Skip to main content

तुही रास कंची?

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 25/08/2026 22:42 या दिवशी प्रकाशित केले.

गंमत म्हणून काही प्रसिद्ध व्यक्ती व त्यांची जन्मरास देत आहे. त्यांचे कर्तृत्व, स्वभाव यांचा व चंद्र राशीचा काही संबंध आहे का याचे स्वतःच विश्लेषण करून संबंध जोडता येईल. 

 

कदाचित काही मिपाकरांची जन्मरास त्यांच्या प्रतिसादांवरून ओळखता येईल. 

 

___________________

 

मेष - शरद पवार, रोनाल्ड रीगन, बिल क्लिंटन, पु. ल. देशपांडे, आशा भोसले, अमित शाह 

 

वृषभ - अनिल कुंबळे, सेहवाग, गांगुली 

 

कर्क - मनमोहनसिंग, लता मंगेशकर 

 

कन्या - महेंद्रसिगं धोनी, नरेंद्र दाभोळकर 

 

वृश्चिक - नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप 

 

धनू - सचिन तेंडुलकर, राहुल गांधी, इंदिरा गांधी 

 

मकर - संजय राऊत 

 

कुंभ - देवेंद्र फडणवीस 

 

मीन - राहुल द्रविड 

 

________________________

 

वरील सर्वांची, ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार सूर्य रास खालीलप्रमाणे आहे.

मेष - सचिन तेंडुलकर

वृषभ - डोनाल्ड ट्रंप 

मिथुन - सौरभ गांगुली, महेद्रसिंग धोनी, राहुल गांधी 

कर्क - देवेंद्र फडणवीस 

सिंह - बिल क्लिंटन, आशा भोसले 

कन्या - लता मंगेशकर, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी 

तूळ - नरेंद्र दाभोळकर, पु. ल. देशपांडे, सेहवाग, कुंबळे, अमित शाह 

वश्चिक -  शरद पवार, इंदिरा गांधी, संजय राऊत 

धनू - राहुल द्रविड 

मकर - रोनाल्ड रीगन

 

 


वाचने 1132
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

In reply to by सौन्दर्य

लेख संपादित करून मूळ लेखात उल्लेखलेल्या सर्वांची सूर्य रास दिली आहे.


वृश्चिक - नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रंप  >>>
 अरेच्छा! म्हणूनच ट्रम्पतात्या त्यांच्या विरोधकांना विषारी डंख मारत असतात तर! बादवे तात्यांची ही शेवटची टर्म आहे, मार म्हणा किती डंख मारायचे ते. 


In reply to by विजुभाऊ

 म्हणजे तुमचा जन्म १५ मे- १५जून मधील आहे. या  कालावधीत येणाऱ्या अमावस्येच्या आसपास आहे


In reply to by विजुभाऊ

24  एप्रिल ही जन्मतारीख असेल तर सूर्य रास ही मेष असली पाहिजे ,वृषभ नाही. काहि तरी गडबड आहे


In reply to by प्रकाश घाटपांडे

बरोबर आहे.

 

एका गोष्टीचे नवल वाटते. ज्योतिष प्रकाराचे कट्टर विरोधक असलेल्या कै. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंनिसशी तुम्ही संबंधित होता. तथापि तुम्हाला चंद्र रास, सूर्य रास इ. ची माहिती आहे. कदाचित ज्योतिष, पत्रिका यांची प्राथमिक माहिती सुद्धा असेल. 


In reply to by श्रीगुरुजी

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद  या माझ्या पुस्तकाची लेखमाला  2008 मधे उपक्रम या संकेतस्थळावर चालू केली होती तिथे यावर चर्चा झाली होती.म्हणून ती लिंक दिली. ingonre securtty message and go ahed


 तुमची रास कोणती याचा भारतीय परिप्रेक्षात अर्थ  तुमची चंद्र रास कोणती असाच असतो.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्र पत्रिकेतील असेल तर कन्या, पण जन्मवेळेनुसार नसेल तर त्याला अर्थ नाही. 


In reply to by श्वेता व्यास

आताच आईला विचारले घ वरून नाव होते पत्रिकेत असे तिने सांगितले.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

मिथुनच आहात मग तुम्ही चंद्ररास. सूर्यरास जन्मतारखेनुसार नेटवर सहज मिळेल.


In reply to by श्वेता व्यास

मलाही तसेच वाटते. सायंकाळी ६:१५ नंतर जन्म असेल तर वृषभ चंद्ररास येते व लग्नरास मेष,  वृषभ किंवा मिथुन  येईल. 


यातील काही व्यक्तींच्या जन्मरास व सूर्यरास ही जोडी रोचक आहे.

 

साधारणपणे कर्क, कन्या, तूळ, मीन या राशी सौम्य समजल्या जातात. मनमोहनसिंग व लता मंगेशकर या दोघांचीही जन्मरास कर्क व सूर्यरास कन्या. हे दोघेही सौम्य स्वभावाचे, वादविवादात न पडणारे, आक्रमकतेचा अभाव, आपल्या क्षेत्रात उच्च पातळीवर गेलेले आहेत. त्यांची वेशभूषा सुद्धा ठराविक असायची (लता मंगेशकर श्वेत साडी व मनमोहन सिंग आकाशी पगडी). 

 

संजय राऊत हे एकदम भीतिदायक व्यक्तिमत्व. जन्मरास मकर (दीर्घोद्योगी, कष्टाळू व सातत्यता) आणि सूर्यरास वृश्चिक (आक्रमक, सूडबुद्धी, नांगी मारणे, निर्भय) ही दोन्ही राशींची वैशिष्ट्ये दिसतात.

 

साधारणपणे गुरू राशीस्वामी असलेले (धनू व मीन रास) उत्तम अनुयायी, सभ्य व संघ खेळाडू असतात, परंतु नेतृत्व कौशल्य तितकेसे नसते. राहुल द्रविड (जन्मरास मीन व सूर्यरास धनू) हा उत्तम संघभावना असलेला, वादांपासून दूर राहणारा  उत्कृष्ट फलंदाज, परंतु कर्णधार म्हणून तो फारसा यशस्वी नव्हता. धनू जन्मरास असलेला सचिन सुद्धा उत्कृष्ट खेळाडू असूनही कर्णधार म्हणून तितकासा यशस्वी नव्हता.

 

डोनाल्ड ट्रंप (वृश्चिक जन्मरास व वृषभ सूर्यरास) हे राशींना अनुसरून सूडबुद्धी, परिणामांची पर्वा न करता थेट कृती करणारे आहेत. वृषभ रास परिणामांची पर्वा न करता थेट कृती करणारी असते. सेहवाग आणि गांगुली हे वृषभ जन्मरास असलेले धडाकेबाज फलंदाज म्हणून प्रसिद्ध होते. 

 

शरद पवार (मेष जन्मरास व वृश्चिक सूर्यरास) यांच्यासाठी या दोन्ही राशी मंगळाच्या आहेत. सूडबुद्धी, नेतृत्वगुण हे प्रकर्षाने दिसतात. 

 

 


In reply to by श्रीगुरुजी

सर्व जण आपापल्या राशीला शोभत आहेत, शरद पवार जरा जास्तच.


In reply to by श्रीगुरुजी

जन्मरास व सूर्यरास ही जोडी जर विरुद्ध स्वभावी असेल तर?
म्हणजे समजा, वृश्चिक जन्मरास आणि तूळ सूर्यरास!

दुभङ व्यक्तिमत्व असेल असे समजायचे का यातली एखादी रास जास्त प्रभावी असते असे काही असते?

 


In reply to by अनामिक सदस्य

साधारणपणे शेजारच्या राशी स्नेही असतात व १५० ते २१० अंशात विरूद्ध असलेल्या राशींचे एकमेकांशी पटत नाही.

 

उदाहरणार्थ मीन व सिंह-कन्या-तूळ, कुंभ व कर्क-सिंह-कन्या यांचे आपापसात कमी जमते. मीन बुधाची सर्वाधिक नावडती रास आणि कन्येचा राशीस्वामी बुध व कन्या आणि बुध एकमेकांपासून १८० अन्नावर. शनी तूळ राशीत उच्चीचा व मेष राशीत नीचेचा व या दोन राशी एकमेकांपासून १८० अंतरावर. 

 


In reply to by श्रीगुरुजी

षडाष्टक ? मिथुन, कन्या, धनु आणि मीन मुळातच द्विस्वभाव राशी, थोडंसं व्यक्तिमत्त्व दुभंगच म्हणता येईल ना 😀


In reply to by श्वेता व्यास

विरूद्ध स्वभाव असतो. कन्या नास्तिक तर मीन श्रद्धाळू. मग कसं जमणार? मिथुन एकदम धारदार टोमणे मारणारी तर धनू काहिशी शांत. कसं जमणार? कर्क काहिशी भोळसट गलिबल, तर वृश्चिक सूडबुद्धी. नाही जमत त्यांचं. 


In reply to by श्वेता व्यास

षडाष्टक

 

माझ्या लग्नाआधी स्थळे बघताना मृत्यूषडाष्टक आहे असे काहीतरी म्हणून आमच्या पालकांनी एक स्थळ नाकारले होते.  


In reply to by कांदा लिंबू

आपल्या राशीपासून सहावी रास प्रीति षडाष्टक आणि आठवी रास मृत्यू षडाष्टक असते असे मानतात. 

मृत्यू षडाष्टक म्हणजे इतका वेगळा स्वभाव की पटतच नाही. गम्मत म्हणजे एकाची जी रास प्रीति षडाष्टक असते तीच दुसऱ्यासाठी मृत्यूषडाष्टक असते. मेषेची कन्या प्रीति तर वृश्चिक मृत्यू षडाष्टक. तेच कन्येची मेष मृत्यूषडाष्टक. नावे घाबरवणारी असली तरी एकमेकांशी न पटण्याजोगे टोकाचे वेगळे स्वभाव यापेक्षा जास्त काही नसते.


In reply to by अनामिक सदस्य

जन्मरास व सूर्यरास ही जोडी विरूद्ध स्वभावाची असली तरी चालते. सर्वाधिक परिणाम जन्मराशीचा असतो. लग्नरास व सूर्य राशीचा परिणाम कमी असतो.‌ 


लग्नरास,जन्मरास,चंद्ररास ,सूर्यरास वगैरे कोणी उलगडुन सांगेल काय? ह्यातील कुठली रास जास्त प्रभाव टाकणारी असते वगैरे.


In reply to by कानडाऊ योगेशु

चंद्र राशीवरून मनुष्याचा स्वभाव  ढोबळ कळतो. सूर्याचा ( रविचा) राशीपेक्षाही  स्थानाचा फार प्रभाव असतो. आणखी तो कोणत्या राशीचा आहे त्यावर तीव्र किंवा सौम्यपणा येतो. रवि हा प्रमूख ग्रह आणि पापग्रह, ताप देणारा आहे. जिथे असेल ( ज्या स्थानात) त्या स्थानाचे मुख्य फल (प्रभाव) जाळून टाकतो. कुटुंबातील आणि समाजातील मान ठरवणारा ग्रह रवि आहे. तर मित्र, नातेवाईक, शेजारी, लोकांशी संबंध राखणारा चंद्र आहे. 

रवि कितीही प्रभावी असला तरी राजा करू शकत नाही. नोकरीतील हुद्दा - रवि. सरकारी उच्च नोकरीत रवि.( आयुष्यात प्रभावी काळ २८ ते ५५) पदावर राहाणे, भुषवणे इत्यादी. हुकमात, दमात काम करवून घेणे. 

लोकमान्यता, लोकप्रियता -चंद्र. (आयुष्यात प्रभावी काळ बालपण ते म्हातारपण.) अल्पकाळ बाल राजा चंद्र करू शकतो.

हे अगदी थोडक्यात.


In reply to by कानडाऊ योगेशु

नाना, तुम्ही थोडं ए आय वापरायला शिका.. :)

सैम मामांनी दिलेले उत्तर : 

 

थोडक्यात सांगायचं तर लग्नरास, जन्मरास/चंद्ररास आणि सूर्यरास या तिन्हींचा ज्योतिषशास्त्रात वेगवेगळा अर्थ मानला जातो. “सगळ्यात प्रभावी कोणती?” याचे उत्तर मात्र तुम्ही कोणत्या बाबतीत विचारत आहात यावर अवलंबून असते.

लग्नरास (Ascendant/Lagna): जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर असलेली रास. व्यक्तिमत्त्व, शरीरयष्टी, वागण्याची पद्धत, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जीवनातील घटनांचा आराखडा यासाठी वैदिक ज्योतिषात तिला विशेष महत्त्व दिले जाते.

जन्मरास / चंद्ररास: जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती. मन, भावना, मानसिकता, सवयी, संवेदनशीलता यांच्याशी तिचा संबंध मानला जातो. दशा-गोचर पाहताना चंद्रराशीला विशेष महत्त्व दिले जाते.

सूर्यरास: जन्माच्या वेळी सूर्य ज्या राशीत असतो ती. आत्मविश्वास, स्वत्व, अधिकार, नेतृत्व, व्यक्तिमत्त्वाचा मूलभूत केंद्रबिंदू यांच्याशी तिचा संबंध मानला जातो. पाश्चात्त्य ज्योतिषात “तुमची रास कोणती?” असे विचारल्यावर बहुतेकदा हीच अभिप्रेत असते.

नक्षत्र: चंद्र ज्या नक्षत्रात असतो तेही वैदिक ज्योतिषात महत्त्वाचे मानले जाते; विशेषतः जन्मनक्षत्र आणि त्यावर आधारित दशा-विचारात.

मग सर्वांत प्रभावी कोणती?

वैदिक ज्योतिषाच्या चौकटीत साधारणपणे असे म्हणता येईल:

जीवनाचा एकूण आराखडा → लग्नरास
मन/भावनिक जग → चंद्ररास
स्वत्व/आत्मप्रेरणा/अधिकार → सूर्यरास

त्यामुळे एकच रास “सर्वांत प्रभावी” आहे असे सरसकट म्हणणे योग्य नाही. कुंडलीतील लग्न, लग्नेश, चंद्र, सूर्य, त्यांची स्थिती, ग्रहांची दृष्टी, नक्षत्र आणि दशा-गोचर हे सगळे एकत्र पाहिले जातात.

आणि एक महत्त्वाची गोष्ट: ज्योतिष हे श्रद्धा/परंपरेवर आधारित आहे; त्यातील दावे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत.

 


In reply to by कानडाऊ योगेशु

यावर पुर्वी ज्योतिषाचा धंदा करणारे आणि नंतर त्यावर आगपाखड करणारे गृहस्थ कदाचित माहिती देतील. ती पारखून घेणे. 


In reply to by कानडाऊ योगेशु

लग्नरास --> कुंडलीचा एक तक्ता असतो. त्यामध्ये बारा घरे असतात. पहिल्या घरामध्ये जो क्रमांक दिला आहे ती आपली लग्नराशी, त्यावरून जातकाची वृत्ती ठरते. आपला जन्म झाला तेव्हा पूर्वेला असणारी रास ही असते.

चंद्ररास --> आपल्या जन्मकुंडली मध्ये ज्या रकान्यात चंद्र लिहिले आहे तिथे असणारी रास ही आपली चंद्ररास असते. आपला स्वभाव मुख्यत्वे यावरून ठरतो. भारतीय ज्योतिष पद्धतीने कोणी माझी रास अमुक सांगतात तेव्हा ती ही चंद्ररास असते, हीच जन्मरास असते. लग्न आणि चंद्र दोन्ही काढण्यासाठी अचूक जन्मवेळ आणि जन्मस्थान लागतात.

सूर्यरास --> एकतर सूर्य ज्या राशीत असेल ती किंवा पाश्चात्य खालीलप्रमाणे

मेष २१ मार्च ते १९ एप्रिल
वृषभ २० एप्रिल ते २० मे
मिथुन २१ मे ते २० जून
कर्क २१ जून ते २२ जुलै
सिंह २३ जुलै ते २२ ऑगस्ट
कन्या २३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर
तूळ २३ सप्टेंबर ते २२ ऑक्टोबर
वृश्चिक २३ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर
धनु २२ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर
मकर २२ डिसेंबर ते १९ जानेवारी
कुंभ २० जानेवारी ते १८ फेब्रुवारी
मीन १९ फेब्रुवारी ते २० मार्च
माझ्या निरीक्षणाप्रमाणे जन्म + लग्नराशीचा माणसाच्या वागण्यावर जास्त प्रभाव असतो. 

रास, ज्योतिष, मुहूर्त सगळं काही थोतांड आहे! इथे तुम्हाला परकीय आक्रमणे होणार आहेत हे देखील ग्रह तारे पाहून कळले नाही. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

टोमॅटो फळ आहे हे ज्ञान पण ते फ्रुट सॅलड मधे घालू नये हे कॉमन सेन्स. 

😂😂😂😂