Skip to main content

पाभे की बात २

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 13/05/2026 08:52 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात २

मितरों,

सूर्य अकाशातून आगीचे गोळे फेकतो आहे. तापमान असह्य झाले आहे. का नाही या संधीचा फायदा घ्यावा? (क्यूं न इस मौके का फायदा उठाया जाय?)

रस्त्याने जातांना प्रत्येकाने छत्री घ्यावी. म्हणजे उन्हापासून संरक्षणही होईल आणि उन्हात फिरण्याचा आनंदही घेता येईल. वाहन न वापरल्याने देशाचे इंधन आणि पैसा वाचेल तो अजून एक फायदा आहेच.

भेटूया पुढील "पाभे की बात" मध्ये.

#पाभे_की_बात

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 354
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

रस्त्यातून जाताना शर्टच्या खिशात एक चमचा सर्फ किंवा तत्सम पावडर ठेवावी जेणेकरून तुम्हाला आलेल्या घामातच शर्ट धुवून निघेल.

डोक्याला हमाम लावून ठेवला तर अंघोळीचेही कष्ट वाचतील

 


In reply to by विजुभाऊ

अरे हो!! चांगला सल्ला दिलात.

तुमच्यासारखे श्रोते या बातें नेहमी ऐकत असतात त्यामुळेच हा कार्यक्रम पूर्ण देशात प्रसिद्ध आहे.

पुढील बातें मध्ये तुमच्या सल्याचा उल्लेख नक्कीच केला जाईल. धन्यवाद. 


माझ्या मित्राचे काका , डोक्यावर कच्चा पापड घेऊन निघतात.

मधेच कधीतरी तो पापड शेकून तयार होतो. मग ते तो खाऊन टाकतात आणि नवीन कच्चा पापड डोक्यावर धारण करतात