एक गोष्ट लक्षात आली का, हे युद्ध सुरू झाल्यापासून युद्धात काय घडले, कोठे बॉम्ब टाकले, कोठे क्षेपणास्त्रे सोडली, इराणचे किती नुकसान झाले याविषयी एकटा ट्रंप दिवसभर बोलतोय. अमेरिकेचे सेनाधिकारी, सैन्याशी संबंधित कोणीही बोलताना दिसत नाही. ही माहिती सैन्याने द्यायला हवी, पण सैन्य गप्प आहे. सिंदूर होत असताना रोज दोन सैन्याधिकारी महिला माध्यमांसमोर येऊन आवश्यक तेवढीच माहिती देत होत्या. पंतप्रधान, संरक्षणमंत्री फारसे पुढे आले नव्हते.
बाता मारायच्या, फुशारक्या मारायच्या, इतर राष्ट्रांच्या नावाने स्वतःच उतावळेपणाने तथ्यहीन घोषणा करून मोकळे व्हायचे, दोन राष्ट्रप्रमुखातील गुप्त बोलण्यांची वाच्यता करायची, इतर राष्ट्रप्रमुखांचा माध्यमांसमोर जाहीर पाणउतारा करायचा, सातत्याने हास्यास्पद धमक्या द्यायच्या, सातत्याने निर्णय बदलत रहायचे या ट्रंपच्या सवयी जगाच्या लक्षात आल्या आहेत. याला आता जगभर कोणीही गांभीर्याने घेत नाही. होर्मुज खाडीत तुमच्या युद्धनौका पाठवा या मागणीला सर्व नेटो देशांनी स्पष्ट नकार दिलाय व त्यामुळे ट्रंपने त्यांनाही धमक्या द्यायला सुरूवात केली. रशियाकडून तेल घ्याल तर धडा शिकवीन ही सर्व देशांना धमकी दिल्यानंतर आता ट्रंपने टोपी फिरवून सर्व देशांनी रशियाकडून ३० दिवसांसाठी तेल घेण्यासाठी मी अनुमती दिलीये अशी हास्यास्पद घोषणा केली, जणू काही बाकी देशांनी याची अनुमती मिळण्यासाठी अर्ज केला होता. याच्या आयातशुल्काच्या घोषणांना चिलटही घाबरत नाही.
अमेरिकेच्या इतिहासात इतका हास्यास्पद व टिंगलीचा विषय बनलेला अध्यक्ष झाला नाही. याला कोणीही गांभीर्याने घेत नाही व याच्या हास्यास्पद घोषणांकडे सर्व देश दुर्लक्ष करतात.
आता या युद्धात इस्राएल व अमेरिका पूर्णपणे एकाकी पडले असून चांगलेच अडकले आहेत. इराणमध्ये भूदळ पाठवून विजय मिळविणे अशक्य आहे कारण इराणकडे मोठे सैन्य आहे व अमेरिका जमिनीवरील युद्धात जिंकत नाही हे व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तान अश्या देशात सिद्ध झाले आहे. जमिनीवरील युद्धात अमेरिकन सैनिक मोठ्या प्रमाणात मरतात व मानहानी पत्करून अमेरिकी सैन्याला तो देश सोडावा लागतो.
या युद्धातही त्यांना एकतर मानहानी स्वीकारून युद्ध थांबवावे लागेल किंवा अण्वस्त्रांचा वापर करून इराणचा संपूर्ण नाश करून युद्ध संपवावे लागेल. ट्रंपचा माथेफिरूपणा व उतावळेपणा लक्षात घेतला तर ट्रंप अण्वस्त्रे वापरणार नाही याची शाश्वती नाही.
इराणकडे आता फारशी ड्रोन व क्षेपणास्त्रे शिल्लक नसावी. जेवढी शिल्लक असतील ती इराणने होर्मुझ खाडी रोखून ठेवण्यासाठी राखून ठेवली असावी.
इस्राएलचेही या युद्धात प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे व बराच शस्त्रसाठा खर्ची पडला आहे. एवढे करूनही इराण व लेबनॉनचा पराभव झालेला नाही.
या युद्धाचा मुख्य लाभ रशिया व चीनला होताना दिसतोय. ट्रंपने क्युबाचीही आर्थिक घेराबंदी केलीये. आपल्या जुन्या मित्राच्या मदतीला रशिया जाईल का हे माहिती नाही. परंतु व्हेनेझुएलापाठोपाठ ट्रंपने क्युबा सुद्धा आपल्या नियंत्रणात आणला तर तैवान शेवटच्या घटका मोजायला प्रारंभ करेल.
आगाऊपणा करून लाकडाच्या ढलप्यात ठोकलेली पाचर काढल्याने शेपटी अडकलेल्या माकडासारखी ट्रंप व नेतनयाहू यांची अवस्था या युद्धामुळे झाली आहे.
वाचने
2173
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
कबुली
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
कोणीही ट्रंपचा प्रचार केला
In reply to कबुली by स्वधर्म
:)
In reply to कबुली by स्वधर्म
हा शेवटचा पॅरा एकदमच भारी
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
ट्रम्प
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
एम्बसी
In reply to ट्रम्प by कॉमी
इस्राएल अभेद्य नाही हे २
In reply to एम्बसी by चंद्रसूर्यकुमार
तेलाचे राजकारण....
क्युबा
ट्रंपचा उथळ व अप्रगल्भ स्वभाव
In reply to क्युबा by चंद्रसूर्यकुमार
तात्यांचा स्वभाव उथळ असला तरी
तात्याना वेळीच आदर्श सरपंच
तात्या गेली वर्षभर आपल्याला
इतर देश काय करणार हे ट्रंप
In reply to तात्या गेली वर्षभर आपल्याला by रात्रीचे चांदणे
शेवटचे वाक्य आवडले...
In reply to इतर देश काय करणार हे ट्रंप by श्रीगुरुजी
तात्याची वक्तव्ये
In reply to इतर देश काय करणार हे ट्रंप by श्रीगुरुजी
मोठ्या लोकांच्या , मोठ्या गोष्टी.......
In reply to तात्याची वक्तव्ये by चंद्रसूर्यकुमार
हे युद्ध थांबविण्यासाठी मोदी
In reply to तात्याची वक्तव्ये by चंद्रसूर्यकुमार
अमेरिकन सैन्य व्यावसायिक
युद्ध परिस्थिती थोडी…
युद्ध परिस्थिती थोडी निवळल्यासारखी दिसतेय. ट्रंपचा ताठा कमी झालाय. इराणनेही होर्मुझ जलमार्ग काही दिवसांसाठी उघडला आहे. नेतनयाहूची युद्धखोर वृत्ती कायम आहे. परंतु ट्रंप व नेतनयाहू एकटे पडलेले दिसताहेत. सर्व युरोपियन देशांनी ट्रंपला सहकार्य देण्यास नकार दिलाय. त्यांच्यावर ट्रंपने आगपाखड करून व धमक्या देऊनही काहीही उपयोग झाला नाही.
लवकरात लवकर सर्व परिस्थिती पूर्वपदावर यावी हीच सदिच्छा.
हा लेख बरोबर ३…
हा लेख बरोबर ३ महिन्यांपूर्वी लिहिला होता. त्यातील खालील भाकिते सत्य झाली आहेत.
>>> अमेरिकेच्या इतिहासात इतका हास्यास्पद व टिंगलीचा विषय बनलेला अध्यक्ष झाला नाही. याला कोणीही गांभीर्याने घेत नाही व याच्या हास्यास्पद घोषणांकडे सर्व देश दुर्लक्ष करतात. आता या युद्धात इस्राएल व अमेरिका पूर्णपणे एकाकी पडले असून चांगलेच अडकले आहेत.
>>> युद्धातही त्यांना एकतर मानहानी स्वीकारून युद्ध थांबवावे लागेल किंवा अण्वस्त्रांचा वापर करून इराणचा संपूर्ण नाश करून युद्ध संपवावे लागेल.
>>> एवढे करूनही इराण व लेबनॉनचा पराभव झालेला नाही.
>>> आगाऊपणा करून लाकडाच्या ढलप्यात ठोकलेली पाचर काढल्याने शेपटी अडकलेल्या माकडासारखी ट्रंप व नेतनयाहू यांची अवस्था या युद्धामुळे झाली आहे.
शेवटी ट्रंपला युद्धविराम करून इराणशी तह करावा लागला. इराणचे प्रचंड नुकसान झाले, तरीही त्यांनी चिवटपणे शस्त्रे म्यान न करता झुंज देऊन अमेरिकेला युद्ध थांबविण्यास भाग पाडले.
या युद्धात ना अमेरिका जिंकली ना इस्राएल जिंकला ना इराण जिंकला ना कोणाचा पराभव झाला. या तीनही देशांचे (लेबनॉनचे सुद्धा) प्रचंड नुकसान झाले. हिजबोल्ला सुद्धा संपली नाही.
परंतु असे दिसते की तहाच्या वाटाघाटीत इराणला अनेक गोष्टी मिळाल्या व त्या तुलनेत अमेरिकेला अत्यंत किरकोळ लाभ झाला. हा तह अर्थातच इस्राएलला मान्य नाही, परंतु इस्राएलला सुद्धा आता कोणीही घाबरत नाही व प्रचंड नुकसान होऊनही इस्राएलला सुद्धा काहीही हातात आले नाही.
अमेरिका व इराण यांनी मान्य केलेला तह
या सामंजस्य तहातील प्रमुख मुद्दे -
१) या युद्धातील सर्व सहभागी सर्व भागात (लेबनॉन सहित) सर्व प्रकारची लष्करी कारवाई ता्काळ व पूर्ण थांबविणार.
२) यातील सर्व सहभागी देश एकमेकांचे सार्वभौमत्व, प्रादेशिक एकात्मता मान्य करून एकमेकांच्या अंतर्गत बाबतीत ढवळाढवळ करणार नाहीत.
३) इराण व अमेरिका जास्तीत जास्त ६० दिवसात या तहातील मुद्द्यांचे अंतिम ध्येय साध्य करणार.
४) ३० दिवसात होर्मुझमधील वाहतूक पूर्ववत करणार व अंतिम करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर ३० दिवसात अमेरिका या भागातील सर्व सैन्य परत नेणार.
५) इराण ६० दिवसांसाठी होर्मुझमधील वाहतूक पूर्ववत करणार व दरम्यानच्या काळात ओमानबरोबर चर्चा करून पुढील योजना आखणार.
६) अमेरिका स्थानिक मित्रदेशांशी चर्चा करून इराणला ३०० अब्ज डॉलर्स मदतीची योजना आखणार.
७) अमेरिकेने व संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने इराणवर लादलेले सर्व निर्बंध उठविणार.
८) इराण अण्वस्त्रे तयार करणार नाही व युरोपियन समृद्धीकरण व इतर आण्विक गरजांसाठी अमेरिकेशी चर्चा करणार.
९) अंतिम तह प्रत्यक्षात येईपर्यंत दोन्ही देश आहे ती परिस्थिती कायम ठेवणार. अमेरिका कोणतेही नवीन निर्बंध लादणार नाही व नवीन सैन्य या भागात आणणार नाही.
१०) इराणच्या तेल निर्यातीवरील प्रतिबंध उठविणार.
११) अमेरिका इराणची गोठविलेली मालमत्ता व संपत्ती मुक्त करणार.
१२) अंतिम तहासाठी चर्चा सुरू ठेवणार.
एकंदरीत इराणची प्रचंड मनुष्यहानी व मालमत्ताहानी झाली, परंतु तहातून बराच लाभ होणार आहे. होर्मुझ खाडीवर इराणने आपले वर्चस्व प्रस्थापित करून जगाच्या नाड्या आवळण्याचे नवीन शस्त्र इराणला मिळाले आहे.
अमेरिका व इस्राएलची किरकोळ मनुष्यहानी झाली, पण प्रचंड प्रमाणात शस्त्रे, क्षेपणास्त्रे, विमाने खर्ची पडली. अमेरिकेत जनमत वेगाने ट्रंपविरोधात गेले. ज्या उद्दिष्टांसाठी आपण इराणवर हल्ला केला असे अमेरिका व इस्राएल सांगत होते, त्यातील बहुसंख्य उद्दिष्टे साध्य झाली नाहीत. जगभर अमेरिकेचा दरारा संपला. जगभर ट्रंप टिंगलीचा विषय झाला. नेटो एकसंध राहिली नाही. जगातील एकही देश अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरला नाही. इस्राएलने सुद्धा अनेकदा अमेरिकेला धुडकावून लावले. अनेक युरोपिय देशांनी आपल्या देशावरील अवकाशातून अमेरिकी लष्करी विमानांना उड्डाण करण्यास प्रतिबंध केला. ट्रंपने थयथयाट करूनही कोणीही भीक घातली नाही. अमेरिका व इस्राएल जगात पूर्ण एकाकी झाले.
पर्शियन आखातातील अमेरिकेच्या मित्र देशांचे अमेरिकेपेक्षा खूप जास्त नुकसान झाले. दुबई ओपेकमधून बाहेर पडला. पर्यटन व्यवसायावर खूप वाईट परिणाम झाला.
भारताचेही बरेच नुकसान झाले. काही नागरिक मारले गेले व देशात इंधन भाववाढ झाली.
शाळेवर क्षेपणास्त्र टाकून व श्रीलंका बंदरात उभ्या असलेल्या इराणच्या युद्धनौकेवर क्षेपणास्त्र टाकून अमेरिकेने आपल्या विकृत क्रोर्याचे दर्शन घडविले. इस्राएल व अमेरिकेच्या वेडगळ हिंसाचाराने जगात अनेक जण संतप्त झाले आहेत.
एकंदरीत यातून केवळ विनाश झाला. कोणीच जिंकले नाही. युद्ध करण्यामागील एकही हेतू साध्य झाला नाही.
या तहातील काही मुद्दे प्रत्यक्षात येणे अत्यंत अवघड आहे. इस्राएल हा तह मान्य न करता लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवेल. इराण सुद्धा आण्विक कार्यक्रम सोडणार नाही.
मुक्त पत्रकार निळू दामले…
मुक्त पत्रकार निळू दामले यांनी चेपुवर लिहिलेला खालील लेख वाचला. अत्यंत समर्पक लेख आहे.
https://www.facebook.com/share/1P7MmMQLcz/
________________________
निळू दामलेंचे विश्लेषण --
इराणबरोबरचं युद्ध थांबवण्यासाठी करायच्या कराराची चौकट ठरवणारा समझौता ट्रंप यांनी तयार केला आहे. या चौकटीनुसार पुढल्या ६० दिवसात करार व्हायचा आहे. ही चौकट आहे, करार नाही.
ट्रंपना युद्धातून बाहेर पडायचं होतं, तेवढंच या करारामुळं शक्य झालंय.
समझौत्यातली कलमं अशी. होरमुझ खाडी मुक्त होईल. इराण आणि लेबनॉनमधलं युद्ध थांबेल. इराण अणुबाँब तयार करणार नाही. इराणची गोठवलेली संपत्ती मोकळी केली जाईल. युद्धामुळं उध्वस्थ झालेला इराण पुन्हा उभा करण्यासाठी इराणला ३०० अब्ज डॉलर देणारा फंड तयार केला जाईल. इराणवरचे आर्थिक निर्बंध उठवले जातील.
हा करार इस्रायलला मंजूर नाही. युद्ध थांबवणं, इराणला ३०० अब्ज डॉलर देणं, इराणवरचे आर्थिक निर्बंध उठवणं, इराणला तेल व्यापार पूर्वीप्रमाणंच करू देणं, यामुळं इराणला स्वतःची ताकद वाढवण्याची आणि आर्थिक जमवाजमव करायची उसंत मिळेल असं इस्रायलला वाटतंय.
ट्रंप यांच्या अमेरिकन पाठीराख्यांना समझौता मंजूर नाही. इराणला ठेचायचं म्हणून तर अब्जावधी रुपये खर्चून अमेरिकेनं इराणवर हल्ले केले. इराणला पैसे देणं, इराणचे गोठवलेले पैसे परत करणं, इराणला व्यापाराला परवानगी देणं म्हणजे केलेलं युद्द चुकीचं होतं असा अर्थ होतो. @ट्रंप पाठीराख्यांना ते मंजूर नाही.
ट्रंपचे पाठीराखे नसलेल्या लोकांना मुळातलं युद्धच मान्य नव्हतं. त्यामुळं त्यांचा ट्रंपना विरोध आहेच.
ट्रंपना समझौता महागात पडतोय. युद्धही महागात पडलेलं आहेच.
ट्रंप करार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, करार अमलात आणण्यासाठी नाहीत. ट्रंप जे करार करतात ते भुसभुशीत, विसविशीत आणि संदिग्ध असतात. इराण मदतीचा ३०० अब्ज डॉलरचा फंड कसा तयार होणार? इस्रायल एक पैसाही देणार नाही. आखातातल्या देशांना युद्द महागात पडलंय. इराणने केलेले हल्ले आणि बंद पडलेली तेल निर्यात यामुळं आखाती देशांचं प्रचंड नुकसान झालंय. ते भरून काढायचा विषय ट्रंप काढत नाहीत, उलट म्हणतात की इराण पुनर्निर्माण फंडात आखाती देशांनी पैसे घालावेत. आखाती देश अजिबात तयार नाहीत. युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी लोक युद्धापासून दूरच होते. एक खडकूही देणार नाहीत.
अमेरिकन जनतेचं तर विचारायलाच नको. अमेरिकन काँग्रेस पैसे देणार नाही. मेक अमेरिका ग्रेट वाले तर ट्रंपना दारातही उभे करणार नाहीत. ट्रंप ज्या देशाचं वर्णन खूंख्वार दहशतवादी मुस्लीम देश असं करत त्या देशाला पैसे?
इराणवरचे आर्थिक निर्बंध (सँक्शन्स) उठवणार? युद्धाला सुरवात होण्याच्या आधी घातलेले निर्बंध युद्ध झाल्यावर उठवणं म्हणजे युद्ध केल्याबद्दल बक्षीस देण्यासारखंच होईल.
ओबामा यांनी अण्वस्त्र निर्मिती १५ वर्षासाठी पुढं ढकलणारा करार करून इराणवरचे निर्बंध उठवले होते. त्यांना बसता उठता त्यासाठी शिव्या देणाऱ्या ट्रंपनी निर्बंध उठवले तर ट्रंपच्या पाठीराख्यांची होणारी गोची भीषण असेल.
इराणमधील दहशतवादी सत्ता उध्वस्थ करणं यासाठी ट्रंपनी युद्घ उचकवलं होतं. तिथली सत्ता अजिबात उध्वस्थ झाली नाही. अतिरेकी धर्मवादीच सत्तेत व्यवस्थित शिल्लक आहेत. पाच दहा नेते मारले, त्यांची जागा त्यांच्यापेक्षा अधीक जहाल अनुयायांनी घेतलीय.
इराणचा धोका कोणाला होता? अमेरिकेला? अमेरिका कित्येक हजार किमी दूरवर आहे. इराणची रॉकेट अमेरिकेपर्यंत पोचू शकत नाहीत. धोका असल्यास इस्रायलला होता. इस्रायलचं दुखणं अमेरिकेनं उसनं घेतलं. इस्रायलचा धोका कमी झालेला नाही.
अमेरिकेनं इराणवर चाळीस हजार पेक्षा जास्त हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या सीआयएनं अहवाल दिला की ड्रोन आणि रॉकेटं यांची ७० टक्के संख्या इराणमधे अजूनही शाबूत आहे. १०० ड्रोन आणि रॉकेटं यातली ९८ ड्रोन रॉकेटं अमेरिका-इस्रायल हवेतच पाडतात अशी आकडेवारी अमेरिका सांगते. याचा अर्थ १० हजार ड्रोन, रॉकेटातली २०० इस्रायल आणि आखाती देशांवर पडतात. त्यानं नुकसान तर होतंच ना.
एक अपाचे हेलेकॉप्टर ४५०कोटी डॉलरचं असतं. एक बाँबर विमान ९०० कोटी डॉलरचं असतं. ४ ते ४० लाख डॉलर किमतीचं रॉकेट आणि २५ ते ३० लाख किमतीचं ड्रोन अपाचे आणि बाँबर पाडू शकतात, त्यांचं नुकसान करू शकतात. इराण कित्येक वर्षं लढाई चालवू शकतं. अणुबाँबची आवश्यकताच नाही.
या साऱ्या गोष्टी अमेरिकन लष्कराला माहीत होत्या, पण ट्रंप त्यांचं ऐकत नव्हते, आजही ऐकत नाहीत. इराणच्या अण्वस्त्र निर्माण करणाऱ्या इमारतीवर केलेल्या हल्ल्यांमुळं इमारतींचं नुकसान झालं, अणु कार्यक्रम नष्ट झाला नाही असा रिपोर्ट अमेरिकन गुप्तचरांनी दिला. ट्रंप म्हणतात की गुप्तचर विभागाला काही कळत नाही.
अमेरिका आणि इस्रायल यांची लष्करी ताकद इराणच्या ताकदीपेक्षा किती तरी मोठी आहे. इराणला ते माहीत आहे. अमेरिका आणि इस्रायलची दमछाक करणं, त्यांना छळ छळ छळणं असं इराणचं धोरण आहे. अमेरिकेचा पराभव हे इराणचं धोरण नाही, अमेरिकेला रडवायचं असं इराणचं धोरण आहे.
युद्ध होणं, युद्ध लांबणं, अमेरिकेला परवडत नाही. अमेरिकेच्या संरक्षक छत्रीत सुखानं वावरणाऱ्या आखाती देशांनाही युद्ध परवडत नाही. युद्ध थांबवणं ही ट्रंप यांची गरज आहे, पण एका परीनं ती ट्रंप यांची फजिती आहे. ट्रंपना युद्ध थांबवण्यावाचून गत्यंतर नाहीये. त्यातूनच प्रस्तुत समझौता तयार झालाय.
ट्रंप खुष, ट्रंप स्वतःवर खुष येवढी एकच गोष्ट घडत असते.
तेच समझौत्यात घडलंय.
इस्रायल-इराण-पॅलेस्टाईन वैर संपणार नाही, मारामाऱ्याही संपणार नाहीत.
माणसाची आर्थिक-वैज्ञानिक वगैरे प्रगती खूप झालीय. मन अजून रानटीच आहे. त्याला काय करणार?
निळू दामले
In reply to मुक्त पत्रकार निळू दामले… by श्रीगुरुजी
ह्यांचे अफगाणिस्तान वरील लेखनही विपुल आणि समर्पक आहे.
त्यांचे सीरिया सगळे वी सगळे…
In reply to निळू दामले by वृषभ खोंडे
त्यांचे सीरिया सगळे वी सगळे मी वाचलेय!
इराणच्या तेला वरचे निर्बंध…
इराणच्या तेला वरचे निर्बंध पूर्ण पणे हटवले तर कच्च्या तेलाचे भाव आणखीन खाली येतील. पण खरा प्रश्न म्हणजे इराण साठी ३०० अब्ज डॉलरचा फंड कोण तयार करणार?
इराण साठी ३०० अब्ज डॉलरचा…
इराण साठी ३०० अब्ज डॉलरचा फंड कोण तयार करणार?
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात
युद्ध होऊन
कोणीही कोणाचीही काशी केली तरीही पर्सपोलिस (फार्स प्रांत), पसरगदे (फार्स प्रांत), छोगा झांबील (खुजेस्तान प्रांत), बिसोतून (कर्मनशाह प्रांत), नागाश - ए - रोस्तम (सासानीड राजांचे अवशेष, मुंबईत/भारतात स्थाईक झालेल्या पारशी जनतेचे जुने घर/ तिथले राजे) व अशा तमाम जुन्या ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या जागा ईरान मध्ये अमेरिकेने बॉम्ब वर्षावात उडवून देऊ नये हीच प्रार्थना. अशा कैक ह्याहूनही प्राचीन जागा अमेरिकेने इराक अन् सीरिया मध्ये उडवून टाकल्या (अर्थात तिथल्या मुसलमान जनतेला सुद्धा त्याचे काही खास पडले नसावे) ईरान मध्ये मात्र अजूनही बऱ्यापैकी लोक "आम्ही मुसलमान नंतर झालो, जीव वाचवायला झालो तरीही आम्ही पहिले पर्शियन होतो अन् राहणार, प्राचीन जगातील एक मानवी संस्कृती" हे मानतात. एक इतिहासप्रेमी म्हणून तितकीच काय ती अपेक्षा. शिया बहुसंख्यांक आणि पर्यायाने शिया अतिरेकाचे केंद्रस्थान असूनही बामीयान मध्ये सुन्नी कट्टरपंथीय तालिबानने बुद्धमूर्ती पाडल्या होत्या तसे काही ईरानी जनतेने/ शासनाने केलेले दिसत नाही.