Skip to main content
लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 28/09/2026 19:03 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मिपाकर...

एक ऑक्टोबरला अजून एक-दोन दिवस बाकी आहेत. पण, लिहित्या हातांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे, हे आपलं पहिल्यापासूनच धोरण आहे. पाहा संदर्भ जुने धागे. तर, काही मित्रांचं सुरू झालं, सर, चालू घडामोडीचा धागा काढा. तर, आपल्याला मिपाकर मित्रांचे आग्रह मोडता येत नाहीत.

तर मित्रांनो, यावेळी पाऊस कमीच झाला. दुष्काळी तालुक्यांची नावे जाहीर झाली. आपला तालुका राहिला, आपल्यावर अन्याय होतोय म्हणून कार्यकर्ते नेत्यांच्या मागे लागलेत. शेतीसाठी पाण्याची गरज, पिण्याचे पाणी, शेतीचे कर्ज, कर्जमाफी हे नियमितच विषय झाले आहेत. त्यावरही बोलू काही.

श्रीगणेशोत्सव शांतपणे, कमी आवाजात साजरा झालाय. गणपती बाप्पाची आठवण अजून आहेच. आता दुर्गोत्सव पण दिसायला लागला आहे. आमच्याकडे गल्लीत श्रीगणेशाचं स्टेज देवीसाठी तसंच ठेवलं आहे. आता वर्गणीवाले सुरू होतील, दांडिया रंगेल, काही अशा-काही तशा बातम्या येतील. उत्साह महत्त्वाचा. परंपरा, श्रद्धा वगैरे आणि देवीच्या कथा-आख्यायिका, त्यावरही काही बोलूया.

दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या कारभारावर चर्चा सुरू आहे. मतदार वगळणे, अन्याय आणि निवडणूक आयोगाने घेतलेले निर्णय, तसेच पक्षीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. निवडणूक आयोगाची स्वायत्तता, प्रत्यक्ष अंमलबजावणी, निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता, पक्षीय भूमिका आणि शेवटी असलेला मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचला पाहिजे, यावरही चर्चा करू.

कॉकरोच जनता पार्टीचं निवडणूक आयोगाच्या धोरणाविरुद्ध आंदोलन सुरू होणार आहे, अशा बातम्या येत आहेत; पण त्यापूर्वीच आंदोलन पोकळ व्हावे, पूर्वीसारखं काही होऊ नये म्हणून वेगवेगळ्या क्लुप्त्या सुरू झालेल्या आहेत. दोन ऑक्टोबरला मुंबैतील दादरच्या शिवाजी पार्क येथे निवडणूक आयोगाच्या कारभाराविरुद्ध आंदोलन करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने पोलिसांकडे परवानगी मागितल्याची बातमी होती आणि आंदोलन कायदा-संविधानाला अनुसरून शांततापूर्वक राहील, असे कॉकरोच जनता पार्टीने म्हटले आहे. सीजेपीचं प्रेशर ग्रुप म्हणून काम करणे पुढे कसे सुरू राहील, ते भविष्यात कुठे जाईल, त्यावरही बोलू...

तर, काथ्याकूट शांततेच्या मार्गाने, मिपाच्या धोरणानुसार, एकमेकांच्या मतांचा आदर करत सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

स्वागत आहे. शुभेच्छा.


वाचने 128
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

धन्यवाद बिरुटे सर, गेले महिनाभर उपवास घडला, लिहू लिहू म्हणत होतो पण लिहायचे कुठे हा प्रश्न पडला होता, तो तुम्ही ह्या धाग्याच्या रूपाने सोडवलात धन्यवाद.

तर पाऊस कमी असल्याने व विरोध पक्ष जोरात मागणी करू लागल्यामुळे सरकारला शेवटी दुष्काळ जाहीर करावा लागला, पण फक्त कागदोपत्री दुष्काळ नको मदत जाहीर करा असे शेतकरी tv चॅनल्सच्या माईकवर येऊन बोलू लागलेत.

दुसऱ्या बाजूला झुरळ जनता पक्षाने ज्ञानेशकुमार ह्या भारतीय निवडणूक आयोग प्रमुखाच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे, ह्यावर सरकार त्यांना काढू शकत नाही असे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे पण आम्ही सरकारला त्याना हटवा असे सांगितलेले नाही तर ज्ञानेशकुमार ह्यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे असे झुरळ पक्ष म्हणतोय.

दुसऱ्या बाजूने ज्ञानेशकुमार ह्यांच्या बाजूने काही भाजपचे नेते वक्तव्य करत आहेत. काँग्रेस, नेहा बोरा, अभिजीत दिपके व झुरळे, ठाकरे बंधू हे ज्ञानेश कुमारच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसताहेत, काँग्रेसचे आंदोलन सुरू झाले आहे तर नेहा बोरा नी इतर विद्यार्थी संघटनांनी जंतर मंतरवर आंदोलन घोषित केले आहे, अभिजीत दिपके आणी झुरळे ह्यांनी मुंबईत २ ऑक्टोबरला आंदोलनाची हाक दिली आहे.

तर दुसरीकडे निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेद आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत झालेल्या कथित गैरप्रकारांच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या काही वरिष्ठ वकिलांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे. वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी इतर दोन निवडणूक आयुक्त (डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी) यांच्या सहमतीशिवाय एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप केला आहे. हे निर्णय घटनाबाह्य आणि अवैध घोषित करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

विचारवंत श्री. विश्वंभर चौधरी ह्यांनी त्यांच्या चेपू पानावर पुढील पोस्ट केली आहे.

ग्यानेसचे कारनामे

ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात 52,000 मतं कापून टाकली.

ममता 15,000 मतांनी हरल्या.
https://www.facebook.com/share/18PsAu4C5o/

एकंदरीत हा महिना आंदोलनात जाणार असे दिसतेय.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

पाऊस कमी असल्याने व विरोध पक्ष जोरात मागणी करू लागल्यामुळे सरकारला शेवटी दुष्काळ जाहीर करावा लागला, पण फक्त कागदोपत्री दुष्काळ नको मदत जाहीर करा असे शेतकरी tv चॅनल्सच्या माईकवर येऊन बोलू लागलेत.

 

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्ध्या, माढा तालुक्यातील तुळशी गाव मिडियावर गाजते आहे.  गावातल्या लोकांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे त्या गावातील नागरिकांनी  गाव विकणे आहेचा ठराव घेतला आहे. कोणी  तरी अडाणी ;) आपलं गाव विकत घेईल आणि आपल्या गावाची दुर्दशा थांबेल असे गावक-यांना वाटत असावे.  

दुष्काळात कर्जमाफी आणि अतिवृष्टीत नुकसानभरपाई ही तात्पुरती मदत यापुढे या देशातील शेतकरी जाणार की नाही ? कायमस्वरुपी यावर काही तोडगा निघणार नाही, यात काही शंका नाही. कारण राजकारण कसे करता येईल त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना असा दुष्काळ आणि अतिवृष्टीत नुकसानभरपाई हा मतांचाच विषय वाटत असल्यामुळे त्यावर कायम स्वरुपी उपायांपेक्षा तात्पूरती मदत देऊन आपली वोट बॅंक जपणे यावरच ते काम सुरु असते.

 ''कोणतीही आपत्ती आली की कर्जमाफी” यापेक्षा शेतीचा धोका कायमचा कमी कसा करता येईल त्यावर उपाययोजना प्रत्येकवर्षी  आखल्या पाहिजेत असे वाटते.
 

गेले महिनाभर उपवास घडला, लिहू लिहू म्हणत होतो

खरंय,  काय ते दररोजच्या बातम्यांचा त्रास करुन घ्यायचा. सरकारच्या धोरणाचा ताण घ्यायचा, आपल्या लिहिण्या बोलण्याने काही बदल होतील का ? सार्वजनिक प्रश्नांच्या बाबतीत आपण भावनिक गुंतवणूक करुन त्रास करुन घ्यायचा कशाला ?  असे वाटतेच.  पण, आपण सगळंच बदलू शकत नाही; पण काहीच बदलू शकत नाही, असंही नाही. आपलं लिहिणं, बोलणं, प्रश्न विचारणं यांची किंमत कदाचित लगेच दिसत नाही. पण लोकशाहीत सार्वजनिक मत तयार होण्याची प्रक्रिया अशाच अनेक छोट्या आवाजातून घडते, हे आपण  सीजेपी आंदोलनात पाहिलं आहे, तेव्हा थांबायचं नाही. लिहायचं आणि जमेल तसं बोलायचं. 


-दिलीप बिरुटे


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणी  तरी अडाणी ;) आपलं गाव विकत घेईल>>>
एका बाजूला सुभाष चंद्राचे २२ हजार करोडचे कर्ज माफ होते नी दुसऱ्या बाजूला बळीराजाला मदत करायला जमत नाही, काय करतील गाववाले तरी? अर्थात गोबरयुग म्हटले की ह्या गोष्टी ओघाने आल्याच!

लिहायचं आणि जमेल तसं बोलायचं. >>
+१


सर्वोच्च न्यायालयाचे वकील बृजेश सिंह यांनी अटर्नी जनरल यांच्याकडे ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना कारवाई सुरू करण्यासाठी अधिकृत परवानगी मागितली आहे. बहु-सदस्यीय निवडणूक आयोग केवळ एका व्यक्तीच्या मनमानी कारभाराने चालवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

https://www.thehindu.com/news/national/advocate-seeks-to-file-contempt-…

प्रशांत भूषण, महमूद प्राचा आणि बलराज मलिक यांसारख्या सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांनी जाहीरपणे वक्तव्ये करत ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची हकालपट्टी करण्याची आणि त्यांना तुरुंगात पाठवण्याची (Behind the bars) मागणी केली आहे.
https://www.instagram.com/reel/Ddol0KcBzZm/?stkn=MXZ4ajgxMGdsMHE0Yw==


राहुल गांधी आणि विरोधी पक्षांच्या आरोपांना चोख उत्तर देण्यासाठी भाजपने एकाच वेळी पक्षाच्या १२ हून अधिक मुख्यमंत्र्यांना वेगवेगळ्या राज्यांच्या राजधान्यांमध्ये पत्रकार परिषदा घेण्यासाठी मैदानात उतरवले.

या सर्व मुख्यमंत्र्यांनी एकमुखाने सांगितले की, निवडणूक आयोगाने घेतलेले सर्व निर्णय (ज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीचा म्हणजेच SIR चा समावेश आहे) हे पूर्णपणे एकसमान आणि सर्व सदस्यांच्या संमतीने (Unanimous Decisions) घेण्यात आले आहेत.
https://www.ndtv.com/india-news/bjp-deploys-a-dozen-chief-ministers-vs-rahul-gandhi-on-gyanesh-kumar-row-lies-exposed-12105917