
रामदासकाकांच्या कथांची ओळख ’मिसळपाव’च्या वाचकांना नव्यानं करून देण्याची काही गरज नाही!
मराठी मध्यमवर्गीय जगाला अपरिचित असलेली अनेक जगं ते वाचकासाठी खुली करत आलेले आहेत. मग ते आर्थिक घोटाळ्यांचं जग असो की गुन्हेगार-पोलिसांचं क्रूर जग असो. त्या सगळ्या पसार्यात सराईतपणे वावरणार्या त्यांच्या नायकांच्या ’स्मार्ट’ नजरेत खोल कुठेतरी मात्र सात्त्विक, सुसंस्कृत मराठी जगाच्या खुणा दडलेल्या असतात. भावना अनुभवायला आणि व्यक्त करायला न लाजणारा, बघता बघता पात्रांच्या मनात शिरून त्यांचं जग जिवंत करणारा त्यांचा तो मराठीपणा वाचकाला ओळखीचा-जवळचा वाटतो. तेच त्यांचं बलस्थान आहे.
त्यांच्या या कथा पुस्तकरूपात येतायत. ’भास प्रकाशना’तर्फे. ६ तारखेपर्यंत नोंदणी केल्यास मूळ किंमत २२० रुपये असलेला कथासंग्रह सवलतीच्या दरात, म्हणजे वट्ट १८० रुपयांत मिळेल.
रु. १८० + टपालखर्च (७० रु) = असे रु. २५० या रेझरपेच्या लिंकवर देता येतील. त्याबद्दल ९९२०१९३१८३ या नंबरवर व्हॉट्सऍप करून खातरजमा करून घेता येईल.
७ जूननंतर पुस्तक घरपोच मिळेल. पुस्तकाचं नाव? ’काटेकोरांटीची फुलं’.
मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप चांगला उपक्रम आहे.लगेच…
खूप चांगला उपक्रम आहे.
लगेच ऑर्डर टाकतोय...
छान! पुस्तकाला शुभेच्छा!💐
छान! पुस्तकाला शुभेच्छा!💐
छानच
छानच.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे पुस्तक "भास प्रकाशन"तर्फे प्रकाशित केले जातेय ती सगळी आपलीच लोकं आहेत. मेघना भुस्कुटे म्हणा किंवा आदूबाळ म्हणा हे आपल्या लिखाणासाठी मिपावर गाजलेली नावे आहेत. कालपरत्वे त्यांचे लिखाण जरी मिपावर कमी झाले असले तरी मराठी साहित्याबद्दल असलेल्या आत्मीयतेने राबवत असलेल्या अशा उपक्रमांचे आपण स्वागतच करायला पाहिजे.
रामदासकाकांचे लिखाण ह्याबद्दल तर काय बोलावे, मिपा कायम आपलेसे वाटते ते गवि, रामदास, आदूबाळ अशांच्या लिखाणाने. कधी चार शब्द मिपावर खरडले गेले तेही त्यांचे लिखाण वाचून आलेल्या हुरुपामुळेच.
ह्या पुस्तकाला आणि अर्थात भास प्रकाशनालाही खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छा
छान! पुस्तकाला शुभेच्छा!
अरे वाह
अभिनंदन आणि शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
अरे वा,
या माहीतीबद्दल धन्यवाद नीलकांत.
रामदासकाकानी ईथे अपूर्ण ठेवलेल्या कथा जर पुरतावून या पुस्तकात समाविष्ट केलेल्या असल्या तर अहो भाग्यम ('म'चा पाय मोडलेला वाचावा!).
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.