आज सोशल मीडिया स्क्रोल करताना एका व्हिडिओवर काही कमेंट्स वाचल्या आणि डोके भणभणून गेले. देशातल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या हक्काच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या मागण्यांना थेट 'देशविरोधी' किंवा 'धर्मविरोधी' ठरवण्याचा एक नवा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. अशाच एका कमेंटमध्ये कुणीतरी लिहिले होते, "हा आमच्या देश आणि धर्माच्या विरोधात जाणारा आहे, त्यामुळे आमचा अजिबात पाठिंबा नाही." हे वाचून मला पडलेला प्रश्न अगदी साधा आहे, भावांनो, तुमचा 'धर्म' आणि 'देश' म्हणजे नेमकं काय रे? हा प्रश्न पडण्यामागे माझी एक जुनी आठवण आहे. २०२४ मध्ये जेव्हा मी हॉस्टेल जॉइन केलं होतं, तेव्हा तिथं माझा एक मित्र झाला. असाच एकदा मी रूमवर बसून ध्रुव राठीचे विश्लेषणात्मक (Analytical) व्हिडिओ पाहत होतो. ते पाहून तो मित्र अचानक भडकला आणि मला थेट 'देशद्रोही' म्हणून मोकळा झाला! माहितीचे विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहणं म्हणजे देशाच्या विरोधात जाणं कसं काय असू शकतं, हे मला आजवर न सुटलेलं कोडं आहे. पण त्या क्षणी मी मनोमन खूप हसून घेतलं होतं. कारण, ज्या हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा ठेका घेतल्यासारखं तो वागत होता, त्या धर्माचा पाया असणारी 'संस्कृत' भाषा मला अवगत आहे. अनेक क्लिष्ट स्तोत्रं मला अगदी शुद्ध उच्चारांसहित मुखोद्गत आहेत. पण तरीही, केवळ एका व्हिडिओवरून मी त्याच्या नजरेत 'देशद्रोही' ठरलो होतो! ज्यांना फक्त उथळ घोषणाबाजीत आणि द्वेषातच धर्म दिसतो, त्यांना मूळ संस्कृतमधील धर्माची व्याख्या तरी ठाऊक आहे का? महाभारताच्या कर्णपर्वात (६९.५९) धर्माचे मूळ लक्षण सांगताना स्पष्ट म्हटले आहे: धारणात् धर्ममित्याहुः धर्मो धारयते प्रजाः। यत् स्याद् धारणसंयुक्तं स धर्म इति निश्चयः॥ याचा सरळ अर्थ असा की, 'जो समाजाला एकत्र धरून ठेवतो, जो प्रजेचे (माणसांचे) कल्याण करतो आणि व्यवस्था टिकवतो, तोच खरा धर्म!' लोकांमध्ये फूट पाडणं, प्रश्न विचारणाऱ्या तरुणांच्या विचारांना देशद्रोही ठरवणं आणि समाजात द्वेष पसरवणं हा धर्म नसून निव्वळ 'अधर्म' आहे. हे समजायला कोणत्याही आयटी सेलच्या गाईडलाईन्सची किंवा प्रोपगंडाची गरज नाही. कर्मकांडाला, अंधश्रद्धेला आणि भेदभावालाच जर तुम्ही देव, देश आणि धर्म समजत असाल, तर मग देव आणि देश वाचवायची नाही, तर आधी तुम्हाला स्वतःला सुधारण्याची गरज आहे. काही लोकांना वाटते की केवळ सण-उत्सव साजरे करणे, उथळ घोषणाबाजी करणे आणि स्वतःच्या विचारांशी असहमत असणाऱ्यांवर 'देशद्रोही'चा शिक्का मारणे म्हणजेच देशप्रेम! जर तुमच्या व्याख्या इतक्या संकुचित असतील, तर तुमचा पायाच कच्चा आहे. जेव्हा देशातला तरुण, विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो, किंवा एखादा सुजाण नागरिक प्रश्न विचारतो, तेव्हा त्याला थेट कोणत्यातरी विशिष्ट चौकटीत बसवून मोकळे होणे, हा निव्वळ बौद्धिक दिवाळखोरीचा प्रकार आहे. धर्माचा आणि देशाचा अभिमान असणे चांगलीच गोष्ट आहे, पण त्या अभिमानाचे रूपांतर जेव्हा आंधळ्या अहंकारात आणि दुसऱ्यांबद्दलच्या द्वेषात होते, तेव्हा तो 'अभिमान' उरत नाही, ती एक विकृती बनते.
विशेष सूचना आणि स्पष्ट इशारा:
हा लेख वाचून ज्यांच्या पोटात दुखणार आहे, किंवा ज्यांना आपल्या संकुचित चौकटीबाहेरचा विचार पचनी पडत नाही, त्यांनी कृपया दूर राहावे. जे केवळ कर्मठ, बुरसटलेल्या, संकुचित मानसिकतेचे आहेत आणि जे इथे निव्वळ वाहवाही करायला किंवा उथळ घोषणाबाजी करायला येणार आहेत, त्यांनी मुळीच आपल्या घाण विचारांचे दर्शन कमेंट बॉक्समध्ये देऊ नये. हा मंच वैचारिक देवाणघेवाणीसाठी आहे, तुमच्या पूर्वग्रहांचा कचरा टाकण्यासाठी नाही.
मुळात मला आज इथल्या सुजाण वाचकांना विचारायचे आहे: तुमच्या मते धर्म आणि देशप्रेमाची खरी व्याख्या काय असावी?
ती सर्वसमावेशक असावी की केवळ काही ठराविक लोकांच्या सोयीची?
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या मते
पुस्तकी परिभाषा - देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि घटनात्मक कायदे जोपासणे म्हणजे देशभक्ती ! त्यासाठी रस्त्यावर थुंकले नाही तरी चालते, इन्कम टॅक्स वेळेवर भरला तरी चालते, राजकीय तळ्या उचलल्या नाही तरी चालते. मुद्दे आधारित बोलणे, राजकीय विचार जास्त जीवाला न लावून घेणे, हे काही added advantages असतील. आमच्या आडात नागरिकशास्त्र नाही अन् आम्ही पोहऱ्यात राजकारण आणू पाहतोय हेच आमचे दुर्दैव.
पूर्णपणे सहमत...🙏🏻
In reply to माझ्या मते by वृषभ खोंडे
पूर्णपणे सहमत...🙏🏻
परफेक्ट 👍
In reply to माझ्या मते by वृषभ खोंडे
परफेक्ट 👍
अवांतर : घास कुठे वास कुठे
अवांतर :
आयशप्पत ! तुम्ही येशूला मानता की पोपला असा प्रश्न कुणी ख्रिश्चनांना विचारीत नाही. तुमचा खलिफा कोण हा प्रश्न मुस्लिमांना कोणी विचारीत नाही. साम्यवाद आणि समाजवाद यांतला नेमका फरक काय हे कोणीही डाव्यांना विचारीत नाही.
पण देशप्रेम आणि धर्मप्रेम म्हणजे काय याची डोस्केफोड मात्र हिंदूंनी करायची. इ कौणसा इण्साफ हुवा जी ? ज्यांनी घास घेतला त्यांच्या तोंडचा वास घ्यावा जी.
-गा.पै.
> पण देशप्रेम आणि धर्मप्रेम…
ख्रिस्ती धर्मांत ख्रिती लोकांनीच आपल्या धर्म आणि विश्वासावर प्रचंड टीका, चिंतन लेखन केले आहे. त्यातून अनेक विविध ख्रिस्ती संप्रदाय तसेच पराकोटीचे नास्तिक निर्माण झाले आहे. आत्मचिंतन, आत्मभिमुखता कुठल्याही विचारसरणी साठी चांगलीच आहे.
साम्यवाद आणि समाजवादातील फरक ह्यावर त्याच लोकांनी विपुल लेखन केले आहे. माझ्या सारख्या भांडवलशाही पुरस्कर्तीला दोन्ही सेम वाटतात.
--
Patriotism is the last refuge of a scoundrel. - सॅम्युएल जॅक्सन १७७५
--
चला ध्रुव राठी पाहायचा नाही (मला तो चिप आणि मूर्ख वाटतो) तर मग भारतीय सरकार आणि त्याच्या पॉलिसी ह्यांच्यावर टीकात्मक काही वाचायचे आहे, पाहायचे आहे तर राष्ट्रप्रेम approved असे काय आहे ? जसे हलाल सर्टिफिकेट असते तसे देशप्रेम सर्टिफिकेट सुद्धा ह्या मंडळींनी काढावे सोपे पडेल !
राष्ट्रप्रेम अप्रुव्हड कशाला पाहिजे ?
In reply to > पण देशप्रेम आणि धर्मप्रेम… by साहना
साहना,
तुम्हांस भारतीय सरकार आणि त्याच्या धोरणांवर टीकात्मक काही वाचायचं असेल वा लिहायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रप्रेमाचा शिक्का कशास्तव हवा? नसला तरी काय बिघडतं?
कोणी माझ्यावर अंधभक्त म्हणून छाप मारला तर मारला. माझ्या अंगास काय भोकं पडतात का? हे विधान कुठल्याही छापास लागू पडतं.
आ.न.,
-गा.पै.
हातोटी
In reply to राष्ट्रप्रेम अप्रुव्हड कशाला पाहिजे ? by गामा पैलवान
गा. पै.
मूळ प्रश्न:
>> ... तर मग भारतीय सरकार आणि त्याच्या पॉलिसी ह्यांच्यावर टीकात्मक काही वाचायचे आहे, पाहायचे आहे तर राष्ट्रप्रेम approved असे काय आहे ? जसे हलाल सर्टिफिकेट असते तसे देशप्रेम सर्टिफिकेट सुद्धा ह्या मंडळींनी काढावे सोपे पडेल !
... अगदी राजहंसासारखे आहे, मूळ महत्त्वाचा प्रश्न गैरसोयीचा असला की सोडून द्यायचा आणि त्यातले अवांतर पकडायचे. असो.
मूळ प्रश्नाचे उत्तरही आता देऊन टाका.
लंगडी सबब
In reply to हातोटी by स्वधर्म
स्वधर्म,
काहीतरी मान्यताप्राप्त ( = approved ) हवं ही मनोवृत्ती मेकॉलेने रुजवली आहे. तिला खतपाणी घालायची माझी इच्छा नाही. राज्यघटनेने विचार आणि भाषणाचं स्वातंत्र्य दिलंय. त्यांचा उपयोग करा की. कोणी अडवलंय!
आ.न.,
-गा.पै.
आंदोलनालाची खरी व्याख्या काय असावी
मी बरेच म्हंजे बरेच वर्ष मिपा वर असून केवळ वाचनमात्र होतो , पण हे भाऊ फक्त आपल्यालाच सगळं माहित आहे आणि आपल्या मताशी सहमत नसरणारे सगळे म्हणजे केवळ कर्मठ, बुरसटलेल्या, संकुचित मानसिकतेचे आहेत आणि मिपावर राहण्याच्या त्याना अधिकार नाही असेच लिहीत आहेत
भाऊ जर तू म्हणतोस "हा मंच वैचारिक देवाणघेवाणीसाठी आहे" तर दुसर्याने काही लिहले कि इतका उचकतोस का ??
आता मूळ मुद्याकडे
आंदोलन (Andolan) म्हणजे एखाद्या विशिष्ट सामाजिक, राजकीय, आर्थिक किंवा पर्यावरणीय ध्येयासाठी किंवा बदलासाठी लोकांच्या समूहाने एकत्र येऊन केलेली संघटित व शांततापूर्ण कृती. हे सामान्यतः अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, हक्क मिळवण्यासाठी किंवा जनमत तयार करण्यासाठी उभारले जाते.
देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या सर्वांना एकत्र करून त्याच्या मार्फत तरुणांना भडकावणे
फक्त हिंदू धर्मातील देवदेवतांची टिंगल करण्याचा आणि एका अशांतिप्रिय धर्माचे गुणनगण गाऊन त्याचा धर्मप्रसार (??) करणे
एखाद्या समाजसेवकाला (??) पुढे उपोषणाला बसवून , त्याच्याच पुढ्यात जेवणावर आडवा हात मारणे
तरुणांना उन्हात बसवून आपण फाईव्ह स्टार मध्ये राहणे आणि शिफ्ट ला आल्यासारखे भेट देऊन जाणे
असले धंदे कोणी करत असेल तर तुमचा आंदोलन सुरु करण्याचा हेतू कितीही उद्दात्त असला तर लोक नावं ठेवणारच , त्यातून आपले आंदोलन सरळ मार्गावर न्यायाचे कि जो कोणी नाव ठेवेल किंव्हा प्रश्न विचारेल तो लगेच सरकारचा गुलाम ह्या चौकटीत बसवून मोकळे व्हायचे , जर तुमच्या व्याख्या इतक्या संकुचित असतील, तर तुमचा पायाच कच्चा आहे.
देशविरोधी वक्तव्ये करून फूट पडणे, तुमच्या आंदोलनाची दिशा काय किंव्हा तुमच्या नेमक्या मागण्या काय असा प्रश्न विचारणाऱ्या तरुणांच्या विचारांना सरकारचे गुलाम ठरवणे आणि समाजात द्वेष पसरवणं हे`आंदोलन नसून निव्वळ लोकशाहीचा मांडलेला खेळ (तमाशा ??) आहे. हे समजायला कोणत्याही आयटी सेलच्या गाईडलाईन्सची किंवा प्रोपगंडाची गरज नाही.
मुळात मला आज इथल्या सुजाण वाचकांना विचारायचे आहे: तुमच्या मते "देशातल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या हक्काच्या आंदोलनालाची " खरी व्याख्या काय असावी? ती सर्वसमावेशक असावी की केवळ काही ठराविक लोकांच्या राजकारणात उतरण्याचा सोयीची?
आता मला लगेच अंधभक्त्त वैगेरे ठरवू नकोस , मला अंधभक्त्त , आपटार्ड , चमचे , गुलाम, सतरंजी उचले हे सगळे एकाच लेव्हलचे वाटतात.
कर्मकांडाला, अंधश्रद्धेला…
हे वाक्य हिंदु / मुस्लीम / ख्रिच्शन / शिख / बौद्ध या सगळ्यांना लागु आहे की फक्त हिंदु धर्माला?
ओह!आताच जस्ट पलीकडच्या…
ओह!आताच जस्ट पलीकडच्या धाग्यावर हेच लिहिले होते... ते इथेही परफेक्ट बसतेय.
लक्षात घ्या पुढची पिढी कर्मकांड अजिबात मानत नाही.... हो "अजिबात "
पण म्हणून त्यांनी द्वेषही, जो मागच्या पिढीचा अवगुण आहे. तो पुढे न्यावा हा कोत्यापणा करू नये.राष्ट्रप्रेम तर हवेच!
माझ्य घरातील जेन जी,अल्फा यांची नास्तिकतेकडे होणारी वाटचाल पाहता, हे मुद्दे येतील असे वाटले नव्हते. माझ्या घरातल्या पिढीला केवळ सगळ व्यवस्थित पाहिजे आहे.
जातीद्वेष, धर्मद्वेष या पुढच्या पिढीने तरी धरून पुढे येऊ नये 🙏
लक्षात घ्या पुढची पिढी…
लक्षात घ्या पुढची पिढी कर्मकांड अजिबात मानत नाही.... हो "अजिबात "
कोणत्या जगात आहात आपण.
गणेशोत्सवात लालबागच्या राजाला जाऊन पहा. १६ तास रांगेत उभे राहतात. बहुसंख्य तरुणच दिसतात.
शिर्डीला पायी जाणारे पहा १०० % लोक पस्तिशीच्या आतले असतात.
उलट झाले आहे.
रविवारी मरिन ड्राइव्ह ला जाऊन पहा. बुरखा घातलेल्या मुस्लिम महिलांच्या झुंडीच्या झुंडी दिसतात. त्या पूर्वी सुद्धा असत. पण पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर बुरखे घालत नसत.
जगणं कठीण झालं कि माणसं कर्मकांडाचा आधार घेऊ लागतात.
जगणं कठीण झालं कि माणसं…
In reply to लक्षात घ्या पुढची पिढी… by सुबोध खरे
जगणं कठीण झालं कि माणसं कर्मकांडाचा आधार घेऊ लागतात
आणि हे बदलाव असे वाटत नाही??? म्हणजे या देशात युवा पिढीला जगण कठीण झालं आहे, म्हणून तर काह सैरावैरा धावतात, काही कर्मकांड करतात. सुदैवाने आमची मुलं तरी अशी नाहीत. माहित नाही तुम्ही कोणती ही मुलं पाहत आहात..
हे म्हणजे नेमकं काय ....
In reply to जगणं कठीण झालं कि माणसं… by Bhakti
Bhakti,
हे म्हणजे नेमकं काय बदलायचं? जगणं सुसह्य करवून द्यायचं? की कर्मकांडाचा आधार घेणं बंद करवायचं? तुमच्याकडे काही योजना असल्यास त्यावर वाचायला आवडेल.
आ.न.,
-गा.पै.
+१
In reply to हे म्हणजे नेमकं काय .... by गामा पैलवान
मलाही अशी काही योजना असेल तर त्यावर वाचायला आवडेल.
वास्तविक धर्म को बचाना…
In reply to हे म्हणजे नेमकं काय .... by गामा पैलवान
वास्तविक धर्म को बचाना पड़ेगा। क्योंकि वास्तविक धर्म अगर नहीं बचेगा
'जेनेरेशन्स' के बीतने से फ़र्क़ नहीं पड़ता। कोई भी 'जेनेरेशन' हो, हर 'जेनेरेशन' को 'रेवलेशन' चाहिए। कोई भी 'जेनेरेशन' हो, है तो सब इंसान ही न। दिल सबका धड़कता है अकेलापन सबको लगता है। जीवन क्या है? पैदा क्यों हुए? किसके लिए जिए? ये सवाल सबको उठते हैं। दिल सबका टूटता है आशाएँ सब बाँधते हैं मृत्यु से सब डरते हैं। ये प्रश्न बहुत पुराने हैं और सदा रहेंगे जब तक मनुष्य की चेतना है। धर्म इन प्रश्नों का उत्तर है ,काल्पनिक उत्तर नहीं, वास्तविक उत्तर।
काल्पनिक उत्तर दोगे, नहीं चलेगा। वास्तविक उत्तर क्या होता है? वो उत्तर जो तुम ख़ुद खोजो, तुम्हारी जिज्ञासा से जो बात उठे, वो। वास्तविक धर्म के केंद्र में जिज्ञासा, नकली धर्म के केंद्र में मान्यता। वास्तविक धर्म के केंद्र में खोज, नकली धर्म के केंद्र में कहानी।
क्या Gen-Z धर्म से बिछुड़ जाएगी? पुर्न लेख जरुर वाचा.
मी गीता,विवेकनन्द वाचत राहते.
माझी मैत्रिण रेग्युलर काळाने विपश्यनाला जाते.
माझा भाउ रोज ध्यान करतो. इ.इ.
गामाजी,प्रश्न भक्तीतैसाठी…
In reply to हे म्हणजे नेमकं काय .... by गामा पैलवान
गामाजी,
प्रश्न भक्तीतैसाठी आहे पण मी उत्तर देण्याचा प्रमाद करतो. कृपया, मान्य करून घ्या.
>> जगणं सुसह्य करवून द्यायचं? की कर्मकांडाचा आधार घेणं बंद करवायचं?
कर्मकांडांचा आधार घेणं बंद करायच कारण ते 'दिल बहलने के लिए खयाल अच्छा है गालिब' ह्या थाटाचं असते, त्याने जगणं कठीण होण्याच्या मुळ कारणाचं निर्मूलन होत नाही फक्त काही काळापुरतं त्या मुळ कारणावरून ध्यान दुसरीकडे जातं.
जगणं कठीण होण्याच्या कारणाला तोंड देणं शक्य होत नाही तेव्हा त्यापासून पलायन करण्यासाठी कर्मकांडांचा आधार घेतला जातो. ते टाळून जर जगणं कठीण होण्याच्या कारणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि ते दूर करण्याचा दृढनिश्चय केला की जगणं सुसह्य होत जातं.
ज्या कोणत्याही विचारधारेत किंवा शिकवणूकीत मार्ग आहे आणि त्या मार्गावर कसं चालायचं ह्याचं व्यवस्थित मार्गदर्शन आहे त्या मार्गाचं अनुसरण करणं ही त्यासाठीची योजना असू शकते. ही काही उदाहरणे:
- (गामाजींचा कृपाभिलाषी) सोकाजी
जगणं कठीण होण्याच्या कारणाला…
In reply to गामाजी,प्रश्न भक्तीतैसाठी… by सोत्रि
जगणं कठीण होण्याच्या कारणाला तोंड देणं शक्य होत नाही तेव्हा त्यापासून पलायन करण्यासाठी कर्मकांडांचा आधार घेतला जातो. ते टाळून जर जगणं कठीण होण्याच्या कारणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि ते दूर करण्याचा दृढनिश्चय केला की जगणं सुसह्य होत जातं.
बऱ्याच वेळेस माणसं अगतिक असतात. कारणाच्या मुळापाशी जाणे सर्वच वेळेस शक्य नसतं अशा वेळेस माणसं कुठला तरी आधार शोधतात.
आपला नातेवाईक दुर्धर आजाराने पछाडलेला असेल तर माणूस अगतिक असतो.
माझी आई थायरॉईड ग्रंथीच्या कर्करोगाने आजारी होती. त्यावेळेस तिची टाटा रुग्णालयामध्ये शल्यक्रिया झाली. याबद्दल मी एक लेख माला हि लिहिली (विळखा).
यानंतर तेथल्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे तिची परिस्थिती फार बिघडली आणि बऱ्याच गुंतागुंती निर्माण झाल्या. ती एकंदर ४५ दिवस व्हेंटिलेटर वर होती. तिला मी टाटा रुग्णालयातून वैद्यकीय सल्ल्याचा विरुद्ध व्हेंटिलेटर वर स्वतःच्या जबाबदारीवर बाहेर काढलं. जवळच्या रुग्णालयात उपचार करवून घेतले. त्यातून ती बाहेर आली आणि पुढे ६ वर्षे जगली. (या गुंतागुंती मुळे मी ती लेखमाला पुढे लिहू शकलो नाही. पण आता या भयानक स्थितीबद्दल लिहुन ती लेखमाला पूर्ण करावी असा मानस आहे.)
आपली आई व्हेंटिलेटर वर आहे आणि टाटा च्या डॉक्टरांनी तिचं काही खरं नाही असं निदान तीन वेळेस तरी सांगितलं होतं. माझी मन स्थिती काय असेल याचा आपण तर्क करू शकता. पण मी किंवा आमचे वडील किंवा भाऊ कधीही कोणत्याही देवळात नवस करायला गेलो नाही किंवा कोणत्याही बाबा महाराज पीर याचा अंगारा आणण्यासाठी गेलो नाही. आपली विचारांची बैठक फारच पक्की असावी लागते.
अशी स्थिती सर्वांची नसते.
त्यामुळे माणसं कुठेतरी कर्मकांडात आधार शोधतात.
एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये काम करत असताना एक नास्तिक आणि डाव्या विचारांचे निवृत्त न्यायाधीश शल्यक्रिये पूर्वी फार टेचात वागत होते पण शल्यक्रियेनंतर त्यांच्या छातीत पाणी झाले आणि त्यांची प्रकृती तेंव्हा नाजूक झाली असताना ते कोणत्यातरी बाबा/ महाराजांचा अंगारा लावू लागले आणि डॉक्टरांशी फार नम्रतेने बोलू लागले.
अगतिक झाले आणि हातात काही राहिले नाही कि माणसे कर्मकांडाचा आधार घेतात. त्याने मिळणारे मानसिक समाधान किंवा दिलासा तात्पुरता असला तरी पुढची लढाई लढण्यासाठी माणसाला थोडं फार बळ देतो हे विसरून चालणार नाही.
कित्येक स्त्रियांना केवळ संध्याकाळी देवापुढे दिवा लावला तरी खूप बरं वाटतं. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे हे सवामी समर्थांचे वचन असाच मानसिक आधार देतं.
मी स्वतः नास्तिक आणि अज्ञेयवादी याच्या मध्ये कुठे तरी आहे पण तरी अनेक वर्षांच्या अनुभवामुले लोकांच्या श्रद्धेवर सहसा टीका करत नाही.
अगदी बरोबर
In reply to लक्षात घ्या पुढची पिढी… by सुबोध खरे
>> जगणं कठीण झालं कि माणसं कर्मकांडाचा आधार घेऊ लागतात.
जगणं इतकं कठीण झालंय हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. समस्या आहे हे समस्या सोडवण्याची पहिली पायरी आहे.
खरं तर तुमच्या आवडत्या नेत्याचं मजबूत सरकार आहे, भारत सर्व क्षेत्रात प्रगती करतो आहे, रामाचं मंदीरही बांधून झालं इ. इ. असे ढोल बडवले जात आहेत. विरोधक कोणताही विरोध करू शकत नाहीत. हे सगळं राज्यकर्त्यांच्या बाजूने असताना ते लोकांचं जीवन सुखकर करण्यात का कमी पडत आहेत? अचानक लोकच वाईट झालेत २०१४ पासून असं तर नसणार ना?
सर
In reply to लक्षात घ्या पुढची पिढी… by सुबोध खरे
गणेशोत्सवात लालबागच्या राजाला जाऊन पहा. १६ तास रांगेत उभे राहतात. बहुसंख्य तरुणच दिसतात. अगदीच कर्मकांड आणि धार्मिक विधी पॅकेज मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मुळातच मोडेल का ही मला शंका आहे, त्याशिवाय, सार्वजनिक गणेशोत्सव हा मुळातच एक सामाजिक राजकीय उपक्रम आहे, आणि आजही त्यात सकाळ संध्याकाळ होणारी आरती, पूजाअर्चा आणि स्थापना विधी सोडून १० - ११ दिवस होणारे कार्यक्रम हे बहुसंख्य सामाजिक प्रबोधन किंवा गेलाबाजार कॅसेट लावून VCR वर सिनेमे पाहणे होते. जुनी जाणती मंडळे व्याख्याने इत्यादी पण ठेवतात ती सुद्धा सामाजिक प्रश्न किंवा तत्सम असतात हा आजवरचा अनुभव आहे ! . बाकी तुम्ही म्हणाल ते प्रमाण.
जगणं कठीण झालं कि माणसं…
जगणं कठीण झालं कि माणसं कर्मकांडाचा आधार घेऊ लागतात.
You said it !
दुरूस्ती
समस्या आहे हे मान्य करणं समस्या सोडवण्याची पहिली पायरी आहे.
फार इंटरेस्टिंग आहे एकुणात…..
फार इंटरेस्टिंग आहे एकुणात…..
निषेध म्हणुन तुम्ही तुमच्या मित्राला सुरेश चव्हाणकेचे "विश्लेषणात्मक" व्हिडिओ पाहताना पकडुन त्याला देशद्रोही म्हणुन उलट प्रत्युत्तर द्यायला हवं खरंतर...🤐 पण तुमच्यासारख्या विचारवंतांना असला बालीशपणा शोभणारी नाही हे ही खरंच !!!
तुमच्यासारख्या "हाडाच्या" पुरोगामी तथा उदार मनोवृत्तीच्या लोकांना ह्या समाज नियंत्रित करण्यासाठीची आयुधे असणाऱ्या धर्म आणि देश(प्रेम) यासारख्या संकुचित(?) संकल्पनांची ओझी वागवायची, त्यांच्या व्याख्या शोधायची दुर्बुद्धी तरी का सुचावी बरं 🤔🤔
खरं तर, धर्मविहिन व्यवस्था आणि बोर्डेरलेस स्टेटस यापेक्षा सर्वसमावेशक असं तुमच्यासाठी दुसरं काही असू शकेल का ???
असो, "स्पष्ट इशारा" वाचुनही प्रतिक्रिया लिहिण्याचा प्रमाद केल्याबद्दल तुमचा क्षमाप्रार्थी आहे.
१९९६ साली आपली लोकसंख्या ९८…
१९९६ साली आपली लोकसंख्या ९८ कोटी होती आणि २००८ साली १२१ कोटी म्हणजेच. या १२ वर्षात २३ कोटी मुलं जन्माला आली.
म्हणजेच २०१४ ते २०२६ या काळात २३ कोटी तरुण १८ वर्षांचें होऊन नोकरीच्या बाजारात आले.
सर्वच्या सर्व सरकारी निमसरकारी स्थानिक स्वराज्य संस्था लष्कर निमलष्करी दले यात मिळून २.३ कोटी सरकारी नोकऱ्या आहेत.
म्हणजेच सर्वांच्या सर्व सरकारी नोकरांना बडतर्फ केले तरी ९० % लोकांना सरकारी नोकरी मिळणें अशक्य आहे. त्यातून आपल्याकडे शिक्षणमहर्षी यांनी शिक्षणाचा जो काही अभूतपूर्व खेळ खंडोबा करून ठेवला आहे त्यामुळे मुलांना मिळणारे शिक्षण हे त्यांना नोकरी किंवा धंद्याच्या बाजारात निरुपयोगी आहे.
यातून हे तरुण केवळ वैफल्यग्रस्त आणि निराश होतात. प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी असते. ती मिळणे शक्य नाही. पण हे कोणीही सांगणार नाही.
सश्री मोदी यांनी मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण घेऊन व्यवसाय करा मग तो भाजी टाळण्याचा का असेने हे सांगितले तर त्याबद्दल केवढा गदारोळ झाला.
तरुणांची माथी भडकावणे सहज सोपे असते. आपल्या पेक्षा कमी बुद्धिमत्तेच्या पण आपल्या बरोबरच्या मागास वर्गीया ला आरक्षणातून आणि श्रीमंतांच्या मुलाला खाजगी मिळताना पाहून तरुण अधिकच वैफल्यग्रस्त होतात. यातून मग मराठा जाट धनगर वंजारी माळी अशा अनेक जातीचे पुढारी त्यांना आरक्षणाचे गाजर दाखवतात. त्यासाठी अनेक तरुण आपली डोकी फोडून घेतात.
मागच्या तीन दशकांत आय टी मध्ये आलेल्या लाटेत बी एस सी (आय टी) किंवा कोणत्याही शाखेतील अभियंत्यालाच काय हवशा नवश्या गवशाला पण ५० ते ७५ हजारांची नोकरी मिळत होती. आता कृत्रिम बुद्धिमत्ता आल्याने हा बुडबुडा फुटला आहे. पण झकपक कपडे घालून वातानुकूलित खोलीत आयटी ची नोकरी सर्वाना हवीहवीशी वाटते आहे ज्या नोकऱ्या फार कमी झाल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेत महारथ असलेल्याना आजही भरपूर पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. पण त्याला लागणारे उच्च कौशल्य किती तरुणांकडे आहे?
या वैफल्याचा फायदा उठवून सध्याचे आंदोलन चालू आहे.
सध्या परिस्थिती काय आहे? तंत्र शिक्षण घ्यायची कुणाची तयारी नाही. कारण हाताने काम करण्याची कुणाची तयारी नाही.
आज तुम्ही एसी, पाणी शुद्धीकरण यंत्र, इलेक्ट्रिशियन, प्लम्बर, गवंडी, इ क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मुसलमान किंवा राजस्थान कडचे कारागीर दिसतात. कारण त्यांच्याकडे शिक्षण नाही म्हणून ते अशा क्षेत्रात येऊन काम करता करता शिकून तंत्रज्ञ होत आहेत आणि मुंबई सारख्या शहरात बऱ्यापैकी पैसा कमावत आहेत.
पण आपल्या मराठी तरुणांना त्यात रस नाही.
सरकरने आम्हाला शिक्षण दिले पाहिजे नोकऱ्या दिल्या पाहिजेत आम्हाला सगळं घर बसल्या मिळालं पाहिजे या वृत्तीतून बाहेर आलं पाहिजे. पण विरोधी पक्षात असलं कि अफाट आश्वासनं द्यायची आणि सत्तेत अली कि त्यांच्या तोंडाला पानं पुसायची हा आपल्या ७५ वर्षांचा इतिहास आहे.
जो नेता सांगतो कि आरक्षणातून तुम्हाला काहीही फायदा होणार नाही त्याला घरी बसवलं जातं आणि जो सांगतो आरक्षण हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे त्यासाठी तुम्ही लढा दिला पाहिजे त्याचा उदो उदो होतो.
आज या तरुणांनी असलेलं सरकार पाडलं आणि नवं सरकार आणलं तरी ते सरकारी नोकऱ्या कुठून निर्माण करणार आहेत? आपल्याला बाजारात आवश्यक असणारे कौशल्य आपणच मिळवले पाहिजे हे आईबापानी सांगितलं पाहिजे. सरकार आपल्याकडूनच घेतल्याशिवाय आपल्याला फार काही देऊ शकत नाही हि वस्तुस्थिती त्यांना कुणी सान्गु इच्छित नाही.
पण शासनाच्या सह सचिव( जॉईंट सेक्रेटरी) या उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या बाईं जरांगे पाटील आपल्याला आरक्षण देतील या आशेवर होत्या. मला धक्काच बसला. अर्थात ते आरक्षण मिळाले नाही म्हणून त्या आता फडणवीस यांच्यावर खापर फोडताना दिसतात.
नेपाळ श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान मध्ये या अराजका मुळे काय चालू आहे हे तरुणांना समजावण्याच्या ऐवजी येथे पण नेपाळ श्री लंकेसारखी क्रांती केली पाहिजे हे सांगणाऱ्या नेत्यांना अक्षरशः देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली पाहिजे.
झुरळांच्या नेत्यांकडे काही तरी ठोस कार्यक्रम आहे का?
नीट मधून १ लाख ३७ हजार जागा उपलब्ध आहेत यात ६३ हजार सरकारी महाविद्यालयात आहेत आणि २२ लाख इच्छुक आहेत
there are a total of 136,939 MBBS seats available across India for the 2026-27 academic session, which includes 63,296 government seats and 73,643 private seats.
मग बाकी २० लाख विद्यार्थी हे काय करणार आहेत? याबद्दल झुरळांकडे काही विचार आहे का?
परीक्षांत पेपर फुटणे हे वाईट आहेच. पण हे गेली ७५ वर्षे चालू आहे. माझ्या लहानपणापासून मी हे ऐकत आलो आहे.
आपल्याला एका परीक्षेत यश मिळाले नाही तर काय होईल याचा विचार आईबापांनी करून ठेवणे आवश्यक आहे. त्यात प्राधान्यक्रम ठरवून ठेवणे आवश्यक असते. अन्यथा विश्वास नांगरे पाटील यांच्या कहाण्या ऐकून तिशी पर्यंत यू पी एस सी च्या वाऱ्या करून झाल्यावर खाजगी कंपनीत चिकटून सरकारला शिव्या घालणारे लोक काही कमी नाहीत.
झुरळांकडून आशा ठेवणारे अतिउच्च शिक्षित लोक पाहिले कि हसावे कि रडावे हे कळत नाही.
मोदी सरकारच्या आत्यन्तिक द्वेषातून लोक आपली सारासार बुद्धी गहाण कशी ठेवतात याचे आश्चर्य वाटते.
कर्मकांड की पलायन ?
सोत्रि,
कारणाच्या मुळाशी जायला वेळ व/वा इच्छा असेलंच असं नाही. किंबहुना खूपश्या लोकांना शक्य होत नाही. अशांनी जर कर्मकांडात आधार शोधला तर ते पलायन कसं काय?
आ.न.,
-गा.पै.
गामाजी, मनुष्यप्राणी जेव्हा…
In reply to कर्मकांड की पलायन ? by गामा पैलवान
गामाजी,
मनुष्यप्राणी जेव्हा जेव्हा निर्णय घेण्याच्या क्षणाला येतो (जो की प्रत्येक क्षण असतो), तेव्हा तेव्हा तो त्याच्याकडे असलेल्या डेटा पॉईंट्सनुसार निर्णय घेत असतो. (प्रत्येक घेतलेला निर्णय हे कर्म जे मनुष्यप्राणी करतो).
कारणाच्या मुळाशी जायला वेळ व/वा इच्छा असेलंच असं नाही. किंबहुना खूपश्या लोकांना शक्य होत नाही कारण त्यासाठी लागणारे डेटा पॉईंट्स त्यावेळी त्याच्याकडे नसतात. त्या परिस्थितीतुन सुटका करून घेणं हे त्यावेळी मनुष्यप्राण्याचं प्राधान्य असतं. मग त्यावेळी त्याच्याकडे असतात परंपरेनुसार चालत आलेले कर्मकांडांचे डेटा पॉईंट्स. जे फक्त पुर्वापार चालत आलेले आहेत म्हणून त्यांचं अनुकरण केलं जात असतं. कारणाच्या मुळाशी जाउन त्यांचं निर्मुलन करणं सयुक्तिक असतं हा डेटा पॉईंट त्यामुळे मनुष्याकडे येत नाही जो अत्यंत गरजेचा आहे. सबब, जर कर्मकांडात आधार शोधला तर ते पलायन असतं.
वानगीदाखल माझ्या एका पलायनाचा किस्सा:
मी डिप्लोमाला असताना एक विषय अत्यंत नावडीचा होता आणि ड्रामा-डेच्या तालमीच्या नावाखाली त्या विषयाची लेक्चर्स बंक केली होती सेमीस्टरभर. अर्थातच त्या विषयात ATKT लागणार होती. शाळेय जीवनात हुषार म्हणून गणणा केली जाणाऱ्याला ATKT, ही परिस्थीती भायावह होती माझ्यासाठी. शिक्षक असणाऱ्या वडिलांना कसे तोंड द्यायचे याचा प्रचंड ताण आला होता. त्यावेळी, वडील दत्त सम्प्रदायातले असल्याने घरी गुरुचरित्राची पारायणं करायचे ते पाहिलेलं होतं, तो डेटा पॉईंट माझ्या स्मृतीत जमा होता. मला तो तणाव कसा हाताळायचा याचं ज्ञान नव्हतं म्हणजे त्यासाठीचे डेटा पॉईंट्स माझ्याकडे नव्हते. म्हणून त्यावेळी मी निकाल लागेपर्यंंत दर गुरुवारी गुरुचरित्राची (अध्याय २१) पारायणं करायचं ठरवलं आणि त्याप्रामाणे करायचो. कारण हा खालचा श्लोक, मनात घरलं होतंं श्रीगुरुदेवदत्त मला पास करणार आणि ATKT च्या नामुष्कीपासून वाचवणार:
जया नाम कल्पतरु । प्रत्यक्ष जाणा औदुंबरु ।
जें जें मनीं इच्छिती नरु । साध्य होय परियेसा ॥ ८६ ॥
अर्थात जो 'निकाल' लागयचा तो लागलाच. 😀
- (कर्मकांडं नाकारणारा नम्र) सोकाजी
कर्मकांड म्हणजे PK ने…
कर्मकांड म्हणजे PK ने मोदींना निवडणूक जिंकून देणे आहे.