Skip to main content

मेडिकल दुकानातून औषधे विकत घेताना ...!

लेखक kvponkshe यांनी सोमवार, 29/06/2026 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
! जन जागृतीसाठी !


एका नातेवाईकांसाठी VSL ३ हे औषध आणायचे होते. हे औषध प्रो बायोटिक आहे. म्हणजे अनेक उपयुक्त जीवाणू आपल्या जठर आणि पचन क्रियेच्या इतर काही भागात असतात. प्रतिजैविक आणि इतर काही कारणाने त्यांची कमतरता झाली की अन्नपचन बिघडते. म्हणून पूरक म्हणून VSL ३ सारखी पूरक कॅप्सूल मधून अन्नपचनासाठी उपयुक्त जिवंत जीवाणू रुग्णास देतात.
आता मूळ मुद्दा :
VSL ३ च्या खोक्याच्या मागे पाहिलत तर त्याचे स्टोअरेज तापमान दिलंय. २ अंश सेल्सियस ते ८ अंश सेल्सिअस मध्ये ते साठवावे असे स्पष्ट निर्देष दिलेत.
आज पुण्यात ४-५ दुकाने फिरलो. सगळीकडे सहज उपलब्ध होते हे मेडिसिन, पण औषधांच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले. मी सगळ्यांना विचारले की फ्रिज मध्ये का नाही ठेवलेत ? तुम्ही फार्मसी चे शिक्षित आहेत ना ? ..
आश्चर्य म्हणजे एकालाही या मेडिसिन च्या स्टोअरेज बाबत माहिती नव्हते. एकाने तर मला "२-८ सेल्सिअस लिहिलंय ना ? मग आता कुठे इतके ऊन आहे असा प्रश्न विचारला. मी त्याला मोबाईलवर पुण्याचे सध्याचे तापमान दाखवले. मग शांत बसला आणि त्याच्या दुकानातील पोराला ते औषध फ्रिज मध्ये ठेवायला दिले.
खरंतर प्रत्येक औषधांचे एक साठवायचे तापमान असते, त्यातच तिच्यातील सॉल्ट किंवा घटक परिणामकारक राहतात आणि अपेक्षित परिणाम रुग्णाला मिळतो. अशा औषधांचे ट्रान्सपोर्ट करताना सुद्धा हे तापमान निश्तिच ठेवावे लागते.
सगळ्यात आश्चर्यकारक आणि मजेशीर बाब म्हणजे या सगळ्या मेडिकल शॉप्स मध्ये कॅडबऱ्या मऊ पडू नयेत म्हणून जे काचेचे आईस्क्रीम वगैरे पदार्थ थंड ठेवणारे शोकेस असतात त्यात ठेवलेल्या होत्या.
तेव्हा, जसे आपण सगळे आपल्याला प्रिसक्राइब केलेले औषध एक्सपायरी पाहून घेतो तसेच त्याचे साठवणूक नियम काय आहेत आणि त्यानुसार त्या औषधाचे स्टोअरेज केले आहे ना हे पाहून घ्या.
अजून एक निरीक्षण : त्या त्या डॉक्टरच्या आसपासच्या मेडिकल मध्ये आपल्या डॉक्टरांनी प्रिसक्राइब केलेली औषधे त्याच कंपनीची मिळतात. दूर वरच्या मेडिकल्स मध्ये ती दुसऱ्या कंपनीची असतात, आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली लगेच मिळत नाहीत.
तळटीप : मी मेडिकल प्रॅक्टिशनर नाही आणि औषध निर्माण शिक्षित नाही, पण अनुभवातून वरील माहिती देत आहे. काही चुकले असेल तर जरुर सांगावे.
या औषधाचे नाव , फोटो फक्त उदाहरण म्हणून दिले आहे. May be an image of medicine and text that says "© 1mg NET QUANTITY: NETQUANTTY:10N 10N Live Freeze- Freeze-Dried Dried Lactic Acid Bacteria and Bifidobacteria Capsules VSL3 D The Living Shield"

May be an image of text


कौस्तुभ पोंक्षे
८००७६०५०८२
लेखनविषय:

वाचने 445
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

इथे लिहिण्यापेक्षा तुकाराम मुंडेना कळवा. ते सध्या धडाडीने काम करत आहेत म्हणे. 

निदान झाला तर फायदा तरी होईल.

 


असे हजारो मुंढे आपल्याला हवे आहेत. जिथे जाउ तिथे खाउ वाल्यांना मात्र अशांचा त्रास होतो आणि दरवर्षी भ्रष्ट लॉबीच्या प्रभावामुळे बदली होते. 

शिर्डीमध्ये हजारो किलो भेसळयुक्त प्रसाद जप्त

ग्राहकांनी विचारल्याखेरीज बिस्लेरी विकायला हॉटेलना बंदी


उत्तम माहिती! एक्सपायरी डेट सोबत तापमानही पाहायला हवे! नाहीतर पैसा जायचा पण गुण नाही यायचा.


मेडीकल शॉप मधे औषधामागे   साधारणत: किमान २० टक्के  नफा असतो. काही स्कीम वगैरे असेल तर ते वेगळे.

तरीदेखील मेडीकल शॉप ओनर्स असोसिएशन गावात कोणत्या कम्पनीचा माल विकू द्यायचा हे ठरवते.

उदा: बऱ्याच गावांमधे जॉन्सन & जॉन्सन चे बेबी प्रॉडक्ट  उपलब्ध नसायचे. याचे कारण ही तेच होते.

फार्मा शॉप ओनर असोसिएशन ही एक बलाढ्य संघटना आहे. 

तुम्ही त्यांच्याकडे तक्रार केली तर ते एखाद्या कंपनीला नमवू शकतात. पण दुकानदाराच्या विरोधात कधीच कारवाई करत नाहीत.

 


 पुण्याच्या ३२-४० या तापमानात ते स्टोअर केल्याने त्याचे घातक परिणाम काय होतात? हे सांगणारा जाणकार कुणी आहे का?  एक्स्पायरी डेट बाबत माझ्या मनात असे तर्कट यायचे की, उदा एक्स्पायरी जुन २०२६ आहे तर ३० जुन रात्री ११.५९ पर्यंत ते औषध असते व  बारा वाजले रे वाजले की त्याचे विष बनायला सुरवात होते. त्यामुळे ते औषध जर तुम्ही १ जुलैला घेतले तर सुपरिणाम व्हायच्या ऐवजी दुष्परिणामच होतील