गंमत म्हणून काही प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची जन्मरास देत आहे. त्यांचे कर्तृत्व, स्वभाव यांचा व चंद्र राशीचा काही संबंध आहे का याचे स्वतःच विश्लेषण करून संबंध जोडता येईल.
कदाचित काही मिपाकरांची जन्मरास त्यांच्या प्रतिसादांवरून ओळखता येईल.
___________________
मेष - शरद पवार, रोनाल्ड रीगन, बिल क्लिंटन, पु. ल. देशपांडे, आशा भोसले, अमित शाह
वृषभ - अनिल कुंबळे, सेहवाग, गांगुली
कर्क - मनमोहनसिंग, लता मंगेशकर
कन्या - महेंद्रसिगं धोनी, नरेंद्र दाभोळकर
वृश्चिक - नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप
धनू - सचिन तेंडुलकर, राहुल गांधी, इंदिरा गांधी
मकर - संजय राऊत
कुंभ - देवेंद्र फडणवीस
मीन - राहुल द्रविड
________________________
वरील सर्वांची, ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार सूर्य रास खालीलप्रमाणे आहे.
मेष - सचिन तेंडुलकर
वृषभ - डोनाल्ड ट्रंप
मिथुन - सौरभ गांगुली, महेद्रसिंग धोनी, राहुल गांधी
कर्क - देवेंद्र फडणवीस
सिंह - बिल क्लिंटन, आशा भोसले
कन्या - लता मंगेशकर, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी
तूळ - नरेंद्र दाभोळकर, पु. ल. देशपांडे, सेहवाग, कुंबळे, अमित शाह
वश्चिक - शरद पवार, इंदिरा गांधी, संजय राऊत
धनू - राहुल द्रविड
मकर - रोनाल्ड रीगन
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईंग्रजी कॅलेंडर प्रमाणे अशी माहीती मिळेल काय?
ईंग्रजी कॅलेंडर प्रमाणे अशी माहीती मिळेल काय?
लेख संपादित करून मूळ लेखात…
In reply to ईंग्रजी कॅलेंडर प्रमाणे अशी माहीती मिळेल काय? by सौन्दर्य
लेख संपादित करून मूळ लेखात उल्लेखलेल्या सर्वांची सूर्य रास दिली आहे.
नवनाथ बन ह्यांची रास कोणती…
नवनाथ बन ह्यांची रास कोणती आहे?
वृश्चिक - नरेंद्र मोदी,…
वृश्चिक - नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप >>>
अरेच्छा! म्हणूनच ट्रम्पतात्या त्यांच्या विरोधकांना विषारी डंख मारत असतात तर! बादवे तात्यांची ही शेवटची टर्म आहे, मार म्हणा किती डंख मारायचे ते.
माझी रास?
तीच ती इतरांच्या राशीला लागणारी 😈
माझी सूर्य रास आणि चंद्र रास…
माझी सूर्य रास आणि चंद्र रास एकच आहे.
वृषभ.:
म्हणजे तुमचा जन्म १५ मे-…
In reply to माझी सूर्य रास आणि चंद्र रास… by विजुभाऊ
म्हणजे तुमचा जन्म १५ मे- १५जून मधील आहे. या कालावधीत येणाऱ्या अमावस्येच्या आसपास आहे
२४ एप्रिल
In reply to म्हणजे तुमचा जन्म १५ मे-… by प्रकाश घाटपांडे
२४ एप्रिल
मग तुमची सूर्य रास ही मेष आहे
In reply to २४ एप्रिल by विजुभाऊ
24 एप्रिल ही जन्मतारीख असेल तर सूर्य रास ही मेष असली पाहिजे ,वृषभ नाही. काहि तरी गडबड आहे
बरोबर आहे. एका गोष्टीचे नवल…
In reply to मग तुमची सूर्य रास ही मेष आहे by प्रकाश घाटपांडे
बरोबर आहे.
एका गोष्टीचे नवल वाटते. ज्योतिष प्रकाराचे कट्टर विरोधक असलेल्या कै. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंनिसशी तुम्ही संबंधित होता. तथापि तुम्हाला चंद्र रास, सूर्य रास इ. ची माहिती आहे. कदाचित ज्योतिष, पत्रिका यांची प्राथमिक माहिती सुद्धा असेल.
इथे पहा
In reply to बरोबर आहे. एका गोष्टीचे नवल… by श्रीगुरुजी
http://mr.upakram.org/node/1065
पान असुरक्षित असल्याचा संदेश…
In reply to इथे पहा by प्रकाश घाटपांडे
पान असुरक्षित असल्याचा संदेश क्रोम देतोय.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी …
In reply to पान असुरक्षित असल्याचा संदेश… by श्रीगुरुजी
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकाची लेखमाला 2008 मधे उपक्रम या संकेतस्थळावर चालू केली होती तिथे यावर चर्चा झाली होती.म्हणून ती लिंक दिली. ingonre securtty message and go ahed
चंद्र रास
तुमची रास कोणती याचा भारतीय परिप्रेक्षात अर्थ तुमची चंद्र रास कोणती असाच असतो.
माझी चंद्ररास नी सुर्यरास…
माझी चंद्ररास नी सुर्यरास कोणती? प्र वरून नाव आहे.
प्र पत्रिकेतील असेल तर कन्या…
In reply to माझी चंद्ररास नी सुर्यरास… by अमरेंद्र बाहुबली
प्र पत्रिकेतील असेल तर कन्या, पण जन्मवेळेनुसार नसेल तर त्याला अर्थ नाही.
आताच आईला विचारले घ वरून नाव…
In reply to प्र पत्रिकेतील असेल तर कन्या… by श्वेता व्यास
आताच आईला विचारले घ वरून नाव होते पत्रिकेत असे तिने सांगितले.
मिथुनच आहात मग तुम्ही…
In reply to आताच आईला विचारले घ वरून नाव… by अमरेंद्र बाहुबली
मिथुनच आहात मग तुम्ही चंद्ररास. सूर्यरास जन्मतारखेनुसार नेटवर सहज मिळेल.
पु. ल. देशपांडे मेष वाटत…
पु. ल. देशपांडे मेष वाटत नाहीत, कदाचित लग्न राशीचा जास्त प्रभाव असेल.
मलाही तसेच वाटते. सायंकाळी ६…
In reply to पु. ल. देशपांडे मेष वाटत… by श्वेता व्यास
मलाही तसेच वाटते. सायंकाळी ६:१५ नंतर जन्म असेल तर वृषभ चंद्ररास येते व लग्नरास मेष, वृषभ किंवा मिथुन येईल.
चर्चेत मला काही गम्य नाही पण…
चर्चेत मला काही गम्य नाही पण वाचत आहे.
यातील काही व्यक्तींच्या…
यातील काही व्यक्तींच्या जन्मरास व सूर्यरास ही जोडी रोचक आहे.
साधारणपणे कर्क, कन्या, तूळ, मीन या राशी सौम्य समजल्या जातात. मनमोहनसिंग व लता मंगेशकर या दोघांचीही जन्मरास कर्क व सूर्यरास कन्या. हे दोघेही सौम्य स्वभावाचे, वादविवादात न पडणारे, आक्रमकतेचा अभाव, आपल्या क्षेत्रात उच्च पातळीवर गेलेले आहेत. त्यांची वेशभूषा सुद्धा ठराविक असायची (लता मंगेशकर श्वेत साडी व मनमोहन सिंग आकाशी पगडी).
संजय राऊत हे एकदम भीतिदायक व्यक्तिमत्व. जन्मरास मकर (दीर्घोद्योगी, कष्टाळू व सातत्यता) आणि सूर्यरास वृश्चिक (आक्रमक, सूडबुद्धी, नांगी मारणे, निर्भय) ही दोन्ही राशींची वैशिष्ट्ये दिसतात.
साधारणपणे गुरू राशीस्वामी असलेले (धनू व मीन रास) उत्तम अनुयायी, सभ्य व संघ खेळाडू असतात, परंतु नेतृत्व कौशल्य तितकेसे नसते. राहुल द्रविड (जन्मरास मीन व सूर्यरास धनू) हा उत्तम संघभावना असलेला, वादांपासून दूर राहणारा उत्कृष्ट फलंदाज, परंतु कर्णधार म्हणून तो फारसा यशस्वी नव्हता. धनू जन्मरास असलेला सचिन सुद्धा उत्कृष्ट खेळाडू असूनही कर्णधार म्हणून तितकासा यशस्वी नव्हता.
डोनाल्ड ट्रंप (वृश्चिक जन्मरास व वृषभ सूर्यरास) हे राशींना अनुसरून सूडबुद्धी, परिणामांची पर्वा न करता थेट कृती करणारे आहेत. वृषभ रास परिणामांची पर्वा न करता थेट कृती करणारी असते. सेहवाग आणि गांगुली हे वृषभ जन्मरास असलेले धडाकेबाज फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते.
शरद पवार (मेष जन्मरास व वृश्चिक सूर्यरास) यांच्यासाठी या दोन्ही राशी मंगळाच्या आहेत. सूडबुद्धी, नेतृत्वगुण हे प्रकर्षाने दिसतात.
सर्व जण आपापल्या राशीला शोभत…
In reply to यातील काही व्यक्तींच्या… by श्रीगुरुजी
सर्व जण आपापल्या राशीला शोभत आहेत, शरद पवार जरा जास्तच.
विरुद्ध स्वभावी जोडी असेल तर?
In reply to यातील काही व्यक्तींच्या… by श्रीगुरुजी
जन्मरास व सूर्यरास ही जोडी जर विरुद्ध स्वभावी असेल तर?
म्हणजे समजा, वृश्चिक जन्मरास आणि तूळ सूर्यरास!
दुभङ व्यक्तिमत्व असेल असे समजायचे का यातली एखादी रास जास्त प्रभावी असते असे काही असते?
साधारणपणे शेजारच्या राशी…
In reply to विरुद्ध स्वभावी जोडी असेल तर? by अनामिक सदस्य
साधारणपणे शेजारच्या राशी स्नेही असतात व १५० ते २१० अंशात विरूद्ध असलेल्या राशींचे एकमेकांशी पटत नाही.
उदाहरणार्थ मीन व सिंह-कन्या-तूळ, कुंभ व कर्क-सिंह-कन्या यांचे आपापसात कमी जमते. मीन बुधाची सर्वाधिक नावडती रास आणि कन्येचा राशीस्वामी बुध व कन्या आणि बुध एकमेकांपासून १८० अन्नावर. शनी तूळ राशीत उच्चीचा व मेष राशीत नीचेचा व या दोन राशी एकमेकांपासून १८० अंतरावर.
षडाष्टक ? मिथुन, कन्या, धनु…
In reply to साधारणपणे शेजारच्या राशी… by श्रीगुरुजी
षडाष्टक ? मिथुन, कन्या, धनु आणि मीन मुळातच द्विस्वभाव राशी, थोडंसं व्यक्तिमत्त्व दुभंगच म्हणता येईल ना 😀
विरूद्ध स्वभाव असतो. कन्या…
In reply to षडाष्टक ? मिथुन, कन्या, धनु… by श्वेता व्यास
विरूद्ध स्वभाव असतो. कन्या नास्तिक तर मीन श्रद्धाळू. मग कसं जमणार? मिथुन एकदम धारदार टोमणे मारणारी तर धनू काहिशी शांत. कसं जमणार? कर्क काहिशी भोळसट गलिबल, तर वृश्चिक सूडबुद्धी. नाही जमत त्यांचं.
षडाष्टक माझ्या लग्नाआधी…
In reply to षडाष्टक ? मिथुन, कन्या, धनु… by श्वेता व्यास
षडाष्टक
माझ्या लग्नाआधी स्थळे बघताना मृत्यूषडाष्टक आहे असे काहीतरी म्हणून आमच्या पालकांनी एक स्थळ नाकारले होते.
आपल्या राशीपासून सहावी रास…
In reply to षडाष्टक माझ्या लग्नाआधी… by कांदा लिंबू
आपल्या राशीपासून सहावी रास प्रीति षडाष्टक आणि आठवी रास मृत्यू षडाष्टक असते असे मानतात.
मृत्यू षडाष्टक म्हणजे इतका वेगळा स्वभाव की पटतच नाही. गम्मत म्हणजे एकाची जी रास प्रीति षडाष्टक असते तीच दुसऱ्यासाठी मृत्यूषडाष्टक असते. मेषेची कन्या प्रीति तर वृश्चिक मृत्यू षडाष्टक. तेच कन्येची मेष मृत्यूषडाष्टक. नावे घाबरवणारी असली तरी एकमेकांशी न पटण्याजोगे टोकाचे वेगळे स्वभाव यापेक्षा जास्त काही नसते.
जन्मरास व सूर्यरास ही जोडी…
In reply to विरुद्ध स्वभावी जोडी असेल तर? by अनामिक सदस्य
जन्मरास व सूर्यरास ही जोडी विरूद्ध स्वभावाची असली तरी चालते. सर्वाधिक परिणाम जन्मराशीचा असतो. लग्नरास व सूर्य राशीचा परिणाम कमी असतो.
लग्नरास,जन्मरास,चंद्ररास …
लग्नरास,जन्मरास,चंद्ररास ,सूर्यरास वगैरे कोणी उलगडुन सांगेल काय? ह्यातील कुठली रास जास्त प्रभाव टाकणारी असते वगैरे.
रास आणि ग्रहाचे स्थान दोन्ही प्रभाव टाकतात.
In reply to लग्नरास,जन्मरास,चंद्ररास … by कानडाऊ योगेशु
चंद्र राशीवरून मनुष्याचा स्वभाव ढोबळ कळतो. सूर्याचा ( रविचा) राशीपेक्षाही स्थानाचा फार प्रभाव असतो. आणखी तो कोणत्या राशीचा आहे त्यावर तीव्र किंवा सौम्यपणा येतो. रवि हा प्रमूख ग्रह आणि पापग्रह, ताप देणारा आहे. जिथे असेल ( ज्या स्थानात) त्या स्थानाचे मुख्य फल (प्रभाव) जाळून टाकतो. कुटुंबातील आणि समाजातील मान ठरवणारा ग्रह रवि आहे. तर मित्र, नातेवाईक, शेजारी, लोकांशी संबंध राखणारा चंद्र आहे.
रवि कितीही प्रभावी असला तरी राजा करू शकत नाही. नोकरीतील हुद्दा - रवि. सरकारी उच्च नोकरीत रवि.( आयुष्यात प्रभावी काळ २८ ते ५५) पदावर राहाणे, भुषवणे इत्यादी. हुकमात, दमात काम करवून घेणे.
लोकमान्यता, लोकप्रियता -चंद्र. (आयुष्यात प्रभावी काळ बालपण ते म्हातारपण.) अल्पकाळ बाल राजा चंद्र करू शकतो.
हे अगदी थोडक्यात.
नाना, तुम्ही थोडं ए आय…
In reply to लग्नरास,जन्मरास,चंद्ररास … by कानडाऊ योगेशु
नाना, तुम्ही थोडं ए आय वापरायला शिका.. :)
सैम मामांनी दिलेले उत्तर :
थोडक्यात सांगायचं तर लग्नरास, जन्मरास/चंद्ररास आणि सूर्यरास या तिन्हींचा ज्योतिषशास्त्रात वेगवेगळा अर्थ मानला जातो. “सगळ्यात प्रभावी कोणती?” याचे उत्तर मात्र तुम्ही कोणत्या बाबतीत विचारत आहात यावर अवलंबून असते.
लग्नरास (Ascendant/Lagna): जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर असलेली रास. व्यक्तिमत्त्व, शरीरयष्टी, वागण्याची पद्धत, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जीवनातील घटनांचा आराखडा यासाठी वैदिक ज्योतिषात तिला विशेष महत्त्व दिले जाते.
जन्मरास / चंद्ररास: जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती. मन, भावना, मानसिकता, सवयी, संवेदनशीलता यांच्याशी तिचा संबंध मानला जातो. दशा-गोचर पाहताना चंद्रराशीला विशेष महत्त्व दिले जाते.
सूर्यरास: जन्माच्या वेळी सूर्य ज्या राशीत असतो ती. आत्मविश्वास, स्वत्व, अधिकार, नेतृत्व, व्यक्तिमत्त्वाचा मूलभूत केंद्रबिंदू यांच्याशी तिचा संबंध मानला जातो. पाश्चात्त्य ज्योतिषात “तुमची रास कोणती?” असे विचारल्यावर बहुतेकदा हीच अभिप्रेत असते.
नक्षत्र: चंद्र ज्या नक्षत्रात असतो तेही वैदिक ज्योतिषात महत्त्वाचे मानले जाते; विशेषतः जन्मनक्षत्र आणि त्यावर आधारित दशा-विचारात.
मग सर्वांत प्रभावी कोणती?
वैदिक ज्योतिषाच्या चौकटीत साधारणपणे असे म्हणता येईल:
जीवनाचा एकूण आराखडा → लग्नरास
मन/भावनिक जग → चंद्ररास
स्वत्व/आत्मप्रेरणा/अधिकार → सूर्यरास
त्यामुळे एकच रास “सर्वांत प्रभावी” आहे असे सरसकट म्हणणे योग्य नाही. कुंडलीतील लग्न, लग्नेश, चंद्र, सूर्य, त्यांची स्थिती, ग्रहांची दृष्टी, नक्षत्र आणि दशा-गोचर हे सगळे एकत्र पाहिले जातात.
आणि एक महत्त्वाची गोष्ट: ज्योतिष हे श्रद्धा/परंपरेवर आधारित आहे; त्यातील दावे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत.
यावर पुर्वी ज्योतिषाचा धंदा…
In reply to लग्नरास,जन्मरास,चंद्ररास … by कानडाऊ योगेशु
यावर पुर्वी ज्योतिषाचा धंदा करणारे आणि नंतर त्यावर आगपाखड करणारे गृहस्थ कदाचित माहिती देतील. ती पारखून घेणे.
लग्नरास --> कुंडलीचा एक…
In reply to लग्नरास,जन्मरास,चंद्ररास … by कानडाऊ योगेशु
लग्नरास --> कुंडलीचा एक तक्ता असतो. त्यामध्ये बारा घरे असतात. पहिल्या घरामध्ये जो क्रमांक दिला आहे ती आपली लग्नराशी, त्यावरून जातकाची वृत्ती ठरते. आपला जन्म झाला तेव्हा पूर्वेला असणारी रास ही असते.
चंद्ररास --> आपल्या जन्मकुंडली मध्ये ज्या रकान्यात चंद्र लिहिले आहे तिथे असणारी रास ही आपली चंद्ररास असते. आपला स्वभाव मुख्यत्वे यावरून ठरतो. भारतीय ज्योतिष पद्धतीने कोणी माझी रास अमुक सांगतात तेव्हा ती ही चंद्ररास असते, हीच जन्मरास असते. लग्न आणि चंद्र दोन्ही काढण्यासाठी अचूक जन्मवेळ आणि जन्मस्थान लागतात.
सूर्यरास --> एकतर सूर्य ज्या राशीत असेल ती किंवा पाश्चात्य खालीलप्रमाणे
माझी रास मेष, अंगावर आले की…
माझी रास मेष, अंगावर आले की शिंगावर घेणारच. त्याला तोड नाही.
रास, ज्योतिष, मुहूर्त सगळं…
रास, ज्योतिष, मुहूर्त सगळं काही थोतांड आहे! इथे तुम्हाला परकीय आक्रमणे होणार आहेत हे देखील ग्रह तारे पाहून कळले नाही.
खरंय
In reply to रास, ज्योतिष, मुहूर्त सगळं… by अमरेंद्र बाहुबली
टोमॅटो फळ आहे हे ज्ञान पण ते फ्रुट सॅलड मधे घालू नये हे कॉमन सेन्स.
😂😂😂😂