हरिद्वार – कटरा – जैसलमेर – जोधपूर : स्वप्नातील प्रवासाची आखणी
२०१८ साली आम्ही काश्मीर ट्रिप करून आलो आणि त्यानंतर ठरवल होत की ह्या पुढची सहल नवीन जागी जाउ म्हणुन. तसे आम्ही दरवर्षी वैष्णोदेवी यात्रा करतोच आणि सोबत एखादी नवीन जागा फिरुन येतो. . नवीन ठिकाणे शोधणे, त्यांची माहिती वाचणे, प्रवासाचे व्हिडिओ पाहणे आणि पुढच्या सहलींची स्वप्ने रंगवणे हा आमच्या आयुष्याचा एक भागच बनला होता. एखाद्या ठिकाणाचा सुंदर फोटो किंवा व्हिडिओ दिसला की तिथे कधी जायचे याचे विचार मनात सुरू व्हायचे.
कुठे जायच असा विचार करत असताना २०१९ चा सप्टेंबर महिना आला. जानेवारी २०२० मध्ये कुठेतरी मोठी सहल करायची असे आम्ही ठरवले. दिवाळी, ख्रिसमस किंवा शाळांच्या सुट्ट्यांमध्ये सर्व पर्यटनस्थळांवर प्रचंड गर्दी असते. त्यामुळे गर्दी टाळून निवांतपणे प्रवासाचा आनंद घ्यावा म्हणून आम्ही जानेवारी महिन्याची निवड केली.
या प्रवासासाठी आमच्या घरातून मी, आई आणि माझी बहीण तयार होतो. माझी मैत्रीण स्नेहा व निलिमा, निलिमाचा भाचा आणि माझा मित्र समीरही आमच्यासोबत येणार होते. समीर आमच्या काश्मीर ट्रिपलाही सोबत होता. अशा प्रकारे आम्ही एकूण सात जणांचा छोटासा पण उत्साही ग्रुप तयार झाला.
सुरुवातीला हरिद्वार, ऋषिकेश आणि अमृतसर एवढाच विचार होता. मात्र मी, आई आणि माझी बहीण या आधी हि अमृतसर जाऊन आलो होतो. तर माझ्या बहिणीने सांगितले की आपण त्यापेक्षा जैसलमेर जाऊ. पण हा अगदी वेगळा रुट होत होता. मग गुगलवर शोधमोहीम सुरू झाली. अनेक प्रवासवर्णने, ब्लॉग, यूट्यूब व्हिडिओ आणि पर्यटन संकेतस्थळे पाहिली. प्रत्येक ठिकाणाविषयी माहिती गोळा केली. हळूहळू आमचा प्रवास आकार घेऊ लागला आणि अखेर मुंबई- हरिद्वार – ऋषिकेश – कटरा – अमृतसर – जैसलमेर – जोधपूर – मुंबई असा तब्बल १३ दिवसांचा प्रवास निश्चित झाला.
पुर्ण प्लन मग सर्वाना ईमेल केला. सर्वांना तो आवडला ही.
प्रवास ठरवणे जितके सोपे वाटते तितके प्रत्यक्षात नसते. सात जणांच्या वेळा, सुट्ट्या, बजेट आणि प्रवासाचे पर्याय यांचा विचार करावा लागतो. पण त्या नियोजनातही एक वेगळी मजा असते. प्रत्येक फोन कॉल, प्रत्येक चर्चा आणि प्रत्येक नवीन माहिती आम्हाला प्रवासाच्या आणखी जवळ नेत होती.
यानंतर सुरू झाले रेल्वे तिकिटांचे नियोजन. आजकाल सर्व बुकिंग ऑनलाइन होत असल्याने काम थोडे सोपे झाले असले तरी सात जणांचे संपूर्ण प्रवासाचे आरक्षण करणे हे मोठे आव्हान होते. रेल्वेचे आरक्षण चार महिन्यांपूर्वी उघडते, त्यामुळे योग्य दिवशी आणि योग्य वेळी बुकिंग करणे आवश्यक होते.
अनेक वेळा रेल्वेचे वेळापत्रक तपासले, जोडणाऱ्या गाड्या पाहिल्या आणि मग अंतिम निर्णय घेतला.
आमच्या प्रवासातील रेल्वे मार्ग पुढीलप्रमाणे ठरला –
• मुंबई ते हरिद्वार – LTT HWH Superfast
• हरिद्वार ते कटरा – Hemkunt Express
• जम्मू ते जोधपूर – JAT ADI Express
• जोधपूर ते जैसलमेर – बस प्रवास
• जैसलमेर ते जोधपूर – JSM JU Express
• जोधपूर ते मुंबई – Ranakpur Express
रेल्वे आरक्षण पूर्ण झाल्यानंतर हॉटेल्स आणि स्थानिक वाहतुकीची व्यवस्था करण्याचे काम सुरू झाले. इंटरनेटवर अनेक संकेतस्थळे तपासली. Make My Trip, Booking.com, Yatra अशा विविध प्लॅटफॉर्मवर दर आणि सुविधा यांची तुलना केली. प्रत्येक ठिकाणी स्वच्छता, स्थान, पुनरावलोकने आणि किंमत यांचा बारकाईने अभ्यास केला.
हरिद्वारसाठी युपी गव्हर्मेंट च्या साईट वरुन त्यांच खासगी घाट असलेल अलकनंदा हे होटेल बुक केल.. कटरा आम्ही 7 व्यांदा जात होतो त्यामुळे आमच नेहमीच हॉटेल श्रीधर बुक केल. हरिद्वार वरुन ऋषिकेश जाण्यासाठी गाडी गुगल वरुन शोधलेल्या India Easy Trip (P) Ltd मधुन बुक केली. जैसलमेरसाठी मात्र विशेष उत्सुकता होती. तिथे पृथ्वी पॅलेस नावाचे एका हवेलीचे हॉटेल मधे रुपांतर केलेले हॉटेल बुक केले.जैसलमेर मधे ऊँटाची सफारी Sam Dunes नावाच्या साइट वरून बुक केली.अनेक पुनरावलोकने वाचल्यानंतर योग्य कॅम्पची निवड केली. उंट सफारी, लोकनृत्य, राजस्थानी जेवण याची कल्पना मनातच आनंद निर्माण करत होती.जोधपुर मधे ओम हेरिटेज हॉटेल बुक केले.
हळूहळू सर्व बुकिंग पूर्ण झाली आणि आता प्रवासाची प्रत्यक्ष तयारी सुरू झाली. डिसेंबर महिना सुरू होताच शॉपिंगची लगबग सुरू झाली. राजस्थानमधील थंडी, हरिद्वारमधील सकाळचे वातावरण आणि प्रवासाचा कालावधी लक्षात घेऊन आवश्यक वस्तूंची यादी तयार केली.
दिवस जसजसे जवळ येत होते तसतसा उत्साह वाढत होता. अखेर २० जानेवारीची वाट पाहणे सुरू झाले. अनेक महिन्यांच्या नियोजनानंतर आता स्वप्नातील प्रवास प्रत्यक्षात साकार होणार होता.
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो कसे टाकावे समजत नाहीये. मदत हवी. गुगल ड्राइव मधे आहेत फोटोज
फोटो कसे टाकावे समजत नाहीये. मदत हवी. गुगल ड्राइव मधे आहेत फोटोज.
<img src="https://drive.google.com/ /file/d/18kXuBNkPBlldNao0Xr1ZrSOx9IRRxt2Q/ " width="80%" /><br /><br />
हे प्रयत्न केले नाहि जमत आहे.
गूगल ड्राईव्हमधे एकेक फोटो उघडून
In reply to फोटो कसे टाकावे समजत नाहीये. मदत हवी. गुगल ड्राइव मधे आहेत फोटोज by नयना माबदी
गूगल ड्राईव्हमधे एकेक फोटो उघडून प्रत्येकावर कर्सर आणून - right click - copy image करून लेखात योग्य ठिकाणी paste केल्याने फोटो डकवला जातो. आकार कमिजास्त diagonal ओढून करता येतो.
लेखाच्या शेवटी 'क्रमश:' लिहावे.
धन्यवाद
In reply to गूगल ड्राईव्हमधे एकेक फोटो उघडून by चित्रगुप्त
धन्यवाद
कर्सर आणून - right click option येत नाही आहे.
In reply to गूगल ड्राईव्हमधे एकेक फोटो उघडून by चित्रगुप्त
कर्सर आणून - right click option येत नाही आहे.
लॅपटॉपवर होते आहे.
In reply to कर्सर आणून - right click option येत नाही आहे. by नयना माबदी
हे काम लॅपटॉपवर सहज होते आहे.
या लिन्क वर क्लिकले असता …
In reply to फोटो कसे टाकावे समजत नाहीये. मदत हवी. गुगल ड्राइव मधे आहेत फोटोज by नयना माबदी
या लिन्क वर क्लिकले असता "नॉट फाऊन्ड" असे येते.
हा फोटो नीट प्रॉपरली पब्लिकली शेअर झालेला दिसत नाहिये , नाही तर कॉपी पेस्ट काम करते.
शेअरिंग तपासुन पहा.
हे मी गुगल फोटो वरून पब्लिक शेअर करुन कॉपी पेस्ट केले आहे. जमले.
In reply to फोटो कसे टाकावे समजत नाहीये. मदत हवी. गुगल ड्राइव मधे आहेत फोटोज by नयना माबदी
क्रुपया मला कोणी विडियो करुन दाखवेल का?
In reply to हे मी गुगल फोटो वरून पब्लिक शेअर करुन कॉपी पेस्ट केले आहे. जमले. by चौथा कोनाडा
क्रुपया मला कोणी विडियो करुन दाखवेल का? मी सर्व प्रयत्न केले. नाही जमत आहे.
source म्हणुन option आहे तिथे सुद्धा मी add करुन पाहिल. नाही जमत आहे.
google drive मधुन photo वर क्लिक केल्यावर copy image option येत नाही.
thank you
दुसऱ्या लेखात विडिओ अपलोड कृती दिली आहे आताच
In reply to क्रुपया मला कोणी विडियो करुन दाखवेल का? by नयना माबदी
मिसळपाव फोटो अपलोड धाग्यात पाहा.
चांगली सुरुवात.जैसलमेर…
चांगली सुरुवात.
जैसलमेर म्हटलं की शान-ए-जैसलमेर, साम गाव, वाळूतली पोकळी वगैरे आठवते
धन्यवाद
In reply to चांगली सुरुवात.जैसलमेर… by प्रचेतस
धन्यवाद
सुंदर सुरूवात.
नियोजनावर जेव्हढा जोर द्याल तेव्हढी ट्रिप चांगली होते.
सर्व प्रकारची माहिती आणी प्लॅन बी जर तयार असावा.
कटरा सोडले तर सर्व परिसर फिरून झालाय. सर्वच जागा प्रेक्षणीय आहेत. खाण्या पिण्याची चंगळ आहे.
पु भा प्र
धन्यवाद
In reply to सुंदर सुरूवात. by कर्नलतपस्वी
धन्यवाद. हो सर्वच जागा प्रेक्षणीय आहेत.
लवकरच पु.भा प्रकाशित करेन.
photoes add करायला जमत नाही आहे.
मोबाईल वरुन
In reply to धन्यवाद by नयना माबदी
ड्राइव्ह लिंक जराशी बदलून वापरावी लागते. तुम्ही तुमच्या पहिल्या प्रतिसादात दिलेली लिंक अशी आहे.
👇
https://drive.google.com/file/d/18kXuBNkPBlldNao0Xr1ZrSOx9IRRxt2Q
ह्या लिंक मधील drive.google.com/file हा भाग काढून टाकून त्याजागी lh3.googleusercontent.com असा बदल करा.
बदललेली नवी लिंक अशी असेल.
👇
https://lh3.googleusercontent.com/d/18kXuBNkPBlldNao0Xr1ZrSOx9IRRxt2Q
ही बदललेली लिंक मिपाच्या एडिटर मधे image upload via url ही सोय वापरून insert करता येईल.
तुम्हि हि जि लिंक दिली आहे
In reply to मोबाईल वरुन by सुमो
तुम्हि हि जि लिंक दिली आहे ति पेस्ट केली तर image दिसतेय. पण सेम जर मी दुसरा फोटो सिलेक्ट केला तर नाही होत आहे.
कोणताही फोटो डकवता येतो.
In reply to तुम्हि हि जि लिंक दिली आहे by नयना माबदी
१. गूगल ड्राइव्ह वरील फोटो पब्लिक शेअर्ड आहे का ते तपासा.
२. फोटोची परवानगी 'Anyone with link can view' अशी हवी.
जो फोटो डकवायचा आहे तो या दोन बाबी बरोबर असतील तर त्याची शेअर लिंक खालील प्रमाणे असते.
https://drive.google.com/file/d/1KuwIz-CrMtD8FGpwHGVY0FirlOw0uuUo/view?usp=drivesdk
ही फोटो डकवण्यासाठी लिंक मधील शेवटचा /view?usp=drivesdk हा भाग काढून टाका. आणि drive.google.com या ऐवजी lh3.googleusercontent.com असा बदल करा. /file हा भागही काढून टाका. अशी बदललेली लिंक खालील प्रमाणे होइल.
https://lh3.googleusercontent.com/d/1KuwIz-CrMtD8FGpwHGVY0FirlOw0uuUo
ही बदललेली लिंक मिपावर फोटो डकवण्यासाठी वापरा. फोटो नक्की दिसेल.
हे बघा तसाच प्रयत्न केला आहे.
In reply to कोणताही फोटो डकवता येतो. by सुमो
हि लिंक आहे.
In reply to हे बघा तसाच प्रयत्न केला आहे. by नयना माबदी
https://Ih3.googleusercontent.com/d/1v4HQLxECsFD6eF2sLmyHRtpuTVwKwVRw
फोटो शेअर झालेला नाही.
In reply to हि लिंक आहे. by नयना माबदी
ड्राइव्ह फोटो सेटिंग तपासा. पब्लिक शेअर्ड फोटो असावा लागतो तर आणि तरच डकवता येतो.
जो फोटो मिपावर द्यायचा आहे त्याचं सेटिंग असं आहे का ते तपासा. 👇
असाच आहे. तरी सुद्धा नाहि दिसत आहे.
In reply to फोटो शेअर झालेला नाही. by सुमो
असाच आहे. तरी सुद्धा नाहि दिसत आहे. मला एक सांगाम लेखन करताना जर मी image link paste केली तर ती image preview madhe दिसली पाहिजे. त्यानंतरच मी प्रकाशित करु शकते ना?
मला preview मधेच image दिसत नाहि आहे.
छान.
धार्मिक, पर्वतीय आणि वाळवंट अशा जागा एकाच सहलीत निवडल्या आहेत.
धन्यवाद
In reply to छान. by कंजूस
हो. एकाच वेळी .
धन्यवाद
मुंबई हरिद्वार किति वेळ…
मुंबई हरिद्वार किति वेळ लागला प्रवासाला
ट्रेन २९ तास घेते. पण उशीर…
In reply to मुंबई हरिद्वार किति वेळ… by सुस्वरूप
ट्रेन २९ तास घेते. पण उशीर झाल्यामुळे ३३ तास लागले.
मी तसेच केले आहे