पाताळयंत्री चर्चा

निनाद's picture
निनाद in काथ्याकूट
3 Mar 2026 - 5:07 am
गाभा: 

पाताळयंत्री या शब्दाचा गर्भित अर्थ आता वेगळ्या रुपात आपल्याला समजतो आहे असे वाटते.

युद्धभूमीवर जेव्हा वरून येणाऱ्या मृत्यूची भीती वाढते, तेव्हा सैन्य नैसर्गिकरित्या जमिनीच्या गर्भात आश्रय शोधू लागते. पाकिस्तानने भुयारी युद्धतंत्र अवलंबले आहे. हा एक अतिशय धूर्त आणि खोलवर विचार केलेला लष्करी डाव आहे. पाकिस्तानने अशा भुयारी मार्गांचे जाळे विणले आहे - असणार. हे जाळे आधुनिक सॅटेलाइट आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या नजरेला सहज चकवा देत असणार. या रणनीतीचा मुख्य आधार म्हणजे अदृश्य राहून वार करणे, रसद पोहोचवणे. हे बोगदे अनेकदा इतके खोल असतात की वरून होणारी साधी बॉम्बफेक त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. ऑप सिंदूरमध्ये जरी आपण काही महत्त्वाची भुयारे उडवली असली तरी अनेक अशी भुयारे अजूनही असणार हे नक्की. भारतीय सैन्याने या 'पाताळयंत्राला' उत्तर देण्यासाठी तितकीच आक्रमक आणि आधुनिक पद्धत अवलंबली. केवळ मानवी डोळ्यांवर अवलंबून न राहता ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार चा वापर केला.

याच पद्धतीने जर इराणच्या भौगोलिक रचनेचा विचार केला तर हे भुयारी युद्ध तंत्र एका वेगळ्याच आणि अधिक भयानक उंचीवर पोहोचलेले दिसते. अमेरिकेने इतके हल्ले करूनही इराण प्रतिहल्ले केले - असे तो कसे करू शकला? सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीत इराणने आपली अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन तंत्रज्ञान केवळ जमिनीवर न ठेवता झॅग्रोस आणि अल्बोर्झ सारख्या अजस्त्र पर्वतरांगांच्या काळजात दडवून ठेवली असणार. इराणने या कठीण पाषाणात शेकडो फूट खाली क्षेपणास्त्र शहरे वसवली असावीत . अशा प्रदेशांतून ही क्षेपणास्त्रे आणि ड्रोन अनपेक्षित ठिकाणी थेट जमिनीच्या खालून बाहेर यतात. त्यांचा उगम शोधणेही कठीण जाते. हे केवळ साधे बोगदे नसून संपूर्ण लष्करी तळ असणार आहेत कदाचित तेथे हजारो सैनिक, रसद आणि इंधन कित्येक महिने सुरक्षित राहू शकते. गाझा मध्ये हे तंत्र केलेले दिसून आले आहे. म्हणजे इराणमधे तर नक्की असणार. इराणच्या मध्यवर्ती पठारी भागात आणि विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या डोंगररांगांमध्ये इराणने गुप्त जागा तयार केल्या असाव्यात.
या अवाढव्य पाताळयंत्राला उत्तर देण्यासाठी अमेरिकेने लष्करी ताकद आणि इस्राएली विज्ञान पणाला लावले जाणार आहे. कदाचित प्रगत अशा ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार चा वापर करून याचा शोध आधीच लावलेला असणार आहे. या भुयारी शहरांचा अंत करण्यासाठी अमेरिकेचे सर्वात मोठे आणि क्रूर शस्त्र म्हणजे GBU हा १५ हजार किलो वजनाचा महाकाय बॉम्ब. एखाद्या खिळ्याप्रमाणे काँक्रीट आणि कठीण पाषाणाचे २०० फूट जाड थर चिरून थेट बोगद्याच्या मध्यभागी जाऊन फुटतो. यामुळे डोंगरच्या डोंगर आतून कोसळतात संपुर्ण भुयारी जग एका क्षणात जिवंत थडगे बनू शकते.

तार्किकदृष्ट्या पाहिले तर हे युद्ध दीर्घकाळ चालण्याचे मुख्य कारण इराणची ही पाताळयंत्री रणनीतीच आहे. इराणच्या या पर्वतांना फोडून आत शिरणे जवळजवळ अशक्य आहे. जोपर्यंत त्यांचा दारुगोळा साठा आणि लष्करी नेतृत्व या भुयारी जगात सुरक्षित आहे, तोपर्यंत इराण शरणागती पत्करणार नाही असे वाटते. यामुळे हे युद्ध केवळ ताकदीचे न राहता कोणाची सहनशक्ती जास्त आहे यावर येऊन थांबते. अर्थात काय घडेल हे काळ ठरवेल.
आणि हे वरील सर्व अंदाज आहेत.
हे युद्ध कसे पुढे जाईल. पाताळयंत्राला उत्तर काय होऊ शकेल यावर चर्चा करण्यासाठी हा धागा काढत आहे.
येथे अनेक खूप ज्ञानी विचारवंत आहेत त्यांनी या युद्धतंत्रावर अजून प्रकाश पाडावा ही विनंती.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

3 Mar 2026 - 7:51 am | विजुभाऊ

भुयारी आश्रय हे रणनीती व्हिएटनाम ने सर्वात अगोदर वापरली. अमेरीका जेरीस आली

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 Mar 2026 - 8:55 am | माईसाहेब कुरसूंदीकर

युद्ध लवकर संपवायचे असेल तर जास्तीत जास्त अमेरिकन सैनिकांना यमसदनास पाठवणे ईराणच्या/जगाच्या हिताचे आहे. कारण अमेरिकन सरकारवर ह्याचा प्रचंड दबाव असतो. व्हियेतनाम युद्धाच्या वेळेस असेच झाले होते. सुरुवातीला म्रुतदेह गुपचुप आणले जायचे. नंतर त्याचा बोभाटा व्हायला लागल्यावर अमेरिकेतच निदर्शने सुरु झाली. कदाचित ईराणही हेच धोरण अवलंबेल.

मदनबाण's picture

3 Mar 2026 - 2:18 pm | मदनबाण

युद्ध हे तंत्रज्ञान्,युद्ध सामुग्री,ह्युमन इंटलिजन्स आणि रणनिती यांचा वापर करुन लढले जाते.
इराण यावेळी थांबलेला होता आणि त्यांनी हल्ल्याची सुरुवात आधी केली नाही.जरी त्यांना माहित होते की आपल्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात युद्धाची तयारी केली जात आहे, तरी युद्ध आम्ही सुरु केले नसुन आमच्यावर केलेल्या हल्ल्याला आम्ही प्रतिउत्तर देत आहोत हा नॅरेटिव्ह सेट होण्यासाठी ते वाट पाहत होते, झाले देखील तसेच.
अमेरिका आणि इजराईल या दोघांकडे असलेले तंत्रज्ञान जरी इराणकडे नसले तरी लढा देण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि बदला घेण्याची मानसिकता इराणकडे आहे आणि आत्ता ते याच मानसिकतेचे प्रर्दशन करत आहेत.
अमेरिकेने आत्ता पर्यंत इराणच्या १० युद्ध नौका समुद्राच्या तळाशी पाठवल्याचे कळते आहे.

पाताळयंत्री:
खामेनी पाताळयंत्रीच झाले होते आणि बहुतेक बंकर बस्टरच्या वापरामुळे ते ढगात गेले.ह्युमन इंटलिजन्संमुळेच हे शक्य झाले. सीआयए आणि मोसाद गेल्या अनेक महिन्यांपासून खामेनींच्या हालचालींवर आणि सुरक्षेच्या पद्धतींवर बारकाईने लक्ष ठेवून होते.२८ फेब्रुवारीच्या सकाळी खामेनी इराणच्या वरिष्ठ राजकीय आणि लष्करी नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरच तातडीने हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांना ठार करण्यात यश मिळाले.

पाताळयंत्री मिसाईल्स:
या पाताळयंत्री मिसाईल्सच्या सिटीज असतात आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या असतात. यातल्या काही अंतर्गतपणे एकत्रीत जोडलेल्या असतात तर काही पूर्णपणे वेगळ्या असतात.अमेरिकेच्या NORAD बद्धल मी कधी काळी मिपावर एका प्रतिसादात उल्लेख केला होता.याचे बांधकाम इंजिनिअरिंगचा एक चमत्कार मानले जाते.
इराणच्या मिसाइल सिटीज ५०० मीटर किंवा त्याहुन खाली असल्याचे कळते आणि आश्या सिटीजची निर्मीती बोगदे करुन आत केलेली असते.पाकिस्तानात असे अनेक बोगदे बांधले आहेत त्यातील एक नमुना खाली देतो.
दुवा: https://tinyurl.com/2vvtrm36

ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण बोगदे उडवले की नाही ते मला ठावूक नाही पण नूरखान एअर बेसवर हल्ला करुन त्यांचे मोठे नुकसान केले होते,काल तालिबान ने इथेच असलेल्या त्यांच्या कमांड आणि कंट्रोल सेंटरवर हल्ला केला आहे.

ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार (GPR),सॅटेलाइट इमेजरी, SAR ( सिंथेटिक अपर्चर रडार ) ,Seismic Sensors ( जमिनीच्या कंपनांवरून खाली काही हालचाल चालली असेल तर कंपनांवरुन माग काढण्यासाठी ) आणि थर्मल इमेजिंगचा वापर बोगदे आणि त्यांचे विणलेले जाळे शोधण्यासाठी केला जातो.तुम्ही सांगितल्या प्रमाणे GBU सिरीज चे बॉंम्ब वापरले जातात ( GBU-57 MOP,GBU-28 आणि BLU-109 )

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Exclusive Scene | The Kerala Story 2 Goes Beyond

इराण कडे सामान्य हत्यारांचा प्रचंड साठा आहे. मागील अनेक दशके इराण सातत्याने त्यांचे निर्माण करत आला आहे. इराणी लोक अत्यंत हुशार आणि मेहनती आहेत. इस्लाम चे जोखड नसते तर हे राष्ट्र आज अत्यंत प्रगत राष्ट्र असते.

इस्राएल चे राष्ट्र सुद्धा एक धर्मांध पद्धतीचे राष्ट्र आहे. खोटे बोलणे, षडयंत्र करणे, ब्लॅकमेल, निष्पाप लोकांची हत्या, येन केन प्रकारें आपले हित साधून घेणे आणि प्रचंड प्रोपागंडा ह्यावर इस्राएल चालतो. बहुतेक गोष्टी ब्लॅकमेल, आर्थिक गुन्हे आणि अमेरिकन लोकांना ठगवणे ह्यांनी हस्तगत केल्या आहेत. एप्सटिन फाईल्स मधून ह्यांची षडयंत्र दिसून येतात. हि मंडळी भयंकर डांबिस आणि गोड बोलून गळा कापणारी आहेत. भारतीयांनी ह्यांना गरजेपुरता मामा म्हणून ठेवायला पाहिजे. जास्त जवळीक नको.

इराण मध्ये ट्राफिक केमेरा हॅक केले, डेंटिस्ट तर्फे विशेष इम्प्लांट दांतात घालून ट्रेक केले इत्यादी बटवण्या इस्राएल करते त्यानं कोबी सरकारच्या IT सेल प्रमाणेच प्रोपागंडा जास्त आहे. एव्हडी कर्तव्यदक्ष सुरक्षा यंत्रणा आहे तर ऑक्टॉबर ७ ला कसे बरे तुम्हाला काहीच ठाऊक नव्हते ? ९/११ चे खापर इराण वर फोडण्याचा प्रयत्न अमेरिकेने केला होता पण तो साध्य नाही झाला.

युद्धांत ध्येय काय आहे आणि ते प्राप्त करण्याची क्षमता आहे कि नाही हे महत्वाचे आहे.

अमेरिकेकडे इराणचे संपूर्ण नेतृत्व संपविण्याची क्षमता आहे. इराणी आर्मी आणि नौदलाला नेस्तनाबूत करण्याची क्षमता आहे. पण त्यांनतर काय ? अमेरिकन सैन्य इराण मध्ये घुसणार का ? घुसले तरी करणार काय ? इस्राएल ने १६० लहान मुलींना ठार केले. त्यांचे आई वडील अमेरिकन सैन्याचे "कैवारी" म्हणून स्वागत करतील काय ? इराण मध्ये अनेक ग्रुप्स आहेत त्यांची भांडणे कशी रोखणार ?

आणि समजा बेस्ट केस सिनॅरिओ. इराण मध्ये सत्ता बदल झाला आणि अमेरिकेशी जवळीक असणारा नेता निर्माण झाला आणि जनता त्याच्या मागे उभी राहील तर काय ? असा स्टेबल आणि समृद्ध इराण हा इस्राएल च्या हिताचा आहे काय ? कारण समृद्ध इराण आणि इतर मुस्लिम राष्ट्रे ह्यांनी आपले वैर मिटविल्यास इस्राएल ला धोका जास्त आहे. हा धोका अतिरेकी हल्ले किंवा थेट युद्धाचा नसला तरी इस्रायलची आर्थिक कोंडी हि राष्ट्रे मिळून करू शकतात. त्यामुळे इस्राएल तरी इराण मध्ये यादवी माजविण्याचा प्रयत्न करेल असे वाटते. खोमेनी नंतर, मिळेल त्या नेत्याला ठार मारणे हा त्याचाच भाग आहे. कुठलाच राष्ट्रीय स्तराचा क्रेडिबल नेता नसेल तर यादवी होण्याची शक्यता बळावते.

मदनबाण's picture

4 Mar 2026 - 1:10 pm | मदनबाण

@साहना
तुमचा प्रतिसाद आवडला आणि इजरायलच्या बाबतीत असलेला तुमचा दृष्टीकोन योग्य आहे.
अमेरिकेला ज्यू लॉबी नियंत्रित करते हे आता सर्वश्रुत आहे आणि अमेरिकेत देखील अमेरिकन नागरिक त्यांच्या विरोधात काही काळा पासुन बोलत आहेत आणि आता या युद्धामुळे हा विरोध अधिक प्रखर झालेला दिसतोय. ९/११ चे म्हणाल तर त्या घटनेच्या वेळी डान्सिंग ज्यू प्रकरण वर आले होते जे ९/११ प्रमाणेच दाबले गेले.
अमेरिका त्यांच्या बलाढ्य साम्राज्याचे शेवटचे दिवस पाहत असुन अनेक अमेरिकन अमेरिकेतुनच बाहेर पडत असल्याचे समजत आहे,इजराइल देखील त्यांचा अमेरिकाचा उरला सुरला वापर करुन हिंदुस्थानाकडे वळत असल्याचे दिसते.टकर कार्लसन ने आत्ताच यावर भाष्य केलेले पाहण्यात आलेले आहे.अमेरिकेतल्या एका निवृत्त कर्नलच्या खुलाश्या नुसार अमेरिकेचे अनेक बेस नष्ट झाले आहेत, बंदरांवरील सेटअप नष्ट झाला आहे.याचा फॉलबॅक म्हणुन हिंदुस्थानी पोर्टस लेस दॅन आयडियल दॅट्स व्हॉट द नेव्ही सेज हे त्यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.आपण इजराइला कंट्रोल करत नसुन इजराइल आपल्याला कंट्रोल करते आहे हे देखील याच कर्नल ने सांगितले आहे. मागे मिपावर मी एका प्रतिसादात Interstellar दिसणार्‍या ड्रोनवर इंडिया दिसत आहे याचा उल्लेख केला होता, माझ्या आत्ताच्या विश्लेषणा नुसार आपल्याकडे इजारयली अलायन्समुळे येत्या काळात आपले डिफेन्स सेक्टर बूम करणार आहे. इजरायलच्या एका व्यक्तीच्या मुलाखतीत आमच्यासाठी काम करायला भारताची लोकसंख्या आहे हे वक्तव्य देखील तितकेच चर्चेत आले होते.
बादवे... आपल्या वेस्टर्न कमांडला फेब्रुवारी मध्ये युएस अ‍ॅंबॅसिडर Sergio Gor यांनी भेट दिली होती तेव्हा ही अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या!
संदर्भः US ambassador Sergio Gor visits Indian Army's Western Command HQ with Indo-Pacific commander
थोडक्यात आपल्याकडे इजरायली नियंत्रण पूर्णपणे मान्य केले जाईल का? हे येणारा काळच सांगेल.

इराण अपडेटः
इराण जवळपास गेली २० वर्ष आत्ता जी स्थिती उद्भवली आहे त्यासाठी तयारी करत होता. मोठ्या प्रमाणात त्यांनी विवध रेंजच्या मिसाईल्स आणि ड्रोन्सचा साठा करुन ठेवला होता जो आता त्यांनी वापरात आणलेला दिसतो.सीआयए आणि मोसाद यांनी मिळुन आधी इराणाचे चलन पाडले जेणे करुन जनतेमध्ये प्रक्षोभ निर्माण होईल व असलेल्या सरकार विरोधात आक्रोश निर्माण होईल,झाले देखील पण प्रमुख नेत्रुत्व पहिल्यांदा ठार केल्याने जनता इराणच्या झेंड्याखाली एकवटली ज्याचा विचार केला गेला नव्हता. जरी कुठलेही नेत्रुत्व नसले तरी छोट्या छोट्या समुहातुन हल्ले केले जावेत याची देखील इराण मध्ये तयारी केली गेली होते ज्याचे परिणाम आपल्या समोर आहेत. इराणच्या इंटलिजन्स ने कोण कुठल्या बिल्डिंग मध्ये आहे हे व्यवस्थित हेरुन युएइ मध्ये हल्ले केले असे सध्या तरी समजत आहे.
इराण ने अमेरिकेला सगळ्यात मोठा दणका कतार मध्ये दिला असुन अमेरिकेचे तिथे असलेले साधारण १ ते २ बिलियनचे बॅलॅस्टिक मिसाइल अर्ली वॉर्निग रडार नष्ट करुन निगराणी करणारे महत्वाचे डोळेच फोडुन टाकले आहेत.
इलेक्ट्रॉनिक जॅमिंग आणि स्फुपिंग देखील पाहण्यात आले होते,चायनीज जाहजे जीपीस जॅमिंग फेस करत होती मग त्यांनी स्वतःला बीडीस (
BeiDou Navigation Satellite System ) वर स्वीच केले, तसेच चायना इराणला हाय रेसोल्युशन सॅटेलाईट डिटेल्स पुरवत असल्याचे दिसत आहे व ते ऑनलाईन इमेज सुद्धा रिलीज करत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी देखील चीन पाकिस्तानला लाईव्ह फीड डिटेल्स देत होता.इतके होऊन देखील कोबींच्या चीन धोरणात शष्प फरक पडलेला दिसला नाही. इराणने इजरायलचे Hermes 900 drone सिग्नल जॅम करुन पाडल्याचे देखील समजते आहे.

जाता जाता: लईच बेक्कार रिसेशन येणार आहे आणि आपल्या इथे तेलाच्या किंमती किती काळ सरकार नियंत्रित करु शकेल याची मला आता शंका वाटत आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Arash - Boro Boro | Nippandab Remix | FAST & FURIOUS [Dubai Scene]

ह्या विषयावर मी अवकाशाने लिहीन.

पण पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेने इस्राएल च्या चिथावणीवरून, रशियाच्या युक्रेन मूर्खपणाप्रमाणेच तोंडा पेक्षा मोठा घास घेतला आहे असे किमान सध्याचे रिपोर्ट्स दर्शवतात.

१. अमेरिकेने आपल्या दूतावासातून लोकांना बाहेर काढले नव्हते तसेच अमेरिकन नागरिकांना भागांतून बाहेर काढण्याची सोय केली नव्हती ह्यावरून इराण प्रतिहल्ला करेल अशी त्यांची अजिबात अपेक्षा नव्हती असे वाटते.

२. ट्रम्प साहेबानी इटली मार्फत इराणला शस्त्रसंधीची मागणी केली होती (खोमेनी ची हत्या केल्या नंतर) पण इराणी नेतृत्वाने ती नाकारली. [१]

३. इराण हल्ला करेल म्हणून आम्ही आधीच केला हे सर्वार्थाने बंडल आहे कारण इराणी हल्ला अपेक्षित होता तर सर्वप्रथम आपल्या नागरिकांची आणि सैनिकांची सुरक्षा पाहणे गरजेचे होते.

४. जे अमेरिकन सैनिक ह्या हल्ल्यांत मारले गेले त्या बेस वर सुरक्षेची यंत्रणा ठीक नव्हती असे दिसून येते. ह्यावरून ह्या ऑपरेशन चे प्लॅनिंग किती गंडलेले आहे हे समजते.

५. इराण ने किमान एक महत्वाचे रडार उडवले आहे. बिलियन डॉलर्स चे एक रडार पूर्णतः असुरक्षित होते.

६. ट्रम्प कधीही जास्त काळ चालणाऱ्या युद्धांत भाग घेणार नाही येथवरून सध्या चर्चा आम्ही कितीही काळ युद्ध करू शकतो ह्या विषयावर पोचली आहे ह्यावरून हे युद्ध आता हाताबाहेर जाईल असे वाटते.

७. खोमेनी हे आण्विक अस्त्रांचे विरोधक होते. त्यांच्या विरोधांत त्यांनी फतवे लिहिले होते. आणि इराण च्या सैन्य नेतृत्वा प्रमाणे खोमेनी हे आण्विक कार्यक्रमाचे तेरा वाजवण्याचे प्रमुख कारण होते. खोमेनी ह्यांना ठार मारून आण्विक प्रोग्रॅम बंद होईल हे उलटे तर्कशास्त्र आहे.

८. स्टिफन मिलर हा यहुदी श्वेतभवनातून सूत्रें हलवत आहे. निशस्त्र असलेली आणि युद्धांत भाग न घेणारी इराणी नाव अमेरिकेने भारतीय महासागरांत बुडवली आणि जिनिव्हा कराराच्या विरोधांत वाचलेल्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. ह्यवर सदर मिलर साहेबानी काय व्यक्तव्य दिले ते पहा : https://x.com/atrupar/status/2029382027695268217?s=20

युद्ध सुरु करणे सोपे, पण बंद करणे आपल्या हातांत नाही. ह्या युद्धाने ट्रम्प साहेबांची पाचावर धारण बसणार आहे.

[१] - https://www.ynetnews.com/opinions-analysis/article/hylyslbfzx

मदनबाण's picture

5 Mar 2026 - 1:45 pm | मदनबाण

ओक्के.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)

मदनबाण's picture

3 Mar 2026 - 10:56 pm | मदनबाण

आज दुपारी एएनआय पचकले आणि म्हणाले की आपल्याकडे २५ दिवसाचा क्रूड आणि रिफांइण्ड ऑइलचा स्टॉक आहे! [ काय गरज होती जगाला ओरडुन सांगण्याची? ] तरी नशिब यात एसपीआर [ स्पेशल पेट्रोलिअम रिझर्व ] गृहित धरलेले नाही. ५० दिवसाच्या स्टॉकला जरासा ठीक-ठाक म्हणता येईल,जो बहुतेक हे दोन्ही मिळुन आपल्याकडे असावा.सध्या रशियाकडुन बहुतेक १.४ मिलियन बॅरल्स पर डे ने आपल्याकडे तेल येत आहे.कोबी जी ही आयात आता अधिक वाढवण्यासाठी तात्यांकडुन परमिशन मागतील का?
आत्ताच्या घडीला ब्रेंट क्रूड प्राईज ८३.८६ आहे.
इराणचे ९०% ऑइल चीनला जाते [ चीन चा इराण बरोबर ४०० बिलियन डॉलरचा २५ वर्षांसाठी केलेला करार आहे. ] आणि व्हेनाझुएलाचे ७०% ऑइल चीन ला जात होते. दोन्हीकडे आता ट्रम्प तात्यांनी पाचर मारुन ठेवली आहे.ऑइल टॅकरसाठी इनश्युरन्स असतो व हा इनश्युरन्स देणार्‍या कंपन्यांनी तो मागे घेतलेला दिसतो याचा परिणाम अर्थातच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणार्‍या जाहजांनाच आहे,जहाजे इनश्युरन्स नसल्यास तिकडे जाणार नाही मग तेल वाहतुक होणार नाही.
तिकडे कतार गॅस ने गॅस उत्पादन बंद केले आहे, जगातील २०% एलएनजी सप्लाय हा कतार कडुन येतो.त्यामुळे युरोपीची बुच्चण लागली आहे व त्यांच्यासाठी गॅसच्या किंमत ३७% नी वाढली आहे. यात भर म्हणुन इराकने जगातली दुसरी सगळ्यात मोठी ऑइल फिल्ड बंद केली आहे.
थोडक्यात जगातल्या सगळ्या स्टॉक मार्केटचा बाजार उठणार ! :)))

जाता जाता: इराण मध्ये सुप्रिम लिडर निवडायची एक समिती असते त्यातील ८८ लोकांना एकाच वेळी इजरायल ने ढगात पाठवले आहे.वरती ७२ हुरांची फार बिकट अवस्था होणार आहे, किती गर्दी! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Exclusive Scene | The Kerala Story 2 Goes Beyond

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Mar 2026 - 10:33 am | माईसाहेब कुरसूंदीकर

"काय गरज होती जगाला ओरडुन सांगण्याची?"
नाहीतर कळले नसते का जगाला? पिगॅससच्या मदतीने मोदी/शहा/राजनाथ कोणाकडे बोलतात हे बेंजामिनला माहित नसणार?

माई काय बोलावे? सगळी नुसती जुमलेबाजी आणि नौटंकी.मनमोहन बोलत नव्हते आणि कोबी इतके बडबड करत आहेत की आता त्याचे अजिर्ण झाले आहे.
इजरायली पदक गळ्यात घालुन घेतले की पट्टा? ते कळेल पुढे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Arash - Boro Boro | Nippandab Remix | FAST & FURIOUS [Dubai Scene]

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Mar 2026 - 5:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आमची आपली साधी मागणी- ईराण, ज्या देशाबरोबर आपले चान्गले संबंध होते, त्या देशाचा प्रमुख आणि त्याच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली त्यावर थोडे दु:ख व्यक्त करायला काय हरकत होती?
१९८४ साली इंदिरा गांधींची हत्या झाली. तेव्हा ह्याच ईराणने त्यांच्या नागरिकांना तीन दिवस दुखवटा पाळण्याचे आवाहन केले होते.नेत्यान्याहु आणी ट्रम्प हे बदनाम टपोरी नेते आहेत हे सगळ्या जगाला माहित झाले आता.

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Mar 2026 - 5:08 pm | अमरेंद्र बाहुबली

माई एफस्टीन फाईल मधे नाव आहे विश्वगुंचे! समजून घे!

पाषाणभेद's picture

5 Mar 2026 - 12:16 pm | पाषाणभेद

वैयक्तिक (किंवा राजकीय पक्षाच्या) स्वार्थापेक्षा देशहित कधीही श्रेष्ठ असावे. नेमके त्यात भारत सरकार (मोदी सरकार, देवाभाऊचे सरकार असली फडतूस व्याख्या जाणीवपुर्वक रुजवली गेली आहे.) मागे पडले आहे. जो देश आपल्याला इंधन देत होता त्याच्या नेत्याबद्दल काहीतरी सकारात्मक संदेश जायला हवा होता. इस्त्रायल, तसेच या युद्धाबाबत तटस्थ भुमिका बाळगणे आवश्यक असतांना इस्त्रायलसोबत खॅ खॅ खॅ केल्याने एक वेगळाच संदेश जगात गेला आहे.
परदेशनिती सपशेल फोल ठरली आहे.
येत्या काळात भारताची यापेक्षाही अधीक अधोगती अपेक्षित आहे.

पाषाणभेद's picture

5 Mar 2026 - 12:16 pm | पाषाणभेद

वैयक्तिक (किंवा राजकीय पक्षाच्या) स्वार्थापेक्षा देशहित कधीही श्रेष्ठ असावे. नेमके त्यात भारत सरकार (मोदी सरकार, देवाभाऊचे सरकार असली फडतूस व्याख्या जाणीवपुर्वक रुजवली गेली आहे.) मागे पडले आहे. जो देश आपल्याला इंधन देत होता त्याच्या नेत्याबद्दल काहीतरी सकारात्मक संदेश जायला हवा होता. इस्त्रायल, तसेच या युद्धाबाबत तटस्थ भुमिका बाळगणे आवश्यक असतांना इस्त्रायलसोबत खॅ खॅ खॅ केल्याने एक वेगळाच संदेश जगात गेला आहे.
परदेशनिती सपशेल फोल ठरली आहे.
येत्या काळात भारताची यापेक्षाही अधीक अधोगती अपेक्षित आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Mar 2026 - 12:20 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
परदेशनीती ह्याना इडी, चुना आयोगाच्या जीवावर सत्ता मिळवावी इतकी सोपी वाटत असावी!

भारतीयांचे दुर्दैव आणखीन काही नाही !

मदनबाण's picture

5 Mar 2026 - 1:45 pm | मदनबाण

काल अमेरिकेच्या पाणबुडीने इराणची युद्ध नौका IRIS Dena श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर बुडवली. असे म्हंटले जात आहे की दुसर्‍या महायुद्धा नंतर अमेरिकेने पहिल्यांदाच टॉर्पेडोचा वापर करून ही युद्धनौका बुडवली. [ मला यावर अधिक पडताळणी करणे शक्य झालेले नाही. ]
या घटनेमुळे हिंदुस्थानी राजकारणात बडीच खळबळ उडालेली दिसते आहे,या शिवाय सोशल मिडियावर देखील या विषयावर मोठ्या प्रमाणात परस्पर विरोधी मते मोठ्या प्रमाणात दिसलेली असुन मला संरक्षणा दलातील / नेव्हीतील लोकांचीही परस्पर विरोधी मते दिसलेली आहेत.
१] ही बुडवलेली नौका आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात घडली आहे हे सत्य आहे.
२] आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात घडल्यामुळे आपण अर्थातच यावर काही करु शकत नाही.
३] ही युद्धनौका भारतात झालेल्या एका बहुराष्ट्रीय सरावात सहभागी झाली होती आणि परत इराणकडे निघाली होती.
४} बहुराष्ट्रीय सरावात सहभागी असलेल्या या युद्ध नौका शस्त्रास्त्रांनी सज्ज होती का? किंवा अश्या अश्या सरावात किती शस्त्रास्त्रांचा सराव केला जातो? सरावात सहभागी होणार्‍या युद्धपोतांसाठी काही नियम आहेत का? या बद्धल मला काही विशेष माहित नाही.
५] सराव संपल्यावर ती परत चालली होती व त्याच मार्गात असताना तिला बुडवली,आपण हा सराव आयोजित केला होता तेव्हा आयोजक म्हणुन आपल्यावर आता जी टीका केली जात आहे त्याकडे नक्की कसे पाहिले पाहिजे? याचे काही संकेत असतात का?
६] सराव संपल्यावर युद्ध सुरु झाले व ती बुडवली गेली.
७] हा सराव नक्की काय आहे आणि यात कोण कोण सहभागी आहेत याची अमेरिकेला पूर्ण माहिती होती आणि अमेरिकेला देखील याचे आमंत्रण दिले गेले होते, पण बहुतेक आयत्यावेळी त्यांनी या सरावात भाग घेण्यास नकार दिला / माघार घेतली असे म्हंटले जात आहे. [ ते युद्ध करणार होते त्यामुळे ते अर्थातच यात कसे घेतील. ] त्यांच्यासाठी हे आयतं भक्ष होते व ते ही संधी कशी सोडतील?
८] राजकिय दृष्ट्या पाहिल्यास याचे काही परिणाम संभवतात का?
-
या घटनेत अंदाजे ३२ जणांना वाचवण्यात यश आले असून ८७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. इति: श्रीलंकन नौदल.
-
आत्ता पर्यंत अमेरिकेने इराणची १७ जहाजे आणि एक महत्त्वाची पाणबुडी सागरतळाशी पाठवली आहे.
या घटनेमुळे इराण चवताळला असुन इराणने आता "रमजान युद्ध" असे नाव देऊन प्रत्युत्तराची तयारी सुरू केली आहे. [जगभरातील मुसलमांनाच्या भावनेस त्यांनी या प्रकारे हात घातला आहे.]
या सगळ्या युद्ध स्थितीमुळे कंटेनर मुव्हमेंट थंडावली आहे. याचा परिणाम केमिकल्,अन्नधान्य, खत पुरवठा इं आणि अनेक गोष्टीणवर झाला आहे. तेल अवीव आणि जेरु सलेमवर इराणने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत अश्या बातम्या आहेत.
मस्क मामांनी एक्सचा अल्गोरीदम बदलुन इजराइल विरोधी बातम्यांवर नियंत्रण आणल्याची चर्चा देखील रंगली असुन युएइ ने देखील तिथल्या परिस्थीचे व्हिडियो बाहेर जाऊ नयेत व तसे केल्यास तुरुंगवासाची योजना केल्याचे समजत आहे.
आत्ता पुरते इतकेच... वेळ मिळाल्यास भर टाकण्यास परत येइन. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)

अत्यंत दुःखद घटना आहे. माजी भारतीय नौसेनाअध्यक्षांनी ह्यावर टीका केली आहे.

१. जहाज सरावासाठी आले होती. अशी जहाजे सुस्सज नसतात. ह्यावर खलाशी बहुतेक करून एक तर नवीन किंवा ट्रेनिंग संबंधित असतात. त्याशिवाय मार्चिंग बँड इत्यादी लोक सुद्धा असतात. हि मंडळी युद्ध साठी तयार नव्हती.

२. खलाशांनी भारतांत मार्चिंग केले होते आणि आपल्या परिवारासाठी भेटवस्तू वगैरे घेऊन ते परत चालले होते.

३. जहाज निशस्त्र होते कारण सर्व शस्त्रे लोकरूम मध्ये होती.

४. अमेरिकेने इराण विरुद्ध युद्ध घोषणा केली नाही त्यामुळे ह्या जहाजाला हल्ल्याची अजिबात अपेक्षा नव्हती.

५. अमेरिकन पाणबुडी अत्याधुनिक होती आणि तिच्याशी पंगा घेण्याची काहीही क्षमता त्यांत नव्हती.

६. जहाज बुडाल्यानंतर पाणबुडीने खलाशांना वाचविण्याचा काहीही प्रयत्न केला नाही. जिनिव्हा करार प्रमाणे हे आवश्यक होते असे कायदे तज्ञ् म्हणतात.

७. जहाज फक्त भारतांत सरावा साठी आले होते आणि म्हणूनच हे खलाशी ठार झाले आहेत. तुम्ही कुणाला घरी सत्यनारायणाच्या पूजेला बोलावे आणि तो निघायला बाहेर पडताच कुणी तरी त्याच्यावर गोळी मारावी असा प्रकार आहे.

८. आंतरराष्ट्रीय जलरेखा असली तरी भारताच्या इतक्या जवळ आण्विक पाणबुडी असावी आणि भरती नौसेनेला त्याचा थांगपत्ता लागू नये हि गोष्ट चांगली नाही आणि ठाऊक असून आम्ही त्या जहाजाला यमसदनाला पाठवले तर कदाचित ह्यांत भारतीयांचे हात सुद्धा रंगले आहेत असे वाटते.

कोबीजीना अमेरिकन नेते अत्यंत नीच वागणूक देत आहेत हे नक्की. ह्याचे परिणाम विलेक्शन मध्ये होतील कि नाही हे ठाऊक नाही.

ह्याचे परिणाम विलेक्शन मध्ये होतील कि नाही हे ठाऊक नाही.

भारतीय जनतेला स्वमत नाही. केवळ दिखाव्याला ती भुलते. चांगले वाईट काय हे ठरवणयाचा अधिकार त्यांनी नेत्यांना उधार दिला आहे. भारतीयांकडून कसलीही अपेक्षा नाही.

कुठलाही प्रतिकूल परिणाम होणार नाही!

मदनबाण's picture

6 Mar 2026 - 4:08 pm | मदनबाण

घटनाक्रम:

१] इराणी नौदलाची IRIS Dena भारतीय महासागरातील आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात,श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळील गॅले पासून अंदाजे ४० नॉटिकल मैल (सुमारे ७४ किमी) अंतरावर अमेरिकन नौदलाच्या पाणबुडीने टॉरपीडो मारून बुडवली गेली.
२] हल्ल्यानंतर लगेचच IRIS Dena ने डिस्ट्रेस कॉल पाठवला. (सकाळी सुमारे ५:०८ ते ५:३० वाजता, स्फोटाची माहिती देऊन).
हा कॉल मुख्यतः कोलंबो, श्रीलंका येथील Maritime Rescue Coordination Centre (MRCC) ला मिळाला,कारण ही घटना श्रीलंकेच्या Search and Rescue (SAR) क्षेत्रात घडली.
३] भारतीय नौदलाला ही माहिती श्रीलंकन अधिकाऱ्यांमार्फत मिळाली आणि त्यांनी त्वरित शोध आणि बचाव कार्यवाही सुरू केली.

भारतीय नौदलाच्या प्रमुख कृती:
१] ४ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता लॉंग-रेंज मरिटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट तैनात केले.दुसऱ्या एअरक्राफ्टला एअर-ड्रॉपेबल लाइफ राफ्ट्स सोबत स्टँडबाय ठेवले.
२ ] जवळपास असलेल्या INS Tarangini ला वळवले ( ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत पोहोचले ).
३] INS Ikshak कोचीहून निघाले, जेणेकरून हरवलेल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात मदत होईल.
४] भारतीय नौदल आणि श्रीलंकन अधिकाऱ्यांमध्ये मानवतावादी सहकार्य सुरू राहिले.
५] श्रीलंकन नौदल प्राथमिक/प्रथम प्रतिसादकर्ता होता,पण भारताने क्षेत्रीय जवळीक आणि आंतरराष्ट्रीय समुद्री जबाबदाऱ्यांमुळे या प्रयत्नांना मदत केली.
अत्यंत महत्वाचा भागः
१] IRIS Dena ला गॅले बंदराबाहेर ११ तास प्रतीक्षा करावी लागली.
२] परदेशी युद्धनौकेला बंदरात प्रवेश देण्यासाठी विशिष्ट औपचारिक प्रक्रिया आणि सुरक्षा प्रोटोकॉल पूर्ण करणे आवश्यक असते.हे प्रोटोकॉल तपासण्यात अधिकाऱ्यांचा वेळ गेला असे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या संसदेत सांगितले.
३] आंतरराष्ट्रीय सागरी नियमांनुसार अडचणीत असलेल्या जहाजाला मदत करणे बंधनकारक असतानाही,केवळ राजनैतिक दबावापोटी सरकारने ११ तास विलंब केला ज्यामुळे ही नौका हल्ल्याला बळी पडली असा आरोप श्रीलंकेतील विरोधी पक्षांनी केला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Major Lazer & DJ Snake Lean On feat MØ Official Music Video

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Mar 2026 - 5:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात घडल्यामुळे आपण अर्थातच यावर काही करु शकत नाही." मदनबाण

भारताने अटलांटिक/पॅसिफिक महासागरात अमेरिकेच्या हद्दीपासुन ४०० कि.मी. समजा अशीच एखादे जहाज बुडवले तर अमेरिका गप्प बसेल असे वाटते? भारताला विश्वासात घेउन किंवा फाट्यावर मारुन अमेरिकेने ही कारवाई केली आहे.

माई आपण अमेरिका नाही आहोत ना!

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Mar 2026 - 5:07 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

भारताने काहीच प्रतिक्रिया देउ नये हे खूप लाजिरवाणे आहे. एवढा भित्रा-डरपोक भारत कधीच अनुभवला नव्हता. आता समर्थन करायला समर्थक "ते जहाज भारताच्या हद्दीत नव्हते" असे म्हणुन मखलाशी करतील. पण लाज जायची ती गेली आहे. एप्स्टिन फाईल्समध्ये काहीतरी चांगलेच गूढ आहे जे मोदी/सरकारला अडचणीत आणणारे असावे असा संशय आहे. ईस्रायलशी मैत्री करा पण जे तुमच्या आजुबाजुला घडते आहे त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही?आणि आपण विश्वगुरु? आपण दक्षिण-आशिया गुरूही नाही हे आता उघड झाले.

मदनबाण's picture

5 Mar 2026 - 5:23 pm | मदनबाण

सध्या जगात जी विचित्र परिस्थिती आहे त्यावर माझ्या टकुर्‍याला जितके चालवता आले त्यावरुन खालील विचार मांडत आहे.
१] अमेरिका कर्जात आकंठ बुडालेली महासत्ता असली तरी ती पूर्णपणे लयास जाण्यास अजुन एक दशक लागेल.
२] आपल्यासाठी अमेरिकेचे आपल्याला असलेले उपद्रवी मूल्य अधिक आहे, मग त्यांचे पाकिस्तान मधले बेस असोत किंवा बांग्लादेश मध्ये चालले उध्योग.
३] चीन आता आपल्या बॉर्डवर येतो व अमेरिका हे अजुन तरी असे काही करत नाही. आपला आणि अमेरिकेचा चीन कॉमन एनिमी आहे.
४] चीन कडुन हळु हळु का होईना आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे येत आहे. आपल्याकडे आता जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे व यात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यांच्या भविष्याचा आणि रोजगाराचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे येणे गरजेचे आहे.
५] अमेरिका आणि इजराइल दोघेही तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्यापुढे आहेत,चीन त्या बरोबरीस येण्याचा प्रयत्न करत आहे. आपण सर्व्हीस इंडस्ट्री बनुन इतका काळ तगलो पण एआयच्या येण्याने सगळयाच गोष्टी बदलणार आहे.
६] अमेरिका आणि आखाती देश दोन्हीकडे स्थिरावरली मोठी भारतीय लोकसंख्या आहे. सध्य परिस्थीतीमुळे दोन्ही बाजुकडील लोक त्यांच्या भविष्याच्या चिंतेत आहे.
७] आत्ताचा काळ असा आहे की आपण तटस्थ राहु शकत नाही, तसे राहण्याचा प्रयन केल्यास कोणताही विशेष लाभ नाही. तेव्हा आपले राष्ट्रहित प्रथम डोळ्या समोर ठेवुन महत्वाची उद्देश कुठले असावीत व कोणत्या क्रमाने ती साध्य करावीत यावर अत्यंत गांभीर्याने विचार करायला हवा आणि त्याच दिशेने पाउले उचलली पाहिजेत. असे न केल्यास देशात यादवी माजेल इतके मात्र नक्की.
८] इजरायली कितीही पाताळयंत्री असले तरी एक गोष्ट त्यांच्याकडुन घेण्यासारखी आहे, ती म्हणजे त्यांच्या शत्रु पाताळात जरी जाऊन लपला असला तरी ते तिथे जाऊन त्याला ठार करतात, या उलट आपल्या इथे रोज हिंदू मुली फाकवल्या जातात आणि त्यांचे तुकडे तुकडे केले जातात तरी हिंदूंना फरक पडत नाहीये. दोघांच्या विनाशावर असलेला शत्रु समान आहे. आपल्या तर तो घरात आहे आणि इजारइलसाठी तो शेजारी आहे.
९] पाकिस्तान बेचिराख करायचा असेल तर इजराइल आणि अमेरिका आपल्या बाजुने असण्याचे गरजेचे आहे आणि या दोन्ही देशांना देखील आजच्या काळात आपली तितकीच गरज आहे. आखाती देश काही आपली बाजु घेणार नाहीत आणि चीन आपल्या दरवाज्यावर उभा असलेला आणि पाकिस्तानचा मित्र देश आहे.
१०} डिफेन्स सेक्टर मजबुत केल्या शिवाय आपण महासत्ता बनु शकणार नाही, किमान त्यामार्गावर चालायचे जरी असेल तरी डिफेन्स सेक्टर बलाढ्य असणे हा की- फॅक्टर आहे.
११] जसे अमेरिकेच्या स्वत:च्या समस्या आहेत तश्या चीनच्या देखील अंतर्गत समस्या आहेत. आपली स्थिती देखील काही वेगळी नाही. इच्छाशक्ती दाखवली तर ती अधिक चांगली नक्कीच कराता येऊ शकते.
१२} ज्या प्रमाणे कोव्हीड ने आपले जग बदलले त्याच प्रमाणे हे युद्ध देखील जगातील सर्व परिस्थीती पूर्णपणे बदलुन टाकणार आहे.
१४ ] रशिया आपल्याला तेल आणि शस्त्रे देत असला तरी तो आता त्याच्या स्वतःच्या युद्धात आहे, व्यापारा पलिकडे काही विशेष मदत तो यापुढे करु शकेल का? या बाबतीत शंका आहे.
१८] वेस्टचा अस्त आणि इस्टचा उदय. चीन आपल्याला मोठे होऊ देणार नाही आणि अमेरिका आपण दुसरा चीन होणार नाही यासाठी पुरेशी काळजी घेइल.
१९] कोबी हे केवळ प्रतीमे पुरतेच मोठे आहेत व मिडियाचे दमन करुन आणि फार मोठा पैसा पीआरवर खर्च करुन ते आपल्या खुर्चीला चिकटुन आहेत.व्यक्ती म्हणुन ते निर्बुद्ध आहेत. माजपा मधील लोकांना हे आता समजले पाहिजे हा आत्ममग्न व्यक्ती आता राष्ट्राला आणि पक्षाला डोइजड झाला आहे आणि अधिक काळ हा व्यक्ती पदावर राहिल्यास सत्ता हातातुन जाईल.मग वयाचे,तब्येतीचे कोणतेही कारण दाखवुन त्यांची पालखी उचलली गेली पाहिजे आणि त्यांच्या काळात राबवली जाणारी अयोग्य धोरणे बदलली पाहिजेत.
२०] एकंदर सरासार विचार केल्यास आपण इजराइल आणि अमेरिकेच्या बाजुने वळवणे अधिक फायद्याचे आहे असे निदान मला आत्ताच्या घडीला वाटते.
२१] कोणाचे मांडलिक होण्या पेक्षा भागिदार होणे अधिक चांगले.

या निमित्त्याने का होईना जरा वेगळा विचार करुन पाहिला. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

5 Mar 2026 - 5:44 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरेचसे मुद्दे मान्य पण भारत मोक्याच्या वेळेस स्वाभिमान गुंडाळुन का ठेवतो? हा प्रश्न आहे.ईस्रायलशी मैत्री करू नका असे कोणीच म्हणत नाही. नेहरुंच्या काळापासुन भारताने आय.आय.टी/आय आय एम साठी अमेरिकेची मदत घेतलेली होती.इंदिरा/राजीव/मनमोहन्/नरसिंह राव ह्यांच्या काळातही भारत-अमेरिका संबंध होतेच की? संगणक आयात करणे असो वा लढाउ विमान खरेदी असो.. ही मनमोहन काळातली बातमी-२०११
India to buy C-17 transport aircraft from US in biggest-ever defence deal
https://www.ndtv.com/india-news/india-to-buy-c-17-transport-aircraft-fro...
पण स्वाभिमान गुंडाळुन नाही ठेवला. भारत अमेरिकेमागे कधी फरफटत गेला आहे असे वाटले नाही.

कॉमी's picture

6 Mar 2026 - 12:27 am | कॉमी

तुमचे मुद्दे अमान्य आहेत असे नाही पण स्वाभिमान स्वाभिमान करू नका राव. स्वाभिमानाचे काय लोणचे घालायचे आहे का ? वाटल्यास जी काही इमेज होतीय त्यामुळे थेट स्ट्रॅटेजिक इंटरेस्टला कुठे धक्का लागतो ते लिहा.

मदनबाण's picture

6 Mar 2026 - 1:32 pm | मदनबाण

१८] वेस्टचा अस्त आणि इस्टचा उदय. चीन आपल्याला मोठे होऊ देणार नाही आणि अमेरिका आपण दुसरा चीन होणार नाही यासाठी पुरेशी काळजी घेइल.
-
"India should understand that we're not going to make the same mistakes with India that we made with China 20 years ago in terms of saying, oh, we're going to let you be able to develop all these markets, and then the next thing we know, you're beating us in a lot of commercial things," he said.
इति: US Deputy Secretary of State Christopher Landau
लोकेशनः Raisina Dialogue in New Delhi
जे मी काल लिहले, तेच त्यांनी आपल्या देशाच्या राजधानीत सांगितले. अगदी अवघ्या २४ तासात पडताळणी झाली!
मास्टर स्ट्रोक नाही का?
संदर्भः Won't make China-like mistakes: US official says 'America First' in India trade deal
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Major Lazer & DJ Snake Lean On feat MØ Official Music Video

भारतीय दाळीद्र्य आणि दुर्बलता ह्यांचे कारण अमेरिका आणि चीन नाहीत तर भारत आणि भारतीयच आहेत. ह्यातून बाहेर यायचे असेल तर त्यासाठी अमेरिका काय करणार आणि चीन काय करणार हे मुद्दे गौण आहेत कारण फक्त भारतीयच देशाला ह्यातून बाहेर काढू शकतात आणि त्या बाबतीत चीन आणि अमेरिका दोन्ही जास्त काही करू शकत नाहीत. त्यांचे मत काहीही असो.

गामा पैलवान's picture

6 Mar 2026 - 1:41 pm | गामा पैलवान

मदनबाण,


जे मी काल लिहले, तेच त्यांनी आपल्या देशाच्या राजधानीत सांगितले. अगदी अवघ्या २४ तासात पडताळणी झाली!

उपरोक्त विधान तुमच्या टकुऱ्यातल्या इथल्या विचारासंबंधी केलंय का? असल्यास कलम क्रमांकासह थोडं सविस्तर सांगावे.

आ.न.,
-गा.पै.

मदनबाण's picture

6 Mar 2026 - 2:21 pm | मदनबाण

गामा सेठ.
कलम क्रमांक १८ दिलाय. त्याचाच संदर्भ दिला.
चीप लेबरसाठी आणि त्यामुळे होणार्‍या कॉर्पोरेट प्रॉफिटसाठी मॅन्यूफक्चरिंग अमेरिकेतुन चीन मध्ये हलवले गेले. मॅन्यूफॅचरिंग जिथे होते तिथेच मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन देखील होते. उदा. एखाध्या प्रॉडक्ट सायकल मधील वेळ कमी करण्यासाठी प्रोसेस इप्रूवमेण्ट बरोबरच इनोव्हेश देखील मदतीस येते.
हे अगदी अचूक उदाहरण आहे ही नाही पण तरी प्रयत्न करतो. हॅन्ड हेल्ड स्कॅनरच्या जागी फिक्स लोकेशन स्कॅनर किंवा वेअर हाऊस मधील सामान मुव्ह करण्याच्यासाठी वापरल्या जाणार्‍या मानव चालित फोर्क लिफ्टच्या जागी रोबोट्स इ.इइ.
चीन अनेक वर्ष गपगुमान राहिला,अनेक प्रकारचे तांत्रिक स्वावलंबन होई पर्यंत आपल्या लोकांकडुन अनेक तास कामे करुन घेत राहिला,सल्पाय चेन मध्ये डॉमिनन्स मिळवत राहिला व नंतर अमेरिकेशी स्पर्धा करु लागला, अपमान करु लागला. तशी चूक आम्ही हिंदूस्थानच्या बाबतीत होऊ देणार नाही कारण चीनचा अनुभव गाठीशी आहे, त्यांना अजुक स्पर्धक नको असुन त्यांना त्यांच्या नियंत्रणात / आज्ञेत राहणारा देश हवा आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Major Lazer & DJ Snake Lean On feat MØ Official Music Video

मदनबाण,

तुमचा १८ क्रमांकाचा मुद्दा तांत्रिक स्वावलंबनाचा आहे. तर लंदाऊ बाबा बाजार विकसित करण्याबद्दल म्हणताहेत. या दोघांचा संबंध कितपत घट्ट धरावा?

बाकी, अभियांत्रिकी गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय निर्माणतंत्र ( = म्यानुफ्याक्चरिंग ) जागतिक दर्जाचं आहे. उदा. : अमेरिकेने विघ्ने आणूनही क्रायोजेनिक शक्तीयन्त्र भारताने विकसित केलंच. त्यामुळे लंदाऊ बाबांना केवळ बाजारपेठेतील वर्चस्व अभिप्रेत असावं. असा माझा अंदाज आहे.

आ.न.,
-गा.पै.

मदनबाण's picture

6 Mar 2026 - 9:14 pm | मदनबाण

गापै
केवळ बाजारपेठेतील
महासत्ता आणि महासत्ता होऊ पाहणारा फक्त बाजारपठे बद्धल बोलत नसतात आणि वागत नसतात.
असो... मी थांबतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Major Lazer & DJ Snake Lean On feat MØ Official Music Video

आत्ता जनरल जी डी बक्षी यांचे विश्लेषण पाहिले: GD Bakshi Explains Iran-US-Israel War: Missile Math, Oil Crisis & Global Escalation

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Major Lazer & DJ Snake Lean On feat MØ Official Music Video

डेटा सेंटर:
इराण ने अमेरिकेच्या अमॅझॉन आणि माक्रोसॉफ्ट डेटा सेंटरवर हल्ले केले. ( मायक्रोसॉफ्टवर डेटा सेंटरवर हल्ला केला असे इराणचे म्हणणे असले तरी ही बातमी मला अजुन पुरेशी पडताळुन पाहता आलेली नाही. ) हे सॉफ्ट टारगेट्स होते व त्यावर हल्ले होतील असे अपेक्षित नव्हते.हे पहिल्यांदाच घडत आहे की अमेरिकन टेक सुविधांना ( Hhyperscalers - अश्या देटा सेंटर सेटअप मध्ये किमान ५,००० सर्व्हर्स असतात. ) लष्करी हल्ल्याने व्यत्यय आला. यामुळे क्लाउड आणि एआय सुविधा प्रभावित झाल्या असे समजते आहे. हे हल्ले युएइ आणि बहारीन मध्ये झाले. या निमित्त्याने का होईना डेटासेंटर लोकेशच्या सुरक्षेचा मुद्दा मात्र आता समोर आला आहे. ( आपण सुद्धा यावर गांभिर्याने विचार करायला हवा ) बँकिंग सुविधा बसणे किंवा त्यांचा डेटा हॅकिंग करुन नष्ट केला जाणे हे होण्याची शक्यता आता अधिक आहे.

हुकुमाचा एक्का:
जर इराणला वाटली कि युद्धाचा वाईट भाग सुरु झाला आहे तर तो हुकुमाचा एक्का वापरु शकतो.
हा हुकुमाचा एक्का म्हणजे : पिण्याचे पाणी.
पाण्याचे महत्व आखाती देशाना किती आहे हे काही वेगळे सांगायची गरज नाही आणि इराण या सर्वांच्या प्रदेशात असलेल्या डिसॅलिनेशन प्लांट्स वर हल्ला करुन फार वाईट स्थिती निर्माण करु शकतो.
१] दुबई आणि यूएईमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सुमारे ४२% डिसॅलिनेशन प्लांट्समधून येते.
२] गल्फ सहकार्य परिषद (GCC - Gulf Cooperation Council) देशांमध्ये याचे प्रमाण उच्च पर्यंत आहे.
३] अजून कोणत्याही डिसॅलिनेशन प्लांटला थेट हल्ला झालेला नाही किंवा नष्ट झालेला नाही.
४] फुजैराह (यूएई) मध्ये इराणच्या हल्ल्याने एका पॉवर स्टेशनला नुकसान झाले, जे जगातील सर्वात मोठ्या डिसॅलिनेशन कॉम्प्लेक्सला ( Desalination Complex -खारे पाणी गोड करणे ) पॉवर पुरवते. पॉवर डिस्रप्शन चालू राहिल्यास ऑपरेशन्स प्रभावित होऊ शकतात.
५] कुवेत मध्ये, इंटरसेप्ट केलेल्या ड्रोन्सच्या अवशेषांमुळे वेस्ट दोहा इलेक्ट्रिकल पॉवर आणि वॉटर डिसॅलिनेशन प्लांटमध्ये आग लागली, काही उपकरणांना नुकसान झाले व ते कितपत झाले आहे त्याची पडताळणी चालु असल्याचे समजते.
६] दुबई मध्ये, जेबेल अली पोर्ट जवळील हल्ल्यांमुळे (जिथे दरवर्षी अब्जावधी गॅलन पाणी उत्पादन करणारे मोठे डिसॅलिनेशन युनिट्स आहेत) आग आणि अवशेष/फॉलिंग इंटरसेप्टर्समुळे डिस्रप्शन झाले,पण प्लांट्स थेट हिट झाले नाहीत.
७] डिसॅलिनेशन हे मोठे स्ट्रॅटेजिक सॉफ्ट टार्गेट आहे, जे तेलापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे कारण: काही ठिकाणी दिवस ते आठवड्यांचा पाणी स्टॉक.
८] पाणीटंचाई, मानवी संकट,मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर होऊ शकते.
९] इराणची सध्य स्थिती: "आम्ही करू शकतो,पण अजून नाही."
१०] पाणी नसल्यास जगणे अशक्य, याची कल्पना काही गडगंज श्रीमंताना माहित आहे, ते आधीच काढता पाय घेत असल्याचे समजते. ( एका तुर्की कुटुंबाने २००००० डॉलर मोजुन ओमानहुन जिनेव्हाला मुव्हमेंट केल्याचे समजते. )
११} अश्या ठिकाणी असलेल्या लोकांनी इमर्जन्सी पाणीसाठा ठेवायला हवा.
१२] कुवेत: ९०% कतार: ९९% सौदी अरेबिया: ७०% ओमान: ८६% पाणी डिसॅलिनेशनमधून मिळते.
१३] जगातील एकूण डिसॅलिनेशन क्षमतेचा ४८.५% भाग मध्य पूर्वात आहे आणि GCC देशांमध्ये सुमारे ४०० हून अधिक असे प्लांट्स आहेत. हे प्लांट्स मुख्यतः किनारपट्टीवर असल्याने, ते हवाई किंवा मिसाइल हल्ल्यांसाठी सोपे लक्ष्य आहेत.
१४] पाणी आणि अन्न टंचाई ही सगळ्यात वाईट स्थिती.
१५] इराण आणि पाणी या बातम्यांवर आता नजर ठेवा.

जाता जाता: मी या परिस्थितीत अडकलेल्या सर्व हिंदुस्थानी नागरिकांसाठी प्रार्थना करतो. _/\_

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S

१३] जगातील एकूण डिसॅलिनेशन क्षमतेचा ४८.५% भाग मध्य पूर्वात आहे आणि GCC देशांमध्ये सुमारे ४०० हून अधिक असे प्लांट्स आहेत. हे प्लांट्स मुख्यतः किनारपट्टीवर असल्याने, ते हवाई किंवा मिसाइल हल्ल्यांसाठी सोपे लक्ष्य आहेत.
थोड्या वेळा पूर्वी अमेरिकेने इराणच्या Desalination प्लांटवर हल्ला केला आहे ज्याचा त्यांनी [ इराण ने ] तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
That final sentence carried a weight well beyond the immediate incident. Across the Persian Gulf coastline from Iran sit more than 400 desalination plants operated by Gulf Cooperation Council states, facilities that produce roughly 40 percent of the world's desalinated water and that, in several countries, represent the sole meaningful source of drinking water.

संदर्भः Iran condemns US attack on Iranian desalination plant, issues a veiled threat
Iran Accuses US Of Attacking Freshwater Desalination Plant On Gulf Island

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S

मदनबाण's picture

8 Mar 2026 - 6:44 pm | मदनबाण

ज्या पद्धतीने आता हल्ले होत होते त्याची दिशा आता वाईट मार्गाकडे वळताना दिसत आहे.

Bahrain says Iran hit a desalination plant, stoking fears of attacks on civilian sites
Bahrain says water desalination plant damaged in Iranian drone attack
UAE denies striking desalination facility in Iran, senior official tells 'Post'

जाता जाता: पुढच्या तीन आठवड्यात अत्यंत वाईट घटनाक्रम घडेल असे मला वाटते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- चादरमोद माजपा मुर्दाबाद!

मोरू लोक इतक्या वेळेस तोंडघशी पडले तरी सुधारण्याचे नाव घेत नाहीत.

इराणची एक युद्धनौका भारताच्या कोची बंदरात सुरक्षित आहे. IRIS LAVAN

IRIS Dena बद्दल भारताने काहीच केले नाही पासून भारताने इराणला वाऱ्यावर सोडले पर्यंत सर्व बोंबा मारून झाल्या.

काहीही करून केवळ श्री मोदींवर राळ उडवायची एवढाच अजेंडा असलेले लोक सध्या जास्तच वैफल्यग्रस्त होऊन लिहीत असल्याने तोंडघशी पडताना दिसत आहेत.

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Mar 2026 - 4:20 pm | अमरेंद्र बाहुबली

अख्खं जगभर आपली नाचक्की झाली तरीही गोभ लोक आपल्या गोबारयुगाची स्तुती करत थकत नाहीत!

मदनबाण's picture

7 Mar 2026 - 7:45 pm | मदनबाण

Pak To Join Saudi War Against Iran? Kingdom's Defence Chief Hosts Asim Munir, Invokes Defence Pact
अभिजित चावडा यांची एक चांगली पॉडकास्ट पाहण्यात आली, थोड्या वेळा पूर्वीच मी ती पाहिली, ही बर्‍यापैकी मोठी आहे व मी साधारण १ तासा पर्यंत पाहिली आहे व नंतर उरलेला भाग पाहुन पूर्ण करणार आहे.
America Ne Khamenei Ko Maar Kar Sabse Badi Galti Kar Di | w/ Abhijit Chavda | TAMS 270

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : Nache Nache - 8K Video | The RajaSaab | Prabhas, Malavika Mohan, Nidhhi Agerwal, Riddhi | Thaman S

रामचंद्र's picture

7 Mar 2026 - 8:58 pm | रामचंद्र

हा पाकचा आत्मघातकी प्रकारच म्हणायचा. पण त्या देशाच्या नेतृत्वाला मांजराप्रमाणे कसंही पडलं तरी तोल सावरायला चांगलं जमतं.

सुबोध खरे's picture

9 Mar 2026 - 7:48 pm | सुबोध खरे

सर्व देशांकडे एक लष्कर असते जे त्या देशाच्या हिताचे काम करते.

पाकिस्तानी लष्कराकडे एक देश आहे जो त्यांच्या हितासाठीच काम करतो

असे आपल्याकडे म्हटले जाते ते याच साठी.