का कोण जाणे तो तीचा “विल यू प्लीज गिव मी अ वे....” म्हणतानाचा आवाज आपण पूर्वी कधीतरी ऐकलाय असे वाटतेय.
मागील दुवा चल कही दूर निकल जाये....( १) | मिसळपाव
पण कसे शक्य आहे. आवाजासारखेआवाज नसतात का? लता मंगेशकरआणि सुमन कल्याणपूर दोघींचेआवाज इतके सारखे कीआजही सुमनताईंचे बरीचशी गाणी लता मंगेशकरानीगायली आहेत असेच वाटते. फरकच कर्ता येत नाही. तेजाऊ देत.सुदेश भोसलेअमिताभ बच्चनच्या आवाजात गाणी म्हणतोच की. जगात जर एकसारखी दिसणारीदोन माणसे असू शकतात तसेदोन एकसारखे आवाज ही असुशकतील. जाउ दे नाआपल्याला काय करायचेय? मी पुन्हा डोळेमिटतो.
फ्लाईटटेक ऑफची अनाउन्समेंट होते. शरीराला रनवेवरची गती जाणवतें टेकऑफ होताना पोटात एक खड्डा जाणवतोते फिलींग येते. नेहमीसारखेच.
फ्लाईटअटेन्डन्ट ची अनाउन्समेन्ट. त्यासोबत एअरहोस्टेस ची येजा सुरूहोते
हेल्लो ... आय नीड आसिस्टन्स. मायसीट बेल्ट हॅज बीन लॉक्ड. इट्स नॉट गेटींग रीलीज्ड. मला पुन्हा एक धक्का बसतो. तोच स्वर. किंचीत सानुनासीक , करडा, पण हाय पीचअसलेला आवाज.मी स्वप्नातहीओळखेन हा. भाषा सोडली तरबोलण्याची ढब तीच. विनंतीकरतानाही आवाजातला अधिकाराचा टोन लपत नाही. विनंती हुकूमवजा. माझ्या नकळत मी डोळ्यावरचाब्लाईंडर काढतो. आणि आता माझ्याशेजारणीकडे पहातो.
पारदॉ. आल्स्येब्लिफ्ट. एक्सक्यूज मी प्लीज. एअरहोस्टेस च्या विनंतीमुळे मीसीट वरून उठतो. त्यानिमित्ताने मला तीचा चेहेरापहाता येईल अगदी शेजारीबसलेल्या माणसाचा चेहेरा त्याच्या नकळत पहाता येतनाही. पण आत्ताही तीच्याआणि माझ्या मधे ती एअरहोस्टेसउभी आहे, ती अडकलेलासीट बेल्ट सोडवतेय. मला नेमका तीचाचेहेरा दिसत नाहिय्ये.
सीटबेल्ट अजूनही अडकलेला आहे. बहुतेक बक्कलची पीन घट्ट झालीआहे.एअर होस्टेस मलाचविनंती करते. मला त्यामुळे तीचाचेहेरा पहायची संधी मिळते. मीपुढे होतो.
सीट बेल्ट च्या बक्कलच्या पीनमधे तीच्या जॅकैटची लेस अडकली आहे. थोडा झटका देऊन मी ती काढतो. ती थॅंक्स म्हणते. मी तीच्याकडे पहातो. मी पहातच रहातो. ती च्या चेहेऱ्यावरचेहासू रुंदावते. मी तीचे धन्यवाद स्वीकारतो. माझा गोंधळ उडालाय. ही तीच आहे? तेच पिंगट डोळे. तोच चेहेरा असे नाही म्हणू शकणार चेहेऱ्याभोवती असलेली केसांची महिरप माहीत नाहिय्ये . . पण ही इथे कशी? नक्की तीच? पण इथेकशी?माझ्या चेहेऱ्यावर बहुतेक प्रश्न चिन्हांची जाळी उमटली असावी.
ती पुन्हा हसते. ओह थॅंक्स अलॉट.
तीच सहजता. पण ही ती नसावी. नक्की? खरंच नक्की? डोळ्यात ओळख दिसत नाही. तोच आवाज. मी जगात कुठे गेलो तरी विसरणार नाही. सुहास? नक्की सुहास? विचारावे का? आणि ती सुहास नसेल तर? तीला मी एखादा फ्लर्ट करणारा वाटेन. पुढचे आठ तास तो गैरसमज विमानाच्या वेगाने सोबत घेऊन चालेल. त्या नंतर आपण काहीही बोललो तरी ते त्या गैरसमजाला पोषकच वाटेल तीला.
नकोच विचारायला. पण ती तीच आहे. काही ठरवता येत नाहिय्ये. मी संकोचाने नुसते स्मित करतो. सीटवर बसतो. तीच्या थॅंक्स ला मी उत्तरही देत नाही. हा तीला आखडूपणा वाटू शकतो . वाटू देत. फ्लर्ट , ठरकी असे वाटण्यापेक्षा आखडू चालू शकेल. निदान ते सेफ तरी असेल.
पण ती तीच असेल तर?
रेल्वे च्या डब्याच्या दारावर रिझर्वेशन चार्ट वर उतारुंची यादी लावलेली असते. कोण कोणत्या सीट नंबरवर बसले आहे त्यांची नावे वाचता येतात विमानात तसे काही करत असते तर बरे झाले असते. तसे काही करत असते तर खात्री करण्यासाठी म्हणून मी आत्ता दार उघडून चालू फ्लाईटमधे तो चार्ट पहायला गेलो असतो.
काय करायचे हे ठरवता येत नसेल की माणसे डोळे मिटतात. मी तेच करतो. नॉट टेकिंग अ डिसीजन इज ऑल्सो अ डिसीजन. हे कोणत्यातरी सेमिनार मधे ऐकलेले वाक्य उगाचच आठवते. पण ती तीच असेल तर...... तर काय ?
तर काय? तर काय..गेल्या वेळेला जे केलेस तेच आत्ता करणार....पळ काढणार. मी चपापतो. अरेच्चा हा कोणाचा आवाज? हे कोण बोलतंय? मी इकडे तिकडे पहातो. मला माझ्याशिवाय कोणीच दिसत नाही. माझी शेजारीण.( हो निदान काही तासांपर्यंतची तरी शेजारीण) तीच्या हातातल्या पुस्तकात डोके खुपसून काहीतरी वाचतेय. पलीकडल्या रो मधला चिनी ढोल खुर्चीत अस्ताव्यस्त पसरलाय. अर्थात तो चिनी असल्यामुळे मराठीत बोलायची शक्यता कमी.
पण झोपेत हिंदी चिनी प्रेमाचे भरते येऊन नी हाव... नी झेम्मे यांग. यिंदी यु सोंगवेन शियोंगडिमेन असे काही म्हणाला असेल आणि मला ते तर काय या सारखे ऐकू आले असेल. पण पण तो ज्या पद्धतीने अस्ताव्यस्त पसरलाय ते बघता ती शक्यता नसणार. मग कोण बोलले. ती शक्यता नसणार. कोण बोलले. माझेच मनातले वाक्य मला ऐकू आले असणार. कदाचित मी त्या गलगले सारखा मनातले विचार मोठ्याने बोललो असेन.
तसे असेल तर इतर कोणी ऐकले नसावे .मी पुन्हा एकदा शेजारणीकडे पहातो . डोक्यावर हुडी असल्यामुळे तीचा चेहेरा मला नीट दिसत नाही. पण तीचे पुस्तक दिसतेय. मला हसू येते. या बायका कुठेही गेल्या तरी अजुनही मिल्स ॲन्ड बून ची पुस्तकेच वाचतात. प्रेमकथा. तो आणि ती. या शिवाय दुसरे काही नसते का यांच्या आयुष्यात.त्या पुस्तकांचा तो किंचीत पिवळसर गुलाबी झाक असलेला नुसता कागद जरी दिसला तरी मी त्यावरचा मजकूर सांगु शकेन. सगळ्या कथा एकसारख्याच . नायीकेला कोणत्यातरी प्रसंगाने तीच्या आयुष्यात एक नायक येतो. त्यांचे एकमेकांवर प्रेम जडते. ते अव्यक्त रहाते. मग ते दुरावतात , त्यांच्यावर संकटे येतात. ते पुहा एकत्र येतात. पुस्तकांची आणि पात्रांची नावे तेवढी बदललेली असतात. कथा तीच.काही काही आठवतात. काय काय नावे असायची ना पुस्तकांची. डेडली फैमिली सिक्रेट, द ख्रिस्मस वी ऑलमोस्ट लॉस्ट. रूथलेस रायव्हल्स. कलर द ब्ल्यू , डॅन्यूब ड्रीम्स. नावे काहीही असो. कथा साधारण तशीच असायची. सुहास वाचायची नेहमी. मी तीची त्यावरून टर उडवायचो. गम्मत आहे ना. पण हे पुस्तक वेगळे दिसतेय. पाने त्या रंगाची नाहिय्येत. कदाचित फ्लाईटमधल्या बल्बच्या उजेडामुळे तसे वाटत असावेत. एक पान नीट दिसतेय. त्यावर बोल्ड अक्षरातले कोट आहे. ते वाचता येतेय.
एव्हरी सिच्यूएशन नो मैटर हाउ कॉमप्लेक्स इट इनिशियली लूक्स , इज एक्सिडिंगली सिंपली.
" every situation, no matter how complex it initially looks, is exceedingly simple.."
कोणतीही परिस्थिती, मग सुरवातीला ती कितीही गुंतागुंतीची वाटो सोडवायला घेतली की ती सरळ होत जाते.
इलियाहु गोल्डराट? द गोल ?.... मी खुर्चीवरून दोन फूट वर उडायचाच बाकी आहे. ही बया चक्क गोल्डराट वाचतेय? माझा विश्वास बसत नाही. पण मी बहुतेक मोठ्यााने ओरडलो असणार.. कारण तीचे माझ्याकडे लक्ष्य गेले आहे. ती मान हलवत म्हणते.ओह येस. इलियाहु गोल्डराट... आणि पुन्हा पुस्तकात डोके खुपसते.
तीच ती टिपीकल हो म्हणताना किंचीत झटका देत मान हलवण्याची स्टाईल. नक्की ही सुहासच आहे. पण ती आयुष्यात इलियाहु गोल्डराट वाचणे शक्यच नाही. बेट लावून सांगतो. जगात कुठल्याच बाईच्या हातात इलियाहु गोल्डराट ची पुस्तके दिसणार नाहीत. क्रॉसवर्ड मधे पुस्तक चाळत उभी असेल तरी सुद्धा दिसणार नाहीत. वाचताना दिसणे तर गुलबकावलीच्या फुलाहून दुर्लभ.
ही कोण असेल याबद्दल माझे कुतूहल आता अधीकच चाळवते.
चल कही दूर निकलते है: चकोर शाह
क्रमश:
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्सुकता ताणली गेली आहे. पु…
उत्सुकता ताणली गेली आहे. पु.भा.प्र
किंचीत सानुनासीक , करडा, पण हाय पीचअसलेला आवाज
बाकी हे वाचून माझ्या साबांची आठवण आली, पण त्यांचं नाव सुहास नाहीये 😆
सुहास हे मुलीचे नाव आहे कथे…
सुहास हे मुलीचे नाव आहे कथे मधे
होय कल्पना आहे
In reply to सुहास हे मुलीचे नाव आहे कथे… by विजुभाऊ
होय कल्पना आहे
आवडलं
उत्कंठावर्धक आहे
@विजुभाऊ सर, पुढे काय झाले?
@विजुभाऊ सर, पुढे काय झाले?
@विजुभाऊ सर, पुढे काय झाले?
In reply to @विजुभाऊ सर, पुढे काय झाले? by श्वेता व्यास
पुढे विमान ॲमस्टरडॅमला पोहोचले. तीने टोरांटो आणी विजुभाऊ नी डेट्राईटची फ्लाईट पकडली. ....विजुभाऊ ना हवाई सुंदरीने वाईन शाॅट दिला आणी विमान उंच उचं जाऊ लागले.....एअर फ्रान्सचे आणी विजुभाऊंच सुद्धा.
वाचतोय, पुभाप्र.
पुभाप्र.
पुभाप्र.