Skip to main content

सह्याद्रीचा एक कडा

लेखक सतिश गावडे यांनी रविवार, 07/06/2026 00:51 या दिवशी प्रकाशित केले.

कालवर जो अढळ होता

सह्याद्रीचा एक कडा

आज तिथे फक्त उरलाय 

एक उघडा, जखमी तुकडा

 

पोकलेनच्या सुळ्यांनी 

त्याची कुस पोखरली

हिरवी शाल ओरबाडून 

लाल माती पाडली

 

ज्या पठारावर खेळले 

पाऊस, वारा नी ऊन

तेच पठार आज ओरबाडले 

सुरुंगाचे घाव घालून

 

पक्षी उडाले घरटी सोडून

झाडं पडली कोलमडून

डोंगर रडतोय मुकाट्याने

आपलंच मरण बघून

 

कैक पिढ्यांच्या वहिवाटीच्या 

मिटल्या त्या पाऊलखुणा

मुका झाला आसमंत सारा 

भासे आज केविलवाणा

 

भस्मासूर होऊन माणूस 

डोंगर राने खात सुटला

हात मारून कपाळावर 

स्वतःच्याच मुळावर उठला

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 189
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

निसर्गाची ऐशीतैशी, सारं काही विकासापोटी,

झाडे पाडून बांधू बिल्डिंग, कमवू आपण  कोटी-कोटी!

काल जिथे ऐकू येत होता, पक्षांचा मंजूळ गाभा,

तिथे आज थाटला आहे, चायनीजचा मोठा ढाबा!

 

हीच परिस्थीती हिमालयात बघायला दिसली. काही जनरेशन नंतर सर्व  संग्रहालयात दिसेल असे वाटते.

 

 


कवितेचा आशय पोहचला. काल परवा पर्यावरण दिन होता त्यामुळे पर्यावरणाची विशेष आठवण होतेच. 

छान. लिहिते राहा. 

बाय द वे, कसं काय आमच्या गरिबाच्या मिपावर असं लिहायला आलो होतो. 
 

-दिलीप बिरुटे
 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाय द वे, कसं काय आमच्या गरिबाच्या मिपावर असं लिहायला आलो होतो. 
 


कैक पिढ्यांच्या वहिवाटीच्या 

मिटल्या त्या पाऊलखुणा

मुका झाला आसमंत सारा 

भासे आज केविलवाणा

......

...

अगदी बरोबर...

खुप छान!