Skip to main content

कवीतेला वय असते

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 19/09/2026 12:54 या दिवशी प्रकाशित केले.

तारुण्यातला उसळणारा,
भावावेग मागे रहातो,
उथळ,गढूळ पाण्याचा डोह,
नितळ,शांत,स्वच्छ  बनतो

​यौवनात जे सौंदर्य होते,
वार्धक्यात तेच तत्त्व बनते,
पिकल्या पाना  सोबत,
कविताही म्हातारी होते!

उगाच नसतो शब्दांचा थाट,
नसतो अलंकाराचा घाट,
दोन ओळींच्या मौनामधून,
वहातो प्रगल्भतेचा पाट .

कवितेलाही वय असते, 
कवीसोबत तीही वाढते,
शब्दांच्या या गोंदणाला, 
अनुभवाचे कोंदण मिळते.

कर्ता अमर, सृजन नश्वर 
इथे मात्र उलटी गंगा वहाते
सृजन कर्त्याला अमर करते
कवीतेला ही वय असते.......

 

-कसरत,१९-९-२०२६

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 11
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कवितेला असतो अनुभव

फेसाळणाऱ्या तारुण्याचा,
कोमल स्पर्श मातृत्वाचा,
उत्तुंग साकारलेल्या कर्तृत्वाचा,
आनंदकण स्व-जाणिवेचा…!

 

 


 परमपिता परमेश्वर  अमर आणी त्याचे सृजन नश्वर असते. हा दस्तूर...

 

इथे कवी सृजन कर्ता व कविता त्याचे सृजन. कवी नश्वर पण त्याचे सृजन ,कवीता अमर असते आणी आपल्या बरोबरच कवीलाही अमरत्व देते. अशी कल्पना केली आहे.