पाताळयंत्री चर्चा
पाताळयंत्री या शब्दाचा गर्भित अर्थ आता वेगळ्या रुपात आपल्याला समजतो आहे असे वाटते.
युद्धभूमीवर जेव्हा वरून येणाऱ्या मृत्यूची भीती वाढते, तेव्हा सैन्य नैसर्गिकरित्या जमिनीच्या गर्भात आश्रय शोधू लागते. पाकिस्तानने भुयारी युद्धतंत्र अवलंबले आहे. हा एक अतिशय धूर्त आणि खोलवर विचार केलेला लष्करी डाव आहे. पाकिस्तानने अशा भुयारी मार्गांचे जाळे विणले आहे - असणार. हे जाळे आधुनिक सॅटेलाइट आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या नजरेला सहज चकवा देत असणार. या रणनीतीचा मुख्य आधार म्हणजे अदृश्य राहून वार करणे, रसद पोहोचवणे. हे बोगदे अनेकदा इतके खोल असतात की वरून होणारी साधी बॉम्बफेक त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही.
मिसळपाव