Skip to main content

चल कही दूर निकल जाये.....(४)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/08/2026 08:25 या दिवशी प्रकाशित केले.

 एक दोघेजण, कुछ भी नही. मारामारी हुवाच नही.   कुछ मजा नही आया. असे त्यांच्या त्यांच्या डच , चिनी , फ्रेंच, स्वाहीली, माओरी किंवा तत्सम भाषेत  बोलत  निराशेने पुन्हा झोपले.

माझी मात्र झोप पुर्ण उडाली आहे. आजच काय पण पुढच्या आठवडाभर तरी झोपू शकेन असे वाटत नाही. इतका जोरदार धक्का आहे हा.

 मागील दुवा चल कही दूर निकल जाये ...( ३) | मिसळपाव

सुहास  अशी भेटेल असे  स्वप्नातही  मला कोणी सांगितलेअसते ना तर मीत्या माणसाला थेट हिंदी सिनेमाचे लॉजिक लिहायला बसवले असते.

कल्पनेलाहीकाहितरी मर्यादा असतात. पण कल्पनेपलीकडले म्हणजेकाय हे असते तेआत्ता प्रत्यक्ष अनुभवतोय.

मी मला चिमटा काढतो. आय....... स्वत: स्वत:ला चिमटा काढलातरी तो जोरात बसतो . त्याला आपपर भाव सतो. हे पण अनुभवतोय.

" हवे असेल तर  मदत करू का? मी काढतेा चिमटा तुला"  सुहास मला विचारतेय. तीच स्टाईल.....  थोडेसे हसत समोरच्याला थेटडोळ्याला डोळा भिडवत जे विचारायचे ते विचारायचे. एकदम कॉन्फिडन्स ने

मला बसलेला चिमटा या वरून मी वास्तवात आहे. स्वप्नात नाही. हे नक्की पण सुहास माझ्या   समोर उभी आहे. हे नक्की काय आहे समजतनाही. मी बहुतेक ट्वायलाईटझोन मधे आहे. स्वप्नवासवदत्तानावाचे एक संस्कृत नाटकआहे. माझ्या अवस्थेचे वर्णन लिहायचे झाले तर तेस्वप्नवास्तव दत्त  असे करावे लागेल.

.. काय झाले. तू वास्तवात आहेस. स्वप्नात नाही. मी खरी आहे. आणि तु देखील. सुहास माझ्या खांद्यावर थापटी मारते.

ओह्ह्ह . तू इथे भेटशील असा स्वप्नातही कधी विचार केलानव्हता.

पण भेटलेय ना? ते ही प्रत्यक्षात. आपण स्वप्नेही बघतो ती आपल्याला झेपतील अशीच. स्वप्नातही आपल्याला आपल्या क्षमता तोडता येत नाहीत.तूच काय पण मी ही असा कधी विचार केला नसता.आपल्या स्वप्नानाही मध्यवर्गीय मर्यादा असतात. 

हो ना. ... मी माझ्याशीच बोलतोय असा पुटपुटतो.

कसा आहेस? किती वर्षे झाली असतील ? सात? आठ? सुहास विचारते.

सात वर्षे आणि पाच महिने. आणि पाच दिवस मी मनातल्या मनात उत्तर देतो.

तुला आपली शेवटची भेट आठवते? जो प्रश्न विचारायला मी टाळतो तोच प्रश्न ती विचारते.

हो आणि नाही...... मी काहीच बोलत नाही. मला त्याबद्दल विचारही करायचा नाहिय्ये.  

पुढचे काही क्षण आम्ही दोघेही गप्प. ती बहुतेक उत्तराच्या अपेक्षेत.आणि मी नव्या प्रश्नाच्या अपेक्षेत.

 तीच्याकडे नवा प्रश्न नसावा बहुतेक. ती माझ्या चेहेऱ्याकडे पहातेय. मला तीची नजर जाणवते. त्यातली धार अजूनही तस्शीच आहे.

माझे मन मागे जाते एकदम फ्लॅश्बॅक मधे. हिंदी सिनेमात दाखवतात तसे शॉट डिझॉल्व होत. 

मॅनेजमेन्ट कॉलेजमधे आलेले सगळेच जण स्वत:ला पीटर ड्रकर समजत असतात. प्रत्येकाच्या डोक्यात कॅंपस मधून च सिलेक्षन,काही लाखाचे पॅकेजवाला  कॉर्पोरेट जॉब. एक्सेल   रीपोर्ट्स ,  ॲनालिसीस , डिसीजन मेकिंग, बोर्ड रूम , कोट टाय घातलेले डिरेक्टर्स, प्रोजेक्टरवर चाललेले बान वर खाली दाखवणारे आलेख,ते प्रेझेंट करत चाललेली जोरदार डिस्कशन्स  अशी हिंदी आणि इंग्रजी सिनेमामधली काही चित्रे डोक्यात एकदम फिक्स असतात. आपण मॅनेजमेंट कॉलेजला आलोय याचा अर्थ हे सगळै आपल्याला मिळणार याची प्रत्येकाला खात्री असते.  मार्केटिंग वाले जिंगल्स च गात असतात.

पण जेंव्हा पहिली असाइनमेंट  तीही  स्टॅॅटेस्टिक्स ची   मिळते तेंव्हा  स्वप्नांच्या फळ्यावरची चित्रे पुसली जायला लागतात.  आपण कुठेतरी जाऊन सर्व्हे करतो. लोकाना प्रश्न विचारतो. लोक आपल्याला हाडुतहुडूत करतात. नीट उत्तरे देत नाहीत. हा धक्का पचवल्यानंतर आपण एक रीपोर्ट तयार करतो.  आपण खूप काहीतरी मोठे केलंय या समाधानात तो सबमिट करतो. प्रेझेंट करतो प्रेझेंटेशन सुरू करताना प्रत्येकाची सुरुवात एकदम कडक कोल्हापुरी-जगात भारी   अशी  असते.  पण ग्रूप डिस्कशनमधे त्या रीपोर्टमधून कसलाच निष्कर्ष निघत नसल्याची जाणीव होते. तो आपल्याला पहिला धक्का असतो. पुढच्या दीड एक वर्षात असे अजून बरेच धक्के बसणार असतात.याची पुसटशी कल्पना येऊन  आपल्या डोक्यातल्या मार्केट डिसरप्शन वगैरे च्या कल्पना भुईसपाट होतात.

त्या गृप असाइनमेंट  मधे माझ्या ग्रुप मधे  एक मुलगी. कुरळे अगदी त्या बोनी एम मधल्या बॉबी फारेल इतके नाही पण  जॉन मॅकन्रो सारखे  म्हणता येतील. इतके कुरळे केस.  नजर रोखली तर धग जाणवावी इतके  पिंगट डोळे. आम्ही पाचजण होतो. तरीही सर्वात जास्त बोलणारी, ग्रुप डिस्कशन मधे हिरीरीने आपली मते मांडणारी. वर्गात शंका बिंदास विचारणारी  सुहास. तीच्या ग्रुप मधे असण्यानेच ग्रुपची एक वेगळीच ओळख झाली.  तीच्यामुळे कॅंम्पसवरचे सगळे प्राध्यापक आम्हाला ओळखायला लागले. 

खरेतर इन्स्टिट्यूट  मधे आलेला प्रत्येक जण अटीतटीच्या स्पर्धेतून जिंकून आलेला असतो. आणि मुळातच इथे खूप कमी विद्यार्थ्याना प्रवेश मिळतो. त्यामुळे तसे प्रत्येकजण पुढे काय करायचे हे ठरवूनच आलेला असतो. पण हीची मते काही वेगळीच. इन्स्टिट्यूट च्या इन्ट्रो च्या वेळेस ती म्हणाली की आज आपण ज्या परिस्थितीत आहोत ती दोन वर्षानी असणार नाही. त्यामुळे आपण काय होऊ हे आजच ठरवणे  शक्य नाही. सगळ्यांच्या लक्ष्यात रहायचे कारण म्हणजे तीने ॲलिस इन वन्डरलॅंड मधले एक वाक्य सांगितले. तीची अवस्था ॲलिस इन वंडरलॅंड मधल्या ॲलिस सारखी आहे. समोर दोन रस्ते दिसले .ॲलिस ने चेशायर  मांजरीला विचारले की मी कोणता रस्ता घेऊ. मांजर म्हणाली की  ते तुला कुठे जायचे आहे त्यावर अवलंबून आहे. ॲलिस म्हणते की कुठे जायचे आहे ते तीने ठरवलेले नाही. मग मांजर म्हणते की  मग कोणताही रस्ता निवड त्याने काहीच फरक पडणार नाही. तु कुठेतरी पोहोचशीलच.

त्या एका मुद्द्यावरून सगळेजण बरेच हसले. बहुतेक सुहासने सगळ्यांच्या मनातली भावना बोलून दाखवली. पण त्या एका वाक्याने सुहासच काय पण आम्ही सगळेच ॲलिस इन वन्डरलॅंड झालो.  

दोन वर्षाच्या अभ्यासक्रमात सगळेच जण स्वत:च्या असाइनमेन्ट करण्यात प्रत्येक जण इतका बीझी असतो की प्रत्येकासाठी सगळे जग , मी माझे आणि माझ्याबद्दल . आय मी ॲन्ड मायसेल्फ  , या तीन शब्दात सामावलेले असते.

सर्व्हे, रीपोर्ट्स ,  ग्रुप डिस्कशन, पेपर प्रेझेंटेशन , त्यांचे ॲनालिसीस, कधीतरी तीन महिन्यानी येणारी इंटर कॉलेज  फेस्ट, त्यात इतर इन्स्टिट्यूट मधून आलेल्या पोरांचे पेपर्स प्रेझेंटेशन्स , दर आठवड्यात होणारे कॉर्पोरेट गेस्ट लेक्चर तेही  एखाद्या  बड्या कॉर्पोरेट मधला डिरेक्टरचे , चेअरमनचे,  गव्हर्नमेंट मधला कोणी पॉलिसी मेकर चे,  त्यांच्या  स्ट्रेटेजीसचा स्टडी , त्याचे रिझल्ट्स ,रेग्यूलर असाईनमेंट्स, पेपर्स या सगळ्यांनी  प्रत्येकाचे  जग भरून वहात असते. असते.  यात एक जरी नवीन गोष्ट आली की नकोशीच वाटते.  अगदी रोजचे वर्तमान पत्र इकॉनॉमिक टाईम्स ऐवजी  टाईम्स ऑफ इन्डिया ही वाचायला लागले की  नको वाटते. जग हे एक मोटःठे कॉर्पोरेट आहे.   त्यातली प्रत्येक गोष्ट नफा आणि तो वाढवण्यासाठी पॉलिसी ठरवणे यासाठीच असते. असा ठाम विश्वास वाटायला लागतो. जगात देवा नंतर हेन्री फोर्ड , वॉरेन बफे, जेफ बेझोस, स्टीव्व्ह जॉब्ज.  मुकेश अंबाणी , हेच ते काय प्रात:स्मरणीय .  सकाळी उठल्यापासून डोक्यात तेच. वर्गात एकमेकांच्या बोलण्यात , कॅन्टीन मधे चर्चा त्याचीच. आमच्या स्वप्नातही तेच येत असावेत बहुतेक. या  सगळ्या गदारोळात इतर कोणताच विचार यायला घाबरेलच. वाचन वगैरे ही फक्त मॅनेजमेंट च्या पुस्तकांचे. कोणाच्या ही बॅगमधे पुस्तक सापडले तर फोर्ब्स मॅगझिन मधल्या सगळ्या बिझनेसेस च्या स्ट्रेटीजीस चेच असणार.   

आमची सगळ्यांची डोकी ऑफसेट प्रेसमधे बुकलेट छापावे तसे एकाच विचारानी छापलेली. स्पर्धा जीवघेणी स्पर्धा. " यशस्वी होणे"  इथे जगण्याचा  एकमेव मंत्र.

 आठ वर्षांपूर्वी जगलेले  ते आयुष्य. सगळे क्षण माझ्या डोळ्या समोर नाचायला लागले. 

कोणीतरी मला हातावर थापटी मारतंय. मी भानावर येतो.

ए... काय झाले..... कुठे हरवलास? सुहास मला विचारतेय.

चल कही दूर निकलते है: चकोर शाह

क्रमश

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 193
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वाचत आहे, सुहासचं कथा नायकाच्या आयुष्यात ती इतकी लक्षात राहण्याइतकं काय महत्त्व असेल याची उत्सुकता आहे.