Skip to main content

चल कही दूर निकल जाये ....(६)

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 16/08/2026 18:52 या दिवशी प्रकाशित केले.

माझे ही उत्तर तेच. विसरेन कशी. सुहास डोळा मिचकावत म्हणते. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट.

म्हणजे?

सांगते. पण अगोदर तू सांग तू काय केलेस त्या नंतर  सांगते . 

मागील दुवा चल कही दूर निकल जाये ....(५) | मिसळपाव

मी काय.... सी पी एल मधे जॉईन झालो. माझा कल  प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट कडे कडे होता.  त्या तीन वर्षात पी एम पी / अजाईल / प्रिन्स टू. सगळी सर्टिफिकेशन केली प्रोजेक्ट मॅनेजमेंट मधली. आत्ता आयटी चे प्रोजेक्ट्स मॅनेज करतो.  स्वत:ची कन्सल्टिंग कंपनी  आहे. प्रोजेक्ट प्लॅन्स ,टारगेट  डेट्स,माईलस्टोन्स,डिलीव्हरेबल्स एस्केलेशन्स स्टेकहोल्डर्स यांच्याशी खोखो आट्यापाट्या खेळत बसतो.   आणि तू  इतक्या वर्षांचा माझा बायोडाटा दोन ओळीत संपतो . का कोणास ठाऊक ,या क्षणी  आपण केलेल्या अचिव्हमेन्ट्स वगैरे सगळे गौण आहे याची जाणीव होते.   

मी! मी त्या दिवसा नंतर रूमवर गेले. थेट.  रात्रभर  जागी राहिले.  तुला माहित आहे. मी तुला द्यायचे म्हणून दर आठवड्याला एक ग्रीटिंग घ्यायचे. त्यातले कोट्स आवडायचे मला.

 मला कसे कळणार .पण मग कधी दिली नाहीस मला ती ग्रीटिंग्स.

मुद्दामच दिली नाहीत. तुझ्या अभ्यासात डिस्टर्ब नको म्हणून. किंवा  मग भीती वाटत असावी कदाचित तू मला पोरकट म्हणशील हसशील म्हणून.  ती सगळी ग्रीटींग्ज घेऊन बसले.  एक एक ग्रीटिंग  पहात बसले.. दुसऱ्या दिवशी दिवसभर तेच. जेवायलाही बाहेर गेले नाही. नेहा गुलाटी मला शोधत आली रूमवर. तीला काहितरी हवे होते म्हणून. तीने माझी अवस्था पाहिली. तीने सगळी ग्रीटिंग्ज गोळा केली.म्हणाली. ओये दसयो. की गल है.   या तो एनु एक तो फाड के फेक दे या तो उस मुंडेनु इथ्थे पकडके ला और पकडाऊ व्याह रचा. की लगता है. ऐसे बीज मे खुदको मत लटका. या तो आर रह या तो पार जा.  बीच मे रहोगी तो बह जाओगी.कही भी नही पहुचोंगी.

मला काय वाटले कोणास ठाऊक.  काय झाले माहीत नाही. काहितरी निर्धार केला असावा. ती सगळी ग्रीटिंग्ज  घेतली आणि कात्रीने कराकरा कापत बसले. अगदी बारीक तुकडे केले. सगळे तुकडे एका ट्रे मधे घेतले आणि त्याला काडी लावून टाकली. फक्त तुकडा सोडून.

कोणता.

त्याबद्दल नंतर सांगते.

पुढे

सगळ्या तुकड्यांची  जळून राख होईपर्यंत पहात बसलें. ते संपल्यावर बाथरूम मधे जाऊन चेहेरा स्वच्छ धुवून आले. नेहाला म्हणाले की चल बाहेर जाऊ या. लेट अस सेलेब्रेट .आम्ही दोघी संध्याकाळी  लीओपोल्ड  मधे गेलो. तेथे सुलाची शिराझ वाईन मागवली. तीच बजेट मधे बसत होती. सोबत मस्त फ्रेंच फ्राईज अणि स्पाघेट्टी आला कार्बोनर  इटालियन पास्टा माझी बकेट लिस्ट होती ही .   जवळचे सगळे पैसे संपले. नवे आयुष्य सुरू करायचे म्हणून केलेले सेलेब्रेशन.

 दुसऱ्या दिवसापासून नोकरीचा शोध. नेहा च्या चुलत बहिणीच्या ओळखीने पी एन जी  मधे मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून्ज जॉइन झाले. पुढचीे दोन वर्ष काय नाही म्हणून केले विचार, रीपोर्टिंग, फील्ड  व्हिजीट्स, इव्हेन्ट्स , सप्लाय चेन, लॉजिस्टीक्स, प्रोक्यूअर टू पे , एस ओ प्लॅनिंग . एफ एम सी जी मधे जे काही येते ते सगळे केले. कधी कधी वाटायचे काय करतोय आपण. पण करत राहिले. मन आणि मान मोडेपर्यंत काम करत राहिले. मग एक दिवस असेच कुणाच्यातरी बोलण्यात इलीयाहू गोल्डराटच्या "द गोल" पुस्तकाची गाठ पडली. मी आधाशासारखी वाचत राहिले. एकदा दोनदा तीनदा पारायणे केली असतील .  त्यातला  नायक ॲलेक्स रोगो कुठेतरी माझीच कथा सांगतोय असे वाटत होते.माझ्या करीयरमधे बॉटलनेक्स मला स्पष्ट दिसू लागले. माझ्या आयुष्याच्या कथेतल्या  गुंतावळ्या मला दिसू लागल्या. दुसरा जन्म झाला म्हण ना.   गोल्डराटची सगळी पुस्तके वाचून काढली. त्याची लेक्चर्स इन्टरनेटवर शोधून शोधून पाहिली.   हे करत असताना स्वत:चे काम ॲनालाइझ करतच होते.  लीन मॅनेजमेंट चे काही कोर्सेस केले. मग एक दिवस काय डोक्यात आले कोण जाणे पी एन जी च्या हायर मॅनेजमेन्ट ला  थेट सिनसिनाटी ऑफिसला  जॉन कोल्ट  व्हीपी  ऑपरेशन्स  ला ईमेल केला. त्या मेल मधे काही स्पेसीफिक पॉलीसीज मधे काय सुधारणा करता येतील याचा विथ कोन्सिक्वेन्सेस थोडा उहापोह केला.  टू माय सरप्राईझ ईमेलचा रीप्लाय आला. पुढच्याच महिन्यात जॉन कोल्ट  मुंबईत येणार होता. त्याने त्या वेळी मला अपॉइन्टमेन्ट दिली.  त्या भेटीत  त्याने माझे म्हणणे ऐकून घेतले. मी ही अर्थात त्यासाठी मेहनत घेऊन भरपूर डाटा, एव्हिडन्स  गोळा करून फ्लोचार्ट्स , प्रेझेन्टेन्शनस बनवले होते.  ही संधी गमवायची नाही. त्यानी माझे ऐकून घेतले. 

दोन दिवसानी माझ्या ईमेल बॉक्स मधे त्यांचे एक इन्व्हाईट होते.  पंधरा दिवसानी होणाऱ्या डब्लीन मधे होणाऱ्या मिटिंग  साठीचे. सोबत  सोKटलंड साठीचा व्हिसा लवकर मिळावा यासाठी एच आर ला आवश्यक हालचाली करण्याच्या सूचना. 

डब्लीन चे माझे प्रेझेंटेशन मला नवी दिशा देऊन गेले. मी तिथे काम करायला लागले.   मी तिथे गेल्या नंतर वर्षभरात तिथले रिझल्ट्स दिसायला लागले. ऑपरेशन्स मधे बरेच फरक पडले होते. इन्व्हेन्टरी बरीच ऑप्टिमाईझ झाली होती. गोल्डराटच्या पुस्तकात शिकलेले प्रत्यक्षात घडताना पहाणे   हा विलक्षण अनुभव होता.  त्या नंतर त्यांच्या  युरोपमधल्या काही छोट्या युनिट्स मधे आम्ही काही प्रयोग केले.  माझ्या कामात काही ठिकाणी स्थानीक विरोध ही झाला  प्रत्येक ठिकाणी जॉन कोल्ट चा बराच सपोर्ट होता.  पी एन जी ने ऑपरेशन इम्प्रोव्हमेन्ट्स साठी  वेगळी कंपनी काढली. तेथे  मी डायरेक्टर म्हणून काम करते. युके मधे राहून सगळ्या युरोपीयन ऑपरेशन ऑपरेशन्स वर काम करतो. गेली तीन वर्षे मी युके मधेच आहे ,  लंडन  मधे रहाणे बरे पडते. माझे असे बदलणे मला सुरवातीला खूप अवघड गेले. माझ्या अनफोकस्ड स्वभावाचा गुंता कसा सोडवायचा तेच समजत्नव्हते. पण नंतर गोल्डराटच मदतीला आला. 

 " every situation, no matter how complex it initially looks, is exceedingly simple.." 

कोणतीही परिस्थिती, मग सुरवातीला ती कितीही गुंतागुंतीची वाटो सोडवायला घेतली की ती सरळ होत जाते.  हे स्वत:च्या बाबतीत खरे होताना अनुभवले.

 

सुहास बोलत असताना मी तीचा चेहेरा न्याहाळत असतो. तीच्या बोलण्यातली सहजता तशीच आहे. पण त्या सोबत  आता त्या चेहेऱ्यावर एक आत्मविश्वास झळकत असतो. 

एक विचारू.... तू  कसा आहेस? म्हणजे म्हणजे घरचे कसे आहेत?

चांगले आहेत.   आई मोठ्या भावाकडे असते .  तो भारतात स्थिर असतो त्या मुळे  ते बरे पडते. मी  ग्रीन कार्ड होल्डर आहे.  माझे ऑफिस सिएटल मधे आहे. बरेचसे क्लायंट   आहेत.  तेथेच रहातो.

आणि.

आणि काय.

सिएटल मधे कोण कोण असते.

कोण असणार. एकटाजीव सदाशिव.

लग्न?

नाही केले.

का?

नाही . वेळ मिळाला नाही कामाच्या मागेच लागलो होतो.

वेळ मिळाला नाही.... की आणखी काही.

खरे सांगू? 

हो.

आईच्या आग्रहाखातर पाच सहा मुली पाहिल्या. पण प्रत्येक वेळेला एखादी  मुलगी बघताना तीच्यात तुला शोधायचो. आणि  अर्थातच ती कधीच सापडली नाही. 

मग. मग काय अजून तस्साच आहे. तिशी  उलटली तरीही. हा हा हा. आणि तू?

मघाशी मी म्हणाले की एक कागद सोडून मी बाकीचे  चिटोरे करून जाळून टाकले.  

 हो.सुहासला बहुतेक उत्तर द्यायचे नसेल.म्हणून ती थेट उत्तर देण्याचे टाळतेय. माझ्या आवाजात अस्वस्थता जाणवू नये याची मी काळजी घेतो.

तो कागद मी जपुन ठेवलाय. पर्स मधे. पहायचाय.  तो दाखवण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ति तू आहेस.  ती पर्सपधून कागद काढते. प्लॅस्टिक लॅमिनेट केलेला एक चिटोरा त्यातून काढते. माझ्या पुढे करते.

खूपदा हाताळल्यामुळे त्या चिटोऱ्यावरची अक्षरे अस्पष्ट झाली आहेत तरी ही वाचता येतात. 

माय मेनीफेस्टेशन :   चिन्मय माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे.  आम्ही  दोघेही  फ्लाईट ने  पॅरिसला निघालोय.  खूप आनंदाचा दिवस आहे हा. पॅरीस मधे  फिरताना  आम्ही गाणे म्हणतोय "क्या मौसम है.  ऐ दिवाने दिल.चल कही दूर निकल जाये.

मी कागद वाचताना सुहास माझ्या चेहेऱ्याकडे पहातेय.   चेहेऱ्यावरचे  झरझर बदलते रंग न्याहाळतेय.

हे काय?

 माझे मॅनिफेस्टेशन. कॉलेज मधे असताना लिहीले होते. यातली एक ओळ आज  खरी झाली  मील्स ॲन्ड बून च्या कथा कधी  कधी खऱ्या होतात. सुहास डोळे मिचकावत माझ्याशी बोलते.

मी काहीतरी निर्णय घेतो. काही ईमेल ड्राफ्ट करतो.  एका ईमेल ने पॅरीसला उतरल्यावर  मुंबईतल्या काही अपॉइन्ट्मेन्ट्स रीशेड्यूल करायला सांगतो.

 दुसऱ्याने पॅरिसला उतरल्यावर मला पुढच्या  फ्लाईटचे बुकिंग रद्द करणार आहे. पुढचे मॅनीफेस्टेशन खरे करण्यासाठी  सुहासबरोबर तेथे फिरताना मी गाणे गाणार आहे. 

क्या मौसम है. ऐ दिवाने दिल 

चल कही दूर निकल जाये.

कोई हमदम है, चाहत के काबील ,

 तो किसलिये हम सम्हल जाये. 

चल कही दूर निकल जाये.

  चल कही दूर निकल जाये: चकोर शाह.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 42
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया