Skip to main content
लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 25/09/2026 22:04 या दिवशी प्रकाशित केले.

 

घरात बसून तो स्वमग्न होता,
सुचलेल्या कोट्यांचा हिशोब लावित होता.

 

 

मिन्नते बहू केली, परी तो न घराबाहेर आला,
"पिळावयास तुम्हां येईन फिरून" - एवढेच वदला.

 

 

कोट्या ऐकताना कावळे, दिल्लीश्वरही हसले जेव्हा,
निमूट गवाक्षे लावून, एकटेच कोट्या करीत बसले तेव्हा. 

लेखनविषय:

वाचने 243
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

रचना आवडली, पण बातम्यादि बघणे बंद केल्यामुळे संदर्भ लागला नाही. हे म्हणजे माझ्या बाबतीत एकादे 'न कळणारे' अमूर्त चित्र बघण्यासारखे झाले, पण 'जाणून घेण्या' ची इच्छा पण सध्या/आता क्षीण झालेली आहे. 


In reply to by चित्रगुप्त

कोट्या करणारा घरात बसून राहणारा कोंबडा - हा संदर्भ.


In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्रातील एक सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीस असे बोलणे योग्य नाही, झाला थोडा उशीर दुष्काळ जाहीर करायला म्हणून काय झाले?


In reply to by अमरेंद्र बाहुबली

पिळावयास तुम्हां येईन फिरून >>>
मी पुन्हा येईन हा संदर्भ का?