तमाशा करायचे हे सांगणे. =)) 

जाऊ द्या. तारीख लक्षात नाही पण, मिपाला आणि आपणासही वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.... ;) 

 

-दिलीप बिरुटे 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हायला

मी काँग्रेसच्याच नेत्याचे (थरूर यांचे) वक्तव्य इथे दिले तर त्याला पण तुम्ही गावगप्पा म्हणताय?

बिरुटे मास्तर

आता तुम्हाला काँग्रेसचे नेते सुद्धा आवडेनासे झाले? का गांधी परिवाराशी एकनिष्ठा दाखवण्याच्या नादात सत्य दिसेनासे झाले आहे.    

कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?  
 


In reply to by सुबोध खरे

>>>> हे सर्व लोक रस्त्यावर आंदोलने करत असत ते संसदेच्या आतील कामकाज करून 

 

वरील वाक्य डाक्तर सुबोध खरे यांचे आहे की थरुर यांचे ?  

झुट बोले कव्वा काटे, काले कव्वेसे डरयो.  

गाणे ऐकता की नै आपल्या काळातले...ऐका. =))

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाब्दिक कसरत चांगली आहे. 


चालू द्या  


नुकतेच त्रिपुरा इथे 5000 जागांपैकी फक्त 14 मिळाल्या. सिल्चर 45 पैकी 2. दोन्ही निवडणूका कागदांवर झाल्या होत्या.  उत्तर प्रदेशात स्थानिक नेत्यांना राहुल गांधी आजच्या घटकेला तिथे हवे आहे.     आताच प्रचार सुरू केला तर अखिलेश सोबत वाटाघाटी करता येईल. किमान 100 जागा तरी लढायला मिळू शकतील. बाकी  मेलेले  आणि डुप्लीकेट मतदार यादीतून रद्द होणार.   गेल्या 12 वर्षांपासून जेएनयू गंग जंतरमंतर येथे  तमाशा करतो पण दिल्लीत 1000 मते सुद्धा वाममार्गी लोकांना मिळत नाही. 


दमदार आवाज, मनाचा ठाव घेणारा अभिनय आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे  गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. ते ७५ वर्षांचे होते. 

नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. त्याशिवाय याच संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे कैली. नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी ते बॉलिवूड अशी मुशाफिरी करणारा दमदार अभिनेता हरपला.

"कलमवाली बाई, आ गए मेरे खून का तमाशा देखने वाले..." हा डॉयलॉग कायम आठवणीत राहील.

भावपूर्ण आदरांजली.

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नटसम्राट हरपला. नानाची सामाजिक बांधिलकी माणूस म्हणून कसा, हे खुप आहे सांगून जात होती.

क्रांतिवीर आईबाबांनी लहानपणी थिएटरात दाखवला होता.टीव्हीवर अग्निसाक्षी पाहून खलनायक नानाची खुप भीती वाटायची.अगदी वेलकम मध्ये चित्राने हसवणारा, पक पक पकाक मधला भुत्या, देऊळबंद मधला ढोंगी नेता ,डॉ प्रकाश आमटे चित्रपटाने माझ्या पिढीला हेमलकसा दाखवणारे नाना, आज शांत झाले.आज खामोशी सिनेमा आठवला... सर्वत्र खामोशी...

या अष्टपैलू नाना पाटेकर कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली 💐


बातमी आहे की ध्रुव राठी हे देखील आंदोलनात आले आहेत, ते आज बेंगळुरूतील आंदोलनात भाग घेणार आहेत, त्यांच्यासोबत प्रकाश राज आणी अभिजित दिपके नी झुरळ पक्षाचे पदाधिकारी असणार आहेत! 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

काल या आन्दोलनाच्या निमित्ताने वाइल्ड कार्ड एंट्री व्हावी तसे ध्रुव राठी दिसणार आहेत, असा व्हीडीयो पाहण्यात आला.  दहा तारखेच्या जंतर मंतर आंदोलनासाठी पोलिसांनी फक्त एक हजार व्यक्तीनाच प्रवेश करता येईल असे सांगितले.

 

बाकी पोलिसांची आंदोलन दहशत, युवकांवर गुन्हे, खोटे युवक घसवून आंदोलन देशद्रोही आहे, कसे आहे वगैरे पटवून द्यायला सर्व पद्धतशीर सुरु आहे.

जंतर मंतर आंदोलनाचे अपडेट्स इथे देत राहू. लोकशाही आणि त्याच्या सरकारी संस्था वाचवण्यासाठी आपणही हातभार लावूया असे वाटते

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल सुप्रीम कोर्टाचे वकील मेहमूद प्राचा ह्यांचा व्हिडिओ पाहण्यात आला, त्यांनी सांगितले की जी कलमे लावली आहेत आंदोलनासाठी लागू होत नाहीत. १६३ वगैरे!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेन झीच्या निमित्ताने या देशात आता परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झालेली आहे.  आपलं कोणी काहीच करु शकत नाही, अशा मस्तवाल अवस्थेत पोहचलेल्या सत्ताधारी भाजपाला आता मंद लोक सोडले तर, कोणी आता त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवत नाहीत. प. मोदींची हवा आणि चेहरा आता काळवंडला आहे. आता सध्या भाजपा चिंतन बैठकीत एकच करु शकते   असे वाटते. विरोधी पक्ष, सीजेपी आणि तिसरी आघाडीतील घटक यांना एकत्र येऊ न देणे, ही ताकद एकत्र येण्यापासून रोखणे एवढेच त्यांच्या हातात आहे, असे वाटते. 

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+१ 

नवीन पिढी बदलासाठी आतुर झालेली दिसते आहे. पाकिस्तान, चिन, विश्वगुरू, हिंदू मुसलमान, बांगलादेशी, मंदीर मशीद हे नेहमीचे मुद्दे काम करेनासे झाले आहेत. नवीन पिढी विकास, व्यवस्था, पेपरफुटी, भ्रष्टाचार ह्या मुद्द्यांवर आंदोलन करू लागली आहे. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

विकासासाठी नवीन पिढी भाजपाळा मतदान करणार. बाकी ज्यांना 12 वर्षांतील प्रगति दिसत नाही त्यांच्या बाबतीत काही ही बोलणे व्यर्थ. जरा 2014 आणि 2026 चे विकासाचे आकडे बघा. पेपरफूटी सर्वच राज्यांत होते. कुठेही मग पंजाब असो केरळ असो किंवा झारखंड कुणीही राजीनामा मागितला नाही. बाकी मोदी कधीच भ्रष्टाचार करत आणि केंद्रीय मंत्र्यांची ही हिम्मत नाही. 


In reply to by विवेकपटाईत

बाकी मोदी कधीच भ्रष्टाचार करत आणि केंद्रीय मंत्र्यांची ही हिम्मत नाही. >>>
मग रस्ते कसे खचताहेत? पूल कसे पडताहेत? 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

>>रस्ते कसे खचताहेत? पूल कसे पडताहेत? 

दुबुक... पाहिला नाही का कधी पूल पडतांना? गंमतच आहे.


वयाच्या ७५व्या वर्षी नाना गेला! [ त्याला एकेरी बोलणं फार आवडायचं ] स्वत:साठी मागे अगदी १२ मण सुकी लाकडं देखील ठेवुन गेला.

त्याला कुठल्याही पोषाखात देखील पाहिले तरी केवळ त्यातला मनस्वी नानाच फक्त नेहमी दिसला.  उदय शंकर शेट्टी ही वेलकम व वेलकम बॅक या चित्रपटातील त्याची विनोदी भूमिका देखील लोक आजही मिम्स च्या माध्यमातुन शेअर करताना दिसतात. प्रहार किती वेळाही पाहिला तरी तो परत पहावा वाटतो यशवंत, क्रांतिवीर आणि किती नावे घ्यावी?

क्रांतिवीर मध्ये नाना ने चक्क गाण्यात हिप्नोटाइझ होऊन नाच केला आहे व त्या काळी ते गाणे अगदी सुपर डुपर हिट झाले होते.

लहानपणी कोल्हापूरात माझे स्व. निळुभाऊ फुले व मराठी अभिनेता दिलीप प्रभावळकर यांना शालिनीसिनेटोन / शालिनी स्टुडियो मध्ये पाहणे व भेटणे झाले होते.जसे त्यांना मला भेटता आले, तसेच नानाला एकदा तरी भेटता यावे अशी फार इच्छा होती, ती अपूर्णच राहिली.

नाना केवळ अभिनया पुरताच थांबला नाही तर शेतकऱ्यांसाठी, पाण्यासाठी देखील राबला. एक सामाजिक जवाबदारी खांद्यावर घेऊन वावरला व अगदी अचानक गेला एकटाच असताना.

त्याचे क्रांतिवीर चित्रपटातील ते गाणं आठवणं म्हणुन देऊन जातो...

 Maine Dekha Jab | Krantiveer |

 

मदनबाण.....


In reply to by मदनबाण

मबा.. मनाला खूप भिडणारं लिहीलं आहेस पण कुणाला त्याची काही पडलेली नाही. झुरळ पार्टी, मोदी बॅशिंग, आपापल्या पार्टीचं झडझडून स्खलन होईस्तोवर समर्थन हीच टॉप प्रायोरिटी आहे आता. ते सर्व अभिसरण लोकशाहीत चालू रहावं हे ठीकच पण आता फक्त ते आणि तितकंच उरलं आहे. कला, ललित, सौंदर्य, अभिनय, सामाजिक कार्य याला काही महत्व असेल आणि गेलेल्या जिवाला कोणी क्षणभर थांबून आदरांजली देईल ही अपेक्षा देखील खूप जास्त अवास्तव ठरते.


दिलीतील रेल्वे स्टेशन बंद करण्यात आल्याची बातमी आहे खरे आहे का हे? 

२३-३० हजारापर्यंत सैन्य नी पोलिसांचा फौजफाटा गोळा करण्यात आल्याचे सांगण्यात येतेय.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

https://www.indiatoday.in/india/story/delhi-cjp-protest-police-deployment-high-security-pg-owners-jantar-mantar-itspc-3012559-2026-10-08


CJP आंदोलनामुळे ट्रेन रद्द? दिल्लीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व रेल्वे उद्या १० तासांसाठी बंद राहणार!

https://www.loksatta.com/desh-videsh/delhi-trains-cancelled-cjp-protest…


In reply to by अमरेंद्र बाहुबली

सरकार भयावह अवस्थेला पोहोचलेले आहे. अशा प्रकारे रेल्वे बंद करणे अजिबात कायदेशीर नाही असे वाटते. तसेच पोलीस हे पण नावाची पाटी काढून आंदोलकांना मारहाण करत आहेत. पोलिसांना अशा प्रकारे कामावर येण्याचाही नियम असेल असे वाटत नाही. हा एक नैतिक नीचतम बिंदू आहे. 

हे सरकार आता कोणतेही कायदे पाळेनासे झालेले आहे.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

CJP आंदोलनामुळे ट्रेन रद्द? दिल्लीला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व रेल्वे उद्या १० तासांसाठी बंद राहणार!

आज भुसावळला रेल्वेने दिल्लीला जाणाऱ्या विद्यार्थांना  पोलीस पकडत होते. आंदोलनालाच जाणार असे तिकीटावर लिहिले होते. समजा त्याच कारणासाठी जात असले तरी , अहिंसक पद्धतीच्या आंदोलनाची धास्ती का वाटते सरकारला ? 

गांधीजींच्या अहिंसक आंदोलनामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले नाही ह्यावर विश्वास असणारे त्याच प्रकारच्या आंदोलनाला का घाबरत आहे? 

 

 


In reply to by आग्या१९९०

वोट चोर गद्दी छोड़ अशा घोषणा दिल्लीत जागोजागी दिसत आहेत, राष्ट्रीय वाहिन्या आणि गोदी मिडियावर तसा आता विश्वास उरलेला नसल्यामुळे खासगी व्यक्तिगत येणारे व्हिडिओ, छायाचित्रे यात आंदोलन गाजणार असे दिसत आहे. सरकार ज्या पद्धतीने आंदोलन दडपू पाहात आहे हे नवयुवकांना खपणारे नाहीच. 

आज ज्ञानेशकुमार आणि उद्या म्हणजे भविष्यात येत्या काही दिवसात पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना राजीनामा द्यावा यासाठी देशभर आंदोलन होईल असे वाटायला लागले आहे, देशभरातील आंदोलने त्याच दिशेने जात आहेत असे वाटते.

विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पन्नास निमलष्करे दल, पोलिस असा तगड़ा बंदोबस्त सरकारने लावला आहे, उद्या हे आंदोलन काय वळन घेते ते पाहात आणि वाचत राहूया...

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by आग्या१९९०

अहिंसक आंदोलनाची व्याख्या सांगता काय? 

मग मागील आंदोलन कसे अहिंसक होते यावर एक परीच्छेद लिहा.


In reply to by चबुगबाळे

हिंसा केली असती तर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा  दिला असता का? 


In reply to by आग्या१९९०

मी फक्त व्याख्या सांगा व आपल्या समर्थनासाठी ४/५ वाक्ये लिहा ईतकेच सांगीतले होते. आपल्या मुद्द्याच्या समर्थनासाठी ईतकेही जमत नसेल तर मुदलात खोट आहे हे मान्य करा. त्या अहिंसक आंदोलनात शंभरावर पोलिस जखमी झाले होते, कित्येक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. अगदी त्याच मुद्द्यावर बोट ठेउन आताच्या आंदोलनाचा दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. तेव्हा रुदन करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा.


In reply to by चबुगबाळे

व्याख्या व्याख्या काय करता ? हिंसा केली असती तर आंदोलकांवर गुन्हा नोंदवला असता पोलिसांनी. तुम्ही तुमच्याच जाळ्यात फसत चाललेत .  


In reply to by आग्या१९९०

खिक्क !!  

मग आमच्यावर केलेल्या केसेस वापस घ्या म्हणुन कशाला गेले होते कोड्तात? 

 


In reply to by चबुगबाळे

मग आमच्यावर केलेल्या केसेस वापस घ्या म्हणुन कशाला गेले होते कोड्तात? 

 

खोट्या आरोपाखाली आंदोलकांना अटक  केली होती , तसे नसते तर  केसेस मागे घेतल्या नसत्या.

जेलमधील गुन्हेगार आंदोलनस्थळी कोणी सोडले होते? 

कडक बंदोबस्त असताना CCTV ला चकवा देऊन दगडांचा ट्रक जंतरमंतर रस्त्यावर आदल्या रात्री कसा आणि कोणी आणला? पुन्हा एकदा जागा बदलून दुसरीकडे कसा आणि कोणी नेला ? 

प्रायव्हेट आर्मी आंदोलन स्थळी कोणी आणली ?

गणवेशावरील नेमप्लेट तेथील पोलिसांनी का काढून  टाकल्या होत्या ?

रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेच्या थोबाडीत एका पोलिसानी का मारली ?

दिल्ली पोलिसानी एका युवतीच्या पार्श्वभागात लाठी का घुसवली ?

आंदोलकांवर पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले?

हे प्रश्न तुम्हाला कधी पडले का?

हो सर्व प्रश्न विरोधकांनी सरकारला संसदेत विचारले होते , 'संपूर्ण पावसाळी अधिवशनात दोन उंदरं बिळात लपून बसली होती  उत्तरे टाळण्यासाठी.  

ह्याचे तुमच्याकडे उत्तर असेल तर द्या. 

अजून भरपूर दारुगोळा आहे तुम्हाला विचारण्यासाठी. 

बिळात लपू नका बरं! 

 

 


In reply to by आग्या१९९०

खिक्क!!

बदलली गोलपोष्ट. चालु द्या.  फालतु कामासाठी वेळ नाहिये ..  

आनंदी रहा .. 


उद्या देशात क्रांति होणार आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेत  अतिशय उत्साह आहे. बीबीसी सीएनएन गर्जियन इंडियन एक्सप्रेस इत्यादि  सर्व चॅनल तैयार आहे.  सर्व देशभक्त जर्मन ध्रुवराठीइत्यादि  रस्त्यावर येऊन सत्तेवर कब्जा करणार आहे. मोदी अमितशाह आणि भागवत जेल मध्ये जाणार. बहुतेक आज किंवा  उद्या रात्री देश सोडून पळून जातील

 आजच आसाम लोकसभा निवडणूक  मुस्लिम बहुल रेजिनगर आणि नंदी ग्राम ही वोट चोरी झाली आहे.      भारतात क्रांति घडवून मोदींना सत्तेवरून दूर करणे गरजेचे आहे. 

 बहुते सकाळी दहाच्या आधी पोटभर नाश्ता आणि बिदागि रक्कम घेतल्यानंतर आंदोलन सुरू होईल. आजकाल आधी पैसा नंतर काम , हा कार्यकर्त्यांचा नियम आहे(पक्ष कोणताही असू दे).  दुपारी तीन-चार वाजे पर्यन्त आंदोलन संपणार.  असामाजिक तत्व एकत्र करून तोडफोड करण्याचा प्रयत्न ही होईल. 

हे सर्व केल्यावर ही अखिलेश बाबू  विधान सभा निवडणूकीत 50 जागा ही दान मध्ये देतील की नाही, हे सांगता येणे शक्य नाही. 

 भाजप नेत्यांचे म्हणणे आहे, राहुल हा आमचा सर्वकालीन सर्वात मोठा स्टार प्रचारक आहे.   सत्ता विरोधी लहर दूर करण्यात या आंदोलनाचा लाभ भाजपला होईल. कारण देश विरोधी नारे लागणार.  राहुलच्या भरोश्यावर 2029 निवडणूक भाजप जिंकणार. 

बाकी दुबई विमान कांड हे इजराईल आणि भाजपचे  षडयंत्र होते.  असा लेख वाचला आवडेल. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

एवढी भीती वाटते तर देश बंद करून टाका. :-

दिपके.

https://www.instagram.com/reel/DeRDeOtin7X/?cplk=MXAwcWN2ZDNvcjVhNw==


भाजपाला मुळीच भीती भीती वाटत नाही आहे. देशाची जनता भाजपाला भरभरून मते देत आहे. विपक्ष ला बिना निवडणूक सत्ता पाहिजे. त्यासाठी नेपाळ सारखी अराजकता पसरविण्याचा प्रयत्न आहे. आजचे निवडणूक निकाल तुम्ही बघितलेच असेल गेल्या आठवड्याचेही बघितले असेल.


In reply to by विवेकपटाईत

भाजपला भीती वाटत नसेल, पण नेते का बिळात लपून बसतात?

दिल्लीत सगळेच बिघडलेले आहे. रेल्वे बंद, संचारबंदी, इंटरनेट बंद, वाहतूक बंद, हॉटेल बंद. पोलीस दडपशाही करून आंदोलन मोडून काढत आहेत. म्हणजे कारण काहीही असू दे परिस्थिती अजिबात सामान्य नाही. अशा वेळी जनतेचे जे हाल होतात, जनजीवन विस्कळीत होते त्याबद्दल सरकारचे जे मंत्री आहेत, नेते आहेत, त्यांनी समोर येऊन जनतेला आश्वस्त करणे, काही सांगणे ही सर्वसाधारण पध्दत नाही का? असे कोणीही समोर येऊन किंवा माध्यमांत सरकारच्या वतीने काहीही बोलताना दिसत नाहीत. मणिपूरमध्येही जेंव्हा राज्य जळत होते, महिलांवर अनन्वित अत्याचार होत होते, तेंव्हाही कोणी जबाबदार मंत्री तिकडे गेला नाही. म्हणजे निवडणूक असेल तर प्रचाराला, काही सकारात्मक उदघाटन इ. असेल तेंव्हा ति़कडे हे जाणार, श्रेय घेणार, माध्यमांसमोर, लोकांसमोर भाषणबाजी करणार पण जनता अवघड परिस्थितीतून जात असेल तर मात्र बिळात लपून बसणार. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर हे नेहमीचेच आहे. कोणीही यावे भारताला टपली मारावी आणि हे गप्पच. हा कचखाऊपणा हे खास उजव्या विचारसरणीचे गुणवैशिष्ट्य म्हणावे का? 
काँग्रेसवर काहीही आरोप करा, पण वाईट परिस्थिती असताना त्याला सामोरे जाण्याचे धैर्य आणि नैतिकता दिसत होती. आता मात्र एक वेगळ्याच प्रकारचा **पणा दिसत आहे.


In reply to by स्वधर्म

जितकं क्रूरपणे चिरडायचा प्रयत्न होईल तितकीच सरकारविरुद्ध नकारात्मकता वाढेल. 


जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशात आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतर येथे सीजेपीचे आंदोलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीची तगडी नाकेबंदी करण्यात आली आहे. 

रस्तोरस्ती उभे असलेले पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान, मेट्रो स्थानके बंद, महत्त्वाच्या मार्गांवर उभारण्यात आलेले बॅरिकेड्स, रेल्वेगाड्यांचे मार्ग बदललेले, रेल्वे स्थानके, बस थांबे, हॉटेल आणि अन्य संवेदनशील ठिकाणांवर सुरू असलेली कसून तपासणी...  रेल्वेतून दिल्लीकड़े निघालेल्या तरुण यांची धरपकड़ असे चित्र सध्या माध्यमात दिसत आहे 

पोलिसांनी केलेला बन्दोबस्त पाहुन सीजेपीचे दीपके आणि दास यांनी मा. पंतप्रधान यांची खिल्ली उडवणारा व्हीडीयो शेयर केला आहे.

सरकार विरुद्ध  युवक- विद्यार्थी यांचे लोकशाही आणि देशातील प्रश्न  यावरील आंदोलन भविष्यात कुठे जात राहील ते उघड्या डोळ्यांनी पाहात राहू.

 

-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल्ली नगर पालिका जंतरमंतर रोडवर कचऱ्याच्या  गाडीतून कचरा रस्त्यावर ओतून पसरवत आहेत. हा ह्यांचा स्वच्छ भारत. झुरळांचा खाऊ आहे हा हे सरकारला माहीत नाही का ?  


In reply to by आग्या१९९०

आज जंतर मंतरवरील आंदोलन सरकार यांनी मोडून काढले असे दिसत आहे. सकाळपासून ते आत्तापर्यन्त एक हजार पेक्षा अधिक  विद्यार्थ्यांची  धरपकड़ केली आहे, असे वृत्तवाहिन्यांवरील वृत्तावरुन दिसते. आत्ता रांका, दास, दीपके आणि ध्रुव राठी यांनाही विमानातच पोलिसांनी  ताब्यात घेतले, वृत्त आहे.

जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची सारखी गर्दी होत असली तरी... आज पोलिसांनी आंदोलन नियंत्रणात आणले आहे, असे दिसते.

प्रश्न आंदोलनाचा नाही. आंदोलन उद्या परवा पुढेही होत राहील. देशभर होत राहतील, प्रश्न आंदोलन दाबण्याचा नाही, ज्या प्रश्नासाठी आंदोलन आहे निवडणूक आयोग आणि ज्ञानेशकुमार या प्रश्नाचं उत्तर तर द्यावेच लागेल. इंटरनेट बंद करुन विद्यार्थ्यांची धरपकड़ करुन प्रश्न सुटनार नाही.

 

-दिलीप बिरुटे


मला एक कळत नाही.  

ज्ञानेश कुमार यांनी राजिनामा दिला नाही तर सरकारच काय सर्वोच्च न्यायालय सुद्धा काहीही करू शकणार नाही.

केंद्र सरकार त्यांना पदावरून सहजासहजी काढू शकणार नाही. त्यासाठी लोकसभेत त्यांच्या विरुद्ध महाभियोग चालवावा लागेल. त्यासाठी  किमान १०० किंवा  राज्यसभेत ५० खासदारानी तसा ठराव आणायला पाहिजे. तो ठराव स्पीकर यांनी तपासून त्यात तथ्य असेल तर संसदेत स्वीकारला पाहिजे यानंतर एक सर्वोच्च आणि एक उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि एक कायदेतज्ज्ञ यांच्या समितीने त्यांच्या वरील आरोपांची छाननी करायला पाहिजे. जर त्या आरोपांत तथ्य आढळले तर हा चौकशी समितीचा अहवाल संसदेच्या सभागृहात मतदानाला घेतला जाईल आणि दोन्ही सभागृहात बहुमत आणि उपलब्ध मत देणाऱ्या खासदारापैकी २/३ खासदारांनी त्याला पाठिंबा दिला तरच  त्या अहवालावर राष्ट्रपती अध्यादेश काढून प्रमुख निवडणूक आयुक्ताला बडतर्फ करू शकतील.      

ही प्रक्रिया ना करता सगळे विरोधी पक्ष झुरळांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर येत असतील तर हि लोकशाहीची थट्टा आहे असेच म्हणावे लागेल.  

आणि आश्चर्य म्हणजे मिपावरील उच्चशिक्षित आणि सुशिक्षित सुद्धा अशा मागण्यांचे  जोरदार समर्थन करताना दिसतात.

त्यांच्या शिक्षणाचा नक्की उपयोग काय असेच विचारावेसे वाटते.  

 

बरं  ज्ञानेश कुमार यांनी अगदी राजिनामा दिला तरी त्यांच्या जागी आलेल्या दुसऱ्या निवडणूक आयुक्तांनीं त्यांचेच निर्णय पुढे चालू ठेवले तर विरोधक काय करू शकणार आहेत?

जर ते निर्णय घटनाबाह्य असतील तर या निर्णयांना न्यायालय आव्हान देणे एवढेच सरकार किंवा विरोधक करू शकतील.  

निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीच्या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिलेलेच आहे.

मग या आंदोलनाचा नक्की  हेतू काय आहे?

सर्वोच्च न्यायालयाने जाट लोकांना इतर मागासवर्गीयात आरक्षण देता येणार नाही हे निसंदिग्ध शब्दात सांगून केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुद्धा नाकारली आहे. अशा स्थितीत केवळ संख्याबळावर जाट मोर्चा काढून दिल्लीवर चालून आले तर सरकारने काय करायला हवे?  

उद्या मराठा आरक्षणामुळे आमच्या आरक्षणात बाधा येते असे सांगून एखादा इतर मागासवर्गीय नेता हजारों च्या संख्येने मुंबईवर मोर्चा घेऊन चालून आला तर त्या साठी सरकारने काय करायला हवं?

याचं उत्तर येथील उच्च/ अती शिक्षित लोक देतील काय?

आंदोलन शांततापूर्ण होईल म्हणून जे नेते सांगतील त्यांना आंदोलनात झालेल्या नुकसान भरपाईची जबाबदारी  घ्यायची त्यांची तयारी असल्याचे शपथपत्र लिहून घेतले पाहिजे. म्हणजे नंतर हात वर करता येणार नाहीत.  

       

 


In reply to by सुबोध खरे

राजीनामत देता येतो ज्ञानेशला की राजीनामा देण्यासाठीही महाभियोग लागेल?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी मी निवडणूक आयोगात काम करतांना माझ्याकडून  काही चुका झाल्या मी  स्वतः आपल्या पदाचा राजीनामा देत आहे इतकेच लिहून

ते आपला राजीनामा कधीही राष्ट्रपतींकडे लिखित स्वरूपात सुपूर्द करू शकतात.

 

आता महाअभियोग आणायचा 2/3 बहुमतांनी मंजूर करुन त्याला काढून टाकणे शक्य आहे का ?  आणि तेही गोबरयुगात....

 

-दिलीप बिरुटे

 

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनी मी निवडणूक आयोगात काम करतांना माझ्याकडून  काही चुका झाल्या मी  स्वतः आपल्या पदाचा राजीनामा देत आहे इतकेच लिहून

ते आपला राजीनामा कधीही राष्ट्रपतींकडे लिखित स्वरूपात सुपूर्द करू शकतात.

+११११


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तेवढी नैतिकता निवडणूक आयुक्ताकडे असेल ही अपेक्षा खूपच बाबा तुमची. आत्तापर्यंत तरी फक्त कोडगेपणाच दिसला आहे.