रदिफ,काफिया, गझल ह्यातुनी कशावर भाळले नक्की?
रुपाला की तिच्या घाटाला, मी काय चाळले नक्की?
कविता माझ्या, लेखही माझे, अन अस्फुट काही उरलेले
सारे तुला जर पाठच होते, काय जाळले नक्की?
गोठलेला स्पर्श तिचा तो अजून खांद्यावरती आहे,
ओलावा हा स्वतःच सांगे अश्रू कुणी ढाळले नक्की.
तुझ्या नि माझ्या कथेतले ते 'प्रकरण' सुरेख होते,
सारे लिहूनी कमीच काही, काय गाळले नक्की?
गळ्यातल्या त्या सूत्रामध्ये मंगळ काही दिसले नाही,
माझे नाव कुठे कुठे अन् कसे माळले नक्की?
राऊळी मी तिला शोधतो, प्रसाद टेकवून हाती जाते
विसरण्याचे नियम आपुले कुणी पाळले नक्की?
-आगाऊ म्हाद्या
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
198
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तं जमलीये
आगाऊ म्हदया,
कविता फक्कड जमलीये. मला काव्यसंगीतनृत्यादि ललितकलांमध्ये फारसं गम्य नाही. म्हणून हिला कविता म्हणालो गझल म्हणावी का नाही ते माहीत नाही. त्याबद्दल क्षमस्व. ढाळले शेर/कडवं विशेषकरून आवडला/ले.
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद गा. पै
गझलच आहे😁. वाटत नसेल मी अभ्यास आणि प्रयत्न वाढवेन.
रत्न व गाजर
In reply to धन्यवाद गा. पै by आगाऊ म्हादया
बापरे, हे म्हणजे रत्नपारख्याने गाजरपारख्याच्या सल्ला शिरोधार्ह मानणं झालं.
-गा.पै.
मी विद्यार्थी आहे
😁
आवडली. - राज जोशी
आवडली.
- राज जोशी
धन्स
In reply to आवडली. - राज जोशी by राज जोशी
आभारी आहे😊