Skip to main content

म्युच्युअल फंड - भाग २

लेखक उदय यांनी गुरुवार, 25/06/2026 11:45 या दिवशी प्रकाशित केले.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना दोन प्रकारचे खर्च असतात. पहिलं म्हणजे फंड विकत घेताना किंवा विकताना वजावट म्हणजेच लोड (load) घेतले जाते. आता सेबीच्या (SEBI) नियमामुळे फ्रंट लोड Front load (जो कमिशनचाच एक प्रकार होता आणि जे फंड खरेदी करताना घेतले जायचे), ते बंद झाले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण फंड विकताना जी वजावट घेतली जाते म्हणजे एक्झिट लोड (Exit load) ते अजूनही चालू आहे. फंड तुम्ही जर १ किंवा २ वर्षात विकलात तर Exit load कापून तुम्हाला पैसे दिले जातात. फंडाच्या स्कीमनुसार १-२ वर्षांनी exit load शून्य होते. एका अर्थाने हा प्रकार अगदीच वाईट म्हणता येणार नाही कारण जे long term गुंतवणूकदार आहेत त्यांना फंड प्राधान्य देते. त्यामुळे फंड वारंवार खरेदी-विक्री करण्याचा जो प्रकार होता, म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायचा प्रकार होता त्याला काही प्रमाणात आळा बसतो. त्यामुळे फंडाच्या उर्वरित गुंतवणूकदारांचे जास्त नुकसान होत नाही. या शॉर्ट टर्म ट्रेडिंगमुळे काय होतं की मॅनेजरला सारखी-सारखी redemption (विक्री) करावी लागते आणि ज्याच्यामुळे खर्च वाढत असतो. हे शक्यतो टाळण्यासाठी म्हणून हे एक्झिट लोड टाकण्याचा प्रकार असतो. तुम्ही लाँग टर्म गुंतवणूक करणार असाल, तरच अशा फंडात गुंतवणूक करा म्हणजे एक्झिट लोडमुळे तुमचे नुकसान होणार नाही.

आता अजून कुठला खर्च आहेत ते बघूया. तर तो म्हणजे ऑपरेटिंग एक्स्पेन्स (operating expense) म्हणजेच फंड चालवण्याचा खर्च.

आता ऑपरेटिंग एक्स्पेन्समध्ये काय काय येतं तर १) मॅनेजमेंट फी: ज्याच्यात transaction म्हणजे स्टॉक्स/बॉण्ड यांचे खरेदीविक्रीचे खर्च असतात आणि शिवाय AMC चा फायदा पण असतो. २) डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्स: जे फंड "म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर"च्या मार्फत विकले जातात, त्यांना पैसे मिळण्यासाठी असतात. ३) बाकी इतर expenses जे फंड चालवण्यासाठी लागतात म्हणजे रेकॉर्डकीपिंग फी, लीगल आणि ऑडिटिंग फी, डायरेक्टर फी, custodian फी वगैरे.

वरील सर्व खर्च एकत्र करून, प्रत्येक युनिटमागे किती टक्के expense पडेल, ते ठरवले जाते.

म्युच्युअल फंड खरेदी करण्यासाठी २ पद्धती आहेत.

१. "म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर" कडून खरेदी करणे, ज्याला रेग्युलर प्लॅन (Regular Plan) म्हणतात.

२. डायरेक्ट प्लॅन (Direct Plan) म्हणजे म्युच्युअल फंड थेट AMC कडून घेतला जातो. यात डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्स नसल्यामुळे खर्च कमी होतो, त्यामुळे TER (Total Expense Ratio) बराच कमी असतो.

आता म्युच्युअल फंडचा Expense Ratio बघणं फार आवश्यक आहे कारण हा खर्च दरवर्षी द्यावा लागतो. प्रत्यक्षात तो काहीसा अपारदर्शक असतो, म्हणजे काय तर तो तुम्हाला स्टेटमेंटमध्ये कधीच स्पष्ट दाखवला जात नाही. समजा expense ratio 1.8% आहे आणि तुम्ही एक लाख रुपये गुंतवलेत तर आम्ही ₹1800 कापून घेऊ असं तुम्हाला स्पष्ट कधीच दिसत नाही, पण हा एक्स्पेन्स कापून नंतरच फंडची NAV ठरवली जाते त्यामुळे गुंतवणूकदाराला पटकन लक्षात येत नाही.

उदाहरणार्थ, समजा एखाद्या फंडाची १४% gross वाढ झाली आणि जर TER २% असेल तर प्रत्यक्षात गुंतवणूकदाराचा फायदा फक्त १२% होतो. बरेच लोक असा विचार करतात की फंड जर मला १५ ते १८% कमवून देतोय तर २% expense ratio ने काय फरक पडतो? मी इतके कमवतोय तर फंड मॅनेजरने पण दोन टक्के कमवू दे. माझ्या मते ही वृत्ती तुमच्यासाठी खूप घातक ठरू शकते. याचं मुख्य कारण म्हणजे हा जो TER आहे तो दरवर्षी कापला जाणार आहे. हे २% चक्रवाढ व्याजाने तुमचे खूप नुकसान करते. याशिवाय, जर समजा मार्केटने कधी -१०% दिले तरी तुम्हाला परतावा मिळणार -१२% कारण २% expense घेतला जाणारच.

तर दरवर्षी तुम्ही एक ते दोन टक्के expenses मध्ये दिले तर किती कमी पैसे मिळतील आणि किती नुकसान होईल हे बघण्यासाठी पुढील चित्र बघा.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बॉण्डमध्ये परतावा हा साधारणपणे स्टॉकपेक्षा बराच कमी असतो. त्यात भर मध्ये तुम्ही जर टीआर कडे लक्ष दिलं नाही तर तुमचं अजूनच नुकसान होतं. म्हणजे कसं? उदाहरणार्थ: १) इक्विटी फंडमध्ये ग्रॉस परतावा 12% आणि तुमचा TER 1.2% आहे तर तुम्हाला नेट परतावा मिळेल तर 10.8% २) बॉण्ड फंड मध्ये समजा तुम्हाला ग्रॉस रिटर्न्स मिळाले 6% आणि TER आहे 1.2% तर तुम्हाला नेट परतावा मिळेल 4.8% 

याचा अर्थ इक्विटी फंडात 12% च्या 10 टक्के फायदा फंडाचे खाऊन टाकला. (12%x10%=1.2%), पण तेच बॉण्ड फंडामध्ये मात्र TER तेवढाच असूनही एकूण फायद्याच्या 20 टक्के फायदा (6%x20%=1.2%) निघून गेला म्हणजे बॉण्डमध्ये तुमचं अजूनच नुकसान झाला.

आता आपण बघूया BER म्हणजे Base Expense Ratio. 2026 पासून सेबीने BER ही संकल्पना आणली आहे. BER म्हणजे काय तर त्याच्यात मॅनेजमेंट फी एडमिन कॉस्ट डिस्ट्रीब्यूशन हे खर्च स्वतंत्र(separate) दाखवलेले असतात.

१) BER + २) गव्हर्मेंट फी म्हणजे जीएसटी, एस टी टी, स्टॅम्प ड्युटी वगैरे. + ३) ब्रोकर फी हे सगळं एकत्र केलं की TER बनतो. BER दाखवल्यामुळे सेबीच्या दृष्टीने म्युच्युअल फंडची तुलना करणे अधिक सोपं होणार आहे. अजून बरेचसे फंड बीईआर सहज दाखवत नाहीत (तसं म्हटलं तर टीईआर सुद्धा बऱ्याच ठिकाणी स्पष्ट दाखवत नाहीत) पण तुम्हाला BER आणि TER ही माहिती ए एम एफ आय इंडिया डॉट कॉम या वेबसाईटवर मिळेल.

https://www.amfiindia.com/ter-of-mf-schemes

 

म्हणूनच तुम्ही शक्यतो कमीत कमी टीईआर चा म्युच्युअल फंड घ्या. आता म्युच्युअल फंड घ्यायचे पण दोन प्रकार आहेत एक म्हणजे डायरेक्ट प्लॅन आणि दुसरा म्हणजे रेगुलर प्लांट तर म्युच्युअल फंड्स डायरेक्ट प्लॅन हा तुम्हाला थेट एमसी करून घेता येतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला कमिटीआर पडतो कारण की त्यांना डिस्ट्रीब्यूशन कॉस्ट द्यावी लागत नाही जर समजा तुम्ही तोच फंड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर करून घेतलात तर त्यांचं कमिशन फंडाला द्यावा लागतं आणि त्याच्यामुळे त्यासाठी TER तुलनेत खूपच जास्त असतो.

त्यामुळे तुम्ही फंड नेहमी डायरेक्ट प्लान मध्ये घेणच तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. एक उदाहरण बघूया समजा तुम्ही 1 कोटी,  15 वर्षासाठी गुंतवले आणि याच्यावर 12% Gross returns आहेत तर १) TER = 1.8% असेल तर तुमचा फायनल कॉर्पस होईल 4.18 करोड

२) TER = 0.8% असेल तर तुमचा कॉर्पस होईल 4.92 करोड 

म्हणजेच तुमचा फायदा झाला 74 लाख रुपये.

दुसरा एक उदाहरण घेऊया. समजा तुम्ही मासिक SIP केली दहा हजार रुपयाची जी 25 वर्ष केली आणि समजा म्युच्युअल फंडाचे ग्रॉस रिटर्न 12% आहेत तर 

१) जेव्हा TER = 0.5% असेल तेव्हा तुमचा कॉर्पस होईल 2.05 करोड 

२) TER  = 1%  असेल तर कॉर्पस होईल 1.6 करोड 

३) TER = 1.5% असेल तर तुमचा कॉर्पस होईल फक्त 1.37 करोड

याचा अर्थ काय तर तुम्ही जर नीट लक्ष दिलं नाहीत तर तुमचं नुकसान होईल 68 लाख रुपये.

म्हणून पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

१. म्युच्युअल फंड नेहमी Direct Plan मधून खरेदी करा.

२. TER (BER) कडे लक्ष द्या.

३. शक्यतो इंडेक्स फंड (Index funds) आणि ETF मध्ये पैसे गुंतवा.

(क्रमशः)
 

Sorry for many typos. I will fix them as time permits. Translating the financial concepts in Marathi is also challenging for me. So I will update and try to add some images as well. Sorry for the inconvenience.
 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 407
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

उत्तम आणि अत्यंत महत्त्वाची माहिती साध्या सोप्या शब्दात !  

जी सहसा आपल्याला आपला वित्तीय सल्लागार देत नाही. (डायरेक्ट फंडात पैसे गुंतवले तर त्यांना त्याचे कमिशन मिळत नाही).

बऱ्याच वेळेस वित्तीय सल्लागार आपल्या पेक्षा त्यांचा फायदा कसा होईल याकडे जास्त लक्ष देतात.( नैसर्गीक आहे ते).

     


TER दरवर्षी भरावा लागतो हे चुकीचे वाक्य आहे ..

<<<समजा एखाद्या फंडाची १४% gross वाढ झाली आणि जर TER २% असेल तर प्रत्यक्षात गुंतवणूकदाराचा फायदा फक्त १२% होतो>>>

हे अत्यंत चुकीचे वाक्य आहे

मुळात फंड ची NAV ही रोज च्या रोज ठरवली जाते ... NAV ठरवताना त्यातून TER (expenses) वजा केलेलेच असतात ... त्यामुळे मुळात NAV मध्ये १४% वाढ झाली तर तो तुमचा फायदा आहे .. त्यातून कुठलेही expenses वजा होत नाहीत

त्यामुळे कृपया चुकीची माहिती देऊ नका

शक्यतो index fund घ्या हा पण अत्यंत चुकीचा सल्ला आहे 


In reply to by अमर विश्वास

कृपया SEBI ची ही लिंक बघावी.
https://investor.sebi.gov.in/regular_and_direct_mutual_funds.html

Example

Suppose you invest ₹1,00,000 in a mutual fund offering 10% annual returns.

In a regular plan, an expense ratio of 1.5% reduces your effective return to 8.5%.

In a direct plan, with an expense ratio of 0.5%, your effective return is 9.5%.

Over 10 years, this difference can significantly impact your wealth due to the power of compounding.


उदाहरणच द्यायचे झाले तर

Nippon India Multi Cap Fund Direct Growth या फंडाचा expense ratio 0.61 % आहे तर त्याचा ५ वर्षांचा CAGR २०.५८% आहे

याउलट UTI Nifty 50 Index Fund-Growth Option- Direct या इंडेक्स फंडाचा expense ratio फक्त ०.२३% आहे .. पण याचा ५ वर्षांचा CAGR ९.७९% आहे

त्यामुळे फक्त expense ratio कमी म्हणून index fund घ्यायला जाल .. तर नुकसान कोणाचे आहे हे वेगेळे सांगायलाच नको 


In reply to by अमर विश्वास

Market efficiency makes it extremely difficult for any active manager to consistently identify and exploit mispriced securities over long term.

 

How Warren Buffett Won a $1 Million Bet Against the Hedge Fund Industry: What It Means for Investors

 


परंतु वैयक्तिक रित्या मी फक्त परतावा (CAGR/XIRR) बघतो.  एन्ट्रि/एक्झिट लोड, टॅक्स वगैरे अस्मानी सुलतानी कट होणारच.

 

तरीही--फंड २ वर्षा आधी न विकणे, डायरेक्ट फंडच घेणे (रेग्युलर नव्हे) ह्या टिप्स उत्तम आहेत.

सध्या कूबु ला विचारुन ३०% लार्ज, ३० फ्लेक्सि, २० मिड आणि २० स्मॉल असे करतो आहे.  शिवाय ग्रेटर चायना, युरोप आणि यु एस टेक फंड्स चालु आहेत. जे फंड बंद केलेत ते पैसे पडुन राहतील. 

 

३ वर्षे परतावा बघुन मग काय ते ठरवेन असे डोक्यात आहे. 


 

म्युच्युअल फंड नेहमी Direct Plan मधून खरेदी करा. 

हे थोडे प्रॅक्टिकली स्पष्ट करून सांगाल तर वाचकांना उपयोग होईल.

 


In reply to by कांदा लिंबू

डायरेक्ट प्लॅन पुढील प्रकारे घेता येतील.
१. थेट Asset Management Company (AMC) कडून खरेदी करणे. उदा. HDFC चे फंड थेट HDFC कडून खरेदी करावेत.
२. MF Central कडून. https://mfcentral.com/
३. Kuvera.in सारखी साईट वापरता येईल.
४. coin.zerodha.com सारखे app
 

पण नेहमी Direct Plan आहे याची खात्री करून घ्या. Regular हा शब्द दिसला की समजून जा की तुम्ही कमिशन देत आहात.


Yes, the Net Asset Value (NAV) of a mutual fund is always calculated after the deduction of the Total Expense Ratio (TER).

 

Impact on Returns: Since the daily NAV goes into your total return calculation, a higher TER directly results in a lower overall return for the investor.

 

The Total Expense Ratio (TER) of a fund directly reduces your net returns by the exact percentage of the fee, as it is deducted daily from the fund's Net Asset Value (NAV). Over the long term, this compounding drag can significantly impact wealth accumulation, turning small annual differences into major gaps in your final corpus


In reply to by सुबोध खरे


मुळात म्युच्यअल फंड मॅनेजर चॅरिटी करीत नसतात ...

त्यामुळे त्यांनी फुकटात / स्वस्तात सर्विस का द्यावी ? रस्त्यावरचा नाव्ही १० रुपयात दाढी करून देतो आणि सलूनवाला १०० रुपयात .. त्यामुळे कायम रस्त्यावरच्या नाव्ह्याकडेच जा .. हे म्हणणं आणि expense ratio कमी आहे म्हणून इंडेक्स फंड घ्या हे म्हणणं यात फारसा फरक नाही ...

वर उदाहरण दिले आहे ....  पण त्याचा कोणी प्रतिवाद करीत नाही .... प्रत्यक्ष डेटा (रिटर्न्स) घेऊन बोला ...


मुळात फंडाचा रिटर्न हा NAV मधल्या वाढीवर ठरत असेल तर एक्सपेन्स रेशो मुळे रिटर्न कमी होतो म्हणजे नक्की काय ? हा कुठला  नॉशनल रिटर्न ?


expense ratio मुळे रिटर्न कमी झाला हे प्रत्यक्ष एखाद्या फंडाचे उदाहरण घेऊन (खरे खुरे आकडे .. उगाच समजा वगैरे नको)  सांगू शकेल का कोणी ? 


In reply to by अमर विश्वास

expense ratio मुळे रिटर्न कमी झाला हे प्रत्यक्ष एखाद्या फंडाचे उदाहरण घेऊन (खरे खुरे आकडे .. उगाच समजा वगैरे नको

 

https://www.moneycontrol.com/mutual-funds/nav/icici-prudential-large-cap-fund/MPI392 14.22%CAGR रेगुलर फंड 

https://www.moneycontrol.com/mutual-funds/nav/icici-prudential-large-cap-fund-direct-plan/MPI1134  CAGR 14.86% डायरेक्ट फंड 

 

अशी हवी तेवढी उदाहरणे देता येतील 

एकाच फंडाचे रेगुलर आणि डायरेक्ट याचे CAGR आणि XIRR काढून पहा.  


In reply to by सुबोध खरे

मुळात म्युच्यअल फंड मॅनेजर चॅरिटी करीत नसतात ...

त्यामुळे त्यांनी फुकटात / स्वस्तात सर्विस का द्यावी.

 

 हे मान्य आहे. 

 

ज्याला बाजारात म्युच्युअल फंडात काहीच कळत नाही त्याने नक्कीच चांगला सल्लागार गाठावा आणि त्याचे शुल्क देऊन  गुंतवणूक करावी.

पण ज्याचा थोडा फार अभ्यास आणि अनुभव आहे  त्याने स्वतः डायरेक्ट फंडात गुंतवायला हरकत नाही.

जो माणूस सशाच्या हृदयाचा आहे त्याने बाजारात सल्लागाराच्या साहाय्याने उतरावे कारण बाजार पडू लागला तर त्याचा हात धरणारा सल्लागार असला तर त्याचे मोठे नुकसान टळू शकेल.

माझ्या सारखा माणूस असेल जो  २००८ च्या कठीण स्थितीत आपली गुंतवणूक ७० %ने खाली आलेली शांतपणे पाहू शकेल किंवा २०२० कोव्हीड च्या बाजाराच्या आपत्तीत थंड डोक्याने गुंतवणूक करू शकेल त्याला बाजाराच्या  भीतीने नुकसान होण्याची शक्यता फार कमी आहे.    

 

ता क - माझी म्युच्युअल फंडात गुंतवणूक नगण्य आहे मी थेट कंपन्यांच्या समभागातच गुंतवणूक करतो. 

   


In reply to by सुबोध खरे


In reply to by सुबोध खरे

प्रश्न इंडेक्स फंड वि इतर फंड आणि त्यांचे expense ratio याबद्द्दल होता ...

direct vs regular हा मुद्दाच नाहीये .. मी कुठेही याबद्दल बोललो नाहीये .... जात तुम्हाला फंड सिलेक्शन आणि एक्सिट याचा अभ्यास असेल तर direct प्लॅन निवडा 


In reply to by अमर विश्वास

रेगुलर आणि डायरेक्ट फंडातील CAGR आणि XIRR यातील फरक त्यांच्या एक्सपेन्स रेशोतील फरकामुळेच येतो  

 

(हा  एक्सपेन्स रेशोतील फरक फंडाच्या आणि सल्लागाराच्या  कमिशन मुळेच येतो)    


In reply to by सुबोध खरे

ते मलाही माहित आहे ...

माझा आक्षेप : शक्यतो इंडेक्स फंड घ्या या वाक्याला आहे 


In reply to by सुबोध खरे

Over the long term, index funds mathematically tend to yield better net returns than the majority of actively managed funds.

Actively managed funds require higher fees to cover research, trading, and management teams. These high expense ratios eat into your overall returns over time. Index funds simply track a benchmark (like the S&P 500 or NIFTY 50), making them highly cost-effective.

According to long-term market data, a significant majority (often 60% to 90%) of active fund managers fail to beat their benchmark indices over 5- to 10-year periods. It is extremely difficult to consistently pick "winning" stocks year after year. 

हे हि वाचून पहा. यात दोन्हीची तुलना केलेली आहे.    

https://www.london.edu/think/hope-active-mutual-funds

 

Does Index beat all active funds? NO

Do ALL active funds beat index? NO

Do most active funds underperform compared to index? Yes

Does the same active fund continuously outperform index? NO

Is there a way to predict which active fund will outperform index? NO

The active fund that you select may or may not beat the index but what is guaranteed is that they will upfront charge you almost 1% fee compared to index.

Since you can control only the known variables focus on minimising the cost and taxation and maximizing the SIP amount and staying in the market duration.


In reply to by सुबोध खरे

Does Index beat all active funds? NO

या पहिल्या ओळीतच मी काय लिहिले आहे त्याचे उत्तर आहे ..

जर असे फंड स्वतःच्या अभ्यासाने / अक्कल हुशारीने निवडता यात असतील तर ते निवडा आणि त्यात direct गुंतवणूक करा ..

जर तुमचा अभ्यास नसेल तर योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या

अजून एक .. लंडन मार्केट आणि इंडिया मार्केट वेगळे आहे

तसेच इंडेक्स फंडात small cap  / mid cap exposure नसते ... यावर आधीही विस्तृत लिहिले आहे त्यामुळे आता राजा घेतो 


In reply to by अमर विश्वास

>> तसेच इंडेक्स फंडात small cap  / mid cap exposure नसते

असहमत.

 

'no nothing inverstor' कॅटेगोरीसाठी इंडेक्स फंड म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा, कमी खर्चाचा आणि शिस्तबद्ध मार्ग.

इंडेक्स म्हणजे काय? तर, इंडेक्स म्हणजे शेअर मार्केटचा “स्कोरबोर्ड”. वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्केट कॅपनुसार वेगवेगळ्या कॅटेगरीजच्या इंडायसेस तयार केल्या जातात. म्हणजे त्या स्पेसीफीक इंडेक्समधे कोणत्या कंपन्या असायला हव्यात हे गणितीय अल्गोरिदम्स वापरून ठरवले जाते. 

 

ह्या इंडेक्स कोण ठरवतं ?

१. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज  - https://www.bseindices.com/

२. ननॅशनल स्टॉक एक्सचेंज - https://www.niftyindices.com/  

मार्केट कॅपनुसार ब्रॉड बेस्ड इंडेक्सचची उदाहरणं

Large-Cap: Track the top 50 to 100 companies (e.g., Nippon India Index Fund Nifty 50, SBI Nifty Next 50 Index Fund, ICICI Prudential BSE Sensex Index Fund). 

Mid-Cap: Track the next 150 mid-sized companies (e.g., Motilal Oswal Nifty Midcap 150 Index Fund). 

Small-Cap: Track emerging and smaller businesses (e.g., Aditya Birla Sun Life Nifty Smallcap 50 Index Fund, Kotak Nifty Smallcap 50 Index Fund).

Global/Thematic: International exposure or specific sectors (e.g., Motilal Oswal S&P 500 Index Fund). 

आताच्या सेबीच्या नवीन नियमांप्रमाणे लार्ज कॅप आणि मीड कॅप कॅटेगरीमधे  ंMF AMC ना फक्त लार्ज कॅप आणि मीड कॅप कंपन्यांमधे गुंतवणूक करावी लागते, जे आधि तसं नव्हतं. आधि MF AMC लार्ज कॅप आणि मीड कॅप कॅटेगरीमधेसुद्धा ~२०% एक्सपोजर स्मॉलकॅपमधे घ्यायच्या अल्फा जनरेट करायला. त्यामुसार ते बेंचमार्क इन्डेक्सपेक्षा जास्त परतवा देऊ शकायचे. आता लार्ज कॅप आणि मीड कॅप कॅटेगरीमधे  ंMF AMC ना लिबर्टी नाही, त्यामुळे दीर्घ काळात ॲक्टीव्हली मॅनेज्ड फंड्स इंडेक्सपेक्षा जास्त परतवा देऊ शकत नाही. त्यामुळे लार्ज कॅप आणि मीड कॅप कॅटेगरीसाठी इंडेक्स फंड म्हणजे ह्या कॅटेगरीत गुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा, कमी खर्चाचा आणि शिस्तबद्ध मार्ग.

 

मल्टीकॅप, फ्लेक्सी कॅप आणि स्मॉल कॅप ह्या कॅटेगरीत फंड मॅनेजरला त्याच्या रिसर्चनुसार गुंतवणूक करण्यासाठी खुप जास्त मोकळीक असते. त्यामुळे ह्या कॅटेगरीजसाठी ॲक्टीव्हली मॅनेज्ड फंड्स चांगला परतावा देऊन इंडेक्स्ला बीट करू शकतात. पण ते 'high risk hidgh gain' ह्या तत्त्वावर चालते.

 

आता सर्व प्रकारच्या इंडेक्ससाठी इंडेक्स फंड्स भारतात उपलब्ध आहेत.  'no nothing inverstor' कॅटेगोरीसाठी हे सगळे इंडेक्स फंड एक चांगला पर्याय आहे.

 

- (इंडेक्स फंडांचा सपोर्टर) सोकाजी

 


शिवाय ग्रेटर चायना, युरोप आणि यु एस टेक फंड्स चालु आहेत. <<<<

अशा फंड्स ची काही उदाहरणे देऊ शकाल का?

यू एस investment लिमिट बऱ्याच चांगल्या फंड्सचं संपला आहे असं वाचलं.. जसे पराग पारेख

 


In reply to by रीडर

एडेल्वाईज फंड बघा. अजुन एक सांगायचे राहीले. एक डिफेन्स फंड चालु करा. सध्या युद्ध ईंडस्ट्रीला बरे दिवस आहेत.


Does Index beat all active funds? NO

या पहिल्या ओळीतच मी काय लिहिले आहे त्याचे उत्तर आहे ..

जर असे फंड स्वतःच्या अभ्यासाने / अक्कल हुशारीने निवडता यात असतील तर ते निवडा आणि त्यात direct गुंतवणूक करा ..

 

Does Index beat all active funds over short term? NO - (over short term लिहायचे राहिले)

प्रश्न स्वत:च्या अभ्यासाचा किंवा हुशारीचा नाही, उलट त्यापेक्षा जास्त फंड मॅनेजरच्या हुशारीचा आहे.

 

शॉर्ट टर्म मध्ये ॲक्टिव्ह फंडची कामगिरी ही इंडेक्स फंड पेक्षा नक्कीच चांगली असू शकते, पण ओव्हर लॉंग टर्म म्हणजे 15 ते 20+ वर्षे वगैरे मध्ये ही कामगिरी टिकवणे खूपच कठीण असते. त्यामुळे आपण जेव्हा लॉंग टर्म इन्वेस्टींग करतो तेव्हा ॲक्टिव्ह फंड हे मार्केटपेक्षा जास्त रिटर्न्स सहसा देऊ शकत नाहीत, त्याची कारणे:
 
१. पाच वर्ष हा कालावधी लॉंग टर्म रिटर्न मोजण्याच्या दृष्टीने खूपच छोटा आहे. शिवाय हा कालावधी कोविड नंतर सुरू झाला आहे आणि मार्केट त्या तेव्हापासून सतत वरतीच जात होतं असं दिसलं आहे. That's timing luck, not manager skill. Consistent performance year-after-year is extremely difficult. 
 
२. The odds are stacked against active funds especially when you consider the high fees they charge. एस.पी.आय.व्ही.ए. SPIVA रिपोर्टचा संदर्भ बघा, ज्याच्यात ऍक्टिव्ह फंड्स आणि इंडेक्स फंड यांची तुलना केली जाते. गेल्या दहा वर्षात साधारणपणे 80% ऍक्टिव्ह इक्विटी फंड आणि 96.5% ऍक्टिव्ह कॉम्पोझिट बॉण्ड फंड यांनी अंडरपरफॉर्म केले आहे. ५ वर्षात काही ऍक्टिव्ह फंडनी नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. पण प्रश्न असा आहे की १) असे फंड आधीच ओळखता येतात का? २) दुसरा म्हणजे कधी लार्जकॅपचा परफॉर्मन्स चांगला असतो तर कधी स्मॉलकॅपचा परफॉर्मन्स असतो, हे आधीच ओळखून त्याप्रमाणे rebalancing करणे सहज आणि प्रत्येक वेळी शक्य आहे का?
 
३. Expense ratio gap compounds into massive wealth difference over time. तुम्ही जे उदाहरण दिले होते त्या निपॉन इंडिया मल्टी कॅप डायरेक्ट ग्रोथ फंड याचा टी ई आर 0.84% आहे आणि निपॉन 500 इंडेक्स फंड याचा टी ई आर 0.11% आहे. हा 0.73% फरक खूप कमी वाटत असला तरी वरती अनेक उदाहरणे दिली आहेत, त्यावरून सिद्ध होईल की या फरकामुळे तुमच्या स्टॉकच्या वृद्धीमध्ये खूपच फरक पडतो.
 
४. जसे जसे Assets under management (AUM) वाढत जातात तसा तसा अल्फा कमी होत जातो आणि इंडेक्स पेक्षा चांगला परतावा मिळवणं खूपच कठीण होत जातं. अल्फा म्हणजे काय तर स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड या रिटर्न्स मधील फरक. अल्फा पॉझिटिव्ह असणं नेहमीच चांगलं, कारण याचा अर्थ फंडचा परफॉर्मन्स स्टॉक मार्केटपेक्षा धन आहे. https://en.wikipedia.org/wiki/Alpha_(finance)
 
५. Survivorship bias - you only see the winners. एनएसई नुसार साधारण 30 टक्के फंड have either failed or merged with other funds so they become invisible, creating an illusion that active management works better than it actually does. वरती एक उदाहरण दिलं आहे. Warren Buffett and $1 million bet. तुम्ही ती लिंक बघितली की नाही माहित नाही. Buffett's bet emerged from his long-standing criticism of the high-fee investment management industry. In Berkshire Hathaway Inc.'s (BRK.A) 2005 annual report, he argued that professional active management would underperform simple, passive investing over time. हेज फंड मॅनेजरला आव्हान दिलं होतं की कोणीही पुढच्या दहा वर्षात S&P 500 इंडेक्सपेक्षा जास्त चांगला परतावा द्यावा. Warren Buffett won the $1 million bet. https://www.investopedia.com/warren-buffett-usd1-million-bet-8779290
 
तर सांगायचं तात्पर्य काय, की मिडकॅप आणि स्मॉलकॅप मध्ये अल्फा मिळवायची शक्यता जास्त असते कारण अशा स्टॉकना ऍनालिस्ट कव्हरेज कमी असतो आणि त्यामुळे म्युच्युअल फंड मॅनेजरला स्टॉक्स  चांगला परतावा मिळवण्याची संधी जास्त असते, पण  वर्षानुवर्षे long term असे करणे खूपच कठीण आहे.
 
पण जर असा कुठलाही फंड तुम्हाला आधीच ओळखता आला, जो तुम्हाला मार्केट पेक्षा चांगले रिटर्न्स न चुकता वर्षानुवर्षे देत राहील तर तुम्ही जरूर त्याचा फायदा घ्यावा, ही सदिच्छा. Only when the tide goes out, you discover who's been swimming naked. - Warren Buffett
 
कुठलाही फंड घेताना जर सल्लागाराची मदत घेत असाल तर तो SEBI नुसार Registered Investment Advisor (RIA) आहे की नाही ते न चुकता तपासून बघा. RIA हे fiduciary असतात म्हणजे स्वत:च्या फायद्यापेक्षा त्यांनी clients' best interests बघणे कायद्याने जरुरी आहे. Mutual Fund Distributor (MFD) हे fiduciary नसतात. ते कमिशनवर काम करतात, म्हणजे तिथे conflict of interest येतो.
 
बाकी सर्व सामान्य लोकांनी शक्यतो इंडेक्स फंड मध्ये पैसे गुंतवणूक करावी हा fiduciary चा सल्ला असेल. भले तुमचा फंड दर वर्षी पहिला येणार नाही, पण long term तुम्हाला जवळपास मार्केट इतका परतावा मिळेल. थोडी थिअरी, मार्केटची हिस्ट्री आणि इतरांच्या चुका यातून आपण काही शिकणे हे आपल्याच फायद्याचे असते, कारण सर्व चुका आपण करू शकत नाही. Learn every day, but especially from the experience of others. It's cheaper. माझी तर इच्छा अशी आहे की स्वत: शक्य तितके शिकून घ्या म्हणजे Investment Advisor ची गरज पडणार नाही आणि गरज पडलीच तर काय प्रश्न विचारायचे ते तुम्हाला किमान माहीत तरी असेल.
 

परंतु वैयक्तिक रित्या मी फक्त परतावा (CAGR/XIRR) बघतो.  एन्ट्रि/एक्झिट लोड, टॅक्स वगैरे अस्मानी सुलतानी कट होणारच. >>>
ह्याबाबत +१ 

४. जसे जसे Assets under management (AUM) वाढत जातात तसा तसा अल्फा कमी होत जातो आणि इंडेक्स पेक्षा चांगला परतावा मिळवणं खूपच कठीण होत जातं. >>>>>
 हे मी स्वत सध्या अनुभवतोय. मी ३ स्मॉल कैप घेतलेत बंधन, क्वांट आणी boi. तिघांची sip सुरू आहे गेल्या ऑगस्ट पासून. मला अनेकांनी boi बंद करायचा सल्ला दिला होता वर्षभराआधी. पण त्या फंडाने सर्वात जास्त रिटर्न दिले आहेत , (१६ टक्के) क्वांट नी बंधन ने अनुक्रमे ११ नी ८ टक्के दिलेत. ह्या बाबत ai सोबत मोठी चर्चा केली, ai ने सांगितले की बंधन व क्वांट हे आता मोठे aum झालेत त्यामुळे त्यांची हालचाल मंदावली आहे. त्यांनी मागील काळात जी मोठी कमाई केली ती तेव्हा त्यांचे aum छोटे असताना, आता boi aum छोटा आहे त्यामुळे तो चपळ आहे. हेच सध्या एचडीएफसी मिड कैप नी पराग पारिख फ्लेक्सीकॅप चे झाले आहे aum मोठे झालेत त्यामुळे सुस्त झालेत चपळता राहिली नाहीये. पराग पारिख फ्लेक्सी कैप ने तर एग्जिट लोड ३६५ दिवसासाठी २ टक्के ठेवलाय, व ३६५-७ टिंब टिंब दिवसांसाठी १ टक्के! एचडीएफएक्स मिड पराग पारीख फ्लेक्सी ह्या हत्तीत गुंतवणूक बंद करून मी आता इतर कमी aum चे चपळ फ्लेक्सी नी मिडकॅप निवडले आहेत, जे जोरात पळताहेत. त्यामुळे कशाने फरक पडो ना पडो aum size ने उपन्नावर फरक पडतोय, असे अनुभवास येतेय. 

मागील एक वर्ष काळात edelweiss us tech फंडाने ३० टक्क्याच्या वर रिटर्न दिले आहेत, सध्या तत्या फंडाने लँपसंप गुंतवणूक बंद आहे फक्त sip चालू karu शकतात ५ हजार लिमिट.