Skip to main content

अवकाळी

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 13/04/2026 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
कंच हिरव्या, ओलेत्या ओळी तुझ्या पावसाळी गारपीट उंबऱ्याशी शिवारात अवकाळी सांग कशी पावसाची मला पडावी रे भूल? चंद्रमौळी घरातली कशी पेटणार चूल? तुझ्यासाठी आभाळीचा थेंब शिंपलीत मोती माझ्या पापणीत पूर उभ्या पिकाची रे माती लेखणीला फुटो तुझ्या इंद्रधनूचा धुमारा झुंजण्यास अस्मानीशी तेवढाच मला थारा
लेखनविषय:

वाचने 188
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

शेवटचे कडवे अस्थानी वाटले (तसंही मला पद्यात गती नाही)! - (गद्य) सोकाजी

वाह .... सुंदर ... चित्रदर्शी ! पावसाची वाट पाहणारा बळीराजा आणि कवि.... साधी सोपी रचना, आशय ही समर्पक ! शेवटचे कडवे विशेष आवडले.