Skip to main content

पाभे की बात ६

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 18/05/2026 23:38 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात ६ 

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 

मागच्या बातेनंतर आपली भेट आमच्या पाच देशांच्या भेटीमुळे होऊ शकली नाही. त्यामुळे विमानातूनच आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत. 

देश भयंकर संकटातून जात आहे. सरकारी उपक्रमातल्या कंपन्यांचे उद्योग खाजगी कंपन्यांना विकल्याने सरकारकडे पैसा जमा झाला आहे ही सुखाची बाब आहे. तसेच इलेक्षन बॉन्ड हे जेम्स बॉन्ड सारखे धावत असून भरपूर पैसा त्यातून सरकारला मिळाला आहे. यातून हे जागतीक संकट आपण पेलू शकू. 

आम्ही बॅंकानाही काटकसर करण्याचा सल्ला दिला आहे. बॅंलातले काऊंटरवर ठेवण्यात येणारे पेन आता आपण नाही ठेवणार. त्यामुळे सर्व देशात मिळून चक्क एकूण रुपये ८६५४/- बचत होणार आहे. बॅंकात पिण्याचे पाणी आणि टॉयलेटचे पाणी आपले आपण घरूनच आणायचे आहे. 

रुपया या चलनाची व्याख्या आज रात्री बारा वाजेपासून Relation Under Paisa And Young Adult = Rupaya
अशी असणार आहे. बदलत्या व्याख्येनुसार रुपया हा तरूणांमध्ये जास्त खेळता राहणार आहे. यातूनच देशाच्या तरूणांना पैशाच्या खेळाचा रोजगार मिळणार आहे. 

अजून बरेच काही बोलायचे आहे. पण ते आमचा परदेश दौरा संपल्यानंतरच. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात


वाचने 340
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

एका विशेष सूचनेद्वारे सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट ना आदेश देण्यात आले आहेत की त्यानी फूड रीसायकलिंग प्रोसेस राबवावी

शिल्लक राहिलेले / वाया जाणारे अन्न शेळ्या कोम्बड्या मासे खेकडे याना खाउ घालावे म्हणजे अन्न बचत होईल.

तसेच कबुतर याचा खाद्य पदार्थात समावेश करण्यात यावा.

भटक्या कुत्र्यांचे उत्तर कोरीया या देशात निर्यात अदाणी समुहाद्वारे करावी  ज्या योगे परकीय चलन वाढेल.  संजय रडत राऊत यानी याला  आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे हा  पक्षपतीपणा आहे.


In reply to by सुबोध खरे

चित्रपट पाहतांना एखाद्या खलनायकाचा आपण तिरस्कार करतो, पण तो तिरस्कार त्याने केलेल्या अभिनयाला दिलेली पावतीच असते. 


In reply to by पाषाणभेद

तुम्ही काळे का गोरे ते मला माहिती नाही तेंव्हा तुमचा तिरस्कार करायचे मला काहीच कारण नाही.

मी केवळ लेखाबद्दल अभिप्राय दिला होता. तुम्हाला स्वतःचे कौतुक करून घ्यायचे असेल तर करा.    


In reply to by सुक्या

तुमच्या माननीय पंप्रनांनी हजारो बाता मारल्या तर चालते. आमचे कमीत कमी ५०० तर सहन कराव्या. 

हे काही बरं नाही. 


In reply to by पाषाणभेद

पंप्र च्या हजार बाता चालवल्या म्हणुन तुमच्या पाचशे चालवुन घ्यायलाच हव्या असे नाही. 

बघा बुवा. मी माझे मत मांडले .. तुम्हाला सल्ला दिला .. मानायचा की नाही हे तुम्ही ठरवा.  


In reply to by सुक्या

एखाद्याचे दुर्गूण मग तो देश, पंप्र का असेना प्रांजळ, खेळकरपणे मांडणे हे समोरच्या पार्टीनेही खेळकरपणे स्विकारणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे. अनेक दिग्गजांचे कार्टून रेखाटले गेले आहेत.

 

तुमचे मला थांबा सांगणे हे निकोप तर नाहीच पण जे काही येथे लिहील्या जाते ते तुम्हाला उमगलेले नाही असे वाटते. 

 

असो.

 

पुढील बातात तुमचाही समावेश करतो. 

 

कारण आपले वर्जीनल हिरो देखील बातात कौतूकास्पद कार्याचा समावेश करत असतात हे तुम्ही ऐकून असलाच.

 

 

 


In reply to by पाषाणभेद

टीका करा , एखाद्याचे दुर्गूण दाखवा , अगदी पिसे काढा ... त्याला कुणी नाही म्हणत नाही. 

ते करताना जे लिहितो / बोलतो त्याला काहीतरी व्हॅल्यु असायला हवी. उगाच आपले टंकायचे म्हणुन टंकु नका. 

 

जाता जाता : माझा ह्या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद. बाकी तुम्ही सुज्ञ आहात.


जाऊ द्या हो.

 

काही जणांना कळफलक दिसला कि तो बडवायची अनिवार इच्छा होते. त्याला काही इलाज नाही.

 

उदा. काही काही रिक्षा वाले सतत भोंगा वाजवत असतात मग रस्त्यावर माणूस नसला तरीही  तसंच आहे ते.