Skip to main content

तुझी माझी प्रित

लेखक जागु यांनी शुक्रवार, 22/05/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी प्रित राधा कृष्णाची रास व्हावी वेणू च्या नादी तुझ्या माझ्या पैंजणांची छूमछूम झंकारावी. तुझी माझी प्रित राम सितेचा आदर्श व्हावी वनवासातील पर्णकूटीलाही तृप्ततेची झालर झळकावी. तुझी माझी प्रित गौरी-शंकरासम पुण्य व्हावी हिमालयाच्या शिखरावरही तुझी माझी प्रित नांदावी. तुझी माझी प्रित विठोबा-रखूमाई भोळी वसून स्वतंत्र मंदीरी जय जय विठोबा-रखुमाई गर्जावी.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2977
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मस्त आहे कविता...खुप आवडली.

तुझी माझी प्रित राम सितेचा आदर्श व्हावी वनवासातील पर्णकूटीलाही तृप्ततेची झालर झळकावी. ह्या ओळी विषेश आवडल्या.. :) पती पत्नी चा एकमेकावर विश्वास आणी प्रेम असेल तर कोणतेही संकट त्यांच्यासमोर टिकु शकत नाही. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

सगळीच कविता आवडली. या ओळी जास्त आवडल्या. तुझी माझी प्रित गौरी-शंकरासम पुण्य व्हावी हिमालयाच्या शिखरावरही तुझी माझी प्रित नांदावी. खरंच इतकं अद्वैत असावं पतिपत्नीच्या नात्यात! क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** अग्निसखा

काजुकतली, मराठमोळा, क्रांती धन्यवाद.

तुझी माझी प्रित राधा कृष्णाची रास व्हावी वेणू च्या नादी तुझ्या माझ्या पैंजणांची छूमछूम झंकारावी. छान!

तुझी माझी प्रित राम सितेचा आदर्श व्हावी हे पटले नाही. एका धोब्याच्या सांगण्यावरून आपल्या गरोदर पत्नीला घराबाहेर काढणारा राम काय कामाचा? हे कृत्य तर रावणाने केलेल्या सीताहरण कृत्यापेक्षा भयंकर आहे..! तात्या.

छान आहे कविता........ :) प्रीत कोनचिका आसेना...........विश्वास महत्वाचा... नाहि का......!! ते म्हण्तात ना...... १ आग का दर्या है डुब के जाना है....!! ;) जे त्या आगित जळाले आसतिल त्याना बरोबर कळाले आसेल नाहि का :)) आसो...पण १ दा तरी प्रेम कराव्...नाहि का :\ ;;)