दिसतील त्या गोष्टी पाहायच्या,
नजरेआड होताच विसरायच्या,
आठवणी ताज्या करायच्या…
धुक्यात चालताना…
अशीच भेट झाली
नजरेसमोर आली
हवेत विरून गेली
धुक्यात चालताना…
तरीही जिवंत आहे ,
धुक्यात हरवलेला…
भले परतलो मी
धुक्यात चालताना…
धुके विरून गेले
जरी चिरून गेले
लोचनात खास जागा
तिच्याच पावलांना....
वाट हि धूकेरी
एकटाच चालतो मी
आस का त्या पावलांची ?
हृदयात स्पंदनांना .....
पुन्हा नव्याने तेथे
धुक्यात मी हरवलो
विरळ होत गेली
धुक्यात चालताना…
सिद्धेश्वर विलास पाटणकर
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
149
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली.
विरळ होत गेली
धुक्यात चालताना…
सोडून मनात गेली
तीच्या पाऊल खुणांना.
आवडली
हलकीफुलकी तरल भावपूर्ण आणि आशयघन ! भरपूर लिहा काव्यसंग्रह निघेपर्यंत लिहा, खूप खूप शुभेच्छा !
धन्यवाद मंडळी
कर्नल आपले कडवे छान आहे.. आवडल