Skip to main content
लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 26/09/2026 13:45 या दिवशी प्रकाशित केले.

कावळा म्हणे मी काळा, पांढराशुभ्र तो बगळा

कावळा म्हणे मी काळा, हळद्या तो पिवळा

कावळा म्हणे मी काळा, सूर्यपक्षी तो जांभळा

कावळा म्हणे मी काळा, मयूर तो निळासावळा

कावळा म्हणे मी काळा, पोपट तो गर्द हिरवा

चिमणी हसून म्हणे चुकले रे यमक बाळा, किती रे तू बावळा

लेखनविषय:

वाचने 56
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

हा हा 😄

 

(कावळ्यांची प्रौढी-१)

कावळा म्हणे मी शायनी ब्लॅक, बगळ्याची करेन सिस्टीम हॅक 

कावळा म्हणे मी शायनी ब्लॅक, हळद्या नुसताच यलो पॅक 

कावळा म्हणे मी शायनी ब्लॅक, सूर्यपक्ष्याची जांभळी बॅक

कावळा म्हणे मी शायनी ब्लॅक, मयूराला नाचाची सुंदर नॅक

कावळा म्हणे मी शायनी ब्लॅक, पोपट तो गर्द हिरवा

चिमणी हसून म्हणे केलास ना क्राईम, पोपटाच्या नादाने गेला ऱ्हाइम 😉