Skip to main content

चालू घडामोडी । जून २०२६ । ज्येष्ठ १९४८

लेखक कांदा लिंबू यांनी सोमवार, 01/06/2026 15:11 या दिवशी प्रकाशित केले.

जून २०२६ च्या चालू घडामोडींसाठी हा नवीन धागा काढत आहे. 
 

थोर गायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले. अवीट गोडीची असंख्य गाणी त्यांनी गायिली आहेत. मराठी, हिंदी, आसामी, कन्नड, बंगाली आणि ओडिया यासह अनेक भाषांमध्ये त्यांनी सिनेमागीते, भक्तिगीते, गझला, ठुमरी इ प्रकारांत गाणी गायिली आहेत.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 


Suman Kalyanpur

 


वाचने 2675
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

मध्यप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, तेलंगण, झारखंड, हिमाचल प्रदेश, आसाम, ओरिसा, छत्तीसगड, केरळ, हरयाणा या १५ राज्यांनी समानधर्मी खिरापत वाटपाची योजना आणली आहे. 

 

परंतु यातील बऱ्याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निवडणुकीनंतर पद सोडवे लाले   किंवा त्यांच्या पक्षाचा निवडणुकीत पराभव झाला. 

 

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यात ही योजना आणणारे सरकार पुढील निवडणूक जिंकले, पण लगेच किंवा काही काळाने मुख्यमंत्र्याला पद सोडावे लागले.

 

बंगाल, तामिळनाडू, केरळ, ओरिसा, तेलंगण  या राज्यात योजना आणूनही पक्षाचा पराभव झाला. 


दिल्ली अमृतसर फ्लाईट टर्न अराऊंड घेताना काही काळासाठी चक्क पाकिस्तानी एअर स्पेस मध्ये शिरली होती !

 

च्यामारी कसला डेंजर कार्यक्रम आहे हा ! सिव्हिलियन एअरक्राफ्ट जगातील काही भयानक जास्त closely guarded आणि volatile airspace मध्ये शिरते काय अन् आपण ते वाचतो काय ! आजच्या तारखेत जेव्हा दोन्ही देशांत target acquisition radars आणि firing mechanisms सुद्धा फायर अँड फोर्गेट मोड मध्ये असणे नॉर्मल आहे तिथे हे काही नॉटिकल माइलचे deviation पण शेकडो निष्पाप प्रवाशांसाठी फुकट अन् हकनाक (आणि भयानक) मृत्यू ठरू शकला असता का ? 

 

 


प्रत्येक विमानाला ट्रान्सपॉन्डर ( ट्रान्समीटर आणि रेस्पॉण्डर) असतो जो रडारने पाठवलेल्या रेडिओ लहरींना प्रतिसाद देतो.    

नागरी विमानांची  फ्रिक्वेन्सी पूर्ण वेगळी असते आणि ते सर्व रडार ना सहज समजते.

तेंव्हा विमान पाकिस्तानात गेले म्हणून त्याला लगेच तोफेने किंवा क्षेपणास्त्राने पाडले जाते असे नव्हे.

त्या देशाच्या हवाई हद्दीचा भंग केल्यास त्याबद्दल विमान कंपनीला दंड भरावा लागतो.

आणि जास्तच आत मध्ये गेले तर त्यांचे वायू दल  त्या विमानाला त्यांच्या विमानतळावर उतरायला भाग पडू शकते