मिसळ हा ओव्हर हाईप्ड पदार्थ आहे.
मिसळ बनवण्यात कसलेही पाक कौशल्य अपेक्षित नसते.
सार, रस्सा कसाही करा, १९-२०% जमून जातोच. अनेक ठिकाणी रश्यात काही बाही पदार्थ "मिसळलेले" आढळले आहे. अगदी माश्याचा रस्सा, कालचा रस्सा वगैरे.
मिसळ म्हणजे पदार्थांची भेसळ असते. मुख्य असते मटकी, पण ती असते अगदी कमी
बाकी भुस्कट फरसाण ते तर आयते तयार असते अन कोणत्या तेलात अन पिठात बनवतात काय माहीती. अगदी मक्याच्या पिठाचेही फरसाण, शेव असते.
(मी असे पदार्थ तयार करणार्या मशिनरीच्या कंपन्या अन सर्वीस जवळू पाहीली आहे. नावाजलेल्या कंपन्यांत कन्व्हेअर बेल्ट, मिक्सर मध्ये अगदी आळ्या सापडलेल्या आहेत.)
बाकी पाव तर तयार असतात. अन बहुतेक वेळा ताजे असतीलच असे नाही.
अन आजकाल पापड, जिलेबी, गुलाबजाम काय देतात!!
नुसते कौतूक.
#MisalPav #मिसळपाव
वाचने
3303
प्रतिक्रिया
89
मिसळपाव
प्रतिक्रिया
रात्री उरलेला रस्सा
खपवण्याकरता केलेला पदार्थ म्हणजे मिसळ 😬
मटकीच का?
मागे एकदा छत्तीसगड येथे पांढऱ्या वाटाण्याची तर्री आणि प्लेटच्या बुडाशी थोडे पोहे घातलेली मिसळ खाल्ली होती. आणि कोकणात तर चक्क काळे वाटाणे, हिरवे वाटाणे आणि वाटप घातलेली मिसळ आणि गोड पाव मिळतो. मिसळीत प्रामुख्याने मटकीच असावी का?
मटकी असावी असं काही नाही…
In reply to मटकीच का? by शेर भाई
मटकी असावी असं काही नाही. नावातच मिसळ आहे. मिसळ म्हणजे पदार्थांची भेसळ.
पण हॉटेलवाल्यांनी मटकी म्हणजेच मिसळ हे समिकरण रुढ केले आहे.
वास्तविक पाहता तुम्ही उल्लेख केलेली देखील मिसळीत गणली जावी.
प्रल्हाद शिंदेंचे (की कुणाचे) गाणेही आहे की, मिसळ झाली मुंबई, रं दादा मिसळ झाली मुंबई.
बहुतेक मराठी पदार्थ हे…
बहुतेक मराठी पदार्थ हे overhyped आहेत !
मराठी पदार्थच कशाला मराठी माणसं सुद्धा overhyped आहेत !
अगदी श्री ज्ञानेश्वर पासून ते शिवाजी महाराजां पासून, टिळक आगरकर सावरकरपासून ते शाहू फुले आंबेडकर पर्यंत.
त्यातल्या त्यात उसातली काही काही माणसंच तेवढी शहाणी आणि सुज्ञ राहिली आहेत
हा का ना का.
कमी मेहनतीत बनणारा पदार्थ
अगदी चांगली मिसळ बनवायला सुद्धा मेहनत कमी लागते. म्हणजे प्रति ताट लागणारी मेहनत कमी. एकदा मसाला व रस्सा बनवला की झाले मग फक्त गरम करुन गिऱ्हाईकांना वाढत रहायची. कांदा , लिंबू कापायची काय ती मेहनत.
फरसाण बाहेरुन येतो, पाव बाहेरुन येतात. दहा गिऱ्हाईक येऊ देत किंवा शंभर मेहनतीत फारसा फरक नाही. तेच बाकी बहुतेक पदार्थांचे तसे नाही. वडे एक एक करत बेसनात घुळवून जास्तीत् जास्त ८-१० च्या बैचमध्ये तळावे लागतात , डोसा ,उत्तपा, पराठा, पोळी हे एक एक भाजावे लागतात. म्हणजे ज्या प्रमाणात ग्राहक त्या प्रमाणात मेहनत.
मिसळीसारखा थोडा कमी मेहनत असलेला पदार्थ म्हणजे इडली. एकदा शिजवल्या की ३०-४०-५० (जी काही भांड्याची क्षमता असेल त्यानुसार) इडल्या तयार तरी मिसळीपेक्षा जास्तच मेहनत म्हणा.
म्हणुन मिसळीच्या उपहारगृहांनी मिसळीला जास्त चढवून ठेवले (ओव्हर हाईप्ड) आहे असे वाटते. बाकी मिसळपाव हा पदार्थ वाईट नाही. पण इतका जास्त डोक्यावर घ्यावा इतका पण भारी नाही,.
अगदी बरोबर विश्लेषण केलेत…
In reply to कमी मेहनतीत बनणारा पदार्थ by तर्कवादी
अगदी बरोबर विश्लेषण केलेत तुम्ही.
आजकाल तर मोड आलेली मटकीही हाटेलींना सप्लाय करणारे आहेत. म्हणजे बाजारात जाऊन आणण्याचेही कष्ट हाटेलींना घ्यायची गरज नाही.
ह्या
In reply to अगदी बरोबर विश्लेषण केलेत… by पाषाणभेद
उकडलेले आणि सोलेलेले बटाटे, बारीक चिरलेली कंांदा कोथिंबीर. आले लसूण पेस्ट आणि टॉोमॅटो पु्युरी होॉटेल पोच देणारी चेन आहे.
इडली, मेदुवडे सांबार चटणी पुरवणारी पण आहे.
मिसळपावचा रस्सा जमला तर…
मिसळपावचा रस्सा जमला तर मिसळीतका चविष्ठ पदार्थ नाही.
सार, रस्सा कसाही करा, १९-२०%…
सार, रस्सा कसाही करा, १९-२०% जमून जातोच
मंजे नक्की काय? उन्नास बीस सगळेच सारखे? की फक्त 20% चांगला जमलेला मंजे एकदम वाईट या अर्थी?
धन्यवाद
आपल्याला मिसळ आवडते (ठराविक…
आपल्याला मिसळ आवडते (ठराविक ठिकाणची )
त्यमंउळे आम्ही मिसळ खातो .. बाकीच्यांना चर्चा करू देत
कमी कौशल्यात चवदार
मिसळपाव हा कमी कष्टात चवदार, पोटभरीचा, माफक दरात, सर्वत्र सहज मिळणारा पदार्थ म्हणून कौतुक आहे.
काही जण अगदीच टुकार मिसळ तयार करतात हा काही मिसळीचा दोष नाही.
हृदयात कळ आली!
अर्रर्रर्र. मिसळ म्हणजे सध्या जीव की प्राण होऊन बसला आहे.
आमचे मामलेदार मिसळ पडल्यापासून जिथे जाईन तिथे मिसळ खाऊन ती चव शोधतो आहे पण मिळत नाही.
गेलाबाजार आमंत्रण ची आणली ( मामलेदार ची सोफिस्टिकेटेड आवृत्ती) पण तरीही मनाला समाधान काय ते नाही.
मिसळीबरोबर जागा सुद्धा तोंडी लावून घायची असते.
Missing Mamledar Misal
मामलेदारची मिसळ पडली म्हणजे?…
मामलेदारची मिसळ पडली म्हणजे? आमंत्रणची मिसळही पूर्वी झणझणीत होती. बऱ्याच वर्षात तिथे गेलो नाही. तिथे तिखट आणि सौम्य तिखट अशी दोन्ही प्रकारची मिसळ मिळायची.
मामलेदार मिसळ
In reply to मामलेदारची मिसळ पडली म्हणजे?… by आग्या१९९०
बाकी, मामलेदार मिसळ या…
बाकी, मामलेदार मिसळ या नावाने एक रेस्टॉरंट चेन दिसते. तिचा मूळ मामलेदारशी संबंध नसावा.
त्यांचीच आहे.
In reply to बाकी, मामलेदार मिसळ या… by गवि
त्यांचीच आहे. एक सेंटर ऐरोलीला आहे. आम्ही कधी कधी तिथून आणतो.
मिसळीच्या तिखटपणाबद्दल…
मिसळीच्या तिखटपणाबद्दल दुराव्याने संबंध असलेला येथील माजी सदस्य टारझन ने लिहीलेला लेख खाली आहे.
तुम्ही अनेक बेवडे पाहिले किंवा ऐकले असतील. त्यांना आपण किती दारू रिचवू शकतो याच्या बढाया मारण्याची सवय असते. बरेचसे बेवडे टँकर असतीलही, पण point is, ती काही भूषावह गोष्ट नाही. अती दारू सेवनाचे भयंकर शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात.
तसेच काहीसा कंड या मराठवाडा कोल्हापूर कडच्या अनेक लोकांना असतो. मराठवाडा त्यातल्या त्यात पुढे. आपल्या अती तिखट जेवणाचे यांना इतके वारेमाप कौतुक असते, की कुणाला खाताना घाम फुटला, कुणाच्याने खाल्ले गेले नाही, कुणाची गांड लागली हे स्वतःच फुशारक्या मारून सांगत असतात. मुळात तिखट ही काही चव नाही. गोड , आंबट, खारट आणि कडू या चवी आहेत. तिखट ही एक संवेदना किंवा irritation आहे असे म्हणता येईल. तिखटपणा जिभेवरील वेदना आणि उष्णता जाणवणाऱ्या संवेदकांना (pain/heat receptors) सक्रिय करतो. मिरचीतील कॅप्सेसिन (capsaicin) हा घटक या संवेदकांना उत्तेजित करतो. त्यामुळे मेंदूला "जळजळ" किंवा "उष्णता" जाणवते, चव नाही.
हा प्राणी ज्याचे इतक्या फुशारकीने कौतुक सांगतोय , ते म्हणजे तोंडाची गांड आणि गांडीचा ड्रॅगन बनवणे, ऍसिडिटी आणि गांडीला कमळ फुलवण्याचे निमंत्रण आहे. मी भारतात आलो की टीव्ही, रेडिओ, पेपर जिथे तिथे अँटी ॲसिड, पचनाची औषधे काढे, आणि मूळव्याधीच्या औषधाच्या जाहिराती यत्र तत्र सर्वत्र सकाळ दुपार संध्याकाळ पाहतो. त्याचे मूळ कारण भारतीयांच्या घाणेरड्या खाण्याच्या सवयी आणि हे असले तिखट, तेलकट मसालेदार खाणे हे आहे. इथल्या टीव्हीवर किंवा मार्केट मध्ये अशा या पचनाशी संबंधित products च्या लक्षवेधी जाहिराती कधीही दिसत नाहीत..
तुम्ही जर शहाणे असाल तर हे असले बावळट बिनडोक अघोरी प्रकार खाणे टाळावे आणि आपल्या शरीरावर दया करावी. त्यापेक्षा ती स्पृहा सांगते ते सुंदर सजवलेले रंगीत सायंटिफिक कार्ब यूक्त पान परवडले.
- टारझन
हाय कंबख्त ....
In reply to मिसळीच्या तिखटपणाबद्दल… by पाषाणभेद
हाय कंबख्त तूने मामलेदार मिसळ खायाच नही क्या !
टारझन यांच्या लेखाशी बराचसा असहमत आहे. सदर लेखात केवळ मिरचीचा तिखटपणा गृहीत धरला आहे. मिरे, लवंग, आले यांचा तिखटपणा वेगवेगळा असतो आणि तो रुची वाढवतो. केवळ तिखटाची फक्की मारणे म्हणजे तिखट खाणे बनवणे नव्हे.
( अवांतर : अशी फक्की पूर्व बंगालातले लोकं मारतात. त्यास ते फाल का काहीतरी म्हणतात. इथे इंग्लंडात मी मोठ्या कौतुकाने एकदा बांगलादेशी खाद्यगृहात फाल चिकन मागवलेली. आली ती फक्त तिखट मारलेली साधारण चवीची कोंबडी. मालकाला विचारलं तर तो म्हणाला की हीच पारंपरिक फाल कोंबडी आहे. )
-गा.पै.
मराठी खाद्यपदार्थांपैकी
Underhyped पदार्थ कोणते ?