आज आपटे रस्त्यावरील आनंदधाम या संस्थेत बाबांसाठी चौकशीला गेलो होतो. चौकशी च्या टेबलावर बसून तिथल्या व्यवस्थापकांशी चर्चा करत होतो. तितक्यात एक केयरटेकर एका शंभरीच्या आसपास वय असेलेल्या आजींना धरून तिथे आल्या. व्यवस्थापक बाईंनी त्या आजींच्या हातात औषधाची एक प्लास्टिक मध्ये गुंडाळलेली पुडी दिली.
आजी माझ्याकडे बघून म्हणाल्या " डॉक्टर, मला तुमच्या हातातून औषधे द्या. तुमचा हात औषधांना लागला की मला अजून लवकर बरे वाटेल." मी क्षणभर गोंधळलो, पण काय ते लक्षात येऊन लगेच ती औषधांची पुडी माझ्या हातात घेतली आणि त्या आजींच्या हातात ठेवली. ...
आजींच्या डोळ्यात पाणी आले, म्हणाल्या आज तुमच्यामुळे मी शंभरी पाहू शकले हो डॉक्टर , मला आता खूप बरे वाटत आहे तुमच्या उपचारांनी...."
रुग्णावर उपचार करताना डॉक्टर ने भावनिक व्हायचे नसते हे मला माहित होते, माझ्या डोळ्यातले येणारे अश्रू मी आतच रोखले. आजींना म्हणालो "नीट वेळच्या वेळी घेत जा औषधे बरं ... " आजीनी मला नमस्कार केला आणि त्याना त्यांची केयर टेकर आत घेऊन गेली... मी त्या व्यवस्थापक बाईंचा निरोप घेऊन निघालो... कारण तिथे अधिक थांबणं मला शक्य नव्हते.
माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधी डॉक्टर होईन असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते ....
पण त्या आजींमुळे आज दोन मिनिटांचा खोटा का होईना, पण डॉक्टर झालो... तोही यशस्वी....
रस्त्यावरून माझी शाईन बाहेर काढली ... आणि घरी आलो ...
पण स्पष्ट दिसत नव्हते ...
कारण अश्रुंनी भरलेल्या नयनांना स्पष्ट दिसतच नाही.....
कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२
| लेखनविषय: |
|---|
वाचने
292
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही
समायोचित प्रसंगावधान ठेवून जी भूमिका वठवलीत ती अतिशय सुंदर आहे पोंक्षे साहेब. ह्या एका कामासाठी परमेश्वर आपणास उदंड पुण्य देता झाला आहे नक्कीच. एका पिकल्या पानाला किती समाधान झाले असेल ह्यातून सांगवत नाही.
(भावुक) खोंडे
देवा माझी मलाच ओळख पटेल
एव्हढेच आयुष्य दे...
छान भावनिक, आवडले.
छान भावनिक, आवडले.
आपण निमीत्तमात्र असतो…
आपण निमीत्तमात्र असतो. कोणीतरी करवून घेतो. तुमच्यामुळे त्या आजींना चांगले वाटले.
पण
यावरुन बोध घेऊन तुमच्या बाबांना तिथे न ठेवण्याचा निर्णय घेणे अधिक कौतुकास्पद ठरेल. मला माहिती आहे, तुमचीही काही चैलेंजेस असतील..पण तरीही, पहा. विचार करा.