Skip to main content

चालू घडामोडी । जून २०२६ । ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 01/06/2026 15:11 या दिवशी प्रकाशित केले.

जून २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे. 
 

थोर गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. अवीट गोडीची असंख्य गाणी त्यांनी गायिली आहेत. मराठी, हिंदी, आसामी, कन्नड, बंगाली आणि ओडिया यासह अनेक भाषांमध्ये त्यांनी सिनेमागीते, भक्तिगीते, गझला, ठुमरी इ प्रकारांत गाणी गायिली आहेत.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 


Suman Kalyanpur

 


वाचने 808
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

लता मंगेशकर, आशा भोसले सम्राज्यातही ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनी आपल्या गोड स्वरांनी रसिकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले होते. हिंदी भाषेसह गुजराती, पंजाबी, असामी, उडिया आणि बंगाली अशा अनेक भाषांमध्ये साडेसातशेहून अधिक गीते गाणाऱ्या कल्याणपूर या मराठी रसिकांत आपल्या भावगीते आणि भक्तिगीतांनी अधिक प्रिय होत्या.

 

आकाशवाणीच्या विविध  केंद्रावरुन  सुमन कल्याणपुर यांची गाणी ऐकत लहानाचे मोठ्या झालेल्या पिढीला अनेकांना तीच ओळख असेल...

 

गंधित नाजुक पानांमधुनी,

 सूर छेडिते अलगद कोणी 

अर्थ कधी कळणार तुला

 धुंदणाऱ्या सूरातला....

 

सांग कधी कळणार तुला

भाव माझ्या मनातला.

 

भावपूर्ण आदरांजली.

 

-दिलीप बिरुटे

 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्यांचे "आकाश पांघरुनी जग शांत झोपले हे" हे गाणे आधी मला माहित नव्हते. कोविड काळात एप्रिल २०२० मध्ये वगैरे केंव्हातरी सहजच कुठेतरी ऐकण्यात आले आणि मनाला खूपच भावले. तेंव्हापासून मी अगणित वेळा हे गाणे ऐकले आहे. विशेष म्हणजे हे गाणे त्याआधी इतकी वर्षे मला का माहित नव्हते अशी अनेकदा मला खंत वाटते! 
 


In reply to by कांदा लिंबू

सुमन ताईंची अशी बरीच गाणी आहेत जी लताजींनी गाईली आहेत असे वाटते. उदा. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई.. त्यामुळे अशी गाणी आधी कधी कानावर पडली जरी असली तरी ती लताजींनीच गाईली आहेत असे वाटत असे. पुढे केव्हातरी सुमनताईंबद्दल समजले तेव्हा अश्या गाण्यांबद्द्ल कळले. दिल एक मंदीर चित्रपटामधली सर्वच गाणी सुमनताईंची आहेत.


In reply to by कांदा लिंबू

अरे यार, काढली का कोवीडकाळाची आठवण.   कोवीडकाळ तर, देशाच्या दृष्टीने गोबरयूगातला  मरणकाळच होता. वृद्ध माणसं केवळ धसक्याने मरण पावली. नातवाईकांच्या वाटसॅप गृपवर आता कोण गेलं,  हे गेले ते गेले. सकाळ- संध्याकाळ 'बहनो और भाईयो' च्या पोरकट निर्णयांनी जीवंतपणी मरणयातना भोगाव्या लागल्या. करोनाच्या दहशतीपेक्षा यांच्या निर्णयांची दहशत होती.  आता मागे वळून पाहिल्यावर  कसेबसे तगलो, कसेबसे जगलो.  असं फिलिंग येतं.  गावागावात काढे,  आणि  इकडे टाळ्या थाळ्या आणि दिवाबत्तीचा महोत्सव. कसली गाणी आणि कसलं काय. काहीही गोड लागत नव्हतं. 


सगळे प्रयोग माणसांवर केले गेले.  कसल्या कविता, कसली गाणी, आयुष्याची वाट लागली होती. मिपावर आपण धाग्यावर धागे वाद घातले,  तेवढा जीवंतपणा सोडला तर, माणसाच्या जगण्याच्या अजिबात शक्यता उरल्या नव्हत्या. पैसे, श्रीमंती, अहंकार, आणि  तत्सम गोष्टींची किंमत शुन्य झाली. भविष्यातही  असे करोना, इबोला,  बिबोला, अजून काय काय येतील ते माहिती नाही. पण, करोना एवढी दहशत कधीच नसेल असे वाटते.  हं तर, 

सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यातले. अजून एक गाणं.  कोणी तरी म्हटलं होतं की प्यार कोई अंतिम ध्येय नही होता,  लेकीन सफर बडा प्यारा होता है, आयुष्यात प्रेम केलं नाही, असा माणूस तसा दूर्मीळ सापडेल.  असतीलही म्हणा आम्ही बॉ, काही अशा भानगडीत पडलो नाही म्हणनारे वगैरे, पण अशा भावभावनांचं एक सुंदर गाणं सुमन कल्याणपूर यांचं गाणं. 

मी बोलले न काही, नुसतेच पाहिले
हृदयात दाटलेले, हृदयात राहिले 

परतून हाय जाण्या, ओठांत शब्द आले
डोळ्यांतले इशारे, डोळ्यांत कैद झाले
मी बोलले न काही, नुसतेच पाहिले ( दुवा )

-दिलीप बिरुटे

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोविड लसचा उल्लेख अखिलेश यादवने मोदी लस आणि भाजप लस असा करून मी ही लस घेणार नाही असे जाहीर केले होते. 

 

कॉंग्रेस प्रवक्ता सलमान नियाझीने कोविड लस फ्रॉड आहे असे सांगितले होते व कॉंग्रेसच्या  रशीद अल्वीने या आरोपाचे समर्थन केले होते.

 

म्हणून मिपावरील मोदीविरोधकांना विचारतोय की कोविड काळात मोदींची लस घेतली होती की नाही.‌


In reply to by श्रीगुरुजी

हा जो तुमचा ग्रह आहे ना की मोदी विरोधी अन मोदी समर्थक (मग त्याच्याच विरोधी कॉग्रेस विरोधक-समर्थक, अमुक विरोधक-समर्थक) तो अतिशय दुर्दैवी, अयोग्य आहे. सरकार कोणतेही असो, त्याला विरोधी असतीलच. किंबहूना असायला पाहीजे. अन कोणतेही सरकार असो, जे चांगले काम केले ते लक्षात ठेवले पाहीजे.

आताच्या ह्या भारत सरकारने (मोदी सरकार, नरेंद्र सरकार, योगी सरकार असे म्हणण्याचा चुकीचा पायंडा या सरकारने पाडला आहे.) कोवीड काळात अनेक चुकीचे निर्णय घेतले. कोवीड काळच काय इतर अनेक निर्णय चुकीचे घेतले आहेत. जरा योग्य अन तटस्थ पद्धतीने विचार करा अन मग ताडून पहा.

पोट भरलेले असले की इतरांच्या खापाटीला गेलेल्या पोटाकडे दुर्लक्ष करू नये. आपण म्हणजेच देश असतो असे नाही.


In reply to by पाषाणभेद

आताच्या ह्या भारत सरकारने (मोदी सरकार, नरेंद्र सरकार, योगी सरकार असे म्हणण्याचा चुकीचा पायंडा या सरकारने पाडला आहे.)

अजिबात नाही.

 

भारत सरकारने एम्स,  आय आय टी बांधल्या असे म्हणता का?  

चांगलं केल्याचं क्रेडिट घ्यायचं आणि वाट लावली तर ती दुसर्याने लावली.

इ चोलबे ना 

 

नेहरू यांच्या सरकारनेच पूर्वांचल च्या शस्त्रसज्जतेकडे दुर्लक्ष केले आणि आपण चीन बरोबर लढाई हरलो.

 

नेहरू यांच्या सरकारनेच कोको बेट म्यानमार ला भेट दिले आणि तेथे आता चीन सरकारने आपल्या उरावर विमानतळ बांधून उत्तर अंदमान मध्ये आपली गोची करून ठेवली.    

इंदिरा गांधी यांच्या सरकारनेच आणीबाणी लावली.

 

राजीव गांधी यांच्या सरकारने आपली अर्थव्यवस्था डबघाईला आणून ठेवली त्यामुले आपल्याला ७५ वर्षात आपले सोने गहाण ठेवण्याची नामुष्की आली.

 

उद्या आपली अर्थव्यवस्था डबघाईला आली तर  तुम्ही श्री मोदी यांच्या सरकारने देशाची अर्थव्यवस्था खड्यात घातली असेच म्हणणार आहात 

 

उगाच मानभावी पणा  करू नका    


In reply to by सुबोध खरे

तुम्हाला मुद्देसुद लिहीता देखील नाही. व्यर्थ आहे तुमच्याशी बोलणे. 

माझे लेख नसेल वाचवत तर नका वाचू. 

पण लेख अन प्रतिसाद वेगळे विषय आहे. हे तुमच्यासारख्या वयाने सिनिअरला समजावून सांगणे म्हणजे कठीण आहे. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोवीडकाळ तर, देशाच्या दृष्टीने गोबरयूगातला  मरणकाळच होता

तरी वाटलंच मला, सुमन कल्याणपूर यांच्याबद्धल निर्मळ भावना व्यक्त केल्या तर तिथेही काश्मीर करायला बकरीवादी कसे काय आले नाही बुवा अजून!

चला, कोविडकाळात तर महाराष्ट्रात तुमचे फेवरीट बकरीवादी सरकार होते की! अर्थात त्या सरकारला कुणी घरकोंबडी म्हणायचे तर कुणी पेंग्विन.  पण काहीही म्हणा, माणसांची किंमत मात्र तेंव्हा नव्हती हे खरे. पालघर असो की मुंब्रा असो, माणसांना मारहाण, हत्या हे प्रकार नित्याचेच होते. तरीही लोक धीर धरून, टिकून राहिले. शेवटी अडीच वर्षांचा मरणकाळ (तुमचाच शब्द!) एकदाचा संपला तेंव्हा कुठे सामान्य माणसांनी निश्वास टाकला. खूप भोगले हो मराठी माणसांनी तुमच्या त्या बकरीवादी सरकारच्या काळात!  

फार वाईट आठवणी आहेत त्या काळातल्या -

मी बोलले न काही, नुसतेच पाहिले
हृदयात दाटलेले, हृदयात राहिले 

 


In reply to by कांदा लिंबू

डांबिस.

 

औरंग्याच्या सैनिकांना सदासर्वकाळ संताजी धनाजी दिसायचे, तसे काही जणांना दिवसरात्र गोबरयुग दिसते. 


In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संपूर्ण जगात भारत एकमेव देश होता ज्याने कोविडची मॅनेजमेंट सर्वात उत्तम केले.  काही काळ सर्व बंद होते तरी अफवा पासारकी नाही.झाली त कोणत्याही वस्तूची कमी झाली नाही किमती वाढल्या नाही. डिजिटल माध्यमाच्या मदतीने देशातील शंभर कोटी लोकांना लस दिली. या शिवाय भारताने कोविड काळातकाळात अनेक देशांना लस, औषधे, PPE किट्स, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, अन्नधान्य आणि वैद्यकीय मदत पुरवली. कोविड पश्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले सर्व परदेशी सर्वोच्च न्मान  मिळाले त्यात कोविड काळातील मदत ही महत्वपूर्ण होती

कोविड काळातील भारताची मदत
भारताने "Vaccine Maitri" (व्हॅक्सीन मैत्री) उपक्रमांतर्गत जगभरातील देशांना कोविड लसी पाठवल्या.
जुलै 2022 पर्यंत भारताने 98 देशांना 23.5 कोटींहून अधिक कोविड लसींचे डोस पुरवले. �
India Brand Equity Foundation +2
डिसेंबर 2021 पर्यंत 94 देश आणि 2 संयुक्त राष्ट्र संस्थांना सुमारे 9.83 कोटी डोस पुरवण्यात आले होते. �
The New Indian Express +1
कोविडच्या सुरुवातीच्या काळात भारताने 150 हून अधिक देशांना औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर मदतही दिली. �
The New Indian Express +1
मदत मिळालेल्या काही प्रमुख देशांचे उदाहरण
Bhutan, Maldives, Bangladesh, Nepal, Sri Lanka, Mauritius, Brazil, Morocco, South Africa, Afghanistan, Mexico आणि इतर अनेक देशांना भारताने लसी पुरवल्या. �
India Brand Equity Foundation +1
मोदींना मिळालेले काही सर्वोच्च परदेशी सन्मान
कोविड काळानंतर किंवा त्याच्या आसपास अनेक देशांनी मोदींना त्यांच्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी गौरविले:
Saudi Arabia – King Abdulaziz Sash
United Arab Emirates – Order of Zayed
Bahrain – King Hamad Order
Fiji – Companion of the Order of Fiji
Papua New Guinea – Grand Companion of the Order of Logohu
Dominica – Dominica Award of Honour (विशेषतः कोविड काळातील लस सहाय्याबद्दल उल्लेख करण्यात आला होता)
Guyana – Order of Excellence
Egypt – Order of the Nile
यापैकी विशेषतः कॅरिबियन आणि पॅसिफिकमधील काही देशांनी भारताच्या कोविड लस मदतीचे सार्वजनिकपणे कौतुक केले होते.

बाकी मोदी द्वेष मुळे सत्य पाहण्याची क्षमताही शिक्षित लोक विसरून जातात. 

 


बंगळूर संघाने (जेथे कॉंग्रेस सत्तेवर आहे) गुजरात संघाचा (जेथे भाजप सत्तेवर आहे) अत्यंत केविलवाणा पराभव केलाय. आगामी भविष्याची ही नांदी आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

हा हा हा !!!

तो पण साक्षात नरेंद्र मोदी स्टेडियम वर! (बाकी, कर-नाटकात सिद्धा जाऊन शिवा आलेत हं!) 


मागच्या महिन्यात १ मे रोजी महाराष्ट्र दिन होता. आज २ जून रोजी तेलंगाणा दिन आहे. तेलंगणातील सर्व मिपाकरांना तेलंगाणा दिनाच्या शुभेच्छा.

 

बारा वर्षांपूर्वी स्थापन झालेले, भारतातील सर्वात तरुण राज्य तेलंगाणा हे सुरुवातीपासून प्रगतीपथावर आहे. एखाद्या राज्याच्या प्रगतीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा शेजारी राज्यांनासुद्धा होतो. तेलंगाणाची सातत्याने प्रगती होत राहो व त्यामुळे महाराष्ट्राचाही फायदा होत राहो ही श्रीचरणी प्रार्थना.

 

Telangana Formation Day 2 June 2026

खरी तृणमूल काँग्रेस कुणाची? महाराष्ट्राप्रमाणे बंगालमध्येही राजकीय पक्ष फुटीच्या मार्गावर ?

 

एक मोठा ग्रुप फोडायचा सत्तेत भागीदारी करुन घ्यायची. प्रबळ पक्ष सत्तेत आला म्हणजे विरोध उरत नाही. महाराष्ट्र प्रमाणे  ममता पक्ष सर्वोच्च न्यायालयात ताटकळत राहील. भाजपचे सत्तेचे राजकारण सुरु...

 

-दिलीप बिरुटे


भाजपचे सत्तेचे राजकारण सुरु.

हायला,

बिरुटे मास्तर तुम्ही हास्यस्पद व्हायला लागलाय.  

बोट बुडायला लागली तर सर्वात प्रथम त्यावरील उंदीर पळून जातात अशी म्हण आहे.

२९४ पैकी २०७ आमदार निवडून आलेले असताना भाजप कशाला तृणमूल फोडून तेथील आमदार आपल्याकडे आणतील?

उगाच आमंत्रण देऊन सत्तेत त्यांना वाटा देऊन आपल्या बुडाखाली आग लावण्याची भाजप ला काय गरज?

  


हिंदीविरोधाने सत्ता मिळेल, पण ज्ञान समाप्त होईल.

मी या जावईशोधाशी संपूर्ण सहमत आहे.‌ हिंदी ज्ञानभाषा आहे. हिंदी राजभाषा आहे. हिंदी भाषेचे स्वातंत्र्यलढ्यात प्रचंड योगदान आहे. हिंदीला विरोध म्हणजे ज्ञानाला विरोध, हिंदीला विरोध म्हणजे विकासाला विरोध, हिंदीला विरोध म्हणजे राष्ट्रीयत्वाला विरोध, हिंदीला विरोध म्हणजे देशाला विरोध. राष्ट्रभाषा हिंदी नीच केजीपासून, खरं तर बालवाडीपासून सक्तीने शिकविली पाहिजे. 


In reply to by श्रीगुरुजी

हा जोकर वाट्टेल ते बरळतोय... चुकलं, हा जोकर नाहीय, हा तर महा पाताळयंत्री, हिंदू द्वेष्टा, मराठीद्वेष्टा, महा कारस्थानी राजकारणी आहे!


In reply to by कांदा लिंबू

भाजप समर्थक या समजुतीत आहेत की २०१४ मध्ये सत्तांतर होऊन कॉंग्रेस - राष्ट्रवादीची भ्रष्ट मुस्लिमधार्जिणी राजवट महाराष्ट्रातून कायमची संपली आणि महाराष्ट्रात प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी सरकार आले. 

 

प्रत्यक्षात जी राजवट आलीये ती कॉंग्रेस - राष्ट्रवादी पेक्षा जास्त मुस्लिमधार्जिणी, भ्रष्टसंरक्षक, गुन्हेगारसंरक्षक, मराठीद्रोही व महाराष्ट्रद्रोही राजवट आहे. आता असं वाटतंय २०१४ पूर्वीची पृथ्वीराज चव्हाण राजवट परवडली, पण हे अजिबात नको.

 

त्यावेळी निदान तोंडदेखली का होईना पण कारवाई व्हायची. विलासराव देशमुख, आर आर पाटील, अशोक चव्हाण, सुरेश जैन, विजयकुमार गावित, नबाब मलिक, भुजबळ यांच्यावर आरोप झाल्यानंतर पदावरूनकाढले होते. आता तर आरोप झाले की भाजपत आणून क्लीन चिट देऊन उच्च पदे देतात. आव्हाड, पद्मसिंह पाटील, संजय राठोड, रवींद्र वायकर, अशोक चव्हाण, अजित पवार, भुजबळ, मुश्रीफ, सत्तार, नबाब मलिक अशी असंख्य उदाहरणे आहेत. 

 

मुख्यमंत्री हेच, गृहमंत्री हेच, आता अर्थमंत्री पण हेच. मुख्यमंत्री म्हणून पहिलीपासून हिंदी लादणे, सातत्याने हिंदीत बोलणे, पक्ष फोडणे ही प्रमुख कामगिरी. गृहमंत्री म्हणून सर्व गुन्हेगारांना क्लीन चिट देऊन भाजपत आणणे व मंत्रीपदे देणे ही प्रमुख कामगिरी. अर्थमंत्री म्हणून लाडकी बहीण योजना, कर्जमाफी, मदरशांना अनुदान अशी खिरापत वाटणे ही प्रमुख कामगिरी.‌


In reply to by रात्रीचे चांदणे

कालच्या भाषणातून तेच सूतोवाच केलंय. मागील वर्षीच निर्णय घेतला होता. परंतु तीव्र विरोध झाला व महापालिका निवडणूक जवळ आल्याने निर्णय तात्पुरता पुढे ढकलला. पण आता जवळपास ३ वर्षात महाराष्ट्रात कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे हिंदी लादण्याचा निर्णय माथी मारणार.

 

तामिळनाडूत विजय किंवा अण्णामलाईंना पत्रकार केवळ तामिळ भाषेत प्रश्न विचारतात. हिंदी तर सोडाच इंग्लिशमध्ये सुद्धा नाही व ते सुद्धा केवळ तामिळ भाषेत उत्तर देतात. पण इकडे उलटा कारभार. बहुसंख्य पत्रकार हिंदीत प्रश्न विचारतात आणि हे अभिमानाने हिंदीत उत्तर देतात. मराठीत प्रश्न असेल किंवा किंवा काही निवेदन मराठीत केले असेल तर तात्काळ तेच उत्तर/निवेदन हिंदीत सांगतात. 

 

२०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद बोलवून जवळपास अर्धा तास आपली भूमिका मराठीत मांडली व पुढील अर्धा तास तीच भूमिका हिंदीत सांगितली आणि वर मखलाशी केली केली की हिंदी भारतीय भाषा आहे आणि भारतीय भाषा शिकायला विरोध का? हिंदीप्रमाणेच तामिळ, कन्नड, पंजाबी, बंगाली अश्या १५ भाषा भारतीय आहेत. इंग्लिश सुद्धा भारतीय आहे. घटनेच्या परिशिष्टात इतर बाबांबरोबर इंग्लिशचा सुद्धा उल्लेख आहे. नागालँड या राज्याची राजभाषा इंग्लिश आहे. राज्यघटना व सर्व अधिकृत कागदपत्रे इंग्लिशमध्ये आहेत. पदाची शपथ इंग्लिशमध्ये घेणे वैध आहे. मग या सर्व भारतीय भाषात हे का बोलत नाहीत आणि शाळेत सक्ती करीत नाहीत? हिंदीचा का? कारण मोदींनतर आपणच या भ्रमात हे आहेत. त्यासाठी हिंदीभाषिक राज्यात स्वीकारार्हता हवी अशी यांची धारणा आहे. म्हणून सातत्याने हिंदी सुरू आहे. मराठी भाषा मेली तरी चालेल, मराठी माणसे घरी बसू दे, मराठी माणसे मरू दे . . . हिंदीभाषिकांना मी महाराष्ट्रात नोकऱ्या देणार, हिंदी सक्ती करून बिमारू राज्यातून हिंदी शिक्षक महाराष्ट्रात आणणार, महाराष्ट्र हे हिंदीभाषिक राज्य करणार, महराष्ट्रात कणत्याही हिंदीभाषिकाला स्थायिक होण्यास व संवाद साधण्यास अजिबात  त्रास होता कामा नये . . . . .    हे धोरण आहे. पुण्यात मेट्रोत सुद्धा मराठी इंग्लिशच्या बरोबरीने हिंदीत घोषणा असतात. सूचना हिंदीतही लिहिलेल्या असतात.

 

पवारांप्रमाणे यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही कारण अमित शहा हा अत्यंत बलवान स्पर्धक समोर आहे. योगी, हिमंता आणि आता शुभेंदू हे सुद्धा यांच्या तुलनेत खूप उजवे आहेत.

 

एकवेळ पवार पंतप्रधान झाले तर कमी वाईट ठरेल कारण हे सर्व दृष्टीने डबल पवार आहेत. 


इराण ने अमेरिकेच्या बेसेस वर आणि अमेरिकेने इराण वर मर्यादित स्वरूपाचे का होईना पण हल्ले चालू केलेत.

ह्या ट्रम्प तात्याला स्वतःच्या देशाचं युद्ध थांबवता येत नाही. रोज नव नवीन घोषणा करतोय. आणि हा क्रेडिट घेतोय भारत पाकिस्तान मधील चकमक थांबवल्याच.


In reply to by रात्रीचे चांदणे

भारत पाकिस्तानमधली चकमक तात्यांनीच थांबवली होती, तात्याद्वेष्टे मान्य करोत वा ना करोत!


In reply to by अमरेंद्र बाहुबली

 तात्या प्रेम साठी.  काश्मिर प्रश्न हजार वर्ष जुना आहे. पडलेल्या विमानाची संख्या 5 पासून 9 वर पोहचली. पुढील महिन्याभरात डझन भर तरी होतील.इराण युद्ध रोज थांबतय. 

रशिया युद्ध आज पर्यंत हजार वेळा तरी थांबलं असेल.


In reply to by रात्रीचे चांदणे

तात्याना अनेक कामे असतात, भारत पाक काश्मीरचा इतिहासात तात्याना काडीचा रस नाही म्हणून दिले ठोकून!  इराण रशिया युद्ध तैयाना फायद्याचे आहे तात्याच्या वक्तव्याने मार्किट पडते वाढते, तात्या त्यातून बक्कळ कमावताहेत. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याची जबाबदारी तात्यांचीच आहे असे जग वागते, पण लक्षात घ्या मूर्ख झेलेनस्कीने रशियाला अंगावर ओढून घेतले आहे एकतर नाटो मध्ये जाऊन काडीचा फायदा युक्रेनचा होणार नव्हता, यु मधे जाण्यासाठी भांडला असता तर समजू शकलो असतो! 


In reply to by अमरेंद्र बाहुबली

तात्यांचे इतक कारनामे माहिती असूनही मोदींना विरोध म्हणून तात्यावर विश्वास ठेवता?


In reply to by रात्रीचे चांदणे

ट्रंप अत्यंत मुर्खासारखे वाटेल ते दावे करतो आणि काही महामूर्ख त्यावर अजूनही विश्वास ठेवतात. कालच ट्रंप म्हणाला की मी नेतनयाहूला कडक शब्दात समज देऊन लेबनॉनवरील हल्ले थांबविण्यास भाग पाडले आहे. पण काल रात्री सुद्धा इस्राएलने लेबनॉनवर हल्ले केले. २ आठवड्यांपर्वी  मार्को रूबिओ भारतात येऊन म्हणाला की व्हेनेझुएलाचे अध्यक्ष पुढील आठवड्यात भारतात येणार आहेत. आता हे भारताला माहिती नाही आणि व्हेनेझुएलाही माहिती नाही.  अशी कोणतीही भेट नियोजित नाही व अर्थातच व्हेनेझुएला अध्यक्ष भारतात आलेले नाहीत. पण इतर देशांच्या नावाने वाटेल ती फेकाफेकी करायची हे ट्रंपचे व सहकाऱ्यांचे अत्यंत हास्यास्पद व्यवच्छेदक लक्षण आहे. यांना जगभरातून कोणीही गांभीर्याने घेत नाही व ते जगभर टिंगलीचा विषय झाले आहेत. 

 

अपवाद भारतातील मोदीद्वेष्ट्यांचा. जो जो मोदींविरोधात, भारताविरोधात बोलेल व तशी कृती करेल तो तो त्यांच्यासाठी सर्वाधिक विश्वासार्ह, वंदनीय आहे. मग तो ट्रंप असू दे, एली लॅंग असू दे, सोरोस असू दे, एपस्टीन असू दे, ग्रेटा थनबर्ग असू दे, पाकिस्तान असू दे, चीन असू दे, कोणत्यातरी जागतिक संघटनेने केलेले भारताचे मूल्यांकन असू दे . . . हे त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात ‌


In reply to by श्रीगुरुजी

ट्रंप आणि टोळीचा मूर्खपणा संपण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. १९ जानेवारी २०२९ पर्यंत हा मूर्खपणा सुरूच राहील.

 

आता मार्को रूबिओचा नवीन दावा वाचा.

 

"रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी दिलेली परवानगी लवकरच थांबवणार आहोत, असे मार्को रूबिओ म्हणाले. "

 

किती गाढव आहे हा. भारताने कोणालाही अशी अनुमती मागितली नाही. भारत स्वतंत्रपणे निर्णय घेतो. आम्ही पूर्वी रशियाकडून तेल घेत होतो व आजही घेत आहोत हे भारताने २ वेळा नि:संदिग्ध शब्दात सांगितले आहे. परंतु यांचे पालुपद सुरूच आहे. शेवटी गाढवाची समज ती किती.

 

दुर्देव हे की भारतीय माध्यमे मुर्खासारखी भारत सरकारवर विश्वास न ठेवता या गाढवांवर विश्वास ठेवतात. आता भारताची चिंता वाढली आहे, भारताला मोठा फटका बसणार हे सांगून आपण किती मूर्ख आहोत हेच भारतीय माध्यमे सिद्ध करीत आहेत. 

 

https://www.lokmat.com/international/we-will-soon-ban-oil-purchases-from-russia-america-has-increased-indias-concerns-will-it-be-hit-hard-a-a571/

 


In reply to by श्रीगुरुजी

१७ तारखेला ट्रंप आणि टोळी रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी दिलेली परवानगी ३० दिवसांसाठी वाढवणार आहेत.

मग भारतात ट्रंप परवाणगी देतो, मग आपण तेल घेतो. मोदी इज कॉप्रमाईज्ड अशी हाकाटी चालु होईल.


In reply to by कर्नलतपस्वी

बालिश एकवेळ चालेल (उदा. रागा), पण विध्वंसक बालिश प्रचंड विध्वंस करतो. तात्या विध्वंसक बालिश आहे. 


विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक महिना होण्याच्या आतच तृणमूल काँग्रेस विभाजन होण्याच्या मार्गावर आहे. निवडून आलेल्या ८० पैकी ५० ते ६० आमदार वेगळा गट करण्याच्या प्रयत्नात आहेत.