एक गोष्ट लक्षात आली का, हे युद्ध सुरू झाल्यापासून युद्धात काय घडले, कोठे बॉम्ब टाकले, कोठे क्षेपणास्त्रे सोडली, इराणचे किती नुकसान झाले याविषयी एकटा ट्रंप दिवसभर बोलतोय. अमेरिकेचे सेनाधिकारी, सैन्याशी संबंधित कोणीही बोलताना दिसत नाही. ही माहिती सैन्याने द्यायला हवी, पण सैन्य गप्प आहे. सिंदूर होत असताना रोज दोन सैन्याधिकारी महिला माध्यमांसमोर येऊन आवश्यक तेवढीच माहिती देत होत्या. पंतप्रधान, संरक्षणमंत्री फारसे पुढे आले नव्हते.
बाता मारायच्या, फुशारक्या मारायच्या, इतर राष्ट्रांच्या नावाने स्वतःच उतावळेपणाने तथ्यहीन घोषणा करून मोकळे व्हायचे, दोन राष्ट्रप्रमुखातील गुप्त बोलण्यांची वाच्यता करायची, इतर राष्ट्रप्रमुखांचा माध्यमांसमोर जाहीर पाणउतारा करायचा, सातत्याने हास्यास्पद धमक्या द्यायच्या, सातत्याने निर्णय बदलत रहायचे या ट्रंपच्या सवयी जगाच्या लक्षात आल्या आहेत. याला आता जगभर कोणीही गांभीर्याने घेत नाही. होर्मुज खाडीत तुमच्या युद्धनौका पाठवा या मागणीला सर्व नेटो देशांनी स्पष्ट नकार दिलाय व त्यामुळे ट्रंपने त्यांनाही धमक्या द्यायला सुरूवात केली. रशियाकडून तेल घ्याल तर धडा शिकवीन ही सर्व देशांना धमकी दिल्यानंतर आता ट्रंपने टोपी फिरवून सर्व देशांनी रशियाकडून ३० दिवसांसाठी तेल घेण्यासाठी मी अनुमती दिलीये अशी हास्यास्पद घोषणा केली, जणू काही बाकी देशांनी याची अनुमती मिळण्यासाठी अर्ज केला होता. याच्या आयातशुल्काच्या घोषणांना चिलटही घाबरत नाही.
अमेरिकेच्या इतिहासात इतका हास्यास्पद व टिंगलीचा विषय बनलेला अध्यक्ष झाला नाही. याला कोणीही गांभीर्याने घेत नाही व याच्या हास्यास्पद घोषणांकडे सर्व देश दुर्लक्ष करतात.
आता या युद्धात इस्राएल व अमेरिका पूर्णपणे एकाकी पडले असून चांगलेच अडकले आहेत. इराणमध्ये भूदळ पाठवून विजय मिळविणे अशक्य आहे कारण इराणकडे मोठे सैन्य आहे व अमेरिका जमिनीवरील युद्धात जिंकत नाही हे व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तान अश्या देशात सिद्ध झाले आहे. जमिनीवरील युद्धात अमेरिकन सैनिक मोठ्या प्रमाणात मरतात व मानहानी पत्करून अमेरिकी सैन्याला तो देश सोडावा लागतो.
या युद्धातही त्यांना एकतर मानहानी स्वीकारून युद्ध थांबवावे लागेल किंवा अण्वस्त्रांचा वापर करून इराणचा संपूर्ण नाश करून युद्ध संपवावे लागेल. ट्रंपचा माथेफिरूपणा व उतावळेपणा लक्षात घेतला तर ट्रंप अण्वस्त्रे वापरणार नाही याची शाश्वती नाही.
इराणकडे आता फारशी ड्रोन व क्षेपणास्त्रे शिल्लक नसावी. जेवढी शिल्लक असतील ती इराणने होर्मुझ खाडी रोखून ठेवण्यासाठी राखून ठेवली असावी.
इस्राएलचेही या युद्धात प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे व बराच शस्त्रसाठा खर्ची पडला आहे. एवढे करूनही इराण व लेबनॉनचा पराभव झालेला नाही.
या युद्धाचा मुख्य लाभ रशिया व चीनला होताना दिसतोय. ट्रंपने क्युबाचीही आर्थिक घेराबंदी केलीये. आपल्या जुन्या मित्राच्या मदतीला रशिया जाईल का हे माहिती नाही. परंतु व्हेनेझुएलापाठोपाठ ट्रंपने क्युबा सुद्धा आपल्या नियंत्रणात आणला तर तैवान शेवटच्या घटका मोजायला प्रारंभ करेल.
आगाऊपणा करून लाकडाच्या ढलप्यात ठोकलेली पाचर काढल्याने शेपटी अडकलेल्या माकडासारखी ट्रंप व नेतनयाहू यांची अवस्था या युद्धामुळे झाली आहे.
वाचने
1587
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
कबुली
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
कोणीही ट्रंपचा प्रचार केला
In reply to कबुली by स्वधर्म
:)
In reply to कबुली by स्वधर्म
हा शेवटचा पॅरा एकदमच भारी
In reply to :) by चंद्रसूर्यकुमार
ट्रम्प
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
एम्बसी
In reply to ट्रम्प by कॉमी
इस्राएल अभेद्य नाही हे २
In reply to एम्बसी by चंद्रसूर्यकुमार
तेलाचे राजकारण....
क्युबा
ट्रंपचा उथळ व अप्रगल्भ स्वभाव
In reply to क्युबा by चंद्रसूर्यकुमार
तात्यांचा स्वभाव उथळ असला तरी
तात्याना वेळीच आदर्श सरपंच
तात्या गेली वर्षभर आपल्याला
इतर देश काय करणार हे ट्रंप
In reply to तात्या गेली वर्षभर आपल्याला by रात्रीचे चांदणे
शेवटचे वाक्य आवडले...
In reply to इतर देश काय करणार हे ट्रंप by श्रीगुरुजी
तात्याची वक्तव्ये
In reply to इतर देश काय करणार हे ट्रंप by श्रीगुरुजी
मोठ्या लोकांच्या , मोठ्या गोष्टी.......
In reply to तात्याची वक्तव्ये by चंद्रसूर्यकुमार
हे युद्ध थांबविण्यासाठी मोदी
In reply to तात्याची वक्तव्ये by चंद्रसूर्यकुमार
अमेरिकन सैन्य व्यावसायिक
युद्ध परिस्थिती थोडी…
युद्ध परिस्थिती थोडी निवळल्यासारखी दिसतेय. ट्रंपचा ताठा कमी झालाय. इराणनेही होर्मुझ जलमार्ग काही दिवसांसाठी उघडला आहे. नेतनयाहूची युद्धखोर वृत्ती कायम आहे. परंतु ट्रंप व नेतनयाहू एकटे पडलेले दिसताहेत. सर्व युरोपियन देशांनी ट्रंपला सहकार्य देण्यास नकार दिलाय. त्यांच्यावर ट्रंपने आगपाखड करून व धमक्या देऊनही काहीही उपयोग झाला नाही.
लवकरात लवकर सर्व परिस्थिती पूर्वपदावर यावी हीच सदिच्छा.