Skip to main content

चालू घडामोडी । ऑगस्ट २०२६ । श्रावण १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी बुधवार, 05/08/2026 15:20 या दिवशी प्रकाशित केले.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे.

 

श्रावण महिना सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे या महिन्यात आकाशातील पांढरे-काळे ढग, सरसर येणाऱ्या पावसाच्या सरी, मध्येच दिसणारे निरभ्र आकाश, पुन्हा पडणारा रिपरिप पाऊस हे निसर्गचित्र नेहमीचंच असतं.  

मिपावरचे लेखन-प्रतिसाद-प्रतिप्रतिसाद असेच असतात, नाही का?

श्रावण मास हा हिंदूंचा पवित्र काळ असतो. नागपंचमी, राखीपौर्णिमा, पोळा यांची धामधूम सुरु असते. बेसिकली, उत्सवी वातावरणाची, व्रतवैकल्याची, उपवास-निराहारांची सुरुवात या इथून सुरु होते.

मिपाकरांना श्रावण मासाच्या आगाऊ शुभेच्छा. 


संसदेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात - परिसीमन विधेयक, आयकरसुधारणा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवणारं विधेयक, FCRA विधेयक, MSME साठी विलंबित पेमेंट्सवरचं संरक्षण देणारं विधेयक अशी प्रमुख विधेयकं सरकारच्या अजेंड्यावर आहेत. यातली FCRA दुरुस्ती विधेयक आणि उच्चशिक्षण नियामकांना एकत्र आणणारं VBSA विधेयक हे दोन विरोधकांच्या रडारवर आहेत, काँग्रेसने या दोन्हींना विरोध करण्याचं आधीच जाहीर केलंय. शिवाय NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावरही चर्चा होत आहे. यांतील काही विधेयकं मंजूर झाली आहेत काही होतील.

परिसीमन विधेयकावरून सरकार व विरोधी पक्षांत नुकतीच वैठक पार पडली. या मुद्द्यावर संसद चांगलीच तापणार आहे. जंतरमंतरवरचं आंदोलनात अजून काही काळ धुगधुगी राहील असे दिसते आहे.

नुकत्याच झालेल्या विविध विधानसभांच्या पोटनिवडणुकांत भाजपचा एक विजय आणि दोन पराभव असा निकाल लागला आहे. 

आर्थिक आघाडीवर सरकारने भारतीय स्मार्टफोन ब्रँड्स जगात पुढे यावेत यासाठी साडेबासष्ट हजार कोटींची योजना जाहीर केलीय, चिनी-कोरियन ब्रँड्सच्या तुलनेत भारतीय कंपन्या किती पुढे सरकतात ते बघावे लागेल.

शेतीसाठी ऑगस्ट महिना नेहमीच कसोटीचा असतो. काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची चातक प्रतीक्षा, हे नेहमीचं विषम चित्र यंदाही आहे. 

माझ्या स्वतःच्या निरीक्षणानुसार मागच्या दहा वर्षांत भारतातील पावसाळा हा जून ते सप्टेंबर असा पारंपारिक न राहता जुलै मध्य ते नोव्हेंबर असा पुढे सरकला आहे. शेतकऱ्यांनी पेरणी वेळापत्रकात त्यानुसार बदल करावा असे सरकार चारपाच वर्षांपासून सांगते आहे पण सगळेच शेतकरी त्याला प्रतिसाद देतात असे नाही. (आम्ही मात्र आमची मराठवाड्यातील शेती पावसावर अवलंबून ठेवलीच नाहीय!)

या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय; कुस्ती-बॅडमिंटन-हॉकीसारखे हुकमी मेडल मिळवणारे खेळ नसतानाही बॉक्सिंग-ज्युदो-ट्रॅक अँड फील्डच्या जोरावर पदकतालिकेत भारत बऱ्यापैकी वर सरकलाय, हे विशेष कौतुकास्पद.

भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२६, शनिवारी साजरा होईल. 


बाकी महिनाभरात काय काय घडतं, कोणत्या बातम्या गाजतात ते इथे नोंदवत जाऊया. चर्चा करत राहु या. 

 

- कांदा लिंबू 

 


वाचने 4957
प्रतिक्रिया 199

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ... तशीही केरळ आणी उर्वरीत भारत यात यांत सांस्कृतिक दरी आहेच.. केरळ मातृसत्ताक का काय ते म्हणजे आईच्या आदेशानुसार वगैरे... बाकीचे उलटे... 


आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार करून अश्रूधूर सोडणाऱ्या सरकारचा व पोलिसांचा जाहीर निषेध  .

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

 

 

झारखंडमध्ये बरं का.


मुळात तात्या आणि बिबी यांचे कधी पटेल हि शक्यता गृहीत धरणे चुकिचे  आहे.

बिबी टोकाचा अतिरेकी आहे

आणि तात्या अफाट बेभरवशी आहे ज्याच्यावर त्याचा बोका सुद्धा विश्वास ठेवणार नाही.

केवळ राजकीय अपरिहार्यतेमुळे एकत्र आलेले आहेत दोघे.    


कांदा लिंबू,

 

काही गोष्टी साम-दाम-दंड-भेद वापरून साध्य कराव्या लागतात.‌

 

यावरनं एक वेगळा वाद निर्माण होतो. परिणाम साधनाचे समर्थन करू शकतो का? ( Do ends justify means? )

 

परदेशांत सादादंभे काहीही वापरलेलं चालतं. तिथे परिणाम साधनाचे समर्थन करू शकतो. पण स्वदेशांत मात्र दंभे शक्यतो वापरू नयेत असा संकेत आहे. 

 

पाकिस्तानात अज्ञात हत्याऱ्यांनी अनेक अतिरेकी मारले तसे भारतात गुन्हेगार मारणं सहज शक्य आहे. पण असं केलं तर देशांतर्गत कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधांत एक बटबटीत संदेश जातो. तो टाळलेला इष्टं. गेले बारा वर्षं कायद्यांचे पाया रचले जाताहेत. तुम्ही म्हणता ते राष्ट्रपुरुषांच्या अवमानाविरुद्धचे कायदे हे कलशाध्याय आहेत. पाया पक्का केल्यावर मग कळस चढवलेला बरा पडतो.

 

आ.न.,

-गा.पै.


यापुढे आपण व्हिगन आहारच घेणार असल्याचे अभिनेत्री प्राजक्ता माळीने जाहीर केले आहे. शाकाहारी आहारात कोणत्याही प्राण्याचे मांस, अंडी वगैरे खाल्ली जात नाहीत. व्हिगन आहारात नुसते मांसच नाही तर प्राणीजन्य कोणताही पदार्थ (उदा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मध) खाल्ला जात नाही. 

 

https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/prajakta-mali-a…


In reply to by श्रीगुरुजी

मी ऐकलंय की अब्राहम लिंकन वर मारामारी झाली म्हणे ( इंग्रजी बातमी ) : https://www.presstv.co.uk/Detail/2026/08/11/774174/Deadly-clash-aboard-US-carrier-Abraham-Lincoln-leaves-seven-dead-several-injured

 

ही बातमी जर खरी असेल तर अमेरिकेचं काही खरं नाही. अब्राहम लिंकन जहाजावरील वरील असंतोष अमेरिकेत झपाट्याने फैलावू शकतो.

 

-गा.पै.


In reply to by विजुभाऊ

एक पत्रकार बोलला आहे, एका पॉडकास्ट मधे का ऑनलाईन इंटरव्ह्यू मधे. त्याचे म्हणणे की इम्रान खान ऑलरेडी मेला आहे हे असीम मुनीर आणि इतर मंडळींना पूर्णपणे माहिती आहे म्हणून ते त्याला बाहेर दाखवतच नाहीत.


In reply to by विजुभाऊ

इम्रान जिवंत असो वा मृत, तो पंतप्रधान असो वा नसो, पाकिस्तानात तथाकथित लोकशाही राजवट असो वा लष्करी राजवट . . . . भारताविषयी त्यांचे धोरण कधीही बदलणार नाही व आहे तीच परिस्थिती कायम राहील.‌


In reply to by विजुभाऊ

अशा बातम्या अधून मधून येतात. खरे खोटे काय ते देव जाणे! 


इम्रान खान यांच्याशी संपर्क करण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना रुग्णालयात हलवण्याचे आदेश दिले.

रक्तदाबाबाबत चिंता व्यक्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधानांना जवळपास महिनाभरासाठी रुग्णालयात हलवण्यास परवानगी दिली. 

https://www.aljazeera.com/news/2026/8/18/pakistan-top-court-orders-imra…


In reply to by विजुभाऊ

पाक मधून इम्रान खान जिवंत नसल्याची बातमी येतेय.

 

कालच इम्रानची पत्नी व भगिनी तुरूंगात जाऊन त्याला भेटल्या.‌


In reply to by श्रीगुरुजी

इम्रान जिवंत असो वा मृत, तो पंतप्रधान असो वा नसो, पाकिस्तानात तथाकथित लोकशाही राजवट असो वा लष्करी राजवट . . . . भारताविषयी त्यांचे धोरण कधीही बदलणार नाही व आहे तीच परिस्थिती कायम राहील.‌

 

आता इतके ढळढळीत ठरल्यावर त्याची पत्नी त्याला भेटे का भगिनी आपल्याला काय त्याचे ! आपण सध्या दिमागी नक्षल वर फोकस करणे गरजेचे आहे असे वाटते 

(पक्ष्याचा डोळा वेधणार आज का) अर्जुन खोंडे


In reply to by विजुभाऊ

ओसामा बिन लादनेला पकडले/मारले, इम्रान खान आटोपला.. आणि हो.. शरद पवार एन.डी.ए मध्ये सामील होणार आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशा वावड्या कित्येकदा उठल्या होत्या/आहेत . जोपर्यंत अधिकृत बातमी येत नाही तोपर्यंत अशा वावड्यांवर विश्वास ठेवायचा नसतो. 😀


In reply to by श्रीगुरुजी

रागांचे साठोत्तरी वृद्धत्व हे दुसरं बालपणच, नाही का? 🤣


In reply to by कांदा लिंबू

एका बालकांचे चित्र आहे. तो म्हणतो आहे "I'll drive BJP crazy. Paagal kar dungaa unko. Narendra Modi is unable to sleep these days for obvious reasons. There are hidden reasons too."

 

म्हणून म्हटलं कठीण आहे. दिवसेंदिवस हे प्रकरण जास्तच वाईट होत चाललंय. 


आपला मुलींना conversion पासून रोखणाऱ्या वडिलांनाच न्यायालयाने दंड ठोठावला! 

Allahabad HC upholds religious conversion of two women, orders UP govt. and father to pay ₹25 lakh compensation 


"स्वतःला हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या पक्षाचे प्रचंड बहुमतातील सरकार १२ वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहे!"

"हो, पण तो न्यायालयाचा निर्णय आहे, त्यात सरकार काय करू शकणार?" 

"असं? मग राम मंदिर सुद्धा न्यायालयाच्या निर्णयानुसारच बांधण्यात आलं, त्यात पंतप्रधानानी  का श्रेय घेतलं?" 


In reply to by कांदा लिंबू

दोन प्रौढ मुलींनी आपला धर्म परिवर्तन केला. वडिलांनी पोलिसांच्या मदतीने ह्या दोन्ही मुलींना डांबून ठेवले. वर गुन्हा दाखल केला कि फसवून त्यांच्या धर्म बदलला होता. मुलींच्या वकिलांना Habeas corpus दाखल करावी लागली. त्याला सुद्धा राज्य सरकारने विरोध केला पण कोर्टाने तो मान्य केला नाही. धर्मपरिवर्तन कसेही केले असले तरी दोन प्रौढ मुलांना अश्या पद्धतीने डांबून ठेवण्याचा अधिकार वडिलांना नाही असा योग्य निर्णय सरकार ने दिला आणि वरून दोन्ही मुलींना नुकसान भरपाई द्यावी लागली.

आई वडील - हिंदू 
राज्य सरकार कुणाचे ? - तथाकथित हिंदुत्व मंडळींचे 
पोलीस कनॉनच्या ताब्यात - तथाकथित हिदुत्व लोकांचं ताब्यांत 
डांबून कुणाला ठेवले ? - हिंदू मुलींना ज्यांनी धर्म परिवर्तन केला होता. 
आता दंड आणि भुर्दंड कोणाला ? राज्य सरकार आणि हिंदू आई वडिलांना.

फसवून धर्मपरिवर्तन केले होते तर कुणा अब्दुल गब्दुलला अटक नसावी का इथे ? आता ते २५ लक्ष ह्यांच्या हाती जाणार.

विश्वगुरू धर्मातून धर्मपरिवर्तन हे नेहमीच कुणी तर फसवले म्हणून होते अशी गोड गैरसमजूत करून कायदे पास केले आणि पोलिसांनी इथे गुंड प्रमाणे वागणूक दाखविली कि हेच होणार.

 


In reply to by रीडर

सुधारणा: निर्णय कोर्टाने दिला असे वाचावे. चुकून सरकार म्हणून लिहिले. चूभूद्याघ्या ! 

 

टीप

मूळ धर्मांतरं चुकीचे होते कि नाही ह्यावर कोर्टाने निर्णय नाही दिला. फसवून धर्मांतराची के वडिलांनी केली आणि पोलिसांनी त्यांत तथाकथित व्हिक्टीम ला डांबले. इतर कुणाला नाही त्रास दिला. ह्यांतून मूळ कायदा हा सरकारी/पोलिसी गुंडगिरी साठी बनवला आहे असे वाटते. 


Screenshot 20260814 144145

 उगाच कशाला हात दाखवून अवलक्षण ! कॉक्रोच पोरांनी ह्यांचा limelight खेचला अन् हे येडे झाले


In reply to by वृषभ खोंडे

हा हा हा !!!

बाकी,

मैं तो रस्ते से जा रहा था 
मैं तो भेलपुरी खा रहा था
मैं तो लड़की घुमा रहा था 
तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ

हे पार्श्वसंगीत आणि पुढे मोदी, मेलॉनी, रागा, केजरी वगैरे लोक्स असा विडीओ दिसला होता, पाहून खुदकन हसू आलं पण तो सर्व प्रकार crass आणि bad taste  वाटला.

- (उच्च अभिरुची रसिक) कांदा लिंबू 
 


In reply to by कांदा लिंबू

अभिरुची उच्चच असावी फक्त ती सिलेक्टीव नसावी ! उद्या इंदिरा गांधींचे चारित्र्य वाईट होते म्हणून कोणी पुस्तक लिहिल अन् आपण ते बाबा वाक्यं प्रमाणं म्हणून अगदी सोयीने त्या बाईचे चरित्र चिरफाड करणार असू तर मात्र आपली अभिरुची उच्च नाही तर सोयीची म्हणवली जाईल इतके नक्की. 

 

मोदी मेलनी कंटेंट विरोधक. 🚫

 व 

इंदिरा गांधी चारित्र्यहनन विरोधक 🚫

 

 (अभिरुची उच्च असणे समर्थक, रसिक वाचक, विश्लेषक) वृषभ ऐसपैस गप्पा खोंडे.🙏🏾😇


In reply to by वृषभ खोंडे

It was first shared by an account impersonating the X account of the Italian Embassy in India.

https://www.thequint.com/news/webqoof/italian-embassy-statement-on-rahu…


पप्पूचा पांचटपणा आता तमाशात बतावणी करणाऱ्यांच्या पातळीला पोहोचलाय. 

 

अत्यंत उद्दाम वृत्ती, कर्तृत्वशून्य कारकीर्द, सतत येणाऱ्या अपयशातून आलेले वैफल्य आणि अंगी भिनलेला जन्मजात पांचटपणा यामुळे अत्यंत वेगाने अधोगती सुरू आहे. 

 

मोदींची २०२९ मध्ये पुनर्निवड आताच नक्की झाली आहे. 

 

 


In reply to by श्रीगुरुजी

२०२४ मध्ये २४० सीट आल्या म्हणून काय झाले ! आता २०२९ मध्ये ४०० पार होतील नक्कीच ! . वाट बघा. 

(व्यंगकार) खोंडू 

 

पॉईंट हा आहे की २०२९ हा २०२४ पूर्वीच्या निवडणुकांसारखा केक वॉक खचित नसेल भाजपला सुद्धा. ह्या संबंधी अजित भारती ह्या विश्लेषकाचे एक लघु चित्रफिती वक्तव्य (शॉर्ट व्हिडिओ) त्यातल्या त्यात बरे वाटले. प्रॉब्लेम मोदी येण्याशी नाही तर प्रॉब्लेम त्यांचे शहामृगांसारखे मातीत मुंडी घालून बसलेले भक्तगण वाटतात. 

 

बॉटम लाईन - मोदींना २०२९ मध्ये मेहनत करावी लागणार आहे भरपूर अन् बहुमत आणण्यासाठी तर विशेषच जास्त. परिसीमन करून हिंदी पट्ट्याच्या पदरात जास्त सीट घातल्या तरच काहीतरी होईल असे वाटते. पण एकंदरीत युपी निवडणुका २०२७ ह्या भाजप/ मोदी दोघांसाठी लिटमस टेस्ट असणार आहेत असे वाटते. 

(विश्लेषक) खोंडुवंत देशमुख.

 

पैज - २०२९ सार्वत्रिक निवडणुकीत जर भाजपने बहुमत (अगदी परीसीमन लागू करून सुद्धा) पार केले तर मी इथे सपशेल माफी मागेन आणि नाही केले तर अशी पैज आत्ता इथे जो कोणी लावायला तयार असेल त्याने इथेच सपशेल माफी मागायची 

(द्युतपटू गॅम्बलर गोविंदा) खोंडे


In reply to by श्रीगुरुजी

पप्पूचा पांचटपणा आता तमाशात बतावणी करणाऱ्यांच्या पातळीला पोहोचलाय. 

असे असेल तर राहुल गांधी ह्यांची बौद्धिक पातळी वाढली असेल. 

 

 मोदींची २०२९ मध्ये पुनर्निवड आताच नक्की झाली आहे.

 

विश्वघाबरू चे मुख्य कर्तृत्व हे कि विरोधक अगदीच गाढव आहेत.  



In reply to by गामा पैलवान

आपल्या इच्छेचा आदरच आहे गामा. माझे विधान करून झाले आहे, त्यामुळे ऑफर ओपन आहे. जे काही असेल/ होईल ते जनादेश म्हणून मानायची माझी दानत आहे. त्यासाठी त्याकाळी मी वोटिंग मशीनला पण दोष देणार नाही किंवा मतदाराला सुद्धा देणार नाही हे पण आत्ताच नमूद करतो. जो जनादेश असेल तो मान्य करायला तयार झाले की पैज लावायला पण काही वाटत नाही आणि माफी मागायला पण

 

 (भीष्म पितामह) खोंडे.


अमित मालवीयला लाथ बसली आयटी सेल प्रमुख पदावरून, कित्येक वर्षांनी भाजपकडून अतिशय स्तुत्य काम

चांगलेच झाले, ऑल कॅटल नो हॅट्स काम होतं मालवीय ह्यांचं एकंदरीत, नवनियुक्त दीपक म्हस्के ह्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा. ह्यांच्याकडून अपेक्षा असेल का किमान ह्यांनी तरी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट जॉर्ज सोरोस, फोर्ड फाउंडेशन इत्यादी आंतरराष्ट्रीय कॉन्स्पिरसी मध्ये न घुसता मुद्द्याला मुद्दा म्हणून हाताळून एक उत्तम उदाहरण सेट करावे.

(अभ्यासक) खोंडे.


In reply to by वृषभ खोंडे

NEET घोटाळ्यापेक्षा आपल्या इमेज ला तडा गेला ह्याला महत्व देऊन गोबीजींनी अमित मालवीय ह्यांना राजीनामा द्यायला लावला. कदाचित जुना टूलकिट मॉडेल आता कालबाह्य ठरवून आणखीन रेगुलेशन आणले जाईल असे वाटते. सोशल मीडिया हल्लीपर्यंत गोबीजींना अनुकूल होता म्हणून त्याचा उदोउदो होत होता. आता तो प्रतिकूल झाल्याने IAS बाबू ला प्रमुख भांड नेमले आहे. हि व्यक्ती बहुतांशी नवीन रेग्युलेशन आणू पाहिल.

पुढील मंकी बात मध्ये सोशल मीडिया चे दुष्परिणाम ह्यावर कदाचित सखोल भाषण होईल. 


In reply to by साहना

दिपक मस्के आय ए एस आहे ? 

बाकी मोदींना शिव्या देणे चूक आहे म्हणले तर आजवर जे उजव्यानी इतराजनांसोबत केले ते कसे बरोबर असणार ? 

राणा अयुब ही पत्रकार बाई आहे जी क्लिअरली ब्रदरहुड मेंटलिटी वर ऑपरेट करते, इस्लामिक revivalist असू शकते ही बाई, ठीक आहे !

 पण मग तिला मुद्यांशी मुद्द्यांवर हाणावी की, इंटरनेट वर सर्वाधिक वेळ "वेश्या" म्हणवली गेलेली बाई असावी ही ! बलात्काराच्या धमक्यांचा तर काय ठावच नाही !

ह्याच विषाची मात्रा मोदींना कॉक्रोच आंदोलनात मिळाली आहे, जे चूक आहे पण पेरले तेचि उगविले हे कोणाला चुकले आहे ? 


In reply to by वृषभ खोंडे

व्हेरिफाय केले नाही. चूक झाली ! म्हस्के हे नेहमीचे बाबू नसून प्राध्यापक होते. 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

+१ खरडफळा पाहिजेच!

कट्टर खरडफळावादी.

खरडफळा ७ दिवसाच्या आता आत आला नाहीतर मीपाच्या ऑफिसात घुसून खळ खट्याक करण्यात येईल. 😝


In reply to by अमरेंद्र बाहुबली

खरडफळा ७ दिवसाच्या आता आत आला नाहीतर मीपाच्या ऑफिसात घुसून खळ खट्याक करण्यात येईल. 😝

हिंसक मार्गाने मिळालेला खरडफळाच काय इंद्राचे सिंहासनही मला नको.

 

आचार्य चंद्रसूर्यकुमार बर्वे


 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

 

नवीन सभासदांना बुली करायला किंवा इग्नोरास्त्र मारून त्यांना त्यांची जागा दाखवायला? खरडफळ्यावर मिपाने स्पष्ट केला होता उद्देश्य पण त्याला हरताळ फासून खरडफळा व्हेपनाइज केल्या गेला होता, बरं, झालं उडाला, 

एका खास कंपुला जोवर पब्लिक इंटरेक्शन १०१ कळत नाही तोवर तो परत चालू होऊ नये ही परमेश्वर आणि मिपा प्रशासन चरणी प्रार्थना.


In reply to by वृषभ खोंडे

ज्यांना हे करायचं ते खरडफळ्याशिवायही करू शकतात ना  🙃


In reply to by श्वेता व्यास

पण एकंदरीत माणूस खराडफळ्यावर संवाद साधायला येतो, त्याचा declared हेतू (चालक मालक घोषित) सुद्धा तोच आहे/ होता असा आपला माझा समज होता बघा 🤣🤣😁😁


In reply to by वृषभ खोंडे

माझाही हाच समज होता/आहे, मी आतापर्यंत जे काही खफ वर लिहिलं ते याच समजातून लिहिलं आहे. पण तुम्हाला ज्यांना हे करायचं ते खरडफळ्याशिवायही करू शकतात याची प्रचिती आली का 😊


ठार वेडा झालेल्या ट्रंपने अमेरिकेचा एक नकाशा प्रसिद्ध करून त्यात होर्मुझ खाडी अमेरिकेचा भाग असल्याचे दाखविले आहे.


In reply to by श्रीगुरुजी

तात्यांनी काहीतरी कारण म्हणून दाखवला असावा, तात्या उगाच काही करत नाही, तात्याना ठार वेडा म्हणण्याआधी तात्यांच्या कृतीमागचा कारणीकारण भाव समजून घ्या! उगाच नाही तात्या अमेरिकेचा अध्यक्ष झाला.


In reply to by अमरेंद्र बाहुबली

तात्यांच्या कृतीमागचा कारणीकारण भाव समजून घ्या! 

 

तुम्ही अज्ञ पामरांना तो समजावून सांगावा ही णम्र  पन हाग्रहाची इनंती.


In reply to by राज जोशी

तात्या हा साधाभोळा माणूस, साधी राहणी उच्च विचारसरणी ह्याला अनुसरून तात्या नेहमी आपल कोट टाय घालून राहतो, कधीही बर्म्युडा टी शर्ट अशी चैन करत नाही. असा साधा भोळा माणूस सरळ अमेरिकेच्या अध्यक्षपदी बसतो हे पाहून अनेकांच्या पोटात दुखतय, तात्यांनी अनेक युद्धे थांबवली, भारतातल्या एकाला दम भरला नी भारत पाक युद्ध थांबवलं, रशिया युक्रेन युद्धत मध्यस्थी केली. आता इराण ऐकेना म्हणून नकाशा आडून तात्यानी भविष्यात हरमुझ खाडीचा आम्ही ताबा घेऊ शकतो असा इशारा इराण ला दिलाय, हाच काय तो कार्यकारणी भाव. पण तात्या मनान लई चांगला, हरमुझचा ताबा काय तात्या घेत नसतो व भारत सरकारला ह्या संधीचा फायदा उचलून आणखी १५ रुपये पेट्रोल चे भाव वाढवूदेत नसतो, ह्या उद्वेगातूनच अनेक लोक तात्याला शिव्याशाप व्हावू लागलेत. त्यामुळे आमच्या सारख्या तात्यावाद्याना उत्तरे द्यावी लागतात. तात्यवादाचा प्रसार व्हावा हाच आमचा हेतू. जगाला तात्यांच्या विचारांची  आणी तात्यावादाची गरज आहे.

:- तात्यावादी बाहुबली. 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

अच्छा ! चांगला अभ्यास आहे तुमचा. असे प्रतिसादातूनच प्रचार करण्याऐवजी लेखमाला का लिहीत नाही? तात्यांचे विचार पुष्प.. भाग `१ ते जेवढे जमतील तेवढे?

 

तितकेच आम्हाला एआय ला कामाला लावता येईल... तात्यांचे विचार आणि जेनझी आंदोलनाच्या गाभ्यातील फरक स्पष्ट करुन सांगा वगैरे इत्यादी


In reply to by राज जोशी

जसे एका षट्पञ्चाशत् वर्षीय नवयुवकाचे भक्त त्याच्यासारखेच यडछाप, तसेच तात्याभक्तही तात्यासारखेच यडे. 

 

हा षट्पञ्चाशत् वर्षीय नवयुवक आणि तात्या हे दोघेही मेलनीवर खार खाऊन आहेत. हा षट्पञ्चाशत् वर्षीय नवयुवक धावत जाऊन आपल्या सेवकाला घट्ट मिठी मारून मिठीत जखडून ठेवतो, तेव्हा तो सेवक विचारतो मेलनी समजून मला मिठी मारली का. तर तात्या बरळतो की आपली घसरलेली लोकप्रियता सावरण्यासाठी माझ्यासमवेत प्रकाशचित्र काढण्यासाठी मेलनी कासावीस झाली होती. 

 

हा षट्पञ्चाशत् वर्षीय नवयुवक सांगतो की मोदींना माझे भय वाटते, मोदी माझ्या भयाने रात्री झोपू शकत नाहीत, मोदी माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत. तर तात्या सांगतो इराण शस्त्रसंधीसाठी विनवणी करतोय, इराणचा सर्व शस्त्रसाठा संपलाय, इराण पहिल्या तासातच युद्ध हरला.

 

तात्याभक्त आणि या षट्पञ्चाशत् वर्षीय नवयुवकाचे भक्त आंधळेपणे मान डोलवित एकमेकांस टाळ्या देतात.


In reply to by श्रीगुरुजी

नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद येथे रोड शोचा रंगारंग कार्यक्रम, माय फ्रेंड डोलांड इत्यादी म्हणणारे आद्य तात्यभक्त (तेच ते पञ्चसप्ततिवर्षोप्येकः नवयुवक) मोजले नाहीयेत का ? नसल्यास का ?

 

तसेच सप्टेंबर २२, २०१९ रोजी एन.आर. जी. स्टेडियम, ह्यूस्टन, टेक्सास नामक ठिकाणी अबकी बार ट्रम्प सरकार असे ठासून प्रतिपादन करणार महान तात्यभक्त इथे जमेस धरले नाहीये का ? 

 

आठवणी ताज्या करायला हे खालील व्हिडिओ चूर्ण पुरेसे असेल, नसल्यास शंखपुष्पी घेण्यावर विचार करू शकला जाऊ शकतो.

 

 


In reply to by कांदा लिंबू

नंतर त्याने लावला धडाका उचलून डिपोर्ट करायचा (ते पण हाती पायी साखळदंड लावून) मग आली का पंचाईत !


In reply to by श्रीगुरुजी

अगदी हल्ली पर्यंत गोबी भक्त तात्यांच्या पायाची धूळ मस्तकाला लावण्याची स्पर्धा ठेवत होते. त्यांच्या प्रेषित गोबीनी मोठ्या सभा वगैरे भरवून "माय फ्रेंड डोलड" वगैरे घोषणा केल्या होत्या (विनाकारण). तात्या आणि आपले गोबी कसे घनिष्ट मित्र आहेत, दोघेही मिळून डीप स्टेट ला नष्ट वगैरे करतील आणि ढोलकपूर मध्ये शांती आणतील अश्या दर्पोक्ती ह्यांनी केल्या होत्या. आता डोलूंड हेच डिप स्टेट आहेत आणि अचानक ते डावे, पप्पू ह्यांचे मित्र आहेत अशी एकदम एकता कपूर धाटणीची ट्विस्ट आणली आहे.

मिपा वर अनेक वर्षे मागे मी राम माधव हे भाजीपाव पक्षांतील प्रथम क्रमांकाचे मूर्ख आहेत (द्वितीय क्रमांकावर पियुषजी गोयल) असे लिहिले होते. काश्मीर मध्ये ह्यांनी गोंधळ घातला, ईशान्य भारतांत गोंधळ घातला आणि अमेरिकेत सुद्धा जाऊन ह्यांनी आपले हसे करून घेतले आहे. आता हे वाचाब्रहस्पती पुन्हा भाजप कार्यकारिणीत आले आहेत. ह्यावेळी कदाचित प्रोमोशन झाले असावे.

राम माधव ह्यांनी conservative कॉन्व्हेंशन मध्ये जाऊन आपले हसे करून घेतले होते. ट्रम्प ह्यांच्यावर त्यांनी अनेक वेळा स्तुती सुमनांचा वर्षाव केला आहे.

> As he returns to power as an experienced and determined leader, Trump is reiterating that commitment... No other American leader  has generated so much anticipation and anxiety in recent history. The liberals may continue to jeer and sneer, but Trump 2.0 is going to be an agenda-setting event for the entire world. Unlike in the past, the trump card of President Trump will be his structured disruptions.

तात्यांच्या पार्टीला अमेरिकेत conservative म्हणतात. भारतात भाजीपाव स्वतःला conservative समजतात त्यामुळे आपल्या दोघांत काही वैचारिक समानता आहे अशी गोड समजूत राम माधव आणि इतर भाजीपाव पक्षाची होती.

त्यामुळे पप्पू आणि इतर लोकांवर तात्यधार्जिणे किंवा CIA हस्तक असण्याचे आरोप करण्यापेक्षा राम माधव conservative कॉन्व्हेंशन मध्ये का गेले होते ह्यावर विचार करणे गरजेचे आहे.

तात्यांचे चरणामृत प्राशन करण्याच्या स्पर्धेंत पहा गोबीजी ह्यांची वक्तृत्व शैली कशी प्रखर पणे जाणवून येते  :

>He has already made the American economy strong again. He has achieved much for the United States and for the world... We in India have connected well with President Trump... He has left a deep and lasting impact everywhere.

** deep and lasting impact everywhere ** इथे कदाचित आपल्या पार्श्वभागाची आठवण येत असावी.

> तर तात्या बरळतो की आपली घसरलेली लोकप्रियता सावरण्यासाठी माझ्यासमवेत प्रकाशचित्र काढण्यासाठी मेलनी कासावीस झाली होती.

ट्रम्प सोबत फोटो काढण्यासाठी कोण कासावीस झाला होता आणि आपली अब्रू घालवून बसला हे पाहायचे आहे का ? त्याचे उत्तर आहे भाजप युवा नेते तेजस्वी सूर्या. ह्या तेजस्वी सूर्यानी स्वतःला झिरो बल्ब करून घेतले.

शशी थरूर ह्यांच्या अध्यक्षतेखाली गोबी साहेबानी ऑपरेशन सिंधूर विषयी बोलायला अमेरिकेत आपले मंडळ पाठवले. चाणाक्ष लोक विचारतील कि सत्ताधारी पक्षाला विरोधी बाजूतील नेता का पाठवावा लागला. किंवा भारतीय ऑपरेशन ला "explain" करण्यासाठी विदेशांत कुणाला पाठवायची गरजच का ? पण ह्या लोकांना मोदीद्वेषी वगैरे म्हणून आपण साधय बाजूला सारू.

ह्यांत मिलिंद देवरा ह्यांनी ट्रम्प जुनिअर ची भेट घेऊन फोटो प्रकाशित केले. हे पाहून सूर्या ह्यांचा जळफळाट झाला. त्यांनी "मला सुद्धा पाहिजे" हा हट्ट धरला. ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी "मी थेट तात्यांना भेटणार' अशी गर्जना केली. पण हे करून देणार कोण ? तिथे एक व्यक्ती जिचे नाव मला ठाऊक आहे (पण मीडियाने कुठेच त्यांचे नाव घेतले नाही म्हणून मी सुद्धा लिहिणार नाही पण ती महिला आहे ) तिने आपले वजन वापरून ह्या झिरो बल्ब ला फ्लोरिडा मधील मार-लागो मध्ये नेले. पण ट्रम्प ह्यांनी भेटणे सोडाच तर अत्यंत शेलक्या शिव्या देऊन झिरो बल्ब ची अक्षरशः हकालपट्टी केली. मार-लागो मध्ये खरोखर मार लागला. रडवेले होऊन सूर्या ह्यांनी थेट दिल्लीचा रस्ता धरला.

दिल्लीमध्ये गोबीजींनी खुद्द ह्या विषयाची दखल घेऊन सूर्या ह्यांना आणखीन फटकारले. पार्टीतून काढून वगैरे टाकण्याची चर्चा सुद्धा झाली. पण शेवटी त्यांच्या विनवण्यांनी क्षमापुरुषाला पाझर फुटला.

---

तटस्थ पणे पाहता, तात्यांची चाटण्यात भाजीपाव पक्ष, संघ परिवार आणि त्याच्या नेत्यांत नेहमीच चढाओढ दिसून आली आहे. तात्यांची स्तुती करण्यात भारतीय डावे, पप्पू आणि त्याची पार्टी, किंवा इतर कुठल्याही पार्टीने कधीही रस दाखविल्याचे कधीच दिसून आले नाही. पप्पू आणि डाव्यांची आपली पापें खूप आहेत पण तात्यांच्या पादयोः अधः रजः ला कपाळावर अर्चन करणे हे पाप त्यांनी केले नाही किंवा तसे काहीच पुरावे नाहीत. गोबीजी सरकारची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मालिन व्हावी हे शेलके काम ह्या मंडळींनी केले आहे पण त्यांत कधीच पक्षपाती पणा किंवा विदेशी नेत्यांविषयी विशेष प्रेम कधीच नव्हते. तो दोष १००% भाजीपाव वाल्यांचा आहे.

उलट तेजस्वी सूर्या ह्यांचे झिरो बल्बकरण जे झाले त्याचा मुद्दा मोठा करून गोबीजींना कोंडीत पकडणे थरूर इत्यादी ना शक्य होते, पण राष्ट्र हित लक्षांत घेऊन कुणीच त्याचा बाऊ केला नाही. त्यामुळे ते स्तुतीस पात्र ठरतात.

-

बहुसंख्य भारतीय लोकांना तात्या, इराण, युक्रेन, पुतीन ह्यांच्याविषयी विशेष प्रेमद्वेष नाही. कुणाला फरक सुद्धा पडत नाही. युक्रेन नष्ट झाला किंवा पुतीन ह्यांनी आत्महत्या केली, किंवा अमेरिकन carrier नष्ट झाली किंवा इराण जमीनदोस्त झाला इथे भारतीयांना फरक तो काय ?

अन्नाची भेसळ, वाढत भ्रष्टाचार, कोलमडणाऱ्या पायाभूत सुविधा, महागाई, शिक्षव्यवस्थेची दुरावस्था, औद्योगिकरणाच्या पीछेहाट, सरकारी नोकरांची मग्रुरी, नोकऱ्यांची कमतरता इत्यादी समस्या सोडून भाजीपाव मंडळी सध्या तात्या, पुतीन, इराण, अमेरिकन क्षेपणास्त्राचा तुटवडा, अमेरीकन जहाजावर मारामारी ह्यावर लक्ष केंद्रित करून आहेत कारण काय ? तर सोनम गुप्ता ला प्रोपोज केल्यांनतर तिने अपमान करून हाकलून दिले म्हणून चंदू तिवारी पुरुष प्रसाधन गृहांत जाऊन कोळशाने "सनम गुप्ता बेवफा है" असे लिहून ठेवतो त्यातलाच हा प्रकार आहे.

 

 

 

 


In reply to by साहना

दाखवाया उजेड गावंत ते दवंडी पिटवूनी गेले 
येताना चार दमड्यासाठी स्वतासी विकुनी आले 


In reply to by श्रीगुरुजी

तात्याभक्त आणि या षट्पञ्चाशत् वर्षीय नवयुवकाचे भक्त आंधळेपणे मान डोलवित एकमेकांस टाळ्या देतात.

यात एक बारीकशी अडचण आहे. भारतातील तात्याभक्त त्या नवयुवकाचेही भक्त असतात. ते दोन वेगळ्या लोकांचे समूह नाहीत. मग ते एकमेकांना टाळ्या कसे देणार?


 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

फक्त २०१९ मध्ये ट्रम्प करता पायघड्या घालणारे लोक आज त्याला राहुल गांधीच्या पंगतीत बसवतात ह्याचा अर्थ काय ? ते पण सांगा, आणि एकेकाळी आपले मिसळपाव शुभनाम पण ट्रम्प होतेच न ? तेव्हा काय आपण पण राहुल गांधी भक्त होता का काय ?


In reply to by चंद्रसूर्यकुमार

मुद्द्यात पॉईंट आहे.‌ ते एकमेकांना टाळी देतात किंवा स्वतःच्या उजव्या हाताने डाव्या हातावर तळहात मारून स्वटाळी देतात.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

काही बाही !  ह्याला पुरावा काय ?

उलट किमान अमेरिकेत howdy मोदी साठी संघ परिवाराने आपल्या लोकांना विनंती केली होती. असंख्य संघ वाले त्या प्रोग्रॅम साठी तर गेले होतेच पण ट्रम्प साठी वैयक्तिक कॅपॅसिटी ने प्रचार सुद्धा करत होते. नेहमीच्या पप्पू प्रेमी अमेरिकन-भारतीयांनी तात्यांचा विरोध केला होते हे स्पष्ट आठवते. उलट संघाचे प्रचारक आणि विशेषतः राम माधव हे ट्रम्प धार्जिणे वाटत होते.

ह्या शिवाय भाजप आणि संघ परिवारातील किती लोक ट्रंम्प धार्जिणे होते आणि आता हळूच about turn करून तो मी नव्हेच हि भूमिका घेत आहेत ते पहा :

विजय चौथाई वाले , भाजीपाव विदेशी संपर्क प्रभारी ह्यांनी ट्रम्प समर्थन करण्यासाठी online इव्हेंट ठेवला होता तो ऐनवेळी त्यांना रद्द करावा लागला : 
https://www.thehindu.com/news/international/former-bjp-leaders-trump-ev…


Overseas Friends Of BJP मंडळी ट्रंम्प साठी प्रचार करत होती आणि त्यामुळे कायदेविषयक समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून लोकांनी सभासदांनी व्यैयक्तिक पातळीवरच प्रचार करावा असे ह्यांनी सांगितले होते. अर्थांत कुठल्याच मीडिया मध्ये हि मंडळी "ट्रम्प समर्थन" करताना दिसली नसली तरी २०१४ पासून व्हाट्सअप्प आणि इतर खाजगी माध्यमातून हि मंडळी कुणाचा प्रचार करत होती हे किमान मला तरी ठाऊक आहे. ह्यांच्या काही मंडळींनी सार्वजनिक रित्या कमला ह्यांच्यावर टीका केली होती म्हणून त्यांना नंतर स्पष्टीकरण सुद्धा द्यावे लागले होते.

https://scroll.in/global/973063/explainer-why-the-overseas-friends-of-b…


> Modi even seemed to tacitly endorse Trump, saying “ab ki baar, Trump sarkar” (‘this time, Trump’s government’) at a rally in Houston, Texas in 2019. Although the party tried to claim that Modi was simply referring to Trump’s use of the term – which is a reference to the Indian prime minister’s campaign tagline from 2014 – in 2016, it was hard to see it as anything but an endorsement.


शलभ कुमार हि संशयास्पद व्यक्ती अमेरिकेत हिंदू रिपब्लिकन कॉइलिशन चालविते.  ह्यांनी ट्रम्प ह्यांना भरपूर डोनेशन दिले आहे आणि हिंदू रिपब्लिकन कॉन्व्हेंशन  मध्ये खुद्द ट्रम्प ह्यांना बोलावले होते. शलभ कुमार आणि HRC हि थेट संघाची शाखा नसली तरी ह्यांनी नरेन्द्र मोदी ह्यांना समर्थन दिले तर होतेच पण २०१३ पासून शालभ कुमार नरेंद्र मोदी ह्यांच्या संपर्कांत आहेत आणि आणि मोदी ह्यांना स्वतःचे "प्रेरणा स्थान' म्हटले आहे. त्याशिवाय मोदी ह्यांना त्यांनी "भारताचे रेगन" असे सुद्धा म्हटले होते.  राम माधव ह्यांना अमेरिकेत शोभा करून घेण्यासाठी बोलावण्यात शलभ ह्यांचा हात आहे.

भारतांत मी कधीच काँग्रेसी, डावे किंवा इतर कुठल्याच मंडळींना, अगदी गोव्यातील माझ्या ख्रिस्ती मित्रांना सुद्धा ट्रम्प ची वैयक्तिक स्तरावर स्तुती करताना पाहिले नाही. अगदी आधीपासून आणि आजपर्यंत सर्व मंडळींची, त्याच्या कंपूतील मीडिया आणि विचारवंतांची भूमिका हि ट्रम्प विरोधी आणि डेमोक्रॅट धार्जिणी राहिली आहे. तथाकथित पप्पू प्रेमींनी सरेंडर मोदी वगैरे शेलक्या विशेषणांनी मोदींवर टीका केली असली तरी ट्रम्प ह्यांची स्तुती किंवा तुम्ही म्हणता तशी भक्ती केलेली कुठेही आढळून आलेली नाही.


त्यामुळे उगाच काहीही फँटसी करून त्या तथ्य म्हणून खपवू नका 


In reply to by श्रीगुरुजी

uss अब्राहम लिंकन ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युद्धनौकेवरच्या सैनिकांची भीतीने गाळण उडाली आणि मनोधैर्य खचल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे प्रयत्न केले. याशिवाय नौकेवरचे निकृष्ट दर्जाचे अन्न आणि क दर्जाच्या सुविधा ह्यामुळे सैनिक हताश झाले. ह्या सगळ्याची परिणती म्हणून लिंकन युद्धनौकेने माघार घेतली आहे. झालेली बदनामी लपवण्यासाठी तात्या ट्रम्प बळेच नकाशावर रेघा ओढून मनाचे समाधान करून घेत आहे. 
ह्या बातम्या अमेरिकन मिडियमधूनच प्रसिद्ध झाल्यामुळे अमेरिकन जनता हताश झाली आहे. राजवाड्याच्या टोकावर बसला म्हणून कावळ्याला गरुड होता येत नाही हे तात्या ट्रम्पने खरे करून दाखवले.


In reply to by अप्पा जोगळेकर

वरचा प्रतिसाद वाचून झिंगुरवाडी बुद्रुक येथून प्रसिद्ध होणा-या दैनिक डुंगरटांगचे संपादकीय वाचल्यासारखे वाटले.