आमच्या व्हॉटसअॅप समुहात एका महत्वाच्या विषयावर झालेल्या चर्चेवर आधारीत हा धागा आहे.
व्यवसाय म्हटला की त्यात वसूली ही आलीच.नंतर आणून देतो रे,कुठे पळून जातोय का पासून अमुक तारखेला पेमेंट करतो असं सांगून ते वेळेवर न देणारे किंवा चक्क बुडवणारे अनेक 'नग' व्यावसायिकांना भेटतात. याला कोणताही व्यवसाय अपवाद नसावा.अगदी एका वैद्यकीय व्यवसाय करणार्या डॉक्टरांनीही त्यांचा याबाबतचा कटू अनुभव सांगितला.
अशा व्यवहारांचं डॉक्युमेंटेशन शक्यतो नसतं.केवळ विश्वासावरच असे व्यवहार होतात.याचाच गैरफायदा घेऊन हे पैसे/उधारी देणं लांबवलं जात.टाळलं जातं.काही वेळा आपल्यालाच दमदाटी केली जाते,पोलिसांची भिती दाखवली जाते.मग कधीतरी एखादा अनुचित शब्द वापरला जातो,वाद होतो,नको ती कृती या मनस्तापातून घडते.अगदी तो ग्राहक पुढल्या वेळी 'कायमचा' तुटतोसुद्धा!
छोट्या व्यावसायिकांचे हे अनुभव तर मोठ्या व्यवसायिकांसोबत कामाचे अनुभवही असेच आहेत.विशेषत: मोठ्या कंपनीला सेवा पुरवणार्या आणि तुलनेने छोट्या असणार्या व्यावसायिकांना या बड्या धेंडांकडून वसुली कशी करावी हा मोठा प्रश्न असतो.यांना 'दुखावलं' तर पुढल्यावेळी काम मिळेलंच याची खात्री देता येत नाही.दरडावून मागण्याइतपत आपण धाडस करु शकत नाही आणि पैसेही वेळेवर मिळत नाहीत.त्यात या मोठ्यांचे कनेक्शन्स 'गुंडापुंडांसोबत' किंवा 'राजकारण्यांसोबत' असले तर ही वसूली अजूनच कठीण होते.वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा प्रकार असतो हा!
अजून एक प्रकार म्हणजे तुमचा नातेवाईक किंवा जवळचा मित्र हाच तुमचा ग्राहक असणं.हे लोक घेतलेले पैसे परत देणं,कामाचा मोबदला वेळेवर न देणे असे प्रकार करत असतील तर त्यावेळी मनाला होणारे क्लेश हे तो भोगणाराच जाणो!
पैसे तर अडकलेले असतात,आपणही व्यवसायासाठी कुठून तरी कर्ज घेतलेलं असतं.वर हा फुकटचा ताप! कोणाची गुलामी नको,स्वत:चा व्यवसाय करु म्हणून एखादा धडपडून व्यवसाय उभारतो आणि ही बाहेरची गुलामी निष्कारण सोसावी लागते.
यामुळेच पडलेल्या काही प्रश्नांबद्दल मार्गदर्शन मिळावं,अधिक अनुभव शेअर व्हावेत म्हणून हा धागा.
१) तुम्ही छोटे व्यावसायिक असाल तर ही थकलेली वसूली तुम्ही कशी करता?कोणत्या युक्त्या,शक्कल वापरता?
२) छोट्या व्यावसायिकांनी वसुली वेळेत व्हावी,मनस्ताप टळावा यासाठी आधीपासूनच कोणती काळजी घ्यावी?छोट्या कामांचं डॉक्युमेंटेशन करता येतं का?जेणेकरुन काही पुरावा सादर करता येईल?
३) मोठ्या कंपन्यांसाठी काम करणार्या छोट्या व्यावसायिकांनी या 'मोठ्यांकडून' वसूली कशी करावी? यांच्याशी केलेले व्यवहार कागदोपत्री चोख असतात.पण प्रत्यक्ष ठरल्यावेळी पैसे मिळतीलंच याची खात्री नसते.अशा वेळी तग कसा धरावा?
४) कोणते/कोणाला दिलेले पैसे हे 'बुडीत' समजून सोडून द्यावेत?
५) नातेवाईक,जवळचा मित्र यांच्याकडून वसूली कशी करावी?
६)पंगुसिंमा(पंजाबी,गुजराथी,सिंधी,मारवाडी)समाजातील लोक व्यवसायासाठी/व्यावसायिकतेसाठी बरेच प्रसिद्ध आहेत.हे लोक वसूलीसाठी काय करतात?त्यांनाही हेच ताप सोसावे लागतात का?की काही वेगळ्या पद्धती वापरतात?
७) हे सगळं पाहता वसुलीचा त्रास नको म्हणूनच तर मराठी माणूस व्यवसायात फारसा दिसत नाही असं असेल का?
वसूलीदरम्यानचे आपले कटू,थरारक,मार्मिक अनुभव असतील तर कृपया जरुर शेअर करा.जेणेकरुन इतरांनाही वापरता येतील.या 'वसुलीच्या जगातल्या फसवणूकीच्या जागा' समजून येतील,सावध राहता येईल.
वर्गीकरण
वाचने
18337
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त विषय....
तुर्तास रुमाल
वसुली !!
१०० % डॉक्टरना असा अनुभव येतो
रोचक विषय,
_____/\_____
In reply to रोचक विषय, by ज्ञानोबाचे पैजार
भारीच..
In reply to रोचक विषय, by ज्ञानोबाचे पैजार
__/\__
In reply to रोचक विषय, by ज्ञानोबाचे पैजार
मला मुविंसारखे पैसे देउन ते विसरुन शांत रहाण्याची कला अवगत नाही.
In reply to रोचक विषय, by ज्ञानोबाचे पैजार
पैजारबुवा
In reply to रोचक विषय, by ज्ञानोबाचे पैजार
किंमत २ रुपयांची नसते तर फसवले गेल्याच्या भावनेची असते.
In reply to पैजारबुवा by सुबोध खरे
@ मुवि
In reply to किंमत २ रुपयांची नसते तर फसवले गेल्याच्या भावनेची असते. by मुक्त विहारि
का म्हणून मनात ठेवू नये?
जर आपल्याकडे भाड्यापेक्षा २ रूपये कमी असतील तर रिक्षावाला आपल्याला घेऊन जाईल का? घेणे देणे दोन्ही बाजूने असावे.
रिक्षावाल्याकडून उरलेले पैसे परत घेण्याऐवजी मीच
In reply to किंमत २ रुपयांची नसते तर फसवले गेल्याच्या भावनेची असते. by मुक्त विहारि
आम्ही मुख्य शहरापासून जरा लांब रहातो, त्यामुळे रिक्षावाला आपल्याला कुरकुर न करता सुरक्षित घरी घेऊन आला, या विचाराने त्याला ठरल्यापेक्षा जास्तच पैसे देतो, शिवाय त्याला थंड पाणी वगैरे देतो. दोघांनाही समाधान वाटते.
पैजारबुवा!
In reply to रोचक विषय, by ज्ञानोबाचे पैजार
कसले भारी किस्से!!
In reply to रोचक विषय, by ज्ञानोबाचे पैजार
मस्त आठवणी .
वसूली ०.१
काही जण खर्चाच्या बाबतीत
दरोडेखोर परवडले पण उसने
युनिक
In reply to दरोडेखोर परवडले पण उसने by अनिंद्य
बरुबर हाय :-)
In reply to युनिक by अभ्या..
मागच्या वसुलीच जाऊ द्या आता पण
वसुलीचा गनिमी कावा
भारी किस्से
सिंधी लोकांकडून शिकण्यासारखी
+1
In reply to सिंधी लोकांकडून शिकण्यासारखी by सुबोध खरे
मोठ्ठा विषय आहे, एकएकाचे
माझा बरंचसं वर मुवि म्हणाले
सवय होते
मी मागे सूचना केली होती कि
In reply to सवय होते by झेन
आर्थिक षडरिपूंनी ग्रासलेल्या समाजाला....
In reply to मी मागे सूचना केली होती कि by सुबोध खरे
माझ्या आत्याचा व्हॉटसअप ग्रुप
मी वापीला होते तेव्हा
तुमच्या नवर्याने अतिशय उत्तम केले....
In reply to मी वापीला होते तेव्हा by जेडी
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु
In reply to मी वापीला होते तेव्हा by जेडी
माझ्या कंपनीतल्या एका सहकाऱ्याने एकदा मला घर कर्जासाठी गॅरेंटर
In reply to मी वापीला होते तेव्हा by जेडी
पैसे बुडवणाऱ्यान्ना ती सवयच असते
नातेवाईकांना पैसे देऊच नयेत
नातेवाईकांना पैसे उधार दीले तर नातेही जाते आणी पैसे ही !
वसुली
आभार!
माझे एक सिनीयर मित्र
तुमचे पैसे बुडवण्यापेक्षा परत
गंभीर विषय
एक अडचण येऊ शकते
In reply to गंभीर विषय by शंकासुर
लोकही अचाट असतात...
हा धागा निसटला होता.माझेही…
हा धागा निसटला होता.
माझेही अनेकांनी पैसे बुडवलेत,
पण मला कुणाकडे १ रुपयाही बाकी असले तर फोन च्या नोट्स मधे लिहायची सवय आहे.ती सवय कामी आली, मी आता १००-२०० ही बाकी असतील तर निर्लज्जपणे पागून घेतो.
सध्या कुणाकडे ५ तर कुणाकडे १० बाकी आहेत, मिळणार नाहीत असे वाटते.
लोक खूप भयंकर निर्लज्ज असतात, एक बालमित्राकडे १० बाकीहेत नाही म्हणजे नाहीच दिले त्याने. त्याने त्याच्या वहिनीच्या काहीतरी अडचणीसाठी पैसे घेतले होते, त्याच्या वहीनीकडेही मागून पाहिले पण ती बाई पण उत्तरे द्यायला पक्की निघाली. विशेष म्हणजे आताच त्याने ४ व्हीलर घेतली, बघून जळफळाट झाला!
एका ओळखीच्या टॅक्सीवाल्याने १५ दिवसात देतो म्हणून २० हजार उधार मागितले होते, ही रक्कम माझ्यासाठी मोठी आहे पण संबंध म्हणून मी त्याला दिले, १ वर्ष झाले तरीही देत नव्हता. फोन केला तर अर्धा तास त्याच्या आयुष्यातील समस्या सांगत असायचा, मधे इन्स्टावर एक रील पाहिली त्यात एक माणूस सांगत होता की पैसे मिळत नाहीत कारण तुम्ही होप सोडतात, पैसे मिळणारच आहेत ह्या आशेवर पैसे मागतच राहायचे, त्यावरून प्रकाश पडला, एकदा त्याची टॅक्सी एक दिवस सांगून ७ दिवसासाठी नेली भरमसाठ फिरवली, नी २० कापून उरलेले पैसे त्याला दिले. खरतर उरलेल्या पैशासाठी त्याला फिरवणार होतो पण कुणाचे पैसे बाकी असतील नी कुणी तगादा लावत असेल तर ते मला आजीबात आवडत नाही. म्हणून दिले.
एका मित्राने आहीच अडचण सांगून ३ हजार घेतले नंतर मला व्हॉट्सअप आणी फोनवर ब्लॉक मारले.
३ नातेवाईकांकडे बरेच पैसे बाकीहेत यायची अपेक्षा आहे, पण कधी येतील काही सांगता येत नाही!
एकाने २०१४ ला १५०० घेतले होते अजून दिलेले नाहीत.
लहान भावाने एक दुकान टाकले होते, एकाने वडिलाना गळ घालून महागडे सामान उधार नेले पैसे दिले नाहीत, देणार नाहिये, माहितीय! त्या पैशावरून लहान भावाचे नी वडिलांचे भांडने होतात, घरातली शांति दुभंगलीय.
ह्यासगळ्या वरून एक किस्सा आठवला. माझ्या आईचा! तिने बुडवल्या गेलेले पैसे वसूल केले होते. झाले असे की २००७ साली आम्ही धुळ्यात घर बदलेले. आमचे जुने घर भाड्याने मागायला एक ओळखीच्या काकू आल्या त्यांच्या भावाला हवे होते, माझ्या आईने चावी दिली. भाडे जास्त नव्हते २ का ३ हजार रुपये महिना होते. पण ६ महिने राहून एकही रुपया भाडे मिळाले नाही. शेवटी त्या माणसाला हाकलावे लागले, माझ्या वडिलांनी आईला सांगितले की कुठे भांडते? दे सोडून पैसे! पण माझ्या आईने हार मानली नाही तिने त्या बाईला बोलावले, त्या बाईचा नवरा (आणी भाऊही) व्यसनात डुबला होता. ती स्वत: नोकरी करून घर चालवत होती. तिच्याकडे पैसे मागितल्यावर ती बाई बोलली की मी पैसे बुडवले नाहीत माझ्या भावाने बुडवले मी देणार नाही, माझी परिस्थिती काय आहे बघा वगैरे गळे काढू लागली. आईने स्पष्ट सांगितले की घर मागायला तुम्ही आल्या होत्या नी तुम्हाला महीत होते की तुमचा भाऊ कसा आहे ते! फसवायला मीच सापडले का? मला पैसे मिळाले नाही तर तुमच्या घरासमोर येऊन रोज भांडेन नी अभद्र बोलेन! ती बाई घाबरली आणी शेवटी १००० रुपये महिना ह्याप्रमाणे पुढील १.५ -२ वर्षे न चुकता सर्व पैसे दिले. त्याच आईचा मुलगा असूनही मला वसुली करता येत नाही, ह्याचे फार दुःख आहे. 😭 माझा एक नातेवाईक सतत पैसे मागायचा जास्त नाही थोडे १०००, ५०० किंवा जिओ रिचार्ज, त्याचा पिच्छा सोडवायला एकदा आईला सांगितले, तिने फोन लावून काय सांगितले देव जाणे पण त्याने नंतर कधीच फोन केला नाही.
माझे पैसे काही ठिकाणी…
माझे पैसे काही ठिकाणी गमावण्याचे, काही ठिकाणाची अजून वसूल न झाल्याचे, आणि इतर काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वसूल केल्याचे किस्से आहेत. नंतर सवडीने लिहितो.
- (गहिरादी) कांदा लिंबू
भीक नको पण कुत्रे आवर
पैसे बुडवण्याचा अजून एक पॅटर्न :
सुरुवातीला छोटी छोटी रकम मागायची ... अगदी एक दोन दिवसाकरता. आणि अगदी वेळेत परत करायची. असे ठराविक अंतराने काही वेळा करायचे. प्रत्येक वेळी रक्कम थोडी वाढवायची. पण ठरलेल्या वेळी परत करायची.
मग एकदम मोठी रक्कम मागायची ..... उद्या परत करतो म्हणून.
आणि गायब व्हायचे .... घेणेकरी दारात आला तर बायको, आई किंवा मुलीला पुढे करायचे ... आपल्याला प्रोव्होक करायचे .... आणि मग त्याबेस वर आपल्यावरच गुन्हा दाखल करायची धमकी द्यायची ....
भीक नको पण कुत्रे आवर म्हणत आपल्याला परत खाली हात यायला लागते !
कुणी कितीही अडचणी सांगत असला…
In reply to भीक नको पण कुत्रे आवर by kvponkshe
कुणी कितीही अडचणी सांगत असला तरीही आजीबात पैसे देऊ नये, तेवढे निगरगठ्ठ व्हावे! आणी छोट्या रकमा बुडणाऱ्याच असतात आजीबात देऊ नये.
थोडे पैसे एखाद्याला देऊन ते…
थोडे पैसे एखाद्याला देऊन ते परत नाही मिळाले तरी एकवेळ चालेल, पण कधीही कोणालाही कर्जासाठी जामीन राहू नका. आयुष्याची वाट लागू शकते. माझ्या जवळच्या नातेवाईकातील व परिचितांतील अनेकांनी भावनेच्या भरात कोणाच्या तरी कर्जाला जामीन राहून वाट लावून घेतली आहे.
मला २ वेळा गृहकर्जासाठी जामीनदार होण्याची विनंती करण्यात आली होती. मी अजिबात संबंध वाईट होऊन न देता समर्पक कारण देऊन ते टाळले.
मुळात कर्जदाराची संपूर्ण मालमत्ता, मुदत ठवी व नवीन घर गहाण असताना दोन जामीनदारांची सक्ती करणे हा अन्याय आहे. माझ्या मते अमेरिका व इतर देशात जामीनदार हा प्रकारच नसतो.
मला कोणाला उसने दिलेले पैसे…
मला कोणाला उसने दिलेले पैसे परत मागण्याची अजिबातच सवय नाही. आतापर्यंत तरी एकदम जवळच्याच लोकांना देऊन त्यांनी ते नीट परत देखील केले आहेत. एखाद्याची विशेष माहिती नसेल तर अशांना उसने देतच नाही. याशिवाय घरगुती मदतीच्या बायका मागतात, पण त्या रकमा फार मोठ्या नसतात, त्यांच्या पगारातून कमी करता येतात. टच वूड
मला
आमच्या पत्रिका बघणाऱ्या गुरुजींनीच सांगितले आहे की जगात काहीही कर पण पैशाचा व्यवहार सख्खा बाप सोडून कोणाशीच करू नको, म्हणजे काही सामानसुमान विकत घेणे जमिनजुमला करणे वेगळे पण मी उधार उसनवार ते पण ओळखीत अजिबात करत नाही, अगदी आठ आणे पण नाही. कोणी गरजवंत आल्यास त्याच्या गरजेचे स्वरूप समजून घेतो, त्याला मदत होईल तितकी करतो पक्षी कोणापाशी शब्द टाकणं, रदबदली करणं (तसं पाहता हे पण डेंजर असते पण नोकऱ्या लावून देतो गरजवंत लोकांना, मालकाला सांगतो, नोकरी देताना मी म्हणतो म्हणून दे पण टिकवणे उमेदवाराने साधले नाही तर बेलाशक बुडावर लाथ घाल).
पैशाचा व्यवहार सख्खा बाप…
In reply to मला by वृषभ खोंडे
पैशाचा व्यवहार सख्खा बाप सोडून कोणाशीच करू नको>>>
मी उलट ऐकल आहे, पैशच्या व्यवहारात सख्या बापावरही विश्वास ठेऊ नये असे.
माझाही एक अनुभव. एके ठिकाणी…
माझाही एक अनुभव. एके ठिकाणी भाडेकरु म्हणुन राहत असताना घरमालक त्याच्या एका परिचिताला माझ्याकडे घेऊन आला आणि हे अमुक अमुक आहेत असे असे सामाजिक वा तत्सम कार्य करतात तर ह्यांना अमुक अमुक रक्कम हवी आहे माझ्याकडे नाही आहे सध्या म्हणुन तुम्ही द्या वगैरे. थोडक्यात वर्गणी वा देणगी आणि हा आयजीच्या जीवावर बायजी उदार असा प्रकार होता. ह्या घरमालकाच्या पत्नीचा एक अनुभव आलेला होता आधी. दोन्ही घरी काम करत असलेल्या एका मोलकरीणीला एकदा पैसे हवे होते तेव्हा तिने त्या मालकिणीकडे मागितले. रक्कम अगदीच किरकोळ होती पण घरमालिकीणीने तिला आमच्याकडुन घ्यायला सांगितले. ह्या अनुभवाने शहाणा झाला होतो. ह्यावेळेलाही रक्कम तशी फार मोठी नव्हती पण परस्पर त्या व्यक्तिला देणे रिस्की होते. त्या व्यक्तीला मी ओळखत ही नव्हतो. मी घरमालकाला म्हणालो कि मी तुम्हाला माझे घरभाडे जे आहे ते आगाऊ देतो आणि त्यातुन तुम्ही त्या व्यक्तिला तुमच्या जबाबदारीवर हवी ती रक्कम देऊ शकता. व्यवहार हा माझ्या व त्या माझ्यासाठी अपरिचित व्यक्ती मध्ये न राहता तुम्हा दोघांमध्येही राहील. ह्या उत्तराने घरमालक हडबडला आणि म्हणाला असे नको करायला दोन्हीही व्यवहार वेगवेगळे ठेऊ. तुम्हीच त्या व्यक्तीला रक्कम द्या. हे ऐकुन मी दोन्ही हात जोडुन पैसे द्यायला असमर्थता दाखविलीे. दोघांना तेव्हा धड चरफडताही आले नाही.
गुजराथी, मारवाडी
लोक नात्यागोत्यात व्यवहार पैसे देणे घेणे बरेच यशस्वीरित्या करतात असे ऐकून आहे. पण मराठी लोक मात्र नात्यात व्यवहार करू नये म्हणतात. मलाही तसा अनुभव आहे. शेत नातेवाईकच कसतात पण खंड काही मिळत नाही. शिवाय बोलायची चोरी कारण नात्यावर परिणाम होईल. काय बरं गोम असावी?
स्वतः बघितलेले उदाहरण
In reply to गुजराथी, मारवाडी by स्वधर्म
मारवाडी बालमित्र, लहानपणापासून सोबती, कॉलेज पर्यंत सोबत, एकदा सेकंड इयरला असताना वडिलांना कुठेतरी बाहेरगावी जायचे होते त्याच्या, त्याला बोलवले दुकानावर (आमच्या गावातील एक सगळ्यात मोठे घाऊक व सुटे किरणामल दुकान) अन् त्याला म्हणाले ५ दिवस जायचे आहे कॉलेजला दांडी मार अन् दुकान सांभाळ,
मित्राने अतिशय casually विचारले किती देणार ? वडील - fix का commission?
पोरगा - दोन्ही
वडील - रोजचे fix २००० आणि पाच दिवसात जितका सरासरीपेक्षा जास्त सेल करशील (कुठल्याही सामानाचा) त्यानुसार त्या त्या नगावर / जिन्नसावर जितके मार्जिन असेल त्याच्या १०%
पोरगा - १५%
वडील - मग डेली allowance १७००/-
पोरगा - चालेल आणि literally business deal फायनल केल्याप्रमाणे शेकहॅण्ड केला त्यांनी !
पोरगा इतका बिलंदर का ५ दिवसात कमावलेला पैसा कॉलेज मधील पोरांतच व्याजावर देऊन महिना पॉकेटमनी काढू लागला सहज ! (निर्व्यसनी होता, खर्च म्हणजे फक्त स्कूटी पेट्रोल आणि समोसे खाणे इतकाच, फारतर दिवसात एखाद सिगारेट किंवा माणिकचंद/ रजनीगंधा)
मी माझ्या सख्ख्या भावाच्या…
In reply to गुजराथी, मारवाडी by स्वधर्म
मी माझ्या सख्ख्या भावाच्या जागेत गेली 16 वर्षे वैद्यकीय व्यवसाय करतो आहे.
पहिल्या दिवसापासून बाजारभावाने त्याला भाडे देत आलो आहे ते सुद्धा चेकने(आता जीपे ने).
त्यावर तो संपूर्ण करही भरतो.
मी लष्करात नोकरी करत असताना त्याने ती जागा भाड्याने दिलेली होती. मी जर दुसरीकडे व्यवसाय केला असता तर मला बाजारभावाने भाडे द्यावेच लागले असते
मग मी तेथे व्यवसाय करत असताना सवलतीची का अपेक्षा करावी?
सख्खा भाऊ असल्याने डिपॉझिट तेवढे दिलेले नाही!
अशा व्यवहारामुळे आमच्या घरात पैशावरून आजतागायत कधीही वितुष्ट आले नाही.
आमच्या आईच्या कर्करोगाच्या उपचारासाठी 11 लाख रुपये खर्च आला हा आम्ही दोन्ही भावांनी खर्च केला पण त्यात एकदाही वाद उद्भवला नाही.
पैशाचा व्यवहार चोख असेल तर नात्यात वितुष्ट सहसा येत नाही!
माझे हात
माझे हात देण्यासाठी आणि घेण्यासाठी बरेचदा पुढे झाले आहेत त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांची मानसिकता समजू शकतो पण सगळ्या गोष्टी इथे लिहिणे अवघड आहे. असो.
जालावर पैसे देणाऱ्यांना आलेले वाईट अनुभव चर्चिले जातात. घेणाऱ्यांचे अनुभव लिहिणारा कोणी भेटत नाही. पैशासाठी हात पसरणे देखील मनाची लाज असलेल्याला माणसाल सुखा:चे नाही. रोज दुसऱ्याचे पैसे देणे आहेत या दडपणाखाली जगताना छोटे छोटे आनंदाचे क्षण असतात ते देखील अपराधी भावनेमुळे निट उपभोगता येत नाहीत. एकदा कर्जाच्या चक्रव्युव्हात अडकले की बाहेर पडणे फार अवघड होऊन जाते.
अनेकदा कर्जाच्या चक्रव्यहात…
In reply to माझे हात by धर्मराजमुटके
अनेकदा कर्जाच्या चक्रव्यहात लोक स्वतच्या चुकीमुळे अडकतात! गरज नसताना कर्ज काढून ३-४ मजले बांधणे, डॉक्युमेंटेशनच्या कंटाळ्यामुळे सावकाराकडून उचल उचलणे वगैरे.
माझाही एक अनुभव
ही १९७८ सालची गोष्ट आहे.
आमच्या सोसायटीत एक सुतार बालकनीला काचेच्या सरकत्या खिडक्या बसविण्याचे काम करीत होता. मी पण त्याला काम दिले. सम्पुर्ण कामासाठी १०,००० रुपये ठरले, त्यातील त्याने ॲड्व्हान्स ५००० रुपये घेतले व काही लाकडी फ्रेम्स, त्याची कामाची अवजारे आणून आमच्याकडे आणून ठेवली. नंतर आज येतो, उद्या येतो करीत दिसेनासा झाला. शेवटी तो तीन महीन्यांनी ऊगवला. एक दिवस काम केलं पुन्हा गायब झाला. पुन्हा काही दिवसांनी तोंड दाखवले. जाताना पुढील कामासाठी अजून ३००० रुपये हवे आहेत म्हणाला. आता ऑलरेडी ५००० रुपये देऊन बसलो होतो व काम तर करायचे होते म्हणून अजून ३००० रुपये दिले. म्हणतात ना 'बुडत्याचा पाय अधिक खोलात'. तो दिवस आहे आणी आजचा दिवस, त्या 'सद्ग्रुहस्थाचे' दर्शन म्हणून पुन्हा झाले नाही. त्याची अवजारे, एक करवत, एक हातोडी, भरताने रामाच्या पादुका ज्याप्रमाणे साम्भाळून ठेवल्या होत्या त्याप्रमाणे आजही जपुन ठेवली आहेत. खोटं वाटंत असेल तर घरी येउन पहा.
1978 साली? टायपो आहे की खरे?…
In reply to माझाही एक अनुभव by सौन्दर्य
1978 साली? टायपो आहे की खरे? तेव्हा ६८५ रुपये तोळा सोने होते म्हणजे आजच्या भावाने १७ लाख ५१ हजार रुपये होतात, एवढे पैसे तुम्ही सरकत्या खिडक्यांसाठी दिले?
टायपो नाही.
In reply to 1978 साली? टायपो आहे की खरे?… by अमरेंद्र बाहुबली
टायपो नाही. सोन्याचा भाव वगैरे काही माहीत नाही, पण एकूण ८००० रूपयांना गंडा घातलेला आजही लख्ख आठवतोय.
बापरे, त्या काळात ८०००? १९७८…
In reply to टायपो नाही. by सौन्दर्य
बापरे, त्या काळात ८०००? १९७८ ला?
१९७८ मधे इन्दुरात २५०० रुपयात ३० x ५० फुटाचा प्लॉट मिळायचा.
In reply to माझाही एक अनुभव by सौन्दर्य
१९७८ मधे इन्दुरात अडीच हजार रुपयात ३० x ५० फुटाचा प्लॉट मिळायचा. त्याची किम्मत आता दीड कोटीपेक्षा जास्त आहे.
माझ्याकडे त्यावेळी पुस्तकासठी चित्रांचे काम करुन जमलेले पाच हजार रुपये होते पण त्याकाळी ज्यांना घर बांधून रहायचे असेल, तेच प्लॉट वगैरे घ्यायचे. . १९८० साली स्वत:च्या लग्नात ते खर्च झाले.
माझ्या बहिणीने त्याच सुमारास प्लॉट घेऊन घर बांधले होते, ते सुमारे १० वर्षांपूर्वी ५८ लाखात विकले गेले.
एक कुतूहल : १०,००० घेऊन गेलेला सुतार मराठी होता की यूपी-बिहारवाला की यंडुगुंडू ?
माझे दोन लाख बुडवले.आता स्वताला सुद्धा उधार देत नाही.
पहिल्यापासूनच "अंथरूण पाहून पाय पसरायची" सवय असल्याने उधारी करत नाही. पण गरजा उपटसुंभा सारख्या असतात त्या कधी उपस्थित होतील याचा नेम नाही. नाईलाजास्तव उधार घ्यावेच लागते. या बाबतीत मी फार काटेकोर आहे. बाकी सर्व बाजूला ठेवून पहिली उधारी चुकती करतो.
दिवाळीचा पाडवा होता. एक अतिशय जवळच्या नातेवाईकाचा फोन आला. घराचे काम चालू आहे मजुरांना पेमेंट करायचे आहे. आता दोन लाख हवेत. नातेवाईक अतिशय श्रीमंत आणी सभ्य पण बरेच दिवस संपर्कात नसल्याने अर्थिक परिस्थिती बद्दल कल्पना नव्हती. पण मुलगी अमेरिकेत, दुसर्या मुलीचे मोठे माॅल त्यामुळे कारण खरे वाटले आणी दोन लाख दिले. चेक दिला,त्यांच्या सुदैवाने बॅक उघडी होती.
अश्वासित मुदत संपली ,भिडेखातर आणखीन थोडे दिवस जाऊ दिले. फोन केला पण उचलेनात. अमेरिकेत मुलीला फोन लावला सत्य परिस्थिती समोर आली. माणूस स्वता भिकेला लागला होता आणी मुलांनाही त्याच मार्गावर नेत होता. मुलांनी पैसे देणे बंद केले होते.
अशीच आणखीन एक हृदय द्रावक गोष्ट पण सांगत नाही.
आता स्वताला सुद्धा उधार देत नाही. समजा एखाद्या अवसानघातकी क्षणात चुक झाली तर इदं न मम म्हणून सोडून देतो.
यातूनच "नाळ कुठवर जपावी?", हा प्रश्न मनाला भुंग्या सारखा पोखरतोय .
बापरे २ लाखाला गंडवले!…
In reply to माझे दोन लाख बुडवले.आता स्वताला सुद्धा उधार देत नाही. by कर्नलतपस्वी
बापरे २ लाखाला गंडवले! भयानकच!😱
बादवे,ऋणको आता या जगात नाही.
त्यामुळे नाॅन रिकव्हरेबल ॲसेट म्हणून बॅलन्स शीट क्लोज केले.
माझेही काही लोकांनी पैसे…
माझेही काही लोकांनी पैसे बुडवले आहेत, तर बऱ्याच लोकांनी वेळेवर पैसे आणून दिले आहेत.
काही जवळचे मित्र आहेत. आमच्यात ज्याला गरज असेल, त्यांच्यात देवाणघेवाण होत असते आणि पैसेही वेळेवर परत मिळतात.
पण नवीन कोणी पैसे मागितले, तर याच विषयावर इथे फार पूर्वी कोणीतरी लिहिलं होतं, मदत एवढीच करा की समजा ती बुडाली तरी आपल्याला वाईट वाटू नये.
तीन महिन्यांपूर्वी शाळेतल्या एका मित्राचा पैशांसाठी फोन आलेला. शाळेत असताना आम्ही भरपूर वेळ एकत्र घालवलेला. त्याला नाही म्हणवलं गेलं नाही, पण तेवढेच पैसे दिले, जेवढे बुडाले तरी मला सहन करता येतील. आठवड्यात पैसे परत देणार होता, पण अजून मिळालेले नाहीत. मात्र रक्कम लहान असल्यामुळे वाईट वाटत नाही.
मला एकाने सांगितले की मला ६०…
मला एकाने सांगितले की मला ६० हजार दे मार्केट मध्ये व्याजाने फिरवतो, ६ टक्के महिना मिळेल. मी त्याला सांगितले की तुझ्या घरातले सोने माझ्याकडे गहाण ठेव, ५० हजार काय एक लाख ने! ३ टक्के तुला ठेव मला जास्त हाव नाही ३ टक्केच दे मला, तो पुन्हा आला नाही.